बस्स..., बहोत हो गया भिडू....!

Submitted by विशाल कुलकर्णी on 21 September, 2010 - 01:39

आत असताना कधीकधी...
फारच एकटेपणा जाणवायचा
मग माझी चुळबुळ सुरू व्हायची
नेमका त्याचवेळी तो...
आईच्या पोटाला कान लावायचा...
ती उब जाणवून मी म्हणायचो...
बाबा, खुप एकटं एकटं वाटतय रे...
बाबा हसुन म्हणायचा....

"बाप्पा आहे ना ......!"

आपल्या पायातली ताकद जोखत
जेव्हा पहिलं पाऊल टाकलं...
तेव्हा हातात बाबाचं बोट होतं..
मी दुसरा हात पुढे केला...,
बाबा हसुन म्हणाला...
दोन्ही हात मीच धरले तर...
त्याच्यासाठी काय उरेल?
त्याच्यासाठी...?

"बाप्पा आहे ना....!"

नोकरीसाठी पहिली मुलाखत ...
जाताना आई-बाबाला नमस्कार केला
आता पण असेल का रे बाप्पा सवे?
बाबा हसला, हसुन म्हणाला...

वेड्या , अरे बाप्पा म्हणजे काय?
एक शक्ती, एक श्रद्धा...
जी देते विश्वास स्वतःच्या सामर्थ्याचा...
जी बनते अभ्यास स्वयंसुधारणेचा...
बाप्पा म्हणजे एक दुवा...
मनाला देहाशी जोडण्याचा....
तो सदैव तुझ्यातच आहे...

फक्त मनापासुन हाक दे..., बाप्पा आहेच रे...!

तू खरंच आहेस बाप्पा?
मग का शांत आहेस असा?
रस्त्यारस्त्यावर नागवली जाणारी मानवता,
नागवणारे धर्माचे अधर्मी आणि निधर्मी ठेकेदार...
स्वार्थाने लडबडलेले रक्तपिपासु सत्ताधारी लांडगे...
माजलेला दहशतवाद आणि गांजलेली मानवता...
ढासळलेली नितीमत्ता आणि सडलेले आदर्शवाद...
खुप धडधडतय रे आत कुठेतरी...
आज पुन्हा एकटं-एकटं भासतंय रे....

तु आहेस ना..., माझ्यातच?

बस्स..., बहोत हो गया भिडू....!
चल मिलके वाट लगाते है इनकी ....!

विशाल...

गुलमोहर: 

विशल्या.. भिडू.. मै भी हू ना !

मस्त कविता आहे रे.. काकाक ..मधे टाकून तोंड का काळं केलस रे .. चल कविता मधे टाक लवकर.

लय भारी.....बहोत हो गया भिडू....! चल काकाक मे से निकालके कविता मे डाल दे जल्दी से...

अरे ते चुकुन झालं होतं, मोबाईलवर बोलण्याच्या नादात कविताच्या ऐवजी चुकुन काकाक वर क्लिक केलं गेलं आणि पुन्हा त्याच बोलण्याच्या नादात लक्षातच आलं नाही. असो धन्स Happy

विशल्या.. असल्या चुका पुन्हा पुन्हा माफ केल्या जाणार नाही. Proud तुझ्या आवाजात ऐकायला आवडेल रे हि कविता.. Happy

छान Happy

बस्स..., बहोत हो गया भिडू....!
चल मिलके वाट लगाते है इनकी ....!

क्या बात है... मस्तच कविता.
..................................

(स्वगत- हा बाप्पा, कुणा सोबत जायचे हे मोदकाच्या क्वालीटीवरून तर ठरवत नाही ना?
तसे असेल तर....
मग ज्यांचेकडे उत्तम मोदक मिळतात, त्यांच्याविरुद्ध, त्यांचीच वाट लावायला विशाल सोबत जाईल? शंका आहे)

गंगाधरदादा, इथे बाप्पा हे प्रत्येकाच्या आत्मविश्वासाचं, त्याच्या सद सद विवेक बुद्धीचं प्रतीक म्हणुन घेतलय, त्याचा निकष योग्य-अयोग्य हा असेल, त्याला केवळ दर्जा नाही सत्यासत्यता हवी असेल Happy
प्रत्येकाचा बाप्पा प्रत्येकाबरोबर असेल, फ़क्त वृत्ती वेगवेगळी. आता तुम्हाला काय हवय ते तुम्ही ठरवायचं. Wink
धन्स Happy

विशालभौ, गेल्या काही दिवसात गद्य आणि पद्य वाचनाची (आणि त्यामुळे त्यासंदर्भातला विचार करण्याची) पातळी एकदम खाली गेलीये त्यामुळे जरा वेळ लागला इतकंच Wink

उतारा म्हणुन आज काही गझला आणि ही कविता वाचली. चांगलंच औषध मिळालं की Happy

मला वाटतं माझा हा प्रयत्न फसलाय.....
ज्यांच्यापर्यंत भावना पोचल्या त्यांचे धन्स आणि अभिनंदन दोन्ही Wink

मी जेव्हा हि कविता लिहायला घेतली तेव्हा शेवटचे कडवेच डोक्यात होते. पण मला नेहमीप्रमाणे केवळ समस्या किंवा वेदना मांडायची नव्हती. तर त्यावरचा उपाय शोधायचा होता. म्हणुन आधीच्या २-३ कडव्यांची प्रस्तावना. मुळात वर म्हंटल्याप्रमाणे इथे मी बाप्पा हे प्रत्येकाच्या आत्मविश्वासाचं, त्याच्या सद सद विवेक बुद्धीचं प्रतीक म्हणुन घेतलय, त्याचा निकष योग्य-अयोग्य हा असेल, त्याला केवळ दर्जा नाही सत्यासत्यता हवी असेल. हा जो कोणी मी आहे त्याने मनाशी पक्कं ठरवलय की जे काही समाजात घडतय त्याविरुद्ध फक्त काळजी व्यक्त न करता आवाज उठवायचा, प्रत्यक्ष कृती करायची. पण त्याच्या छातीत धडधडतय, त्याला भिती वाटतेय ....

आपल्याला हे जमेल का? आपल्यात तेवढे सामर्थ्य आहे का?
तर ते प्रत्येकाकडेच असते. तो प्रत्येकाच्या मनातला बाप्पा, त्याला जागे करण्याची आवश्यकता मात्र आहे. त्या बाप्पाचे स्पष्टीकरण म्हणुन पहिली काही कडवी आणि मुळ मुद्दा म्हणजे शेवटचे कडवे !

ज्याक्षणी आपल्यामधला आत्मविश्वास जागा होइल त्याक्षणी ते सामर्थ्य देखील जागे होइल आणि आपण आपल्याच मनाला सांगु शकू....

बस्स..., बहोत हो गया भिडू....!
चल मिलके वाट लगाते है इनकी ....! Happy

विशाल

Happy

मला वाटतं माझा हा प्रयत्न फसलाय...

मला तसे वाटत नाही. वरच्या पोष्टीत जे लिहिले, तेच डोकावतेय कवितेतून. Happy

Pages