टाकाऊतून टिकाऊ - प्रवेशिका क्र. ४ - vijuvini

Submitted by संयोजक on 15 September, 2010 - 13:31

गुळगुळीत कागदाची फुले

आपल्याकडे बऱ्याचदा जुनी मासिके अथवा मार्केटिंग ची पत्रक असतात किवा अमेरिकेत पोस्टाद्वारे वेगवेगळ्या कंपन्यांची गुळगुळीत कागद असलेली, रंगीबेरंगी, सुंदर चित्रे असलेली भरपूर मासिके येतात आणि दर वेळेस ती कचऱ्यात टाकायचे जीवावर येते. अशा या कागदापासून मी फुले तयार केली आहेत त्याची ही कृती -

साहित्य - गुळगुळीत कागदाचे मासिक ( अंदाजे ६-७ पाने) , फेविकोल.

कृती -

१) मासिकाचे पान घेऊन त्याचे १ टोक दुसऱ्या टोकाला जोडणे. (अशा रीतीने १ त्रिकोण तयार होईल.) दुमडून झाल्यावर जो कागद उरेल तो उरलेला कागद न फाडता आत दुमडून टाकणे.
२) त्रिकोणाची परत १ मध्यभागी दुमडून घडी घालणे.
३) त्रिकोणाचे टोक वरच्या बाजूला ठेऊन सरळ रेषेचा भाग आपल्या बाजूला ठेवणे.
४) सरळ रेषेचा उजवा भाग त्रिकोणाच्या मध्य रेषेपासून दुमडणे ( हा भाग त्रिकोणाच्या वरच्या भागाकडे झुकलेला असेल). हीच कृती डाव्या बाजूसाठी ही करावी.
(वरील १ ते ४ क्रमांकाच्या स्टेप्स ची आकृती सोबत जोडलेल्या फाईल मध्ये दाखवली आहे )

TT_vijuvini_Pakali_Steps.jpg

५) तयार झालेल्या दोन्ही बाजूचे भाग फेविकोल ने एकमेकाना जोडून टाकावे.

६) अशा रीतीने फुलाची १ पाकळी तयार होईल. तयार झालेली पाकळी सोबत जोडलेल्या फाईल मध्ये दाखवली आहे.

TT_vijuvini_Fulachi_Kali.jpg

७) अशा ६-७ पाकळ्या तयार करून त्या सर्व पाकळ्या एकमेकांना जोडाव्यात. अशा रीतीने सुंदर फुल तयार होते. (चित्र सोबत जोडलेल्या फाईल मध्ये दाखवले आहे.)

TT_vijuvini_Kagdi_Ful.jpg

आरास करताना किवा फुलाचा सुंदर रंगीबेरंगी गुच्छ यातून तयार करता येतो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users