..फुलाची पाकळी
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
7
आपल्यातल्या काहीजणांना माहिती आहे की डृपल या मुक्तस्रोत प्रणालीवर मायबोली (नवीन मायबोली) आधारीत आहे. युनि़कोडची चांगली सुविधा असल्यामुळे, मराठीतली इतरही अनेक संकेतस्थळे याच प्रणालीवर आधारीत आहेत.
डॄपलचे हे ऋण लक्षात ठेवून, आजपर्यंत वेळोवेळी मायबोली प्रशासनाने डृपलला शक्य तेवढा हातभार लावायचा प्रयत्न केला आहे.
- -- गेल्या १-१.५ वर्षात, १२२ वेगळ्या त्रुटी शोधण्यात, त्या सोडवण्यात आणि चाचण्या करण्यात आपण आपला खारीचा वाटा उचललेला आहे. आपल्याला माहिती असलेल्या त्रुटी आणि या त्रुटींवर आपण शोधलेले उपाय जाहीरपणे जगातल्या कुठल्याही वेबमास्टरला डृपालच्या वेबसाईटवर (Drupal Issue Queue) उपलब्ध आहेत.
- -- मुक्तस्रोत प्रणालीमधे पुष्कळदा माहितीची (Documentation) कमतरता असते. ऑर्गॅनीक गृप हे मोड्युल, उभारायला सोपे जावे म्हणून त्याबद्दल लिहिलेली माहिती मायबोली प्रशासनाने लिहिलेली/संपादित केली आहे. ते पान शक्य तेवढे ताजेतवाने ठेवायचाही आपण प्रयत्न करतो
- -- वेळोवेळी नवोदीत वेबमास्टरच्या शंकांना उत्तर द्यायचा/मदत करायचा आपण प्रयत्न करतो.
- -- आपण जेंव्हा आहारशास्त्र आणि पाककृती विभाग सुरू केला तेंव्हा त्यासाठी विषयानुसार वर्गीकरण करण्याची प्रणाली (विषयवार यादी) आपण उपलब्ध करून दिली. आता ती मायबोलीवर इतरत्रही वापरली जाते, पण सगळ्यात अगोदर पाककृती गृपमधे वापरली होती. गेल्या आठवड्यात ही प्रणाली (Source code) अधि़कृत मोड्यूलचा भाग बनली. आता डृपलची माहिती असलेल्या कुठल्याही वेबमास्टरला ती प्रणाली वापरता येईल. (गुलमोहर, स्पर्धा, दिवाळी अंक यासारखे काही मराठी शब्द योग्य तो शोध घेणार्याला तिथे सापडतील
आपलीच वेबसाईट पुढे जावी असं कुठल्याही वेबमास्टरला/प्रशासनाला वाटणं नैसर्गिक आहे. परंतु आपल्या प्रगतीचा विचार करताना आपण डृपल कम्युनिटीला विसरलो नाही. आपल्या या योगदानातून कुणा वेबमास्टरचा वेळ वाचला/मदत झाली (त्यात इतर मराठी वेबसाईटसही आल्या) तर चांगलंच आहे.
आपल्याकडून जमेल तितकी मदत करायची. फुलं नाही तर.....
प्रकार:
शेअर करा
अरे वा.. ही
अरे वा.. ही माहिती इथे दिल्याबद्दल धन्यवाद.. मायबोली प्रशासनाने केलेया कामाबद्दल वाचून छान वाटलं..
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..!
नवोदित वेब
नवोदित वेब मास्टर्सना मदत हे एकदम मस्तच. स्वतःचा वेळ घालवून लोकांच्या प्रश्नांना उत्तर देणे फार कटकटीचे. त्यातही अनेक प्रश्नांना RTFM हे चपखल उत्तर असतानाही सविस्तर माहिती देणे, कधी उदाहरणे देऊन समजावणे यात वेळ अन चिकाटी फार लागते.
पण अशी मदत करणे हे 'ज्योतसे ज्योत जगाते चलो' याचं अगदी मस्त उदाहरण आहे. आपण ज्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली अशांमधून एखाद्याने जरी इतरांचं शंकानिरसन केलं की जो आनंद होतो तीच गुरुदक्षिणा
तुम्ही इतर सगळ्या व्यवधानांमधून वेळ काढून हेही करता म्हणून आभार अन अभिनंदन !
धन्यवाद.
धन्यवाद. अभिनंदन. पुढच्या प्रवासाला भरपूर शुभेच्छा.
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन! <<<आ
अभिनंदन!
<<<आपल्याला माहिती असलेल्या तृटी आणि या तृटींवर आपण शोधलेले उपाय जाहीरपणे >>>
वरील वाक्यात 'तृटी' असे न लिहीता.. 'त्रुटी ' असे लिहावे.
अतिशय
अतिशय स्तुत्य आणि अनुकरणीय कार्य. अभिनंदन!
<<<< वरील वाक्यात 'तृटी' असे न लिहीता.. 'त्रुटी ' असे लिहावे.
सुभाष_वाघ, वरील वाक्यात 'लिहीता' असे न लिहिता.. 'लिहिता' असे लिहावे
नुकत्याच
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार अमेरिकन सरकारनेही काही वेबसाईटवर ड्रुपाल वापरायला सुरुवात केली आहे (पहा Recovery.gov).
हे मुद्दाम इथे सांगायचे कारण म्हणजे ड्रुपालची माहिती असणं हे हळूहळू व्यवसाय/नोकरी या साठी महत्वाचं होतंय (विशेषतः वेब डिझाईन्/डेव्हलपमेंट यात काम करणार्या लोकांसाठी)