टोक्यो 'आऊटडोअर्स' गटग पार पडलं!

Submitted by ऋयाम on 10 October, 2010 - 08:52
ठिकाण/पत्ता: 
शिंज्युकु, टोक्यो. -- > शिनागावा, टोक्यो.

कोरिआ(द.) च्या महाराणी सौ. आडोबाई सोलकर यांचे "आध्यात्म" या विषयावरचे व्याख्यान शिंज्युकु, टोक्यो येथे
१६ ऑक्टोबर २०१० रोजी आयोजित केले जात आहे. उपासकांनी येऊन प्रवचनाचा लाभ घ्यावा.

हर हायनेस सौ. सोलकर वैनींचा (सध्या माहिती असलेला ) कार्यक्रम:
१. १४ ऑक्टो. क्षक्षक्ष येथे डेरेदाखल
--> क्षक्षक्ष जवळ असलेल्या भक्तांनी भेटुन घ्यावे.

२-१. १६ ऑक्टो. हहह येथे कोरिअन (द.) भोंडला.
* धष्टपुष्ट हत्ती हवे आहेत.
२-२. १६ ऑक्टो. शिंज्युकु येथे प्रवचन आणि अल्पोपहार.

३. १९ ऑक्टो. डेरा परत. (कोरिआ (द.) )

स्वयंसेवक :
मा. मंजिरी (१)
मा. महेश (१)
मा. सावली (१)
मा. एम्बी (?)
मा. कुसुमिता१२३ (?)
म. ऋयाम (२५)

शुभेच्छुकः
मा. वर्षा (१)
मा. रैना (१)
मा. नंद्या (१)
मा. कांदापोहे (१)
मा. अनीशा (१)
मा. राखी. (१)
आणि मा. सायो (१) इत्यादि.

* कार्यक्रमाच्या गडबडीत स्वयंसेवक अथवा शुभेच्छुकांची नावे द्यायची राहिली असल्यास निदर्शनास आणुन द्यावीत. (निदर्शन करु नये.)
* क्षक्षक्ष तसेच हहह ह्या जागा काही अपरिहार्य कारणांमुळे प्रसिद्ध करण्यात येत नाही आहेत.
* ही संधी पुनःपुन्हा येणार नसलेने, हजेरी लावुन भक्तगणांनी अगत्य येणेचे करावे.
* हार, पुष्पगुच्छ आणु नयेत. पैशाचे पाकिट चालेल.

अधिक माहितीसाठी, "watch this space!!!" Light 1

माहितीचा स्रोत: 
मायबोली, जपान बीबी.
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विकेंडर्स नावाच्या ग्रुपचा पोग्रेम आहे. त्यात आप्ले मित्र हाइच्चात्तेते सा...
नाइ गेलो तर बोम्बाबोम्ब Sad

पण लवकर निघीन. ७:३० ट्राय!

मला वाटलंच होतं ऋयाम साण तुम्ही त्या प्रोग्रामला जाणार म्हणुन इकडे उशीर करणार ते.
पण नक्की डांस बघायला जाणार की विकेंडर्सचं गाणं? Wink

ऋयामा, त्यांना माझ्या येण्याची 'गंधवार्ता' ही नाहीये. तो नवर्‍याचा मित्र आहे, त्याची बायको माझी मैत्रिण वगैरे नाहीये. त्यामुळे त्यांना काहीच न बोलण्याची कृपा करावी. हुक्मावर्न.

नाही.
कोणाचा डांस Uhoh ५०० येन तिकीट आहे ना फक्त, त्यात गाणी आणि डांस पण? प ना हो!!

चला. १००! अभिनंदन सोलकर बाई. अब दिल्ली (१५० पोस्ट्स : सायो ) दुर नही Wink

५०० येनमध्ये गाणी नी डांस? अरे वा. ५०० येनमध्ये मिळणारा यासाई तेन्दोनच माहित होता मला. Wink
हो,हो, १५०, २०० पोस्टस यायलाच हव्यात. त्यातल्या कामाच्या फक्त १०,१५ नी वायफळ बाकीच्या उरलेल्या असा रेशो पाहिजे.

एका डांस क्लासची हाप्प्योकाई आहे आधी तिथे. त्याला १ तास लागणारे. मग गाणं.
आणि ५०० येन? मी ऐकलं की फॅमिलीचे १००० येन! मग कितीही जणं या

ओह... आतुन खबर काढा की जरा. डांस कसा अहे? चांग्ला नसेल तर ज~रा उशीरा जाऊन ज~रा लवकर निघीन म्हणतो.. Lol

हो सावली. एकच. कारण 'विकेंडर्स' हे किती :युनिक: नाव आहे. चुकायचा चानसच नाही Light 1 (हा विकेंडर्स साठी हो.. Wink )

हो सायो.. ०.१:१० असं प्रमाण हवं आहे तर..

हो हो.. नक्की एकाच कार्यक्रमा बद्दल बोलतोय Lol
ऋयामसाण कालच एका मिसेस विकेंडर्स कडुन कळल्ये मला ही रुपरेषा. एकदा काकुनिन्/खाखुनिन काय ते करुन घ्या.

मंजिरी.. थांबा!!!

आता तुमच्या बंधु सेन्सेईंनाच इचारतो Wink
काकुनिन/खाखुनिन का खाकुनिन? Wink आम्ची ओळख आहे Wink
अरे! बंधुंच्या सौ. ना बुलवायचं का? त्यांना इंटरेश्ट / वेळ वै. असला तर?

नाही सावली! लहान मुलंच चांगला डांस करतात.
दोन वर्षांपुर्वी एकदा मोठ्यांनी केला होता. आणि आम्हाला पळता भु. थो. झाली होती... Uhoh

अरे मी तिकडे आपल्या गप्पांच्या बीबीवर विचारतोय कार्यक्रमाबद्दल आणि इकडे त्याच विकेन्ड कार्यक्रमाबद्दल पार वाहून जातील एवढ्या गप्पा झाल्या आहेत Sad
असो, मला पण त्या कार्यक्रमाचे निमंत्रण आले आहे. कोण कोण तिकडे जाणार आहे ?

Pages