जिताड्याच्या कालवणाचे साहित्य :
जिताडी (कापुन, धुवुन)
लसूण ५-६ पाकळ्या ठेचुन
हिंग
हळ्द,
२ चमचे मसाला
चवी पुरते मिठ
तेल
चिंचेचा कोळ
वाटण : आल अर्धा इंच, लसूण ५-६ पाकळ्या, कोथिंबीर, मिरची १, ओल खोबर ४ चमचे.
जिताड्याच्या तळण्याचे साहित्य :
जिताड्याच्या तुकड्या
लसूण ५-६ पाकळ्या ठेचुन
हिंग
हळ्द,
२ चमचे मसाला
चवी पुरते मिठ
तेल
जिताड्याची खवले काढून त्याचे पोटाला चिर पाडून पोटातील घाण काढावी, शेपुट व पर काढावेत. मग जर जिताडी कापुन घ्यावी. डोके व शेपटाचा भाग कालवणासाठी वापरावे व मधल्या तुकड्या तळण्यासाठी वापराव्यात. सगळ कालवणासाठी किंवा तळण्यासाठी वापरल तरी चालतच.
जिताड्याच्या कालवणाची कृती :
टोपात तेलावर लसणाची फोडणी देउन हिंग, हळद, मसाला घालून त्यात वाटण घालावे वर जिताड्यांचे तुकडे घालावेत. वर वाटण, चिंचेचा कोळ मिठ, गरजे पुरते पाणी घालून उकळवावे. ४-५ मिनीटांत गॅस बंद करावा.
जिताड्याच्या तळण्याची कृती :
जिताड्यांना हिंग हळद, मिठ, मसाला लावुन तव्यावर लसणाची फोडणी देउन जिताड्यांच्या तुकड्या शॅलो फ्राय कराव्यात.
दुसर्या पद्धतीने म्हणजे आल लसुण च वाटण लाउन त्याला तांदळाचे किंवा बेसनचे पिठ किंवा रवा लावुन शॅलो फ्राय करावेत.
जिताडा म्हटला म्हणजे शेतकर्यांना पर्वणीच असायची आधी. शेतात पाणी साचल की जिताडे येत असत. हल्ली शेतातले जिताडे खुप कमी मिळतात. खुप चविष्ट असतात शेतातले जिताडे. आता तळ्यात, खाडीत आणि समुद्रात जास्त सापडतात. तळ्यातल्या जिताड्यांना जास्त वईस वास असतो पण शेतातले किंवा खाडीतले जिताडे चवदार असायचे. पुर्वी शेतात जिताडे आले की शेतकरी ते पकडून अगदी अलिपलीकडच्या गावांतील नातलगांनासुद्धा भेट द्यायचे.
हम्म. आयडीया चांगलीय.. मला
हम्म. आयडीया चांगलीय.. मला दोन्-चार मांदेली मिळतील अशी आशा करते...
आज बाजारात जाऊन मासे आणायची खुप इच्छा होतेय..
जागु, मी मासे खात नाही पण तु
जागु,
मी मासे खात नाही पण तु इथे टाकतेस त्या रेसिपीज वाचायला एकदम इंटरेस्टींग वाटतात
मांदेलीचे नाव ज्यास्त काढू
मांदेलीचे नाव ज्यास्त काढू नका. अरेरे मला इतकी चव येते ना... कुरकुरीत मांदेली,पापलेटं तळलेली, गरम भात, मांदेलीचे सार, कोलंबीचे सुकं, चपाती/भाकरी. आई एकच प्रकार नाही करायची. काहीतरी दोन्-तीन प्रकार असायचेच. असे ताट कोणी देइल का आता?
मांदेलीचा फोटो टाकच गं जागू
मांदेलीचा फोटो टाकच गं जागू कधी खाल्ली नाही. पण इथलं वर्णन वाचून खायला पाहिजे एकदा असं वाटायला लागलय.
जागू, तुमच्या ह्या मालिकेमुळे
जागू, तुमच्या ह्या मालिकेमुळे बरेच नविन नविन मासे कळले.. घरी मासे करत नसल्याने बाहेर मिळणारे दोन तीन नेहमीचे प्रकार खाल्ले आहेत.. पण इतक्या प्रकारचे मासे खातात हे माहित नव्हतं.
प्रत्येक लेखावर प्रतिक्रिया देत नसलो तरी वाचतो नक्की... अजून सचित्र माहिती लिहित रहा..
दुसरा फोटो बघूनच पळून गेले
दुसरा फोटो बघूनच पळून गेले एकदा मी या बी बी वरून
(मी घासफूस खाणार्या वर्गातली आहे हे सांगायला नकोच :))
पण जागू, तुला अफाट माहिती आहे ग बाई मत्स्याहाराबद्दल. एक पुस्तक लिहायला पाहिजेस खरं तर तू.
मस्तच जागू, मांदेली टाक ना..
मस्तच


जागू, मांदेली टाक ना.. नुसते चित्रे बघून पोटं भरू. >> हो हो अगदी
आम्हि चांदेली मांदेली म्हणायचो गमतीत.
आणि भरलेलं पापलेट(!!) पण टाक
< कुरकुरीत मांदेली,पापलेटं तळलेली, गरम भात, मांदेलीचे सार, कोलंबीचे सुकं, चपाती/भाकरी. आई एकच प्रकार नाही करायची. काहीतरी दोन्-तीन प्रकार असायचेच. असे ताट कोणी देइल का आता?> अगदी अगदी
अजुन दोन मागण्या. खेकड्याचा
अजुन दोन मागण्या.

खेकड्याचा रस्सा रेसिपी टाक. आणि सुळे कसे करायचे (कसे साफ करायचे ते पण)
म्हणजे इथे निदान करुन तरी बघता येईल
सावली सुळे कसे असतात ते वर्णन
सावली सुळे कसे असतात ते वर्णन कर. आमच्याइथे कदाचीत त्याच दुसर नाव असेल.
भरल पापलेट केल की टाकतेच. चिंबोरीचा रस्सा मी नाही का टाकलाय ? ठिक आहे तोही टाकेन.
मधुरा, दक्षिणा तुमचे विषेश आभार शाकाहारी असुनही तुम्ही इंटरेस्टनी मांसाहारी रेसिपी वाचता त्याबद्दल.
पराग धन्यवाद. वाचत राहा आणि रिप्लायही द्या कशा वाटल्या रेसिपिज त्याबद्दल.
मनस्विनी, फुलपाखरू आता मला तुमच्यासाठी आणाव्याच लागतील लवकरात लवकर मांदेली.
भरलेले पापलेट, खेकड्याचा
भरलेले पापलेट, खेकड्याचा रस्साअ.... तोंपासु एकदम.......
जागु, मी आले की हे सगळे कर गं.. माझी लेक मग दर सुट्टीत जागुमावशीकडे आधी जाउया म्हणुन हट्ट धरेल...
जागु, मस्तच. पापलेट सुरमई
जागु, मस्तच. पापलेट सुरमई व्यतिरिक्त बाकी हे मासे माहितीच नाहीयेत. तू लिहितेस म्हणुन कळतय तरी. धन्यवाद. आता खेकडे कसे करायचे ( अगदी आणण्यापासुन करण्यापर्यंत ) सविस्तर लिही.
तू खरोखर एक पुस्तक लिही तुला मासे अन भाज्यांचे जबरी ज्ञान आहे.
प्रिन्सेस धन्स ग. साधना तु
प्रिन्सेस धन्स ग.
साधना तु येण्याच्या एक दिवस आधी मला कळव. आणि आशु आली की तिला घेउन येत जा. माझ्याकडे दर मंगळवार, बुधवार, शुक्रवार, रविवार मच्छी असतेच.
जागू, हे मासे वगैरे माहित
जागू,
हे मासे वगैरे माहित असायची काहीही शक्यता नव्हती. तुझ्यामुळे पहायला मिळतात. खाऊ नाही शकणार कदाचीत पण कधी इच्छा झाली तर त्यात तू टाकत असलेल्या पाकृंचा वाटा नक्की असेल.
जिताडी. तपं झाली खाऊन. जागू
जिताडी. तपं झाली खाऊन. जागू आईच्या हातच्या पदार्थांची आठवण करून देत असतेस ग..
हे बघ सुळे इथे
हे बघ सुळे इथे
सावली यांचं इग्रजी नाव काय
सावली यांचं इग्रजी नाव काय आहे सांग ना ?
जागू..तोंपासु
जागू..तोंपासु रेसिपी
जिताडे,सुळे यांची इन्ग्लिश नावं सांग ना प्लीज
रैना, आर्च, मेघा, वर्षू
रैना, आर्च, मेघा, वर्षू धन्यवाद.
सावली हे मासे येतात आमच्या बाजारात. साधारण बोईटासारखे असतात.
वर्षू, जिताडे भातशेतीत
वर्षू, जिताडे भातशेतीत वाढणारे मासे आहेत. तूमच्याकडे असणार ते.
डोळ्यांत चमक आहे
डोळ्यांत चमक आहे माशांच्या...
मस्त..
विनय कदाचित फॅशची चमक असेल
विनय कदाचित फॅशची चमक असेल ती.
जिताड्याचं इंग्लिश नाव सिबास
जिताड्याचं इंग्लिश नाव सिबास आहे. जागुच्या पहिल्या फोटो वरून सांगत आहे. अगदि सहज मिळतो हा परदेशातहि. मला सिंगापोरात हि मिळतो.
अरे वा म्हणजे इथलेही काही
अरे वा म्हणजे इथलेही काही जिताडे फॉरेन रिटर्न असतील.
दोन आठवड्यापुर्वी मासेबाजारात
दोन आठवड्यापुर्वी मासेबाजारात गेले होते, मार्गशिर्ष गुरवार होता त्यामुळे शुकशुकाट होता पण माझ्याकडे खास बंगाली पाहुणे येणार होते त्यामुळे माशांना पर्याय नव्हता. तरीही एका हलव्याएवढ्याच लांब जिताड्याचे रु. २५० सांगितले....
मी फक्त त्याला डोळ्यांनीच खाल्ले आणि फोटो काढुन घेतला....
साधना फोटो कुठे आहे तो ?
साधना फोटो कुठे आहे तो ?
हा घे गं खास तुझ्यासाठी.
हा घे गं खास तुझ्यासाठी.
साधने फोटु मस्त. बुधवारी होता
साधने फोटु मस्त. बुधवारी होता आमच्याकडे जिताडा.
हा सीबास नाहि सीपर्च आहे. तसे
हा सीबास नाहि सीपर्च आहे. तसे दोन्ही कझिन आहेत एकमेकांचे.
Pages