माध्यम...

Submitted by मकरन्द परदेशी on 5 October, 2010 - 08:16

आजकाल आमच्यावर पेपरात बरंच येतंय !
कधी-कधी बर वाटतं,
पण कधी-कधी डोकंच सटकतय !! ध्रु !!
साहेब आमच्या गरीबीचंच
तुम्ही भांडवल करताय की राव ,
आमच्यावर रंजक कहाण्या लिहून
तुमचा माल तेवढा खपवताय की राव ,
कुठेतरी आमच्या गरीबीची चेष्टा होतेय,
असं समजू नका "ते तर गरीबंय ते काय करतंय" !! १ !!
आजकाल......
कुणी राजकारन्यासाठीच लिहितात,
आमच्या परीस्थितीची गुणोत्तरे बदलतात,
सत्तधाऱ्यासाठी गरीबीची दाहकता कमी,
तर विरोधकांसाठी मात्र वाढवतात,
तुमच्या लिखाणावर ते निवडणुका जिंकतंय,
पण या सगळ्यात आमचंच नशीब भाजतंय !! २ !!
आजकाल.....
तुमची वर्णनं म्हणजे निव्वळ डोळे झाकुन
हवेत मारलेले बाणच असतात ,साहेब ,
त्यातले काही निशान्यावर बसतातही
भोळ्या वाचकांची काळीजंही चीरतात.
पण त्यात खरंच किती सत्यता असतीय ,
त्याच इथं कुणालाही देणं- घेणं नसतंय !!3!!
आजकाल ......
A.C. मध्ये बसून तुम्ही गरीबीवर लीहीताय,
पण तुम्हाला कुठं माहीतीय तिची दाहकता,
म्हणुनच असते त्यात फुकटची अलंकारीकता,
कारन तुम्ही ते फ़क्त ऐकलेलंच असतंय,
सत्य समजायला हे सगळ अनुभवावं लागतंय.
सकाळी खाल्यावर रात्री उपाशी झोपावं लागतंय.!! ४!!

आजकाल आमच्यावर पेपरात बरंच येतंय !
कधी-कधी बर वाटतं,
पण कधी-कधी डोकंच सटकतय !! ध्रु !!
- मकरंद परदेशी (C.O.E.P.-2010)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मायबोलीवर स्वागत रे Happy मस्त आहे कविता.
फक्त लिहितांना शुद्धलेखनाची काळजी आणि कोणत्या अक्षरासाठी कोणतं बटण दाबायचं ते (?) ह्याच्यावर क्लिक करुन पहा. मग लिखाणाची मजा आणखी वाढेल Happy
पुलेशु.