गणपतीच्या कार्यक्रमांना
रात्री दहाचा चाप आहे
आयपीएलच्या तमाशाला मात्र
सर्व काही माफ आहे
~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~
गवयांच्या सवाईला चावला
समानतेचा साप आहे
रस्त्यावरच्या नमाजाला मात्र
सर्व काही माफ आहे
~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~
कसाबला बिर्याणी अन्
अफझलला शांत झोप आहे
काश्मिरी पंडितांना मात्र
ट्रांझिट कँपचा शाप आहे
~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~
अमरनाथाच्या भक्तांना
उघड्यावरच आसरा आहे
आपलीच जमीन मागताना
आपलाच आवाज कापरा आहे
~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~
दादोजीं, रामदास खलनायक अन्
अफझलखान मात्र 'हाजी' आहे
ब्रिगेडवाल्या राज्यकर्त्यांची मात्र
मॅडमपुढे हांजी हांजी आहे
~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~
त्यांनी लुटली अब्रू, अहो लुटू द्यावी!
सहिष्णूतेचा गुंता आहे
आपल्याच लोकांचा झालेला
वैचारिक सुंथा आहे
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
जाता जाता एक खवचट (काहीच्या काही) चारोळी....
आज कुंकू मागासलेले अन्
टाईट जीन्सला 'पोच' आहे
आईचा सल्ला स्वेच्छा अन्
सासरची प्रथा 'जाच' आहे...
झक्की, आशु, वर्षा सर्वांना
झक्की, आशु, वर्षा सर्वांना धन्यवाद. अतिशय सुंदररित्या विचार मांडले आहेत त्याबद्दल. अक्षरी आणि नंद्या यांनाही धन्यवाद.
रच्याकने, आशु तुला कॅश/चेक न देता बार्टर ने फी दिली तर चालेल का?
![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
संतापाच्या लाह्या फुटल्या
संतापाच्या लाह्या फुटल्या आहेत सगळ्या.
उदे ग अंबे उदे ग
ह्यांत त्यांचे चुकीचे आहे असे
ह्यांत त्यांचे चुकीचे आहे असे नाही. जगातील सर्व जणांना एकाच संस्कारात, एकाच धारणेत घडविणे केवळ अशक्य आहे.(हे कितीही योग्य असले तरी स्वप्निलच विचार आहेत) म्हणुन मग कुठेतरी आपापला कळप, कंपु, जाति, जमाती हे form होतच राहील. आणि हे असेच घडत राहील.
नाहि. मी असे नाहि म्हणत कि " जगातील सर्व जणांना एकाच संस्कारात, एकाच धारणेत घडवा" मी फक्त म्हणतो आहे कि खरोखर आपण असे एका कंपुतले- ब्राहंण्/मुसलमान वगेरे असतो का ह्याचा शोध घ्या. एकदा तेवढी प्रगल्भता आली कि कोणत्याहि अशा प्रकारच्या कंपुत सामील होणे शक्य नाहि.
हे देखील स्वप्निलच विचार आहेत- . पण दुसरा मार्ग आहे ? नाहितर जे होत आहे ते होत आहेच कि आणी होतच राहणार आहे. केवळ एखादा विचार स्वप्निल आहे म्हणुन स्वताला एखाद्या कंपुतला आहे असे मानायचे आणी दुसर्या कंपुतल्यावर अत्याचार करायचे हे तर बरोबर नाहि ना ?
गणू. ला जोरदार
गणू. ला जोरदार अनुमोदन.
लोकांच्या जगण्याच्या लढाया वेगळ्या आहेत, त्या गरजा पूर्ण होत नाहीत म्हणून कोणाला सात्विक वा कसलाच संताप येत नाही. देशातला कुठलाही प्रश्न 'परकीय आक्रमकां'शी जोडला की झाले. आता या चारोळ्यात असे कुठे लिहीले आहे असले तांत्रिक प्रश्न विचारु नका. मंदारचे 'थॉट्स' कुठल्या 'बंच' मधून येतात ते त्याने ही कधी लपवलेले नाही. त्यामुळे सरळ तसा उल्लेख नसला तरी उद्देश तोच आहे.
लोकांच्या जगण्याच्या लढाया
लोकांच्या जगण्याच्या लढाया वेगळ्या आहेत, त्या गरजा पूर्ण होत नाहीत म्हणून कोणाला सात्विक वा कसलाच संताप येत नाही.
--- संतापच येत नाही हे म्हणणे धाडसाचे ठरेल. तोडफोड, जाळपोळ केली तरच हा सात्विक (??) संताप येतो असे आपण म्हणणार कां?
मुंबईला रोज कामावर ये-जा करणारी मंडळी रेल्वे सेवा विस्कळीत वा विलंबाने सुरु असल्यास दगडफेक करते असे मी अनेक वेळा वाचले आहे. किंवा मनमाडात चार तास गाडी थांबल्याने प्रवाशांनी नास-धुस केलेली आपण बघतो.
पोलीस शिपाई भरती साठी १०,००० अर्जदार दिवसभर ताटकळत मैदानात उभे होते. सायंकाळी ४.३० पर्यंत अर्ज स्विकारण्याचा घोळ सुरु होता... शेवटी परिक्षा, चाचणी रद्द केल्याचे घोषित झाले... पुढे काय होते?
रेशन च्या दुकानावर रॉकेल वा साखर घेण्यासाठीच्या भल्या मोठ्या रांगेत तब्बल दोन तास १०० लोकं उभे आहेत. ३० लोकांना रॉकेल दिल्यावर दुकानदाराने संपले म्हणुन पाटी लावली.... लोकं शांततेने चुकार शब्द न बोलता घरी जातील?
@मंद्या -- मला परत विसरलास
@मंद्या -- मला परत विसरलास ना?? ( राग )
गणु, प्रथम मी तुम्हाला हे
गणु, प्रथम मी तुम्हाला हे सांगु इच्छिते कि तुमचे म्हणणे चुकीचे आहे असे मी कधिच म्हंटले नाही. माझ्या वरिल पोस्ट मधे देखिल मी हेच म्हंटले आहे कि तुमचे विचार मला पटतात, कारण बहुतांशी माझे विचार देखिल तसेच आहेत. पण मी आजकाल कोणाचे मतपरिवर्तन, किंवा माझे बरोबर तुमचे चुक असं म्हणायला जात नाही कारण मला हे माहीत आहे कि प्रत्येक जण आपापल्या जागी थोडा बहुत बरोबर असतो.
एकदा तेवढी प्रगल्भता आली कि कोणत्याहि अशा प्रकारच्या कंपुत सामील होणे शक्य नाहि. >>
जसे मी माझ्या वरील पोस्ट मधे लिहीले आहे कि सर्व एकसारखे नसतात, आजुबाजुचे surrounding, बालपणीचे संस्कार, अनुवंशिक जिन्स अशा अनेक गोष्टी , factors मनुष्याचा स्वभाव, विचार करण्याची पद्धत आणि त्या अनुशंगाने त्याची प्रगल्भता ठरवित असतो.
त्यामुळे सर्वांना समान प्रगल्भता असणेच शक्य नाही. त्यामुळे आपण कितीही पोटतिडकीने काही सांगितले तरी ते समोरच्याला पटेल असे नाही. कारण त्याला त्या गोष्टीचे आकलन त्याच्या कुवतिनुसारच होत असतं.
प्रत्येकाची वेगवेगळी मते असतात आणि दुसर्याचे मत एकदम कोरी पाटी ठेवुन स्वच्छ मनाने समजुन घ्यायचे , हे सर्वांना नाही जमत.
management training मधे आम्हाला shift of paradigm ची concept शिकवण्याकरिता एक चित्र दाखविले होते. बहुतांशी लोकांना त्या चित्रात फक्त एकच चित्र दिसायचे , म्हणजे काही जणांना एक म्हातारी बाई दिसायची, तर काही जणांना एक छोटी लहान मुलगी. पण जेव्हा त्या lecturer नी सांगितले कि ह्या चित्रात दोन चित्रे आहेत आणि ह्यांत एक म्हातारी व एक लहान मुलगी अशी दोन्हीही चित्रे आहेत तेव्हा सर्वांच्या चेहेर्यावर एक अत्यंत आश्चर्यजनक भाव आले. मग सर्व जण त्याच चित्राकडे एका वेगळ्या नजरेने बघु लागले. ज्यांना पहिले फक्त म्हातार्या बाईचे चित्र दिसले त्यांना आता छोटी मुलगी देखिल दिसु लागली आणि vice a vera. तो आनंद खुप वेगळा होता जेव्हा दोन्ही चित्रे एकाच चित्रात दिसली तेव्हा. अरे म्हणजे आपण किती एकाच बाजुने विचार करत होतो, दुसर्या बाजुने विचार केला तर हे देखिल दिसले असते आणि ते देखिल तितकेच खरे आणि सच्चे आहे हे जेव्हा कळतं तेव्हा आयुष्यच बदलत.
(मला ते चित्र नेट वर मिळाले तर मी जरुर पोस्ट करेन.)
आपल्या स्वतःच्या विचारप्रवाह, मताच्या एकदम विरुद्ध किंवा त्याच गोष्टीला एकदम नविन आणि वेगळ्या दॄष्टीने बघणं सर्वांना नाही जमत आणि ते तुम्ही जमवा असा आग्रह आपण तरी का धरावा? तेव्हा जे चालले आहे ते चालु द्यावे अशा मताची मी आहे.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हि अशी माणसांची, मतांची विविधता आहे म्हणुनच तर जग एव्हडे exciting आहे, नाहीतर काय सर्वच गोड गोड झाले असते आणि आपण त्याला देखिल कंटाळुन गेलो असतो.....
(हे झाले माझे आणि सर्वस्वी माझे मत)..... मी स्वतः कुठल्याही एका प्रवाहाची, पक्षाची, कंपुतील.. वैगरे नाही.
वर्षा, हेच चित्र ना... ?
वर्षा, हेच चित्र ना... ?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हो विशाल हेच चित्र.
हो विशाल हेच चित्र.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गणु आगाऊपणा करु
गणु आगाऊपणा करु नकोस.............
आगावा, गणुपणा करु नकोस............
आगावा, गणुपणा करु
आगावा, गणुपणा करु नकोस............ >>>> कळळं का बे?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
बाबानु ___/\____
बाबानु ___/\____![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
वर्षा.नायर चांगले लिहिले आहे
वर्षा.नायर
चांगले लिहिले आहे तुम्हि. पण तुम्हि बरोबर उलटे लिहिले आहे.
मी बोलत आहे अशाच प्रकारच्या conditioning बद्दल जे एकाच प्रकारे विचार करायला शिकवते. एकदा लहानपणी conditioned केले "तु ख्रिश्नन आहेस" कि तुम्हि त्यात हरवुन जाता. मग स्वताला ख्रिश्नन समजले जाते. "येशु ने सत्य शोधले आहे. आता तु येशु वर विश्वास ठेव" बस्स! आता तुम्हि आंधळे झालात.
कोणत्याहि गोष्टीवर आंधळा विश्वास ठेवायची गरज नाहि हेच तर मी सांगतो आहे. ज्या क्षणी आंधळा विश्वास ठेवला त्याच क्षणी शोध संपतो. देव मानणार्या किती जणांना देव भेटला आहे ? पण विश्वास ठेवला जातो.किवा अविश्वास ठेवला जातओ. पुर्ण आयुष्य का जाइना,. एवढी घाइ काय आहे जाहिर करायची स्वताचा आंधळा विश्वास ? पण स्वताचे condition झालेले असते. मग उरते फक्त ते condition पुर्ण करण्यासाठी दावे करणे आणी ते दावे सिद्ध करण्यासाठी जमेल त्या मार्गाचा वापर करणे.
एखाद्या चित्रातुन म्हातारा दिसतो का तरुण, माणूस दिसतो का घोडा यावरुन कोणी मार्यामार्या नाहि करत. हि creativity आहे, innovation आहे. एखाद्याला एका चित्रात घोडा दिसला म्हणुन तो तेच धरुन बसत नाहि आणी ज्याला माणुस दिसला त्याला बडवत नाहि. त्याने तसे केले तर आपण त्याला वेडे म्हणु.
नुसताच संताप करु नका आणि
नुसताच संताप करु नका आणि नुसत्याच प्रतिक्रिया देऊ नका अश्या चारोळ्या जागोजागी पोस्टर लावा.
मंदारच्या संतापाची एक सात्विक
मंदारच्या संतापाची
एक सात्विक चारोळी आहे
विनाकारण राग देणार्यांना
मा.बो.करांची आरोळी आहे...
चांगले लिहिले आहे तुम्हि. पण
चांगले लिहिले आहे तुम्हि. पण तुम्हि बरोबर उलटे लिहिले आहे. >>> गणु, मला वाटतं आपण दोघेही वेगवेगळ्या विषयांवर बोलत आहोत. मी ह्या बीबीवर प्रतिक्रीया दिली हेच माझे चुकले बहुधा.
माझी हि शेवटची पोस्ट आहे, तुम्हा सर्वांचे चालु द्या. Enjoy.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
गणु, मला वाटतं आपण दोघेही
गणु, मला वाटतं आपण दोघेही वेगवेगळ्या विषयांवर बोलत आहोत.
बरे झाले कळले , पण फार उशीरा कळले.
नुसताच संताप करु नका आणि नुसत्याच प्रतिक्रिया देऊ नका अश्या चारोळ्या जागोजागी पोस्टर लावा.
धन्य वाटले विचार एकुन.
अहो गणू हा प्रश्न धार्मीक
अहो गणू
हा प्रश्न धार्मीक कमी व राजकीय जास्त आहे. हा सरकार च्या धोरणार आहे. तुम्ही स्वतः का नाही आपळ्या मनाची पाटी स्वछ करुन विचार करत की हा मंदार असे का लिहत असावा. याचे आत काय जळतेय.
याला काय खटकते. यालाही काही कारण असतीलच ना? त्याचीही बाजु समजण्याचा का नाही प्रयत्न
करत?
देव मानणार्या किती जणांना देव
देव मानणार्या किती जणांना देव भेटला आहे ? पण विश्वास ठेवला जातो.किवा अविश्वास ठेवला जातओ. पुर्ण आयुष्य का जाइना,. एवढी घाइ काय आहे जाहिर करायची स्वताचा आंधळा विश्वास ? पण स्वताचे condition झालेले असते. मग उरते फक्त ते condition पुर्ण करण्यासाठी दावे करणे आणी ते दावे सिद्ध करण्यासाठी जमेल त्या मार्गाचा वापर करणे.
=====
गणू..
इथे देव शब्दच का वापरला? अल्ला का नाही? अल्ला दिसलेले लोक आहेत का जगात?
"सात्विक संतापाच्या
"सात्विक संतापाच्या चारोळ्या
एकांगी विचारांच्या आरोळ्या
धर्मां-निधर्मांधतेच्या अफुगोळ्या
तापला तवा, भाजल्या पोळ्या"
हेचि सार या चर्चेचे.....
अरे काय वाद विवाद चालले आहेत
अरे काय वाद विवाद चालले आहेत उगाचच?
एक गणू बोलला म्हणुन कोणी आपले हिंदुत्व किंवा मुस्लीम असणे विसरणार नाहीये आणि तुम्ही कितीही समजावले तरी गणूला तुमचे म्हणणे पटणार नाहीये. गणुभाऊ एक काम करा एखाद्या दिवशी मुंब्र्याला जा आणि तिथे जावून तिथल्या लोकांना सांगा की बाबारे स्वत:ला मुस्लीम म्हणवुन घेणे बंद करा, माणुस आहात माणुस म्हणुन जगा.
किंवा शक्य झाले तर नागालँड किंवा बोडो च्या कट्टर अतिरेक्यांना जावुन भेटा त्यांनी ख्रिश्चन धर्म स्विकारला आहे, त्यांनाही हिंदुत्व किंवा मुस्लीम धर्म पटत नाही. त्यांना जाऊन सांगा की बाबारे तू माणुस आहेस, माणुस म्हणून जग. या सगळ्यानंतर जगला-वाचलात तर, त्यातूनही इथे काही टंकायच्या क्षमतेचे राहीलात तर या बोलू आपण. इथे जमलेले माबोकर एकुन घेतायत म्हणुन प्रत्येकाच्या विचारशीलतेची पात्रता ठरवत बसू नका. आंतरजालावर एकमेकाचे तोंडही न पाहता एकमेकाला सल्ले देणे सोपे असते. मुंब्र्याला जायची तयारी असेल तर सांगा मी पण येतो तुमच्या बरोबर. दोघे मिळून भेटू लोकांना, त्यांना समजावण्याचा प्रयत्न करु त्यांची धर्मांधता किती घातक आहे ते. फार फार काय होइल त्यांना नाहीच पटले तर तुमचे हाड जायबंदी होइल, माझे एखादे. पण काहीतरी फुका बडबडत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करु. मग त्यात थोडेफार नुकसान झाले तरी चालेल.
जायची तयारी असेल तर माझ्या विपुत संदेश द्या, फोन नं. देइन माझा !
गणू.. इथे देव शब्दच का
गणू..
इथे देव शब्दच का वापरला? अल्ला का नाही? अल्ला दिसलेले लोक आहेत का जगात?
अहो काका, अल्ला वापरा/येशु वापरा. काहिहि वापरा. मी देव वापरला नाहितर अल्ला वापरला म्हणुन मला परत बोलाल. आणी आता मला विचारु नका की मंदारने तेच केले. तेच केले असते तर - अजुनहि त्याला म्हणु द्या - कि १९९२ ला मशीद पाडली ते चुकिचेच होते ज्याप्रमाणे बाबराने मंदिर तोडले. मग मी इथेल्या पोस्टच थांबवतो. हे हि म्हणु द्या की तस्लिमा नसरीन वरचा हल्ला जसा अयोग्य होता तसाच एम एफ हुसेन वरचाहि. मग चर्चा करण्याची गरजच नाहि. ते दिसले नाहि लेखातुन, केवळ दिसलेच नाहि - तर दाखवुन दिल्यावर मान्यही केले गेले नाहि म्हणुन एवढे रीप्लाय दिले.
विशालभाउ- तुम्हि
विशालभाउ- तुम्हि म्हणता,
गणुभाऊ एक काम करा एखाद्या दिवशी मुंब्र्याला जा आणि तिथे जावून तिथल्या लोकांना सांगा की बाबारे स्वत:ला मुस्लीम म्हणवुन घेणे बंद करा, माणुस आहात माणुस म्हणुन जगा.
किंवा शक्य झाले तर नागालँड किंवा बोडो च्या कट्टर अतिरेक्यांना जावुन भेटा त्यांनी ख्रिश्चन धर्म स्विकारला आहे, त्यांनाही हिंदुत्व किंवा मुस्लीम धर्म पटत नाही
फारच हुशार तुम्हि. अहो एवढे समजते तरि धर्म काहि सोडवत नाहि - हिंदुना सांगितले - तर ते म्हणतात "त्यांना " सांगा. मग आम्हि . मुसलमानांन्न सागीतले तर ते म्हणतात "त्यांना" सांगा मग आम्हि. मग बसा मार्यामार्या करत. अहो मुंब्र्याला कशाला जायला हवे - कोरेगाव पार्कात हे येतेच की मरण. उद्या दादर मधे, डोंबिवलीत, कोथरुड मधेहि येणारच आहे.
तुमचा नंबर द्या विपुत. कधी जायचे /कसे जायचे वगरे कळवतो सविस्तर. तुमचे टिकिटहि काढतो.
बरे हाच प्रश्न तुम्हि "दोन्हि हात कापणार्यांना " विचारला का, कि ते काय करत आहेत एवढा त्यांचा सात्विक संताप होतो आहे आणी क्रुती करणे त्यांना आवडते. त्यांना हि घेउन जाउ. ते त्यांच्या पद्धतीने समजाउदेत.
काहीतरी फुका बडबडत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करु. मग त्यात थोडेफार नुकसान झाले तरी चालेल. ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
विशाल, अरे जाउदे रे. कुणा
विशाल, अरे जाउदे रे. कुणा मोठ्या माणसाने म्हटलंय:
Wise men talk because they have something to say;![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
fools (इथे गणु) talk because they have to say something.
असु दे हो मदार साहेब, स्वताला
असु दे हो मदार साहेब, स्वताला एवढे कमी नका समजु,
बर, तुम्हि येत आहात ना मुंब्राला ? तुमचाहि नंबर द्या विपुत माझ्या. तिकिटे काढ्ली कि सांगतो.
चला सगळे आता बोलणे थांबवून
चला सगळे आता बोलणे थांबवून कृतीवर यायला तयार झाले आहेत ही एक समाधानाची बाब. गणू तुम्ही कशाला एवढे रक्त आटवताय. तुमचे म्हणणे आहे धर्म, जात-पात मानू नका, त्यावरून एकमेकांची डोकी फोडू नका, एकमेकांचा द्वेष करू नका आणि माणूस म्हणून जगा.
ओके मान्य...बाकीच्यांचे माहीती नाही आम्ही (किमान मी तरी) हे पाळण्याचा कसोशीने प्रयत्न करू. पण म्हणून उद्या म्हणालात हिंदू म्हणून विचार नका करू किंवा हिंदू कळपातच राहू नका. तर ते मात्र मान्य नाही. वर उल्लेखलेले एकमेकांची डोकी फोडू नका, एकमेकांचा द्वेष करू नका आणि माणूस म्हणून जगा.
हे मला एक हिंदू म्हणून जगत राहतानाही शक्य आहे तर मी का उगाच माझी विचारधारा सोडू. आता तुम्ही म्हणाल की हिंदू-मुस्लिम ही विचारधाराच चुकीची आहे तर मग बोलणेच खुंटले. तुम्हाला फक्त तुमच्या पद्धतीनेच शांती हवी आहे. (आणि जे केवळ स्वप्नरंजन आहे). मग केवळ स्वप्नेच बघत बसा. खरोखर तुमची इच्छा असेल तर प्राप्त परिस्थितीत काय तो उपाय करता येण्यासारखा असेल तर सुचवा. नाहीतर फुकाची बडबड काय कामाची.
अरे वाह ईथे सात्विक
अरे वाह ईथे सात्विक संतापाच्या आरोळ्या पण आहेत, मस्त!!!
....... नाहीतरी इथे येणारे
....... नाहीतरी इथे येणारे बहुतेक मायबोलीकर फक्त भांदणाची खाज मिटवायला च येतात.... आणि नविन खरुज घेऊन जाता;):)
बास करा हे गजकर्ण आता... एडमिन थोडं मलम लावा आता ह्या बाफला....![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
व्वा! मंदार जोशी. छान. फक्त
व्वा! मंदार जोशी. छान. फक्त सात्विक संताप व्यक्त करायच्या आधी तेवढी ती दाराची घट्ट लावलेली कडी काढली तर बरं!
त. टी. स्पष्टोक्तीबद्दल राग नसावा.
खरंच मस्त लिहीयल..योग्य शब्द
खरंच मस्त लिहीयल..योग्य शब्द ,,:)
Pages