Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 23:31
![2010_MB_kavyasphurti-4.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u313/2010_MB_kavyasphurti-4.jpg)
१. ही स्पर्धा फक्त मायबोलीकरांसाठी आहे.
२. ह्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
३. ह्या स्पर्धेसाठी एका व्यक्तीला एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठवण्याची मुभा आहे.
४. विडंबन २२ सप्टेंबर २०१० पूर्वी इथेच लिहा.त्यानंतर ही स्पर्धा बंद करण्यात येईल.
५. विडंबन स्वतः लिहिलेले असावे.तसेच ते पूर्वप्रकाशित नसावे.
६. स्पर्धेचा निकाल परीक्षकांमार्फत लावण्यात येईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
--
--
सांग सांग भोलानाथ, बंद होईल
सांग सांग भोलानाथ, बंद होईल काय?
गाड्यांवरती दगड पडून राडा होईल काय?
भोलानाथ दंग्यासाठी कारण मिळेल काय?
खळ्ळ कट्ट आवाजाची धून वाजेल काय?
भोलानाथ किती सुना सुना भासे पेपर
भडकवणार्या भाषणांनी पेटेल का रे नगर
भोलानाथ कोणी खान ओकेल का रे जहर
गर्दी भरून चाललेत की रे मल्टिप्लेक्स थेटर
भोलानाथ दगडफ़ेक माझी टीव्हीत येईन काय?
पोलिस यायच्या आधी मी पळून जाईन काय?
भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा
दंगा बंदचा कधी मंद होईल का रे धंदा?
मुक्तीची युक्ती सांग सांग
मुक्तीची युक्ती
सांग सांग मंदारभौ, काही युक्ती कळेल काय?
माबोवरच्या कवितांपासून, मुक्ती मिळेल काय?
मंदारभाऊ सारे कवी, झोपा घेतील काय?
काव्यरसिक आयड्यांना, आराम देतील काय?
मंदारभौ मंदारभौ, खरं सांग एकदा
जुलाबाच्या गोळ्या यांना देऊ का रे तीनदा?
मंदारभाऊ बंद होईन का रे कवितेचे सदर
डोळे पुसून ओले झाले वाचकांचे पदर
ऐरा आला, गैरा आला, मग आला सैरा
अभय घेऊन यावा आता, एक नथ्थु खैरा
हहहSS, हेहेहेSS, सानिधपSS, मगरेसाSS
जिंगालालाSS, गोडगोड बोलाSS
- गंगाधर मुटे
......................................................
सांग सांग अमरनाथ यात्रा घडेल
सांग सांग अमरनाथ यात्रा घडेल काय?![eyes.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u95/eyes.gif)
गुहेमध्ये झरा गोठून शिवलिंग बनेल काय?
अमरनाथ पहाटेच सूर्य कोपेल काय?![Angry](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/angry.gif)
ग्लोबल वॉर्मिंगचा फटका तुलाही बसेल काय?
अमरनाथ अमरनाथ खरं सांग एकदा![aha.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u95/aha.gif)
निसर्गाच्या अपराध्यांना मारशील ना रे डंडा?
अमरनाथ हवेत आहे कार्बन आणि सल्फर![scared.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u95/scared.gif)
डोळे माझे चुरचुरुन जाणार नाही ना नजर?
अमरनाsssथ अमरनाथ, अमरनाssssथ अमरनाथ......
![saashtang namaskar.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u95/saashtang%20namaskar.gif)
सांग सांग डागदरा, मुलगाच होईल
सांग सांग डागदरा, मुलगाच होईल काय?
क्लिनिकमध्ये पैसे चारलेत, नक्की कळेल काय?
नवरा, सासूबाईंची नियत बदलेल काय?
लाडू मिळाला नाही तर बर्फी चालेल काय?
डागदरा, डागदरा, खरं सांग एकदा
दोन वर्षांतून अॅबॉर्शन केलयं रे तिनदा ......
डागदरा उद्या आहे महत्वाचा पेपर
छातीत धडधड होत राहील, रिझल्ट लागेस्तोवर
सांग सांग भोलानाथ, इच्छित
सांग सांग भोलानाथ, इच्छित घडेल काय ?
जगामध्ये महाशक्ती, भारत बनेल काय ?
भोलानाथ भविष्याच्या, उदरी दडून काय ?
प्रयत्नांना नक्की यश, अमुच्या मिळेल काय ?
भोलानाथ शिकून घे तू, श्वासाचे व्यायाम
जगामध्ये झाला मान्य, योगा प्राणायाम
भोलानाथ भोलानाथ, चला करू स्वारी
अंतराळी चक्कर टाकू, फ़िरूया दिशा चारी
सारे भारतपुत्र आम्ही, एकसंघ होवू
अभयतेने भारताची, शान उंच नेऊ
- गंगाधर मुटे
”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
मूळ गाण्यातला मुलगा मोठा होऊन
मूळ गाण्यातला मुलगा मोठा होऊन software engineer होतो ......आणि त्याचे गाणे हे नवे रूप घेते .....
सांग सांग भोलानाथ, पाउस पडेल काय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
'office pick-up' puncture होऊन सुट्टी मिळेल काय
भोलानाथ, दुपारी boss ढाराढूर झ्होपेल काय![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
office मधून पळून आलो तर बायको चोपेल काय
भोलानाथ भोलानाथ , खरे सांग एकदा![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आठवड्यातून खरच पगार होईल का रे तीनदा
भोलानाथ उद्या आहे Client समोर Presentation
अंग सोडून ताप येवून मला होईल का रे Hypertension
आईन Presentation च्या वेळी Laptop ची Hard disk उडेल काय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सांग सांग भोलानाथ, पाउस पडेल काय
जग्या
आश्विनी ग्रेट आहेस .
आश्विनी ग्रेट आहेस .
मला जग्याचं विडंबन लय आवडलं.
मला जग्याचं विडंबन लय आवडलं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे हो! आणि मुटेजींचं पण छान
अरे हो! आणि मुटेजींचं पण छान आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मामींचं ....अर्र मामींनी
मामींचं ....अर्र मामींनी केलेलं विडंबन पोचलं.
मलाही मामींनी केलेलं जास्त
मलाही मामींनी केलेलं जास्त आवडलं.
.
.
मामी >>आईन Presentation
मामी
>>आईन Presentation च्या वेळी Laptop ची Hard disk उडेल काय
टू मच
इथे भोलानाथ काय सांगणार हो? हा तर मर्फीचा लॉ. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सांग म्हणे ''झोलाछाप'',पेशंट
सांग म्हणे ''झोलाछाप'',पेशंट मिळेल काय?
सांगितलेली गोळी तो ही निमूट गिळेल काय?
''झोलाछाप''ला 'दुपारी''पेशंट येईल काय?
नक्को नक्को दुपारी,तो आत्ताच येईल काय?
''झोलाछाप'' म्हणतो,''देवा,खरं सांग एकदा'',
आठवड्यातून ''आय.व्ही.''चे येतील का रे तीनदा?
'' झोलाछाप'' शोधत येतील पेशंटांचे ''नेबर'',
गोळी होती खोटी,म्हणून फोडतील त्याचे ''ढोपर''......
--डॉ.कैलास गायकवाड
टीप : झोलाछाप म्हणजे बनावट वैद्यकीय व्यावसायिक...,छद्मवैद्य. बोगस डॉक्टर.
मला जग्याच विडंबन आवडलं..
मला जग्याच विडंबन आवडलं..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सांग सांग सोनामाय, हे सरकार
सांग सांग सोनामाय, हे सरकार पडेल काय?
भाजपाच्या डोक्यावरती, मुकूट चढेल काय?
मोहनाची खुर्ची तरी शाबूत राहिन काय?
घ्रराण्याची सत्ताशाही, लयास जाईन काय?
सोनामाय सोनामाय, खरं सांग एकदा
एकाच घरचा पंतप्रधान, होईन का चारदा?
काही केल्या सुटेचिना लोकशाहीचे कोडे
बहूसंख्य पायाखाली, खुर्चीवरती थोडे
गंगाधर मुटे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
मामी, जग्या ग्रेट
मामी, जग्या ग्रेट![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)