Submitted by अ. अ. जोशी on 3 October, 2010 - 09:07
जरी सदा शांत मी भासतो
कधीतरी मीसुधा पेटतो
किती धरा मार्ग आपापला
कुणी उगाचच पुन्हा भेटतो
गुणाप्रमाणे समाजात मी
वयाप्रमाणे कुणी पाहतो
कधीच मी सोडली काळजी
तरी तुझा चेहरा भावतो
जगू नको तू दुराव्याविना
तुझ्यावरी जो सदा भाळतो
कळेल का झगमगाटास या...?
जगात साध्या 'अजय' राहतो...
गुलमोहर:
शेअर करा
जरी सदा शांत मी भासतो कधीतरी
जरी सदा शांत मी भासतो
कधीतरी मीसुधा पेटतो >>>>>>
हे छान ..
छान.
छान.
संदीप, गंगाधर धन्यवाद!
संदीप, गंगाधर धन्यवाद!
एक छोटा बदल केला आहे.
एक छोटा बदल केला आहे.