परवा नुकतेच टीव्हीवर राजेश खन्नाचे गाणे पहात होतो. आणि माझी कन्या ई.... करून किंचाळली. मी दचकून तिच्याकडे पाहीले तर म्हणाली काय बाबा काय पहाताय? हा काय हिरो आहे? मी खरं तर चिडलो होतो. अरे एके काळी 'आराधना' पहाण्यासाठी आम्ही ब्लॅक ची तिकिटे काढली होती. शर्मिलेच्या जागी गल्लीतील लोकल शर्मिलाला पाहत गाणी गुणगुणली होती त्याचा असा हा उपमर्द?? पण नव्या पिढीला काय सांगणार...
.... नाही. मी अशी प्रतिक्रिया अजिबात दिली नाही. खरं तर कन्येच्या प्रतिक्रीयेवर मी अंतर्मुख झालो. आणि विचार करू लागलो.
आजच्या काळातील ते पिक्चर्स खरोखर आता अगदी बेंगरूळ वाटतात्.विशविशीत कथा --- बेतलेल्या, ४०-४२ मधील हिरोइन्स (बल्जिंग अॅन्ड बल्की पण) यांना आपण कसं सोसलं याचे आच्शर्य वाटले
त्यानंतर अमर,अकबर,अॅन्थनी मधील ब्लड ट्रान्स्फर सीन तिघांचे रक्तगट एकच.. अगदी कॉर्पोरशन च्या नळाप्रमाणे रक्त देतात यावेळी आपली सायन्टीफिक साइट कुठे होती हा प्रश पडला.
केवळ माँकी कसम म्हणुन ऐनवेळी मध्यंतरापुर्वी ठोकरणारा विशविशीत नायक आणि तिच्या लग्नानंतर फकाफका सिगारेटी ओढून किंवा नशा करून विरह गीते गाणारे हिरो याना आपण मानले याचीच कीव आली.
तर कघी कधी आर्ट फिल्म पहाताना पुढचा डायलॉग आपणच बोलावा अशी ऊबळ येण्याएवढे स्लो डायलॉग्ज.. आठवा... 'अनुभव' संजीवकुमार...
कधीही धूर न येणारा पाईप तोंडात ठेवून, गाउन मधील बाप ... पुढे त्याचा डायलॉग काय असणार हे तुम्ही ओळखला असणारच... हो तोच तो... खानदानकी.....
आणखी एक ... त्याकाळी राज ठाकरे असता तर.....????
मॉ मुझे तेरे हातका गाजर का हलवा .. पराठे.. राजने त्याना नक्किच हिंदी वाल्याना वडा पाव आणि पाव भाजी खायला लावली असती. राज तू पहले आना था.
आणखी एक मोठा जोक.. राजेंद्रकुमार नावाचा एक महा बोर 'नट" २५ सिल्व्हर ज्युबिल्या करुन गेला आणि जॉय मुखर्जी नावाचा एक जोकर हिरो म्हणून कार्यरत होता आणि त्याला सार्या छान छान नायिका होत्या. जल् गये उस्ताद..
काही असो या पिक्चर्सनी आमच्या पिढीला स्वप्ने दिलीत आणि मनोरंजन देखील... अजुनही ती गाणी... ते शब्द आठवतात हे त्या कवींचे आणि संगीतकारांचे काँट्रीब्यूशन ...
दिलने फिर याद किया....
७०-८० च्या दशकातील सिनेमे आणि मला आलेले हसु
Submitted by सुनिल जोग on 10 October, 2010 - 02:36
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्वात अशक्य मंजे मीना
सर्वात अशक्य मंजे मीना कुमारी. कायम प्रौढा. कायम रडायला तयार.
सुनिल शेट्टी ला ठोकळा म्हणू
सुनिल शेट्टी ला ठोकळा म्हणू नका रे. तो नारळपाणीवाला वाटतो.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
>>>
मी सुनील शेट्टीचं नामकरण "लाळगळू" असं केलंय. आमच्या घरात त्याला याच नावाने ओळखतो आम्ही. बोलायला तोंड उघडलं की याची लाळ आता गळते का मग अशा टाईपचा वाटतो त्याचा आवाज. (पटत नसेल तर कोणत्याही सिनेमातला कोणताही सीन पहा त्याचा.)
अख्ख्या अंगाला आधी आयोडेक्स
अख्ख्या अंगाला आधी आयोडेक्स लावून मग केलेले नाच >>>>
साजिर्या, वेड लागायची वेळ आलीये इकडे माझी हसून हसून![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
कालच शर्मिला आणि शशी कपूरचं
कालच शर्मिला आणि शशी कपूरचं "वादा करो नही छोडोगे तुम मेरा साथ" पाहिलं. शर्मिला सॉलिड झक्कास दिसलेय त्यात. >>>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अनुमोदन
मलाही आवडतं ते गाणं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हेमाचा पहिला सिनेमा राज कपूरबरोबरचा होता ना?? नाव आठवत नाहीये. एकदम कोवळी दिसली होती त्यात. मला वाटतं १७-१८ वर्षेच वय होतं तिचं तेव्हा. राज कपूरनेच इन्ट्रोड्यूस केलं ना तिला??
सप्नों का सौदागर... अगदीच
सप्नों का सौदागर... अगदीच आजोबा-नात असा जोडा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Love in Simla मध्ये साधना चा
Love in Simla मध्ये साधना चा डेब्यु आहे बहुतेक.. मी पाहिलाय तो चित्रपट. त्यात आधी तिचा तो फेमस साधना कट नाहीये, ती एकदम साधी असते, त्यामुळे तो मुर्ख जॉय तिच्याकडे दुर्लक्ष करतो. (सिमल्यामध्ये नेमका तेव्हाच eligible bachlors चा दुष्काळ पडलेला असतो. त्यामुळे तिला चॉइस नसतो). असल्या प्लेन जेनकडे कोण पाहणार? जरा मॉडर्न दिसावे म्हणुन तिची आजी तिची पुढची झुल्फे कापते आणि साधनाकट करते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सिमल्यामध्ये नेमका तेव्हाच
सिमल्यामध्ये नेमका तेव्हाच eligible bachlors चा दुष्काळ पडलेला असतो.>> अय्या मग चंदिगड नाहीतर दिल्लीला यायचंना.
हम दोनो आणि असली नकली या दोन
हम दोनो आणि असली नकली या दोन सिनेमात साधना अतिशय सुंदर दिसली.
अख्खी दिल्लीच दिल्लीच्या
अख्खी दिल्लीच दिल्लीच्या गर्मीतुन सुटकारा म्हणुन सिमल्याला गेलेली असते गं, फक्त most eligible bachlor लोक सोडुन,....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तेव्हाच्या बहुतेक
तेव्हाच्या बहुतेक पिक्चर्समध्ये हिरो किंवा हिरोइन सुट्टी घालवायला सिमल्याला नाहीतर काश्मिरला जायचे. मला तर जाम हेवा वाटायचा त्यांचा. आमच्याकडे (आणि आजुबाजुलाही) तेव्हा सुट्टीत कुठे बाहेर जायची पद्धत नव्हती, गेलोच तर गावी कोकणात. आपल्यालाही सिमल्याला जाता येईल हा विचार केलाच नव्हता कधी.. (आणि केला तरी एवढे पैसे कोणाच्या बाबाकडे होते :P)
हेमामालिनी आणि राज कपूरचा
हेमामालिनी आणि राज कपूरचा (तिचा पहिला) सपनो का सौदागर.
साधना (शिवदासानी) चा पहिला सिनेमा परख.
राखीचा पहिला, जीवनमृत्यू
सर्वात अशक्य मंजे मीना
सर्वात अशक्य मंजे मीना कुमारी. कायम प्रौढा. कायम रडायला तयार.>>>>> पण कोहिनूर मधील काम छान होते. थोडा कॉमेडी टाईप रोल होता.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रच्याकने, "दिल में बजी प्यार कि शहनाईया..." कोहिनूर मधलेच गाणे ना?
शशी कपूर आणि हेमा मालिनीचा अजुन एक चित्रपट "नाच उठे संसार" (कथा काय माहित नाय :)), पण लता रफिचे एक गाणे मात्र अत्यंत आवडीचे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
"तेरे संग जीना तेरे संग मरना
अब रूठे या जग छूटे हम को क्या करना......."
माझ्या मते शर्मिला सगळ्यात
माझ्या मते शर्मिला सगळ्यात छान आणि नॅचरल दिसलीये ती 'कश्मीर की कली' मध्ये. हा बहुधा तिचा पहिला हिंदी चित्रपट. त्यामुळे तिच्या डोक्यावर ते टोपलं नव्हतं. एकदम गोड दिसलेय ती या शिणुमामात.
मीनाकुमारी पाकिजात काही शॉट्स मध्ये खूपच छान दिसते. पण ती मुळातच बोजड. याच सिनेमात जे नंतर नंतर चे शॉट्स आहेत (कारण सिनेमा निर्मितीची प्रक्रिया खूपच लांबल्यामुळे) त्यात वय लपवायला तिने जे काही मेकपचे थर लावलेत ना, तसे इतर कोणी लावले नसतील. पण गाण्यांमुळे पाकिजाला सर्व काही माफ.
एक अतिशय सुंदर असलेली पण उगाच मेकप करणारी बया म्हणजे सुचित्रा सेन. 'ममता' मध्ये काही काही शॉट्स मध्ये ती सेम टू सेम माधुरी दिक्षित सारखी दिसते.
लीला नायडू तर अप्रतिम होती.
Let them speak for themselves
Let them speak for themselves
![29leela1.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u5543/29leela1.jpg)
![f2ulkvx8.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u5543/f2ulkvx8.jpg)
![madhubala9vc.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u5543/madhubala9vc.jpg)
वाव मस्त फोटू...
वाव मस्त फोटू...
>>त्यामुळे तो मुर्ख जॉय
>>त्यामुळे तो मुर्ख जॉय तिच्याकडे दुर्लक्ष करतो.
जॉय मुकर्जी च्या ऐवजी "जॉय मुर्खजी" म्हणायला हवं.
असो. ह्यात ते पहिलं ट्रेनमधलं त्याचं गाणं आहे त्यात जरा बरा दिसलाय तो. गाणं टुकार वाटलं. पहायला हवा एकदा हा सिनेमा. काहीही न करता बापाच्या जीवावर ऐश करणार्या तेव्हाच्या सिनेमातल्या कन्या पाहून त्यांचा कायम हेवा वाटलाय. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>सर्वात अशक्य मंजे मीना कुमारी. कायम प्रौढा. कायम रडायला तयार.
ट्रॅजेडी क्वीन बाबा! पण "भाभीकी चुडिया" मध्ये तो छोटा दीर बघायला येतो तेव्हा पडदा बाजूला करून बघते तेव्हा काय छान सोज्वळ दिसते. अशी वहिनी कोणालाही आवडेल.
अर्थात श्रीमंत घरातून येऊन एकदम नवर्याकडे लग्न झाल्या झाल्या चूल फु़ंकणे आणि शेणाने अंगण सारवणे लीलया करते ते सोडून द्या.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तसंच "अजीब दास्ता है ये" ह्या गाण्यात काहीही दागिने नसतानाही छानच दिसते. नादिरा मात्र साडी नेसून राजकुमारशेजारी एखादा स्त्रीपार्टी बसवल्यासारखी वाटते.
अवधूत, तो पहिला फोटु कोणत्या
अवधूत,![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
तो पहिला फोटु कोणत्या नटीचा आहे?
तो लीला नायडू चा आहे
तो लीला नायडू चा आहे निंबुडा.
जाने कसे सपनो मे खो गयी अखियाँ वाली.
ओह. मला ही नटी माहितीच
ओह. मला ही नटी माहितीच नाहीये. थोडीशी कंगना राणावत सारखी दिसतेय नाही का?? म्हणजे मला तरी तशी वाटतेय.
निंबुडा, लिला नायडू एकेकाळी
निंबुडा, लिला नायडू एकेकाळी जागतील दहा सुंदर्यांमधे गणली जायची. अनुराधा आणि ये रास्ते है प्यार के (सोबत सुनील दत्त, रेहमान आणि शशिकला ) हे तिचे चित्रपट. ये रास्ते ... चा रोल, इतका वादग्रस्त होता, कि बाकी कुणी तो करायला तयार नव्हते. ती शेवटची दिसली, ती शाम बेनेगलच्या त्रिकाल मधे.
मामी, शर्मिलाने अनुपमा मधे पण डोक्यावर टोपले वापरलेय का ? आठवत नाही. देवानंद बरोबरच्या तिचा एकमेव ये गुलिस्ताँ हमारा , मधे पण नव्हते बहुतेक.
बंगालात, एकेकाळी दुर्गा पूजेतल्या देवीचा चेहरा, सुचित्रा सेन वर बेतला जायचा. पण नंतर तिने अज्ञातवास स्वीकारला होता.
मीनाकुमारीच्या, बाली है उमरिया.. मुझे भी संग लेता जा, या गाण्याची लिंक मी दिली होती, गीता दत्त चे गाणे आहे, अवश्य बघा.
बापरे, मला लीला नायडू ही
बापरे, मला लीला नायडू ही माहीत नाही आणि वर दिनेशदांनी सांगितलेले तिचे सिनेमेही माहीत नाहीत.![Blush](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/blush.gif)
सुचित्रा सेन म्हणजे ते आंधी सिनेमात संजीव कुमार बरोबर होती ती का? मुनमुन सेन ची आई??
ती मला तरी सुंदर नाही वाटत. तिचं फेसिंग थोडंसं माला सिन्हा सारखं वाटतं.
ती मला तरी सुंदर नाही वाटत.
ती मला तरी सुंदर नाही वाटत. तिचं फेसिंग थोडंसं माला सिन्हा सारखं वाटतं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आंधीत म्हातारी झाली ती.. तिचे देव बरोबरचे 'दिवाना मस्ताना हुवा दिल...' गाणे बघ, खुप सुंदर दिसते ती.. बंगाली सुंद-या तरुणपणी अतीसुंदर दिसतात म्हाता-या झाल्यावर बोजड वाटतात...
लिला नायडु शशी कपुरबरोबर अ हाउसहोल्डर या इंग्रजी चित्रपटातही होती , खुपच सुंदर दिसलीय त्यात.
निंबुडा, ये रास्ते है प्यारके
निंबुडा, ये रास्ते है प्यारके हा गाजलेल्या नानावटी खटल्यावर आधारित सिनेमा होता. मला वाटतं ह्यानंतर भारतातील ज्युरी सिस्टीम रद्द करण्यात आली. इथे माहिती मिळेल.अर्थात सुनील दत्तसारखा नवरा सोडून रहमानच्या मागे लागणं म्हणजे शुध्द मूर्खपणा आहे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
>>सुचित्रा सेन म्हणजे ते आंधी सिनेमात संजीव कुमार बरोबर होती ती का? मुनमुन सेन ची आई??
बरोबर. मला ती फक्त "बंबईका बाबू" मधे देव आनंदबरोबर आवडली. "दिवाना मस्ताना हुआ दिल" ह्या गाण्यात छान दिसली आहे. ह्याचीही थोडी वादग्रस्त स्टोरी होती. देव तिच्या भावासारखा दिसत असतो. तो गावात येतो तेव्हा सगळे त्याला तिचा भाऊच समजतात. पण तिच्या लक्षात येतं की हा आपला भाऊ नाही, त्याच्यासारखा दिसणारा कोणी दुसरा आहे. तिला तो आवडायलाही लागतो पण जगाच्या द्र्ष्टिने तो तिचा भाऊच. असं काहीतरी कथानक आहे. चूभूद्याघ्या.
साधना, सेम पिंच ग
साधना, सेम पिंच ग![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
असेच असणार आणि त्याकाळच्या
असेच असणार आणि त्याकाळच्या रिवाजाप्रमाणे तिचे लग्न मग दुस-याशी होणार. मी पाहिला नाही हा चित्रपट.
जुने चित्रपट पाहताना मला त्याकाळच्या काही समाजमान्य रिती खुप खटकतात. तेव्हाचे काही समज आता बालिश वाटतात आणि त्यावर उभा केलेला सिनेमाचा डोलारा मग अगदी पोकळ वाटू लागतो. बरेच चित्रपट जे तेव्हा आवडलेले ते आता बघताना कंटाळा येतो, फक्त गाण्यांसाठी कित्येक चित्रपट मी परत पाहिलेत, कथानकाकडे दुर्लक्ष करुन.
सुनील दत्त व रहमान काय चॉइस
सुनील दत्त व रहमान काय चॉइस आहे
लीला नायडू खरी सुंदर. विचित्रा सिल्क साडीची जाहिरातही करत असे. व्हॉट स्टाइल. मानलं
>>जुने चित्रपट पाहताना मला
>>जुने चित्रपट पाहताना मला त्याकाळच्या काही समाजमान्य रिती खुप खटकतात
अनुमोदन, उदा. गुमराह....."हम आपके है कौन" सारखीच कथा पण शेवटी ती तिच्या नवर्याकडे म्हणजे अशोक कुमारकडे परत जाते. माझी आई म्हणत होती की त्या काळी सुध्दा लोकांना ते आवडलं नव्हतं. सुनिल दत्तला सोडून अशोककुमार कडे परत जायचं? हे भगवान!
तसंच महलमध्ये अशोककुमार त्याच्या मित्राला मधुबालाशी लग्न करायला सांगतो. अरे तिला काही चॉईस आहे की नाही? हे म्हणजे आपण दुसर्या गावी चाललोय म्हणून मित्राला सोफा घेऊन जायला सांगण्यासारखं झालं![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
तसे मनाविरुद्ध लग्न करण्याचे
तसे मनाविरुद्ध लग्न करण्याचे प्रसंग बर्याच चित्रपटात होते. देवर (धर्मेंद्र, शर्मिला, शशिकला, देवेन वर्मा),
शारदा (शारदाच ना ? राज कपूर, मीना कुमारी, शामा ) त्याकाळात तशाच समजुती होत्या.
कुणी हेमामालिनीचा (तिच्या उतारवयातला) एक चित्रपट बघितला आहे का ? ती नायिका आणि चार खलनायक होते. अत्यंत बीभत्स होता. त्यातले नाच पण तसलेच. म्हणजे ती कालीच्या रुपात. कुणाचेतरी शिर कापते आणि त्यातून गळणारे रक्त, एका थाळीत गोळा करते. यक् !
शर्मिलाच्या काही वेगळ्या भूमिका न्यू देल्ही टाईम्स. शशि कपूर सोबत. हा सिनेमा का विस्मरणात गेला कुणास ठाऊक ? गृहप्रवेश (संजीव कूमार, सारिका ), फरार (अमिताभ बच्चन, संजीव कुमार) मौसम (संजीव कुमार ) मन (आमिर खान, मनिषा कोईराला, राणी मुखर्जी, दिप्ती भटनागर, शर्मिलाची म्हातारीची भुमिका. )
उदा. गुमराह....."हम आपके है
उदा. गुमराह....."हम आपके है कौन" सारखीच कथा पण शेवटी ती तिच्या नवर्याकडे म्हणजे अशोक कुमारकडे परत जाते. >>>
स्वप्ना,![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
तुला 'हम दिल दे चुके सनम' म्हणायचंय का??
शर्मिलाचा गृहप्रवेश चित्रपट
शर्मिलाचा गृहप्रवेश चित्रपट खुप चांगला होता. घरासाठी स्वतःकडे दुर्लक्ष करुन पै पै जोडणारी आणि त्यापायात घरातील लोकांपासुन दुर गेलेली गृहिणी तिने चांगली रंगवली होती.
अजुन एक उत्तमकुमारबरोबर होता ज्यात ते दोघेही थिएटर आर्टिस्ट असतात आणि खटके उडतात... (दुरीया मला वाटते) तोही खुप सुंदर होता. त्याचा शेवटही मला आवडला नव्हता, त्यात शेवटी स्त्रीलाच अॅडजस्ट्मेंट करुन संसार वाचवावा लागतो. या सगळ्या वेगळ्या भुमिकांमध्ये ती खुप शोभुन दिसली मायनस तिचे ते घरटे. त्या घरट्याशिवायही ती सुंदर दिसलीय... आताही ती हेमासारखीच सुंदर दिसते. राखीसारखा भयाण अवतार करुन नाही घेतला तिने स्वतःचा...
जाताजाता, काय प्रकारचे आयुष्य मिळालेय यावरही माणसाचे रुप अवलंबुन राहते काय? ज्यांचे आयुष्य ब-यापैकी समाधानी गेले ते लोक कायम ग्रेसफुल दिसत राहिले, कुठल्याही फिल्डमधले... जे कायम झगडत राहिले त्यांचा तो झगडा चेह-यावरही उमटला.
Pages