आज चंद्रुनं बकर्याशी हस्तांदोलन केलं. सारखं सारखं बकरा कशाला म्हणायचं ?आजपासुन त्याला हीरो म्हणुया. टाइप करायला मलाही सोप्पं. तर, आज चंद्रुनं हीरोशी हस्तांदोलन केलं. दोलायमान परिस्थितीत हस्त समोरच्याच्या हातात दिला आणि तो डोलत राहिला की झालं हस्त + आंदोलन! त्यानंही हस्तमुखानं आय मीन हसत मुखानं चंद्रुला छान प्रतिसाद दिला. माझ्या व्याख्येच्या ज्ञानानुसार एखाद्याच्या श्रीमुखांत हस्ताने अग्नी प्रज्वलीत केल्यावर त्याला हस्तमुख म्हणायला हरकत नाही, नाही का? श्शी: काय पुचाट विनोदाने सुरुवात केली. असो, होतं असं कधी कधी. हर्षाचा वायु अंगात शिरला की आपण काय बोलतोय त्याचा संयम राहत नाही. भान म्हणायचं का? तर आम्हाला खुप हर्ष झाला होता. हर्षच ना, चंद्रुनं सुरुवात केली होती, पण त्याला घोळात घेतलेलं नव्हतं. म्हणजे अजुन भिशी कुणाला द्यायची तो प्रश्न अनुत्तरीतच.
दुपारच्या जेवणानंतर चंद्रुनं तर सनसनीखेज बातमी आणली होती. हीरो अजुन अनमॅरीड होता. त्याचा भाऊ इथंच कुठेतरी रहातो म्हणे!
बिग बॉसच्या सो कॉल्ड सेलीब्रेटीजसारखं आम्ही एकमेकांच्या कानांत काही तरी हुंगत होतो तर नेमका वासाड्या आला. त्याकाळी बिग बॉस नव्हतं नाहीतर आम्ही पण नावं दिली असती राव! दोन्-तीन महिने असं कानगोष्टी करत राहुन एव्हढे पैसे मिळणार असतील तर राहु की खुशाल. अशा कानगोष्टी करतच तर आम्ही दोन वर्षाचं कंपनी काँट्रॅक्ट मजेत निभावलं होतं. वासाड्याला येताना बघताच मी अचानक पवित्रा बदलुन 'अरे चंद्रन, वो फाईल तुमने सेव की क्या मेरे फोल्डर मे?' असा अगदी गंभीर प्रश्न विचारला. चंद्रु भलता स्मार्ट. 'या, इन युअर फोल्डर, टु डेज डेट...' आयला, चंद्रन पण लय भारी असतो कधी कधी. वासाड्या आल्या पावली परत गेला. आम्हाला क्षणभर 'हुश्श' झालं. नंतर आख्खा दिवस वासाड्यानं मला आणि चंद्रनला कामाचा नुसता ढीग आणुन दिला. त्यामुळे आम्ही दोघे एकमेकाशी काहीच महत्त्वपुर्ण चर्चा करु शकलो नाही. फालतु वेळ गेला अगदी काम करण्यात!
दुसर्या दिवशी कार्ड पंच करुन आम्ही आपापल्या जागी स्थानापन्न झालो. उगीच वासाड्यानं गप्पा मारताना बघितलं तर पुन्हा आजही काम करायला लागेल ढीगभर.
मंडळी, ही माझी काही विधानं ऐकुन तुम्हाला असं वाटेल की आम्ही फारच आळशी, कामचुकार, राजकारणी, बडबडी, नाठाळ अशा गुणांनी संपन्न होतो की काय! नाही हो, अगदी चार चौघांसारखं सुरुवातीला आम्हीही अगदी प्रामाणिकपणानं काम करत होतो. मी तर महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करत होते ना, म्हणजे मला आपलं तसं वाटायचं. महाराष्ट्राचे नाव उंच करायचे, स्त्रीजातीचा अभिमान टीकवायचा, पुण्याची सुप्रसिद्धी करायची वगैरे वगैरे.... पण मग हळुहळु लक्षात आलं की माझी नैतीक जबाबदारी एवढीच नसुन मैत्रीला जागायचं आणि वासाड्या सारख्या नराधमांना धडा शिकवत राह्यचं, हेही माझ्या जीवनाचं इती कर्तव्य आहे! सुदैवानं माझ्या विचारांशी सहमत असलेले चंद्रु, रती, विवेक मिळाल्यानं त्याबाबतीतला उत्साह द्विगुणीत झाला होता इतकंच. जिवन की जीवन? कोणतं शुद्ध आहे?
हीरोच्या बाजुला जाण्याआधी मला माझ्या कामाच्या (कोणे एके काळी) काही गुजगोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. तुम्हाला इच्छा असेल तर! नसेल तरी ऐका. कारण हा माझा लेख आहे. मी काय वाट्टेल ते लिहिन.
हा तर, माझे काम! खरंच हो. काय दिवस होते ते. सोन्याचे. जीव तोडुन काम करायचं. वासाड्या व्वा म्हणेल अशा आशेत घरी जायचं. खुप काम करुन शीण आला असल्यानं अधिक काही न शिजवता फक्त राईस आणि दाल्-फ्राय करुन खायचं. परदेशात गेल्यावर साध्या आमटी-भाताला असं म्हणायची पद्धत असते. उगीच दर्जा वाढल्यासारखं वाटतं मग. पगार वाढीची, किमानपक्षी बोनसची सुंदर स्वप्नं बघत झोपी जायचं. सकाळी पुन्हा मंगल वातावरणात ऑफीसला हजर राहुन सर्व सुसर आणि मगरींना मऊपणानं 'गुड्ड मॉर्निंग' म्हणायचं. त्या हसण्यात आणखी एक भाव होता. साबणाच्या जाहीरातीतल्या बायका जशा निसरडं हसू टाकतात ना तसं! किंवा टूथपेस्ट वाल्या मॉडेल्ससारखं 'आम्ही रोज वापरतो, तुम्हीही वापरा....' असं दात दाखवुन. त्यातुनच दातांवर किती प्रकारच्या प्रक्रिया लोक करौन घेतात (करौनच. चुकले नाय काय टायपाला... ) ते कळायला लागलं, अगदी अक्कलदाढे पर्यंत!. अख्खा दिवस आपण बरे आणि आपला कॉम्प्युटर बरा अशा इ-ष्टाइलनं एकाच खुर्चीवर बसुन काम करायचं. मजा यायची त्यातही.
ह्या जाहीरातींवरुन एक जाहीरात आठवली, एक माणुस आपल्या बाथरूममध्ये दात घासत असतो. त्याच्या दातात कळ येते, अचानक दार उघडुन एक दाताडी तरुणी माईक, कॅमेरामन्स, फोटोग्राफर्स वगैरे बराच् मोठा जामानिमा घेऊन आत येते. रागावुन विचारते, 'तुमच्या पेस्टमध्ये मीठ आहे काय?' आता बोला! नशिब, तो बिचारा कपडे बिपडे घालुन बिलुन असतो. नाहीतर त्याचं दात घासणं असं जागतीक लेव्हलच्या ऑलीम्पिकच्या उदघाटनासारखं प्रक्षेपीत झालं तर? आणि पेस्टमध्ये मिठ घालण्यापेक्षा आम्ही मिठच पेस्ट म्हणुन वापरु. निदान तिथे तरी आमची हुकुमत असावी. देवा रे, ती जाहीरात मी जेव्हा प्रथम पाहिली तेव्हापासुन भितीनं मी दात घासताना किंवा अंघोळ करताना, अगदी 'ते' करताना सुद्धा कपडे घालुन किंवा सावरुनच बसते. न जाणो, आपल्याही दारातुन कुणी अचानक आलं तर. निदान कडी तरी घट्ट लावल्याची खात्री पुनःपुन्हा करुन घेते. आणखी एक सुरक्षिततेचा उपाय म्हणुन मोठ्याने 'मी आत आहे' अशी घोषणा करुनच आत जाते. अजुन एक भिती म्हणजे अचानक बिल्डींग कोसळली किंवा भुकंप झाला किंवा एखादं विमान आमच्या बिल्डींगमध्ये घुसलं तर! काहीही होउ शकतं हल्ली. तुम्ही पण विचार करा ह्याच्यावर.
जाउ दे, जाहीरातींवर मी आले तर तिकडेच दरवाजे ठोठावत बसेन. त्यावर वेगळा लेख लिहु या हवं तर. तुम्हीही मतं मांडु शकाल त्यावेळी. त्यापेक्षा आपण आत्ता माझ्या कामाकडेच जाउ या.
माझा पहिला दिवस. अजुन विसरता येत नाही तो सोनेरी दिवस. विमानातुन उतरल्या उतरल्या बहारीनी आतीफ मला घ्यायला आला होता. सोबत लतिका होती. वाटलंच मला लतिका म्हंटल्यावर तुम्ही भरकटणार! तुम्हाला जागेवर आणण्यासाठी, (मी ही तेव्हा अशीच जागेवर आले होते) मला लतिकाबद्दल सांगणं फा....र गरजेचं आहे. ह्या फा आणि रच्या मध्ये ते एस सारखं चिन्हं कसं टायपायचं बुआ? कळवा हं. तर लतिका. श्रीलंकन होती म्हणजे अजुनी आहे. बर्याचदा सुटीवर लंकेला जाऊन आली तरी बिचारी अजुनी 'आहे'. आणि अगदी श्रीलंकन मुलगी जशी असायला हवी तशीच आहे. उदाहरणादाखल, भाजीत हळद न घालता काळा मसाला अधीक घालावा तश्शी. पुन्हा वर्ण! नाही, हाही वर्णद्वेष नाही. पुन्हा राग इतकंच. कारण ह्याच लतिकानं नंतर माझ्या आनंदात स्क्रूड्रायव्हरचं काम केलेलं आहे. पण मी ते सांगत बसणार नाही. माझी मर्जी. तसा विवेक, चंद्रु, रती तरी कुठे गोरे आहेत. पण माझं त्यांच्यावर प्रेम आहे. मैत्रीचं हो! गोरी मीच. त्यातल्या त्यात.
ऑफीसला गेल्यावर प्रथम भेटला तो एच्-आर महिंदा. नाही नाही महिंद्रा नाही. महिंदाच. अख्या कंपनीत दोनच शाकाहारी. मी आणि महिंदा. फक्त ह्याच एका बाबतीत मी आणि महिंदा जुळले गेलो. नाहीतर एच्-आर शी ह्युमन स्टाफचं जुळणं ह्याला काहीच रीसोर्स नसतो. कंपनीत खुप उंदीर झाले तर महींदानं दोन अरबी मांजरं प्रॉडक्शन फ्लोअरला आणुन सोडली होती. शप्पथ! खोटं नाई काई, चंद्रुला विचारा हवं तर. तो अजुन त्याच कंपनीत आहे. पण ती मांजरीटली उंदरांमागे धावण्यापेक्षा कचर्यातल्या मासे-चिकनच्या तुकड्यातच आयते रमताना दिसत. शेवटी अरबी मांजरं ती, कष्ट कशाला घेतील? नंतर पिंजरे आणुन बसवल्याचं चंद्रुनं इ-मेलनं मला कळवलं होतं, मी जॉब सोडल्यावर. तसं मी, चंद्रु आणि हीरो अजुनी टच मध्ये असतो. महत्वाच्या बातम्या कळतात ना!
हीरो! तुम्ही म्हणाल ही बया विसरली की काय हीरोला. नाही, मुळीच नाही. पण त्या अनुषंगाने येणार्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगुन तुमचं ज्ञान वाढवण्याचा निर्मळ हेतु आहे हो. निर्मळ वरुन रेखाचा 'निर्मल आनंद' डायलॉग आठवला का? ह्या प्रेमकथेच्या वाटचालीत आपला 'भेजा फ्राय' होतोय की काय अशीही एक दुष्ट शंका तुमच्या मनात डोकावेल. 'लघु' नाही म्हणाले मी. मी एक बाई आहे तेव्हढा सोज्वळपणा पाळलाच पाहिजे मला. कारण हा लेख माझा नवराही वाचतो आहे. घरात महाभारत व्हायचं नाही तर. महाभारतात कसं, त्यांचे ते बाण वगैरे कसे सुइई सटाक्-सूऊऊम्-ढीशकॉण करत एकमेकांवर आदळतात आणि मग फुलबाजीसारखं रंगीत रंगीत चांदण्या उडवतात. रंगी 'बे' रंगी म्हणण्यापेक्षा रंगीत रंगीत छान वाटतं ना? तर तशा त्या बाणांसारखं आमचं भांडण असतं. अनंत प्रकारच्या बौद्धीक, शाब्दीक, तात्वीक, सात्वीक वगैरे वाद-प्रतिसादांनंतर प्रेमळ 'सॉरी' च्या चांदण्या आमच्याकडेही उडतात. सहसा त्या नवर्याच्या बाजुनं असतात. कारण वादाच्या वेळी माझ्या बाणातली दारु (फटाक्याची!) ऑलरेडी संपलेली असते.
महिंदाशी पहिली वहिली आणि अर्थातच अखेरची लाघवी भेट झाल्यावर कंपनीतील इतर सहकार्यांशी माझी ओळख परेड झाली. त्यातले ९०% लोकांची नावं ज्या क्षणी त्यांनी मला सांगितली त्याच क्षणी मी विसरुन गेले. पण लक्षात राहिला वासाड्या, चंद्रु, विवेक आणि रती.
पहिल्याच दिवशी आणखी दोन ओळखी झाल्या. त्यासुद्धा लक्षात राहिल्या. एक म्हणजे फिलीपिनी ऍना आणि बहारीनी सिद्दीका. ऍना जेमतेम चार फुट. तीचा सध्याचा जीवलग मैतर (त्या वेळचा) पाकिस्तानी होता. ऍना माझी फ्लॅट्-मेट होती. खुप सोज्वळ, प्रेमळ होती. त्यांच्यात एकावेळी एक बॉयफ्रेंड असेल तर तीला सोज्वळ म्हणतात. पण खरंच ऍना प्रेमळ होती. माझ्याबाबतीत खुप प्रोटेक्टीव होती. मला जपायची. सिद्दीका, ती बाई कुठल्याच अँगलनं वाटली नाही. बांबुसारखी बारिक आणि ए.के. हन्गलासारखा मिळता जुळता हँगिंग चेहरा. त्यावर काळा स्कार्फ (संदर्भासाठी वाचा: बहारीनमधील मुस्लिम स्त्रिया) अशी होती. ए.के. हन्गल काकांबद्दल चेष्टा करण्याचा मुळीच उद्देश नाही, पण एका बाईला तसा चेहरा जरा विचित्र वाटतं ना? मनानंही तशीच होती. तिच्या वागण्यातुन आम्हाला कळुन चुकलं होतं की तिलाही आपल्या 'हीरो'बद्दल सहेतुक कुतुहल आहे. पण आम्ही आमच्या मोहिमेपासुन तिला दूरच ठेवली. कारण आमचा हेतु जास्त पवित्र, शुद्ध भावनेनं प्रेरीत होता.
-------------
ता.क.
प्रियजणहो, काही अप्रैहार्य कारनास्तव लेखाला उशीर झाल्याबद्दल क्षमस्व! भाग तिसराला एवढा वेळ लागनार णाही ह्याची खात्री बाळगावी आनी हा भाग दुसरा वाचावा ही णम्र विणंती.
लेखाशी किंवा त्यातल्या पात्रांशी कुठे सार धम्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा. हा पुर्न स्वाणुभवाने प्रेरीत, सत्य घटणेवर आधारीत आहे.
जसे टाइप केलेय तसेच वाचावे. (हुकुमावरुण)
चु.भु.द्या.घ्या.
एक प्रेमकथा... (भाग २रा)
Submitted by पल्ली on 16 November, 2008 - 03:52
गुलमोहर:
शेअर करा
खूपच
खूपच छान........ मनापासून आवडलं........ जाहिरात या विषयावर पी.एचडी प्रमाणे प्रबंध लिहायला हरकत नाहीत...... पुढील भागाची वाट पहातेय...... अशुद्ध बोलण्यावरून आठवले...... मी एकदा काव्य संमेलनात कविता सादर करायला गेले होते..... अन तेथील परिक्षकच "पानी.....लोनी...." करत मराठी भाषेची खिल्ली उडवित होते....... तेव्हापासून कवी-संमेलनात भाग घेणे सोडले....... लिहण्याचा ओघ खूपच छान.....
जम्या हो,
जम्या हो, वाट पहुन काही तरी वाचेश वाचले.
"नशिब, तो बिचारा कपडे बिपडे घालुन बिलुन असतो. नाहीतर त्याचं दात घासणं असं जागतीक लेव्हलच्या ऑलीम्पिकच्या उदघाटनासारखं प्रक्षेपीत झालं तर?"
"वाट पहातोय, पुढच्या भागाची"
माते, धन्य
माते, धन्य आहेस......! आता पुन्हा पुढच्या भागाची वाट पाहणे आले.
एवढं खुसखुशीत लिहील्यावर वाचणारा पुढच्या भागाची वाट पाहणारच हे समजण्याइतकी सुज्ञ (किं चालु....)
तु नक्कीच आहेस. वाट मात्र मनापासुन पाहतोय.
विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.
खुमासदार >>>
खुमासदार >>> खुसखुशीत >>>
कारण हा माझा लेख आहे. मी काय वाट्टेल ते लिहिन. >>>> मी आत आहे >>> :खीखी:
पुन्यांदा मजा आली बरका वाचून
*********************
नजरेला काय हवी... स्वप्न थोडी जास्त !
लै भारी !!!
लै भारी !!!
झकास जमले
झकास जमले हो....
आता पुढील भाग लवकर येऊ देत.
मस्त
मस्त लि़हल जर मलाहि असे"
(No subject)
आता पुढचं
आता पुढचं लवकर घेवुन ये नाहीतर...
:राग::राग::राग::राग::राग:
विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.
बकर्याचा
बकर्याचा खिम होतो की काय असे वाटत होते पण त्याचा हिरो झाला
या तुकड्या तुकड्या कथेची चितरकथा तर होणार नाही ?
जे.डी भुसारे
वा.. फार
वा.. फार भारी!! जसं लिहीलं तसच वाचलं त्यामुळे धमाल आली! :)))
वि....शाल, मी
वि....शाल, मी घाबरले. मी घाबरले. आणखी घाबरवु नकोस. लिहिन, लवकरच. जालिंदर भुसार, बीएसके आभारी
देवी, एकदम
देवी, एकदम प्रतीसाद देईन असा विचार केला होता. पण रहावले णाही, त्यामुले इथे लिवत आहे, आपण धण्य आपले ळेखण धण्य, आनी उशीरही धण्य.:) मला हे चटाचट बदलणारे विषय वाचुन एक मेल आले होते त्याची आठवण झाली.
.................................................................................................................................
** खरे मित्र असाल तर तुमच्या दुखा:तही सहभागी करुन घ्या ! **
पल्ले, मस्त
पल्ले,
मस्तच !!!
<<<त्यावर काळा स्कार्फ (संदर्भासाठी वाचा: बहारीनमधील मुस्लिम स्त्रिया) >>>>> तोडच नाही...
अनु
---------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......
सहीच ह
सहीच ह पल्लि ..
नेमका किती उशीर करणार आहेस लिवायला? किती वाट बघायची?
ठमे, मी
ठमे,
मी तुझा फॅण व्हायला लागलोय.
- अनिलभाई
अणिलभाय,
अणिलभाय, लय भारी. ठांक्स.
सगळ्यांचे 'आ'भार