Submitted by माणक्या on 1 October, 2010 - 01:47
माहीत होतं कधी ना कधीतरी हे तर होणारच होतं
ओठातून निसटलं तरी स्पर्शातून वेध घेणारच होतं
उगाच कवटाळले आभास आसही उराशी दिनरात
संध्याकाळ येता डोळ्यातून सारं निखळणारच होतं
झाकाळून आलेले नभ निश्चल वारा लवलेली पाती
अं हं! फक्त तुझंच नाव घेताना गलबलणारच होतं
जगावेगळी नव्हती माझी दिनचर्या तू भेटण्याआधी
तळमळताना वेळेचं भान नंतर तसं हरणारंच होतं
निरोपाचे शब्द नव्हते तुझ्या ओठी, तरी कळले ते
साधं बोलतानाही थरथरले तेव्हा, कळणारच होतं
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
(No subject)
क्या बात है!!! सुंदर रचना
क्या बात है!!!
सुंदर रचना
आवडली
आवडली
झाकाळून आलेले नभ निश्चल वारा
झाकाळून आलेले नभ निश्चल वारा लवलेली पाती
अं हं! फक्त तुझंच नाव घेताना गलबलणारच होतं>> अहाहा...डायरेक्ट दिलसे...मस्त
धन्यवाद मित्रांनो!
धन्यवाद मित्रांनो!
निरोपाचे शब्द नव्हते तुझ्या
निरोपाचे शब्द नव्हते तुझ्या ओठी, तरी कळले ते
साधं बोलतानाही थरथरले तेव्हा, कळणारच होतं
सही....