परवा नुकतेच टीव्हीवर राजेश खन्नाचे गाणे पहात होतो. आणि माझी कन्या ई.... करून किंचाळली. मी दचकून तिच्याकडे पाहीले तर म्हणाली काय बाबा काय पहाताय? हा काय हिरो आहे? मी खरं तर चिडलो होतो. अरे एके काळी 'आराधना' पहाण्यासाठी आम्ही ब्लॅक ची तिकिटे काढली होती. शर्मिलेच्या जागी गल्लीतील लोकल शर्मिलाला पाहत गाणी गुणगुणली होती त्याचा असा हा उपमर्द?? पण नव्या पिढीला काय सांगणार...
.... नाही. मी अशी प्रतिक्रिया अजिबात दिली नाही. खरं तर कन्येच्या प्रतिक्रीयेवर मी अंतर्मुख झालो. आणि विचार करू लागलो.
आजच्या काळातील ते पिक्चर्स खरोखर आता अगदी बेंगरूळ वाटतात्.विशविशीत कथा --- बेतलेल्या, ४०-४२ मधील हिरोइन्स (बल्जिंग अॅन्ड बल्की पण) यांना आपण कसं सोसलं याचे आच्शर्य वाटले
त्यानंतर अमर,अकबर,अॅन्थनी मधील ब्लड ट्रान्स्फर सीन तिघांचे रक्तगट एकच.. अगदी कॉर्पोरशन च्या नळाप्रमाणे रक्त देतात यावेळी आपली सायन्टीफिक साइट कुठे होती हा प्रश पडला.
केवळ माँकी कसम म्हणुन ऐनवेळी मध्यंतरापुर्वी ठोकरणारा विशविशीत नायक आणि तिच्या लग्नानंतर फकाफका सिगारेटी ओढून किंवा नशा करून विरह गीते गाणारे हिरो याना आपण मानले याचीच कीव आली.
तर कघी कधी आर्ट फिल्म पहाताना पुढचा डायलॉग आपणच बोलावा अशी ऊबळ येण्याएवढे स्लो डायलॉग्ज.. आठवा... 'अनुभव' संजीवकुमार...
कधीही धूर न येणारा पाईप तोंडात ठेवून, गाउन मधील बाप ... पुढे त्याचा डायलॉग काय असणार हे तुम्ही ओळखला असणारच... हो तोच तो... खानदानकी.....
आणखी एक ... त्याकाळी राज ठाकरे असता तर.....????
मॉ मुझे तेरे हातका गाजर का हलवा .. पराठे.. राजने त्याना नक्किच हिंदी वाल्याना वडा पाव आणि पाव भाजी खायला लावली असती. राज तू पहले आना था.
आणखी एक मोठा जोक.. राजेंद्रकुमार नावाचा एक महा बोर 'नट" २५ सिल्व्हर ज्युबिल्या करुन गेला आणि जॉय मुखर्जी नावाचा एक जोकर हिरो म्हणून कार्यरत होता आणि त्याला सार्या छान छान नायिका होत्या. जल् गये उस्ताद..
काही असो या पिक्चर्सनी आमच्या पिढीला स्वप्ने दिलीत आणि मनोरंजन देखील... अजुनही ती गाणी... ते शब्द आठवतात हे त्या कवींचे आणि संगीतकारांचे काँट्रीब्यूशन ...
दिलने फिर याद किया....
७०-८० च्या दशकातील सिनेमे आणि मला आलेले हसु
Submitted by सुनिल जोग on 10 October, 2010 - 02:36
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तसेच आजच्या पिढीतला सुनील
तसेच आजच्या पिढीतला सुनील शेट्टी त्या पिढीला आवडत नाही.
आजच्या पिढीतही हा ठोकळा कोणाला आवडत असेल असे वाटत नाही..
दक्षे..![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सुनिल शेट्टी ला ठोकळा म्हणू
सुनिल शेट्टी ला ठोकळा म्हणू नका रे. तो नारळपाणीवाला वाटतो.
ठोकळा म्हणजे भारत भुषण, प्रदीपकुमार, जॉय मुखर्जी, वगैरे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आराधना, आनंद, बावर्ची,
आराधना, आनंद, बावर्ची, बॉबी,खट्टा मीठा, घर, गोलमाल, रंग बिरंगी, चुपके चुपके, जंजीर, दीवार,
मेरे जीवन साथी, अमर अकबर अँथनी, हम किसीसे कम नही. नमक हराम, उमराव जान अर्थ, भूमिका, यादोंकी बारात, हरे रामा, आणि भरपूर सिनेमे. मी तर नवीन सीडी कलेक्षन केले आहे जुन्या सिनेमांचे मी लैच फ्यान आहे. तेव्हा कथावस्तूला व संगीताला फार व्हॅल्यू होती.
आजकालचे सिनेमे म्हणजे सन्माननीय अपवाद( रॉक ऑन, देव डी, उडान) सोड्ता वेस्ट ऑफ मनी.
काही वर्षांपूर्वी आम्ही
काही वर्षांपूर्वी आम्ही नातवंडांनी आईच्या आईला तुझा फेव्हरेट हिरो कोण असं विचारलं होतं. तिने "भारत भूषण" असं सांगताच आम्ही सगळे वाईट्ट हसलो होतो. बिचारी आज्जी! राजेन्द्र कुमार आणि राजकुमार हे आमचे आवडते हिरो होते हे वाक्य आईने एकदाच उच्चारलं होतं. आता ह्या विषयावर आमचं बोलणं बंद आहे.
ह्या दोघांचीही गाणी लागली की मी डोळे मिटते. बिचारी मीनाकुमारी - दिल एक मंदिरमधे तिचा प्रियकर असतो राजेन्द्र कुमार आणि लग्न होतं राजकुमारशी. हा काय चॉईस आहे?
दुसरा तापदायक हिरो म्हणजे प्रदीपकुमार. वैजयंतीमालाबरोबर नागिनमध्ये वाईट दिसलाय अगदी. त्यापेक्षा साप चावलेला काय वाईट? जॉय मुकर्जी, विश्वजीत ह्या लोकांबद्दल न बोललेलंच उत्तम!
मामी, रहस्यमय पिक्चर्सचं असंच एक कलेक्शन करायची माझी पंचवार्षिक योजना गेले कित्येक वर्ष चालू आहे - गुमनाम, वो कौन थी, कोहरा, बीस साल बाद, तिसरी मंजिल वगैरे. फक्त महल घेणार नाहिये. त्यातला अशोककुमार सहन होत नाही अगदी.
फक्त महल घेणार नाहिये.
फक्त महल घेणार नाहिये. त्यातला अशोककुमार सहन होत नाही अगदी.
अशोककुमारचा 'किस्मत' ब-याच वर्षांपुर्वी टिवीवर पाहिलेला आणि त्यात त्याला हिरो बघुन धक्काच बसला. याला कधी हिरोची कामेही मिळत असत यावर विश्वासच बसेना. मी त्याला कायम कॅरॅक्टर रोलमध्येच पाहिले. त्याचे व्यक्तिमत्व देखिल तसेच होते. पण त्याची कामे अगदी ए-वन असत यात मला तरी काहीच शंका नाही. रोलमध्ये तो असला की त्या रोलमध्ये काहीतरी दम असणारच याची खात्री पटायची. मला तो 'गुमराह' मध्येही आवडला होता.
त्याने जरा वय वाढल्यावर लिड रोलमध्ये केलेल्या भुमिका मात्र आवडल्या नाहीत. म्हणजे त्याचे काम चांगले असायचे पण मुळात ते कॅरॅक्टरच आवडायचे नाही. बहु बेगम, चित्रलेखा आणि अजुनही असतील, आता आठवत नाहीत.. पण हे चित्रपट पाहुन म्हातारे लोक तरण्यांचे सोंग आणताहेत असेच वाटत राहिले.
दिसायला अतिसुंदर.. टिका करताच
दिसायला अतिसुंदर.. टिका करताच येणार नाही. >>> तरिही हेमामालिनी कधीच प्रेमात पड्ण्याच्या वयातली मुलगी वाटली नाही . कायम बाई , २ पोरांची आईच दिसली ..
'सीता और गीता' मधे मस्त होती
'सीता और गीता' मधे मस्त होती की हेमी. ती हसली की पडद्यावर चांदण्या उधळल्या जायच्या (असे मला वाटायचे
)
मला तर हेमी अजूनही प्रेमात
मला तर हेमी अजूनही प्रेमात पड्लेली मुलगीच वाट्ते. एकदा ती व धरम पाजी एकमेकांकडे बघत आहेत असा फोटो पेपरात पाहिला होता त्यांच्यातले प्रेम अगदी थ्रीडी सारखे डोळ्यात भरते. भगवान उनकी जोडी सलामत रखे!
प्रकाश कौर जी बोटे मोडत अस्तील. क्या करे!
तरिही हेमामालिनी कधीच प्रेमात
तरिही हेमामालिनी कधीच प्रेमात पड्ण्याच्या वयातली मुलगी वाटली नाही . कायम बाई , २ पोरांची आईच दिसली .. >> सायली ह्या वाक्यासाठी तुला हवं ते..![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
अरे काय लेको शोले, सीता और
अरे काय लेको शोले, सीता और गीता, जॉनी मेरा नाम वाल्या हेमाला तोड नाही. इव्हन सत्ते पे सत्ता. धरम-हेमा, बच्चन-रेखा यांची गाणी बघितलीत तर पडद्याबाहेरची केमिस्ट्री लगेच दिसते.
मला तर हेमी अजूनही प्रेमात
मला तर हेमी अजूनही प्रेमात पड्लेली मुलगीच वाट्ते
मलाही.... बागबान मध्ये त्या डिजायनर साड्यांमध्ये दिसते सुंदर, अमिताभकडे बघुन अशी हसते की वाटते आताच दोन तासांपुर्वी लग्न झालेय तिचे... परवाच एका पेपरात तिचा कधी नव्हे तो शर्टपँटमधला फोटो पाहिला. इतकी स्लिम आणि सुंदर दिसत होती की तिच्यापुढे मुद्दाम बारीक होऊन आता भयाण दिसण-या श्रीदेवी, करिश्मा इ.इ.सुंद-या झक मारतील...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नुसते लग्नच आणि दोन पोरांच्या आयाच नाहीत तर हे सगळे करुन मग नव-याच्या मागे समर्थपणे संसार सांभाळणा-या बाया दिसणा-यांमध्ये पहिल्या नंबरवर कायम आशा पारेख आणि नुतन या दोन बाया राहिल्यात. कटी पतंग मध्ये आशा राजेशची आई वाटते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कटी पतंग मध्ये आशा राजेशची
कटी पतंग मध्ये आशा राजेशची आई>>> अगदी ग म्हणून मला तो पिक्चर बघवतच नाही. सीडी आहे पण ती आराधनावरच जाते कायम अमर प्रेम व कटि पतंग बघितलेच जात नाहीत. अमर प्रेम पण मस्ताय हा.
पण ते बाळाला मारतत वगैरे मला बघवत नाही.
धन्सं गं दक्षिणा...
धन्सं गं दक्षिणा...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हेमा मालिनी 'अभिनेत्री' मधे
हेमा मालिनी 'अभिनेत्री' मधे पण अतिशय सुंदर दिसते आणि एकदम लहान दिसते !
टायटल साँग कि टायटल बॅक्ग्राउंड म्युझिक च्या वेळी योगा करताना दाखवलीये, एक्दम स्लिम आणि चेहरा तर होताच /आहेच सुंदर !!
झनक झन घुंगरू बजा रि
झनक झन घुंगरू बजा रि मतवाली...
हे गाणे कशातले आहे?
हेमा मालिनी छान दिसते यात
हेमा मालिनी छान दिसते यात वादच नाही (म्हातारपणी जास्तच ग्रेसफुल) - पण ती मुलगी दिसत नाही असं मलाही वाटतं.. बाईच दिसते कायम!
सायली, दक्षिणा - अनुमोदन!
राजेश खन्ना झीनत अमानचा
राजेश खन्ना झीनत अमानचा 'जानवर' बघितलाय कोणी.. (लेडी टारझन).
राजकुमार नामक माकडचाळे? मला सॉलिड कॉमेडी वाटतात...
(चर्चा अम्मावर गेली म्हणून हा प्रपंच.. )![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हेमा मालिनी 'अभिनेत्री' मधे
हेमा मालिनी 'अभिनेत्री' मधे पण अतिशय सुंदर दिसते आणि एकदम लहान दिसते !
याच्यात तिच्याबरोबर शशी कपुर आहे. मस्त दिसते दोघांची जोडी. यात हेमा आणि शशीचे एक द्वंद्वगीत आहे - सा-रे-ग-म-प-प- गा मेरेसंग गीत मेरे साजना. त्यात हेमाच्या तोंडी एक ओळ आहे - मै गोरी तु काला. शशी या ओळीच्या वेळी तिच्याकडे अगदी वाईट तोंड करुन बघतो. (आज तुनळीवर शोधायला पाहिजे)
वा वा अभिनेत्री, मी पाहिलाय.
वा वा अभिनेत्री, मी पाहिलाय. खरेच गोड दिसते त्यात.
कधी आर्ट फिल्म पहाताना पुढचा
कधी आर्ट फिल्म पहाताना पुढचा डायलॉग आपणच बोलावा अशी ऊबळ येण्याएवढे स्लो डायलॉग्ज >>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बॉलिवुड सिनेमे आणि डोक्याचा काहीही वापर केलेला नसणे- ही अजूनही द्विरुक्ती आहे. याचमुळे आताच्या रोबोट मध्ये रजनीकांत जेव्हा आपले स्वतःचे डोके काढून हातात घेऊन दाखवतो, ते मला भलतेच रियालिस्टिक वाटते.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आधी देवानंद, शम्मीसारखे अख्ख्या अंगाला आधी आयोडेक्स लावून मग केलेले नाच असत. आता झंडूबाम लावून कवायती नाच असतात. आधी विरहात शेरोशायरी, दारू आणि देवदासगिरी असायची. नंतर काचा आणि तत्सम वस्तू फोडायचे. आता बंदूकबाजी, राजकारण आणि हवेतल्या मारामार्या असतात. आधी पोट लपवण्यासाठी नायक ढगळ कुर्ते घालत असत. नंतर ऋषीच्या जमान्यात उन्हाळ्यातही स्वेटर घालत. नंतर गोविंदा पोटावरून लक्ष वळवण्यासाठी अगम्य रंगाचे कपडे घालणे किंवा पोटावर एखादी शबनम/पिशवी मिरवत फिरणे- हा उपाय करायचा. (आता नायक पोट काय पण छाती देखील न लपवण्यासाठी कारण शोधत असतात- हा बदल मात्र स्वागतार्ह आहे. :फिदी:)
मनमोहन देसाई, यश चोप्रांचे पिक्चर अनुक्रमे बच्चन आणि तगड्या स्टारकास्ट आणि चकचकीतपणामुळे कधी 'ईईईईईई' वाटतील ते सांगता येणार नाही. कारण यांनी प्रेक्षकांच्या कित्येक पिढ्यांना प्रचंड भाबडे बनवून टाकले आहे.
रामगोपाल वर्मासारख्यांच्या सिनेम्यांनी 'ईईईईईईई' म्हणवून घ्यायला तर एक पिढी बदलण्याची देखील वाट पाहिली नाही. करण जोहरच्या सिनेम्यांनी मात्र माझ्या हयातीतच 'ईईईईईईई' कॅटेगरीत जावे अशी फार्फार इच्छा आहे. कधी पूर्ण होते, ते बघायचे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@ साधना: www.webmallindia.com
@ साधना: www.webmallindia.com वर जाउन शोधाल, तर मिळून जाईल किनाराची VCD. मी तिथूनच घेतली.
अमी
@ बाळू जोशी: "झनक झन घुन्घरु
@ बाळू जोशी: "झनक झन घुन्घरु बजा री मतवाली" - १९७० - रातों का राजा मधले आहे. धीरजकुमार आणि शत्रुघ्न सिन्हा आठवत आहेत - हिरवीण कोण ते साफ विसरलेय.
अमी
७० मधल्याच नायक नायिकांबद्दल
७० मधल्याच नायक नायिकांबद्दल आहे का?
हेमामालिनी सुंदर होती/आहे पण तीचे जेवढे म्हणून मी (मला अक्कल आल्यावर ) टीवीवर मूवीस पाहिले ती जाडच दिसली. अजिबात नाजूक वगैरे वाटली नाही. अम्माच दिसली मला तरी. त्यामानाने ती आता एकदम स्लीम ट्रीम आहे. अभिनय वगैरे ठिक. खतर नाक हिंदी होते/आहे अजुन सुद्धा(बागबान).
हे घ्या तिच्या चाहत्यांसाठी,
http://www.youtube.com/watch?v=1jYngR77414&feature=related
सगळ्यात नाटकी तर शर्मिला. काय ते चालणे/बोलणे. तरी तिची काही गाणी आवडतात व मूवीज. आराधना मी टीवी वर पाहिलेला पहिल्यांदाच, आवडलेला. तो पाहून बरेच प्रश्ण पडले माझ्या बालमनाला पन तो विषय वेगळा.
http://www.youtube.com/watch?v=ql1-jjEPErw![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ह्या लिंक वरचे बरोबर १.७ नंतरचे तिचे लाजणे मग पुन्हा १.२८ मिनीटाल ते लाजणे.. इतके हसायला येते ना. गाणे ऑल टाईम फेव पण. मी इथे देसी अॅक्ट्रेस बनून यायचे असा ईवेंट होता दिवाळीला तेव्हा शर्मिला बनायचा प्रयत्न केलेला. नको तितके लाजायची प्रॅक्टीस केली हे वरचे गाणे पाहून. ओठ मूडपून बोलायची. डोक्यावर ते घरटे नाही मिळाले कुठे पण. मला बरा प्रतिसाद मिळाला होता.
.. दोनदा पोस्ट झाली.
.. दोनदा पोस्ट झाली.
काल हेमामालिनीचा वाढदिवस
काल हेमामालिनीचा वाढदिवस होता. ४८ सालचा जन्म.
सगळ्यात नाटकी तर शर्मिला अगदी
सगळ्यात नाटकी तर शर्मिला
अगदी अगदी.. दु:खाच्या प्रसंगी ती हनुवटी अशी थरथरवायची की मला बरेच वेळा आरशासमोर तसे करुन पाहायचा मोह झाला होता त्या वयात्..मला कधीच ते जमले नाही ही गोष्ट वेगळी..
पण मला ती बघायला आवडायची. तिचे ते कोरीव काम केलेले डोळे आणि खोल खळ्या....
पण गाणी आणि चित्रपट काय अफलातुन मिळालेत तिला.. तिचा सफर हा माझा अतिशय आवडता चित्रपट आहे.
मनु तुझा विडिओ पण टाक की, आम्ही पण प्रतिसाद देऊ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कालच शर्मिला आणि शशी कपूरचं
कालच शर्मिला आणि शशी कपूरचं "वादा करो नही छोडोगे तुम मेरा साथ" पाहिलं. शर्मिला सॉलिड झक्कास दिसलेय त्यात. फक्त तिच्या डोक्यावरचा पिसाचा मनोरा पाहून माझं डोकं दुखायला लागतं![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ते मेंदूच्यावर अजून एक मेंदू
ते मेंदूच्यावर अजून एक मेंदू उगवला असून त्यातून एक वेणी बाहेर पडली आहे असे दिसते. संदर्भ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मोजोजोजो पॉवरपफ गर्ल्स कार्टून नेटवर्क.
तिच्या मनो-याला हसताय
तिच्या मनो-याला हसताय बायांनो, पण असा मनोरा डोक्यावर बांधुन घ्यायचा आणि मग लाडे लाडे हसायचे, मान वेळावायची... इ.इ. सगळे नखरे करत चेहरा हसता ठेवायचे हे खायचे काम नाही... मी डोक्यात मेंदी घालुन केसांचा मनोरा रचला की कधी एकदा मेंदी धुते असे होते... शर्मिलाने आयुष्यभर तो मनोरा बाळगला डोक्यावर....![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
>>शर्मिलाने आयुष्यभर तो मनोरा
>>शर्मिलाने आयुष्यभर तो मनोरा बाळगला डोक्यावर
तिचं नाव "मनोरामा" असायला हवं होतं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माला सिन्हा हीसुध्दा नेहमी बाईच दिसली असं मला वाटतं. विकेन्डला Times Now वर Total Recall मध्ये Sensational Debuts म्हणून प्रोग्राम होता. त्यात Love in Simla का असल्याच काही नावाच्या पिक्चरच्या शॉटसमध्ये जॉय मुखर्जी बरा दिसत होता. अगदीच विश्वजीत टाईप नाजूक नव्हता दिसत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages