गणपतीच्या कार्यक्रमांना
रात्री दहाचा चाप आहे
आयपीएलच्या तमाशाला मात्र
सर्व काही माफ आहे
~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~
गवयांच्या सवाईला चावला
समानतेचा साप आहे
रस्त्यावरच्या नमाजाला मात्र
सर्व काही माफ आहे
~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~
कसाबला बिर्याणी अन्
अफझलला शांत झोप आहे
काश्मिरी पंडितांना मात्र
ट्रांझिट कँपचा शाप आहे
~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~
अमरनाथाच्या भक्तांना
उघड्यावरच आसरा आहे
आपलीच जमीन मागताना
आपलाच आवाज कापरा आहे
~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~
दादोजीं, रामदास खलनायक अन्
अफझलखान मात्र 'हाजी' आहे
ब्रिगेडवाल्या राज्यकर्त्यांची मात्र
मॅडमपुढे हांजी हांजी आहे
~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~
त्यांनी लुटली अब्रू, अहो लुटू द्यावी!
सहिष्णूतेचा गुंता आहे
आपल्याच लोकांचा झालेला
वैचारिक सुंथा आहे
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
जाता जाता एक खवचट (काहीच्या काही) चारोळी....
आज कुंकू मागासलेले अन्
टाईट जीन्सला 'पोच' आहे
आईचा सल्ला स्वेच्छा अन्
सासरची प्रथा 'जाच' आहे...
मंद्या.. एकदम झणझणीत रे...
मंद्या.. एकदम झणझणीत रे...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सात्विक संतापाच्या
सात्विक संतापाच्या चारोळ्या
छान जमल्या आहेत .
मंदार... मस्त ! स्मित
मंदार... मस्त ! स्मित
झणझणीत चारोळ्या..........
झणझणीत चारोळ्या..........![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हाण तिच्या मारी..... शेवटची
हाण तिच्या मारी.....
शेवटची चारोळी वाचताना सगळा "जाच" आठवला रे![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मंद्या सॉलिड जमून
मंद्या सॉलिड जमून गेलंय...
बादवे सुंता विचारांची.. विचारांचा नाही बहुतेक.
संतापात सहभागी आहो
संतापात सहभागी आहो
>>बादवे सुंता विचारांची..
>>बादवे सुंता विचारांची.. विचारांचा नाही बहुतेक.
आधी तेच लिहिलं होतं, डॉ.कैलासांचं मार्गदर्शन घेतलं तेव्हा ते म्हणाले तो शब्द पुल्लिंगी आहे.
नंदनवनात हिंसाचाराचा नेहमीच
नंदनवनात हिंसाचाराचा
नेहमीच नंगानाच आहे...
लढणार्या जवानाला मात्र
मानवाधिकाराचा जाच आहे !
********************************************
त्यांच्या हातात हँडग्रेनेड...
आमच्या...., निषेधाचा खलिता आहे
त्यांच्या रक्ताला नेहमीच भुतदया
आमच्या...., पेटता पलिता आहे...!
विशल्या, तोडलस मित्रा
विशल्या, तोडलस मित्रा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झक्कास!!!
काळ्या पैश्याला
काळ्या पैश्याला झाकणार्या,
पांढर्या शुभ्र खादीचा झगा आहे,
अश्वासनांच्या खैराती विसरून,
स्वतःचा खिसा भरण्याचीच मुभा आहे..
काळं काय पांढरं काय? सारी
काळं काय पांढरं काय?
सारी षंढपणाची कमाल आहे...
आमच्या नसांमध्ये पाणी,
त्यांचं रक्त तेवढं लाल आहे...
जाचक चार ओळी
जाचक चार ओळी
@मंदार, सुर्य, विशाल मी तर
@मंदार, सुर्य, विशाल
मी तर सग्ळ्यांचीच पंखा झालिये![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
सगळेच जबरदस्त आहात![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जुने काय, नविन काय, सर्वांचे
जुने काय, नविन काय,
सर्वांचे स्वतंत्र अस्तित्व आहे,
कुणि काय स्विकारायचे,
ही ज्याची त्याची विचारधारा आहे...
^^^^
कही च्या कहीच आहे![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मित्रहो हा लेख वाचा, म्हणजे
मित्रहो हा लेख वाचा, म्हणजे या सात्विक संतापाचं कारण उमजेल.
संताप आम्हाला पण येतो, पण
संताप आम्हाला पण येतो, पण पुन्हा शांत होतो कारण, सावरकरांनी देशासाठी काय नाही केले पण त्यांना यांनी देशद्रोही ठरवले,
सुंता हा शब्द पुल्लिंगी
सुंता हा शब्द पुल्लिंगी आहे...
@ मंदार, सूकि आणि
@ मंदार, सूकि आणि विशाल...
मस्त लिहिलय.....
नंदनवनात हिंसाचाराचा
नेहमीच नंगानाच आहे...
लढणार्या जवानाला मात्र
मानवाधिकाराचा जाच आहे !>>>>>>>>>>>>>> दुर्दैवाने अगदी खरं
मंदार, खास , जबरदस्त ...तडका
मंदार,
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खास , जबरदस्त ...तडका !
या संतापाला मतदानादिवशी मात्र लक्षात ठेवा ....!
झक्कास........ ! नेमक्या
झक्कास........ !
नेमक्या शब्दात नेमक्या भावना!
पण उघड उच्चारायची भ्रान्त आहे
मंदार, छान संताप उतरलाय
मंदार, छान संताप उतरलाय चारोळ्यांतून.
शेवटाची भन्नाट!
अगदी खदखदणारा संताप नेमक्या
अगदी खदखदणारा संताप नेमक्या शब्दात व्यक्त केला आहेस!
कानपिचक्या
कानपिचक्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
संताप एकदम नेमका
संताप एकदम नेमका उतरलाय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विशाल तुस्सी भी छा गये हो
मस्त आहेत चारोळ्या पण लेखणी
मस्त आहेत चारोळ्या पण लेखणी ठेवा म्हणजे तलवार घेता येईल.
जबरदस्त लिहिलं आहेस मंदार
जबरदस्त लिहिलं आहेस मंदार !!!! जबरदस्त !!!!!!!!!!
मस्त लिहिलयं !
मस्त लिहिलयं !
सात्विक संतापाच्या "चारोळ्या"
सात्विक संतापाच्या "चारोळ्या" आहेत की "आरोळ्या"???![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
Pages