मासे १४) जिताडा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 October, 2010 - 05:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

जिताड्याच्या कालवणाचे साहित्य :
जिताडी (कापुन, धुवुन)
लसूण ५-६ पाकळ्या ठेचुन
हिंग
हळ्द,
२ चमचे मसाला
चवी पुरते मिठ
तेल
चिंचेचा कोळ
वाटण : आल अर्धा इंच, लसूण ५-६ पाकळ्या, कोथिंबीर, मिरची १, ओल खोबर ४ चमचे.

जिताड्याच्या तळण्याचे साहित्य :
जिताड्याच्या तुकड्या
लसूण ५-६ पाकळ्या ठेचुन
हिंग
हळ्द,
२ चमचे मसाला
चवी पुरते मिठ
तेल

क्रमवार पाककृती: 

जिताड्याची खवले काढून त्याचे पोटाला चिर पाडून पोटातील घाण काढावी, शेपुट व पर काढावेत. मग जर जिताडी कापुन घ्यावी. डोके व शेपटाचा भाग कालवणासाठी वापरावे व मधल्या तुकड्या तळण्यासाठी वापराव्यात. सगळ कालवणासाठी किंवा तळण्यासाठी वापरल तरी चालतच.

जिताड्याच्या कालवणाची कृती :
टोपात तेलावर लसणाची फोडणी देउन हिंग, हळद, मसाला घालून त्यात वाटण घालावे वर जिताड्यांचे तुकडे घालावेत. वर वाटण, चिंचेचा कोळ मिठ, गरजे पुरते पाणी घालून उकळवावे. ४-५ मिनीटांत गॅस बंद करावा.

जिताड्याच्या तळण्याची कृती :
जिताड्यांना हिंग हळद, मिठ, मसाला लावुन तव्यावर लसणाची फोडणी देउन जिताड्यांच्या तुकड्या शॅलो फ्राय कराव्यात.
दुसर्‍या पद्धतीने म्हणजे आल लसुण च वाटण लाउन त्याला तांदळाचे किंवा बेसनचे पिठ किंवा रवा लावुन शॅलो फ्राय करावेत.

वाढणी/प्रमाण: 
आवडीनुसार
अधिक टिपा: 

जिताडा म्हटला म्हणजे शेतकर्‍यांना पर्वणीच असायची आधी. शेतात पाणी साचल की जिताडे येत असत. हल्ली शेतातले जिताडे खुप कमी मिळतात. खुप चविष्ट असतात शेतातले जिताडे. आता तळ्यात, खाडीत आणि समुद्रात जास्त सापडतात. तळ्यातल्या जिताड्यांना जास्त वईस वास असतो पण शेतातले किंवा खाडीतले जिताडे चवदार असायचे. पुर्वी शेतात जिताडे आले की शेतकरी ते पकडून अगदी अलिपलीकडच्या गावांतील नातलगांनासुद्धा भेट द्यायचे.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे पाहा जिताडे
Jitada.JPG

अश्याप्रकारे जिताडे कापुन डोके शेपुट वेगळे आणि मधल्या तुकड्या वेगळे करुन घ्यावे.
jitada1.JPG

तळण्याच्या तुकड्यांना मिठ, मसाला, हिंग, हळद लावुन घ्या. थोडा लिंबाचा रसही लावला तर अजुन रुचकर लागतात.
jitada2.JPG

आता तुकड्या तव्यावर शॅलोफ्राय करत ठेवा.
jitada3.JPG

ह्या आहेत तळुन झालेल्या तुकड्या.
Jitada4.JPG

जिताड्याचे तयार कालवण.
jitada5.JPG

वा.. सुगंध इतपर्यंत पोचला.

मी अलिबागला गेले होते तेव्हा खाल्लेले जिताडे. मस्त लागलेले.

एकदा बेलापुरच्या मासळी बाजारात मोठा जिताडा दिसला. (३-४ फुट लांब आणि १ फुट रुंद) मी घेऊ का असा विचार करत असताना एक म्हातारे जोडपे आले, त्यातल्या आजोबांनी जिताड्याचा एक खवला काढला आणि तो दाबुन बघितला आणि मग काहीच न बोलता पुढे निघुन गेले.

मी अंदाज मारायला हवा होता, पण आम्ही शहाणे पडलो ना.. मी अर्धा किलो विकत घेतला. घरी आल्यावर वेजिटेरियन पाहुणे जेवायला येताहेत असा फोन आला म्हणुन जिताड्याला फ्रिजरमध्ये ठेवले. दुस-या दिवशी त्याला बाहेर काढुन मस्त तळले आणि खायला घेतले तर काय... तुकडा अगदी रबरी झालेला. दातानी अजिबात तुटेना, कसाबसा अर्धा तुकडा खाल्ला आणि उरलेले १/२ किलो तुकडे मांजरीच्या स्वाधिन केले. तिनेही तुकड्यांचे मांस जितके जमेल तितके खाल्ले आणि उरलेले खायला स्वतःच्या धष्टपुष्ट बॉयफ्रेंडाला बोलावले............... तेव्हापासुन मासा घेताना आधी इतर कोणी त्याच्याकडे नापसंतीचा कटाक्ष टाकत नाही ना ते पाहते Happy

मी हल्लीच एक हेल्दी बदल शोधलाय.

माशांना मसाला लावलास तिथपर्यंत सगळ्या स्टेप्स करुन नंतर तळायचे ही शेवटची स्टेप करायची नाही. आपण मोदक कसे उकडतो तसे हे मसाला लावलेले मासे उकडायचे. माझ्याकडे राईस कुकर कम स्टिमर आहे त्यात हळदीची किंवा केळीचे पान ठेऊन त्यावर मासे १०-१२ मिनिटे उकडते. चवीला सेम तळल्यासारखे लागतात आणि तळलेले खायचेही टळते.

तु पिठ न लावता तळते. मी मासे बारीक रवा किंवा तांदळाच्या रवाळ पिठात घोळवुन तळते. आता घरातल्यांनाही उकडलेले खायची सवय लावणार. मला आधी वाटले की उकडल्यावर आमटीतल्या माशासारखा लागेल (आमटीतला जरा चवहीन होतो, त्याची चव आमटीत उतरते). पण हा खरेच अगदी तळल्यासारखा लागतो.

विरा कॅमेराचा प्लॅश आहे तो डोळ्यात. आणि न बघुन कस चालेल तुला एवढ्याला सवय व्हायला पाहीजे होती. अजुन बरेच असे फोटो तुला पहायचे आहेत.
साधना मलाही तुझ्या हातचे मालवणी प्रकार खायचे आहेत.
स्वाती ये माझ्याकडे.

किती दिवसांनी ऐकला / पाहिला हा मासा. तों पा सु !

स्वगतः भारतात आल्यावर तुमच्याकडे जेवणाचं आमंत्रण मिळवायला काय बरे करावे Happy

स्वगतः भारतात आल्यावर तुमच्याकडे जेवणाचं आमंत्रण मिळवायला काय बरे करावे

काहीही करु नका, फक्त विमानात बसा म्हणजे झाले.. Happy

वा वा! काय दिसतय कालवण (?) !!! मस्त ! ह्या सगळ्या माश्यांची नावं माझ्या बकेट लिस्टात मी लावू म्हणत होतो पण मग तर किती वर्ष जिवंत रहावं लागेल काय माहीत? Happy

वा वा ! हे मी खाल्लेत खुप. पेणला. वा काय मस्त आठव्ण दिलीस जागू Happy
चला एकतरी पदार्थ जो जागूने लिहिला अन मी आधीच खालाय Wink
फोटु तोंपासु, :हावरट बाहुली: :जीभल्या चाटणारी मांजरः ......

जागू, मस्तच दिसतेय कालवण आणि तळलेले मासेपण Happy
जिताडा फारच चविष्ट लागतो. खाऊन बघुन जमाना लोटलाय आता. तुझ्याकृपेने निदान बघायला तरी मिळतायत...

जागू, काय मस्त लागते जिताडी. डोंबिवलीला 'कोकण किंग' नावाचे आगरी लोकांचे हॉटेल आहे तिथे कळव्याच्या खाडीतली ताजी जिताडी मिळते म्हणून नणंदेच्या मिस्टरांनी अगदी हौसेने आम्हाला तिथे नेले होते. अशा शॅलो फ्राय केलेल्या तुकड्याच घेतल्या होत्या. मी आणि माझ्या भाचीने चापून खाल्ल्या Happy

जिताडं खूप चवदार लागतात कारण समुद्रातून गोड्या पाण्यात्(शेतात) येतात तेव्हा चवदार लागतात.
खूप मोठे कधीच घ्यायचे नाही. जी पिल्ले असतात ना.

मासा चिवट होतो ज्यास्त तळले की कारण त्यात असलेले प्रोटीन. हलकेच ३ मिनीटे एका बाजूला मग दुसर्‍या बाजूला तळायचा. रवा मिश्र तांदूळाच्या पीठाने कुरकुरीत होतात.

साधना, मी येतेय तेव्हा हे घालणार का खायला?

तारळी, कर्ली, मांदेली, राणे, रावस,सुरमय,बांगडे,कालवं, मोदकं,चिंबोरी? इकडचे खेकडे तेवढे काही खास नाही लागत.... हे दुर्मिळ मासे जे मला इथे कित्येक वर्षात नाही मिळाले ते मिळतील का आता तिथे?

जागू, मांदेली टाक ना.. नुसते चित्रे बघून पोटं भरू. मांदेली मिळते ना अजून भारतात?

मांदेली गॅस वरून तळल्या तळल्या अख्खी तोंडात. मी तर गॅस जवळच उभी असायचे आई तळत असताना. Happy

मनस्विनी, मांदेली अजुनही भरपुर येतात आमच्याकडे. आणली की टाकलाच फोटो म्हणुन समज.

दिपान्त, उर्मि, धन्यवाद.
आरती, पेण साईडला अजुनही शेतात मिळतात जिताडे.
वैद्यबुवा, १ माश्यासाठी किती आयुष्य ते सांगा.
मेघा, फक्त मला फोन करावे आणि माझ्याकडून पत्ता जाणुन घेउन त्यावर येणे.

अरे वा आले का जिताडे !
जिताडे हा भेट देण्याचाच मासा आहे. तो सहसा बाजारात विकत नाहीत. भातशेतीतले जिताडे, तांदळाची फुले खाऊन वाढतात. त्यांचा रंगही वेगळा असतो. आणि त्यांना तिथे नैसर्गिक शत्रू नसल्याने ते भराभर वाढतात.

मनु.. घालणार ना खायला.. मीही मासे आणेन त्या निमित्ताने.

मांदेली गॅस वरून तळल्या तळल्या अख्खी तोंडात

माझ्याही घरात सेम. माझी लेक ताट हातात घेऊन माझ्या बाजुलाच उभी असते. तव्यावरुन डारयेक्ट ताटात, ताटातुन पोटात Happy

मला शिल्लकच उरत नाहीत असे काही करायला. आधी एक वाटा घ्यायचे, आता दोन वाटे घेते, तरीही माझ्या वाट्याला काहीच नाही Happy मांदेलीच्या प्रेमापुढे लेकीला आईही दिसत नाही.. Happy

Pages