गणेशोत्सव २०१० स्पर्धा - अशीही जाहिरातबाजी - ४

Submitted by संयोजक on 3 September, 2010 - 14:27

आजचा विषय : पल्लवी जोशी आणि साडी

2010_MB_Jahiratbajee_PallaviSaree_Poster3.jpg

नियम :
१. ही स्पर्धा फक्त मायबोलीकरांसाठी आहे.
२. ह्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. एका सभासदातर्फे एका विषयासाठी एकच प्रवेशिका स्वीकारण्यात येईल.
४. आपली प्रवेशिका [काल्पनिक संवाद] स्पर्धेच्या त्या त्या विषयाच्या धाग्यावर आपण स्वतः प्रकाशित करावी. एकदा प्रकाशित केल्यानंतर प्रवेशिकेमध्ये कोणत्याही स्वरुपाचे बदल करु नयेत, केल्यास स्पर्धेसाठी ती प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही.
५. जाहिरात वर्तमानपत्र, मासिकं किंवा अंतर्जाल इ. साठी आहे असे समजून बनवायची आहे. त्यासाठी फोटोशॉप किंवा तत्सम सॉफ्टवेअर वापरण्याची परवानगी आहे.
६. जाहिरातीसाठी मजकूराबरोबरच स्वत: काढलेले चित्र/छायाचित्र याचा समावेश करु शकता. मजकूरासाठी शब्दमर्यादा १५० शब्द आहे.
७. अंतिम विजेता वाचकांच्या मतदान पद्धतीने ठरविला जाईल.
८. विषय जाहीर झालेल्या दिवसापासून ते अनंतचतुर्दशीपर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनेक साड्यांची चित्रे दिसतात.
मागून आवाज येतो-
पल्लवी आमच्या साड्या कधीच नेसत नाही.

-

"आणि घेऊया एक छोटासा ब्रेक..." तुम्ही पहात आहात, " पराग साडी, सारेगमप-लिटील चँपिअन्स!!!"

-------------------------------------------------------------------------------------------------------

साडी नेसलेली आर्या : - हाताने सुर दाखवत, "साडी मे साडी..... पराग साडी. " स्मितहास्य
साडी नेसलेली मुग्धा : - गोड हसत, "साडी मे साडी :)... पराग साडी... "
साडी नेसलेली वैशाली : - "साडी मे साडी..."
साडी नेसलेला अवधुत : - "पराग साडी!!! येआह!!! तानानानानानाननाना, शानानानाना.... येआह!!! "

गोग्गोड हसत, पल्लवी, "साडी मे साडी, पराग साडी! मॅचिंग कशाला पायजे माडी?? "
sadi.jpg

-------------------------------------------------------------------------------------------------------

साडीत साडी ललना साडी
नऊवारी, नऊवारी, नऊवारी
पैठणी शालू जरतारी..
सर्व प्रकारांत उपलब्ध.

कसल्याही बांध्यावर आणि कोणत्याही ब्लाऊजवर खुलून दिसणारी.. ललना साडी!
ललना साडीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहीजेत!

सगळेच Lol

---

जोशी यांची खास पल्लवी साडी..
भरजरी पैठणी त्यावर मोराची जोडी...

रंगांची उधळण रेशमाची लडी..
समारंभाची वाढे मणभर गोडी...

जोशी यांची खास पल्लवी साडी....
नेसायला सोप्पी, ही आहे विथ नाडी Proud

पल्लवी जांभळ्याजर्द साडीवर पिवळी सूर्यफुले अशा डिझाईनची साडी आणि त्यावर लाल बुट्ट्यांचं फुग्याच्या बाह्यांचं ब्लाऊज घालून एका मोठ्या स्टेजवर उभी आहे.
टाळ्यांच्या कडकडाटात कॅमेरा पॅन होऊन पल्लवीवर लाँगशॉटने असा स्थिरावतो, जेणेकरून पल्लवीची संपूर्ण साडी दिसेल आणि प्रेक्षक स्तंभित/ भयभीत/ सुन्न/ आश्चर्यचकित व्हायला पुरेसा वेळ मिळेल.. कॅमेरा जवळ आल्यावर पल्लवी कॅमेर्‍याकडे पाहून तिचं प्रसन्न हसू फेकते.. कॅमेरा ते झेलत तिच्या जवळ येतो.. आता क्लोजअप.
"Fusion is my mantra! मी मराठी कुटुंबातली मुलगी, पण काम केलं हिंदी नाटकं, सिरियल्स, सिनेमे आणि reality showsमध्ये.. त्यामुळे घरात, शाळेत मराठी, इतर वेळ हिंदी.. असं fusion झालं.. हिंदी अंताक्षरीने तर history केली, हे तर तुम्हाला माहित आहेच- येस, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत- Annuji, Gajendra you are simply great!"

कॅमेरा थोडा तिरका होतो.. पल्लवी साडीचा एक फलकारा मारत प्रोफाईलने कॅमेर्‍यात बघते..
"त्यानंतर माझ्या careerमध्ये फारसं काही घडत नसताना, Gaj showed faith in me again आणि मराठी सारेगमपमुळे मी घराघरात पोचले.. खरंतर सारेगमपमध्ये फक्त मोठ्या स्पर्धकांना धीर द्यायचं आणि लिटिल चॅम्प्सच्या पाप्या घ्यायचं काम होतं, बस्स.. so I added my contribution to it.. I followed my fusion mantra.. लोक सुंदर सुंदर गाणी म्हणणार, परिक्षक त्यांना टिप्स देणार, वादक वाजवणार.. मग माझं काय काम? so I created my own space here with my fusion साडी!"

आता पल्लवीचा क्लोजेस्टअप
"माझ्या fusion साडीमुळे मी सारेगमपमध्ये सर्वात जास्त चर्चिले गेले, see despite being just an anchor I was talked about the most! Wink मी भारतीय साडीला जे glamour दिलं, मी ब्लाऊजच्या fashions जशा define केल्या, मी contrast matching ची जी लाट आणली industryत त्यामुळे मायबाप प्रेक्षक literally वाहून गेले.. त्यांचं भान हरपलं.. त्या भरात त्यांनी माझ्या मोठमोठ्या चुकाही घशात घातल्या! मी off stageही किती लोकप्रिय झाले माहिते- Dressदादाला टेन्शनच नाही.. कोणतीही साडी, कसलंही ब्लाऊज weirder the better! ;)"

कॅमेराचा परत लॉंगशॉट- पल्लवी जे काही बोलली त्याचं प्रत्यक्ष दर्शन परत एकदा तिचा साडीच्या माध्यमामधून प्रेक्षकांना समजतं..

"Fusion is Pallavi, and Pallavi means a rare combi of traditional and western.. तुम्हीही हा look experiment करा आणि लोकप्रिय व्हा.. Come on girls, wear a sadi today!"

पल्लवीचं तेच ते प्रसन्न हास्य कॅमेरा परत एकदा पकडतो.. प्रेक्षक देहभान हरपून आपल्यावर नक्की काय आदळलं ह्याचा विचार करत बसतात..

[गाल्यावर खळी .. च्या सुरात गाताना पल्लवी.]
टीप -- ढिंग ह्या वर पल्लवी डोळ्यांवरचे केस झटक्याने बाजूला करते असे दिसेल.

अंगावरी साडी हिरवी ss पॅठणी,
जरदोसी नक्षी त्याला ही ss सोनेरी ..!
कधी कुठे कशी सांग ही ss पाहली,
फुलं, वेलं, मोर, पानं ही ss केशरी .. !

जाउ नको दुर तू अशी ये बाणेर तू , अशी साडी तू घे अन तुझ्या वॅनी ला दे तू...!

ढिंग चॅक, ढिंग चॅक, ढिंग .... शर्मीली !
ढिंग चॅक, ढिंग चॅक, ढिंग .... शर्मीली !!

सगळ्या व्हॅरायटी या मिळेल तुला ssss
डिजाईनर, चंदेरी, जॉर्जेट पण दिसेल तुला ss ||१||
साहावारी, नऊवारी ह्या मिळेल इथे ssss
मॅचींग सगळ्यावर हे मिळेल इथे ss ||२||

आता घाई कर, उठ बर, पटकन चल, तू ss दे ना इशारे,
त्याला घेउन अशी निघ, खूप मिळतील बघ तुला साड्या ढिगाने ..!

हे ssss जाउ नको दुर तू...ढिचाक ढिचाक ढिंग.
जाउ नको दुर तू अशी ये बाणेर तू , अशी साडी तू घे अन तुझ्या वॅनी ला दे तू...!

ढिंग चॅक, ढिंग चॅक, ढिंग .... शर्मीली !
ढिंग चॅक, ढिंग चॅक, ढिंग.... शर्मीली sss !!

शर्मीली साड्या, जोशी चौक, बाणेर, पुणे
फोन क्रमांक ६४३७८०३५

आमची इतरत्र कुठेही शाखा नाही..!

[एक जोरदार टाळ्या होवून जाउ द्या...]