paris trip sathi madat

Submitted by तेज१६ on 27 June, 2010 - 03:10

hello,

amhi tighe jan (including 3 warshacha mulga) 4 divsachya paris trip sathi 2 athavdyat jaat ahot. Kuni changla hotel suchwu shakel ka ? amhi vegeterian ahot, tyamule jawal indian restaurant aslela shakyato hawa ahe..mi forum war wachla, pan hotel baddal chi mahiti 2002 saal chi ahe, mhanun kahi navin suchana astil tar please dya..dhanyawaad.

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तेज,
मी पण पॅरीसला २-३ वर्षांपूर्वी गेले आहे. आम्ही तेव्हा holiday inn मध्ये राहिलो होतो. पण तू कुठेही राहिलीस तरी काही फरक पडत नाही कारण मेट्रो सेवा खूपच उत्तम आहे.
भारतीय हॉटेल्स तर भरपूर आहेत. मेन रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडल्यावर डावीकडे एक गल्ली दिसेल. तिथे सलग ३-४ भारतीय हॉटेल्स सापडतील. लुव्र म्यूझिअमच्या जवळ पण सापडतील.
तुझ्या बाळासाठी कोणत्याही हॉटेलमध्ये पॅनकेक, वेज पास्ता , पणिनी असे प्रकार सापडतील.
मुलासोबत जाते आहेस तर पॅरीस दर्शनासाठी तिथली हॉप ऑन हॉप ऑफ ची बस घेणे खूप सोयीचे. सर्व ठिकाणे बघून होतात. आपल्याला शोधत बसावे लागत नाही. प्रत्येक ठिकाणची माहिती बस गाइड मध्ये मिळते. स्वस्तही पडते.
मजा करा. पॅरीस मस्त आहे. Happy

Sacré-Cœur बसिलिका ला हॉप ऑन-ऑफ बस जात नाही. मुलाबरोबर जात आहात तर Disney world चुकवू नका. तसे २ दिवस कमी पडतात, एका दिवसात बरेच काही पाहता येईल (Disney World मध्ये). शक्य असेल तर Pram (baby stroller /बाबा गाडी) न्या, मुलगा थकून जाईल दिवसभर चालून, अथवा हॉटेल मध्ये चौकशी करा. खिसा/पाकीट सांभाळा.

मायानी सगळं व्यवस्थित सांगितलंच आहे. Gare du Nord रेल्वे स्टेशन शिवाय Arc de Triomph, Eiffel tower जवळही एक-दोन भारतिय रेस्टॉरंट सापडतील. पॅरिसमधे हॉटेल थोडं महाग असेल (~ १०० युरो) पण खुद्द पॅरिसमधे राहायची मजाच निराळी!
आम्ही युरोपात हॉटेल बुक करायला ही साईट वापरतो... http://www.hrs.com ...सोर्ट करायचे बरेच ऑप्शन्स आहेत शिवाय नकाशावरपण दाखवतात.
पॅरिसमधे फिरण्याबद्दल सगळी माहिती इथे मिळेल... http://www.ratp.com (उजविकडे-वर Tourist Information वर टिचकी मारा)
तुम्ही अगर तुमचा मुलगा कधिच Disney World (किंवा तत्सम) ला गेला नसेल किंवा जायची फारफार्र इच्छा असेल तरच जा, नाहितर उगाच एक दिवस वाया जाइल.

सॅमशी सहमत. तुझा मुलगा तीन साडेतीन वर्षांचा असेल तर त्याला तिथे दिवसभर करण्यासारखं काही नसेल. मोठ्या मुलांना जास्त मजा येते.
आम्ही युरोपात हॉटेल शोधण्यासाठी booking.com ही साइट वापरतो.
सॅमने सांगितलेल्या साइट पण बघेन Happy

अमेरिकेत येता येण्याची शक्यता नसेल तर Euro Disney ला जावे अन्यथा दोन्हीकडे जाऊन आल्यानंतर अमेरिकेत Disney World जास्त आवडले... Happy
पॅरिसमधे भारतीय भोजनालये सोडल्यास बाकी बोंबच होती (निदान १०/१२ वर्षांपूर्वी).
क्रेप्स वगैरे मिळतील पण Veg नीट कळणे कठिण..
Eifel tower वर संध्याकाळी उशीरा गेल्यास रात्रीचे लाईट बघायला मस्त वाटेल..

>> Veg नीट कळणे कठिण
टुरिस्ट एरिआतील हॉटेलात सगळे व्यवस्थित इंग्रजी बोलतात. पण इंग्रजीची बोंबच असेल तर फक्त व्हेज मागवायला हे सांगा:
- नो विअँद (=मांस), नो पोसाँ (=मासे), नो पुले (=चिकन)... सुलमाँ (=फक्त) लेग्युम (=भाज्या)
शिवाय भारतीय सोडुन अजुन काही ठिकाणी व्हेज मिळेल:
- इटालियन: पास्ता/पाने अवेक (=with) सॉस नापोलितान/अराबिआता/..., राविओलि एपिनार्ड (=पालक), पिझ्झा लेग्युम (=भाज्या), पिझ्झा मार्गारेटा, पिझ्झा थ्वा/कॅथ्र (=३/४) फ्रोमाज (=चिज)
- मोरोक्कनः कुसकुस लेग्युम (=भाज्या)
- लेबनिज
- डोनर कबाब/सँडविच: फ्रोमाज (=चिज) पानिनी+फ्राईज ....
- मॅक-डी मधे व्हेज काहिही मिळत नाही.
- Very very IMP भारतीय हॉटेलातील जेवणाकडुन जास्त अपेक्षा ठेउ नका... पोट भरणे एवढाच उद्देश असावा (समोसा कदापी मागवु नका!)

... आणि जर तुम्ही अंडही खात नसाल तर घरुन घेउन या (स्वतःच्या) किंवा किचनवालं हॉटेल घेउन स्वतः जेवण तयार करा.

>> Eifel tower वर संध्याकाळी उशीरा गेल्यास रात्रीचे लाईट बघायला मस्त वाटेल.
दर तासाच्या पहिल्या पाच मिनिटात विशेष रोषणाई असते पण सध्या उन्हाळ्यात हि रोशणाई रात्री ११ शिवाय दिसत नाही. जर तुमचे हॉटेल मेट्रो स्टेशन जवळ असेल तर काही प्रोब्लेम नाही. मेट्रो साधारण १२:३० ते ०१:०० पर्यंत चालु असतात. रात्री १२:०० वाजता मेट्रोनी जाण्यात तसा काही धोका नाही.

हॉप ऑन हॉप ऑफ ची बस घेणे खूप सोयीचे>> तसेच हॉप ऑन हॉप ऑफ ची बोट पण असते ती पण चांगली आहे. नदीतुन फिरताना मजा येते.
- Very very IMP भारतीय हॉटेलातील जेवणाकडुन जास्त अपेक्षा ठेउ नका... पोट भरणे एवढाच उद्देश असावा (समोसा कदापी मागवु नका!)>> अनुमोदन. अतिशय कळकट्ट होटेल्स आहेत. मी फक्त इडली /डोसा खाल्ला नंतर सरळ व्हेज पिझा खाल्ला.
शांझेलिझे (सॅम असाच उच्चार आहे ना? स्पेलिंग काहीच्या काही आहे) वर पायी फिरत window shopping जरुर करा.

हॉप ऑन हॉप ऑफ खरच सोयीची आहे आणि सॅम नी सांगितल तसं http://www.ratp.com वरची माहिती वाचा. टुरिस्ट एरिया मधे खाण्याचे बरेच पर्याय मिळतील पण अंड पण खात नसाल तर किचनवालं हॉटेल बघा कारण अंड इथे कशातही असु शकत.
जेवणाचे हाल वगैरे काही होत नाहीत आणि घरगुती जेवावं वाटलं तर आमच्याघरी (मी सॅमची सौ.) स्वागत आहे.

कुणी आहे क इथे ? मी १८ ऑगस्ट ला पॅरिसला येत आहे ४ दिवसांसाठी. जरा कुठला पास घ्यावा फिरण्यासाठी ती माहिती हवी होती, कोणी देऊ शकेल का ? मी खरतर आधी ब्रुसेल्सला येत आहे आणि तिथून पॅरिसला. जरा संभ्रमात आहे की नीस करता येइल का नाही. १८ ला सकाळी ब्रुसेल्सला उतरणार आणि लगेचच पॅरिसला येणार असा विचार आहे. मग ४ दिवस पॅरिसला राहून मग नीस करावे किंवा परत ब्रुसेल्सला जावे ब्रजेसवरून असा विचार आहे. जरा कोणी सुचवू शकेल का, कुठला पर्याय जास्त चांगला ते ?