Submitted by sneha1 on 24 August, 2010 - 14:13
नमस्कार ,
मला थोडी माहिती हवी आहे.माझा फ्लॅट पुण्याला आहे.गेली २-३ वर्षे बंदच आहे.पण आता तो थोडा नीट करून घ्यायचा आहे.मला त्याला नीट स्वच्छ करून घ्यायचे आहे, पेंटिंग करून घ्यायचे आहे.फॅन्/ट्यूबलाईट बसवणे,सेफ्टी डोअर लावणे अशी कामं करून घ्यायची आहेत. तर मला अशी माहिती हवी आहे की,
-ही सगळी कामं करणारा विश्वासू माणूस कोणाला माहिती आहे का?
-पेंटिंग करायला अंदाजे किती वेळ लागेल्?घरात कोणी राहत नसताना?३ बेडरूमचा फ्लॅट आहे.
-पेंटिंगचा अंदाजे खर्च किती येईल?
कोणाला माहिती असेल तर सांगा प्लीज.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी पेंटींगबद्दल सांगु
मी पेंटींगबद्दल सांगु शकेन.
एशियन पेंट होम सोल्युशन कडुन करुन घेतले तर चांगले पडेल. आमच्या ३ बेडरुम फ्लॅट साठी ५०,००० पडले. पण सगळे तेच करतात, सफाई इ. करुन देतात. फ्लॅट मोकळा असेल तर लवकर काम होते.
२ आठवडे लागतील किमान.
धन्यवाद्,मनस्मी.चांगली माहिती
धन्यवाद्,मनस्मी.चांगली माहिती आहे.एशियन पेंट म्हणजे खात्रीचे असेलच. मी लगेच वेबसाईट बघीतली, चांगली वाटते आहे.मला माहिती नव्हतं की एशियन पेंट वाले हे पण करतात म्हणून
हा खर्च पेंट कोणता आहे त्याच्यावरही अवलंबून असेल ना?
मनस्मी त्यात लस्टर पण होता
मनस्मी त्यात लस्टर पण होता का? पेंट रोल की ब्रशने?
हो..त्यांचे वेगवगळे प्रकार
हो..त्यांचे वेगवगळे प्रकार आहेत. डीझायनर पेंट जरा महाग असतात.
किड बेडरुम च्या भिंतीवर ग्लोव्विन्ग पेंट इ करायचे असेल तर एक्स्ट्रा पडतात. आम्हाला किड्स बेडरुम ला ५००० अतिरिक्त लागले.
ते छान एक्स्प्लेन करतात. आम्ही नॉन लेडेड निवडला.
केदार, रोलने करतात. लस्टर
केदार,
रोलने करतात. लस्टर होता बहुतेक. आठवत नाही नीट. आम्ही भिंतीना नॉन लेडेड घेतले होते.
सही. मलाही माझ्या घराचे
सही. मलाही माझ्या घराचे रंगकाम करायचेय, मी सध्या शोधतच आहे. त्यांच्याशी संवाद साधून बघतो.
केदार, एक फुकटचा सल्ला: आजकाल
केदार, एक फुकटचा सल्ला: आजकाल वालपेपर्स हा पण एक चान्गला पर्याय आहे.
हो ते ही आहेच.
हो ते ही आहेच.
फॅन्/ट्यूबलाईट बसवणे,सेफ्टी
फॅन्/ट्यूबलाईट बसवणे,सेफ्टी डोअर लावणे>>>
फॅन्/ट्यूबलाईट = किती ?
सेफ्टी डोअर = किती ?
सर्व साधारन माहिती मेल करा मी तुम्हाला २-३ प्रकार चे किंमती चे अंदाज पत्रक देउ शकेन.
काम उत्तम होइल.
@ mansmi18 म्हणजे एकूण ५००००
@ mansmi18
म्हणजे एकूण ५०००० लागले ते ५००० अतिरिक्त लागलेले धरून का?
आणि लोकहो, एवढेच पर्याय. लवकर सांगा. आम्हालाही लवकरच काम करायचंय हे.
घराची देखभाल, रंगकाम,
घराची देखभाल, रंगकाम, वॉटरप्रूफिंग, सर्व तर्हेचे प्लॅस्टरिंग, सुतारकाम इ. कामांसाठी श्री. शेणोलीकर यांच्याशी संपर्क साधा. त्यांच्या कामाचा दर्जा उत्तम असून सर्व व्यवहार प्रामाणिक असतात. माझ्या घरी त्यांनी नुकतेच काम संपविले आहे. इतर २ नातेवाईकांकडेसुध्दा त्यांनी चांगले काम केलेले आहे. त्यांचे संपर्क क्रमांक आहेत - ०२०-२५४६६२६६ आणि ९८२२५-३६००६.
मंदार, ते ५००० वेगळे..एकुण
मंदार,
ते ५००० वेगळे..एकुण ५५,०००.
दोन बालकनी सेफटी डोअर्स आणि एक लिविंग रुम सेफटी डोअर -- एकुण खर्च ३३,०००. (पावडर कोटींग)
मी पण एशियन पेंट लस्टर घेतला
मी पण एशियन पेंट लस्टर घेतला होता. एक वष्र् झाले, कलर छान आहे अजूनही, पण नेरोलक लस्टर जो बबल परिणाम आहे तो एशियन पेंट लस्टर मिळ्त नाही. नेरोलक लस्टर चे बबल सम्प्रमाणात पसरलेले असतात - eck observation
एशियन पेंट चे लोकानी पण हे मान्य केले. आता कदाचीत प्रगत झाली असेलही याम्ध्ये ! पण हा पोईन्ट विचारा.