( थोड़ी प्रस्तावना: फ्यामिली डॉक्टरचा जमाना गेला, स्पेशालिस्टचा ज़माना आला. स्पेशालिस्टला काही संवयी असतात, त्या चिकटल्या की चिकटल्या. अशाच काही सवयी आणि त्यांचे हे किस्से, खरे नव्हे, पण खोटे तरी कसे म्हणू ? )
रिटायरमेंट
१. Orthopedician
साठाव्या वर्षी
शेवटचं ट्रयाक्शन लावून
ओर्थोपीडीशीअन घरी आला
दारातच पाय घसरून
वोर्डात परत गेला
२. फिजिशियन
फिजिशियन ची साठी आली
हातात काठी आली
अंगात कंप आला
डोळ्यात मोती आला
तरी सुद्धा आपल्या बधीर कानाला
त्यान स्टेथो लावला
आणि स्वत:चाच हार्ट-रेट मोजू लागला!
३. सर्जन
हजार अपेंडीक्स, सातशे हायड्रोसील
आणि पाचशे हर्निया करून
सर्जननं नाईफ खाली ठेवली
नाईफ सुटली
अन वाइफ हंसली !
४. सायकीयाट्रीस्ट
रिटायरमेंट च्या दिवशी
सायकीयाट्रीस्टनं केली घोषणा
"आता माझा एकाच बाणा
आज पर्यंत वेड्यांची सेवा
आता करींन समाज सेवा"
मिसेस सायकीयाट्रीस्ट म्हणाल्या :
" यानी कसलं खूळ काढलय
याना नक्कीच वेड लागलय !"
5. Pediatrician
रिटायरामेंट च्या दिवशी
pediatrician रंगात आला
रंगाताच घरी येवून
"Pedaitric ड़ोस" दिला
गोरी-मोरी बायको झाली
लाजून मुरकून ती म्हणाली
"इश्श, हे हो काय
सारखं सारखं
लहान मुला सारखं!"
6. Pathologist
रिटायरमेंट च्या दिवशी
Pathologist सासरा झाला
मुलगा सून दोघं आले
पाय त्याचे धरू लागले
मुलगा म्हणाला
"बाबा, सून तुमची कशी आहे
निवड माझी कशी आहे?"
Pathologist म्हणाला
"काहीच सांगण जमात नाही
Microscope शिवाय काहीच दिसत नाही!"
7. Cardiologist
हार्ट स्पेशालिस्ट रिटायर झाला
त्याच दिवशी प्रेमात पडला
पिकलं पान
हिरवं रान
कसं काय झालं
त्याला विचारलं
तो म्हणाला:
"मैंने उसको नहीं देखा
उसका दिल देखा!"
-अशोक
छान सुरवात. छान सूर
छान सुरवात. छान सूर लागलाय.
लिहित राहा
(No subject)
डॉ.अशोक्,या ओळी मटा किंवा
डॉ.अशोक्,या ओळी मटा किंवा सकाळ या वृत्तपत्रांत वाचल्याचे स्मरते. यांचे रचना कर्ते आपण आहात का?
डॉ, हे तुम्ही मागे वेगळा धागा
डॉ, हे तुम्ही मागे वेगळा धागा उघडून टाकलं होतं (http://www.maayboli.com/node/1843()
... मी एक झब्बू पण दिला होता ... पुन्हा देते...
Fire Brigade:
फायर ब्रिगेडवाला रिटायर झाला,
सरकारी घरातून स्वतःच्या फ्लॅट मध्ये आला.
सकाळी अलार्म वाजल्यावर....
सांडपाण्याचा पाईप धरून ग्राउंड फ्लोअरवर उतरला.
>>डॉ.अशोक्,या ओळी मटा किंवा
>>डॉ.अशोक्,या ओळी मटा किंवा सकाळ या वृत्तपत्रांत वाचल्याचे स्मरते. यांचे रचना कर्ते आपण आहात क>>>>
??????
बाळकवी आणि रेव्यू या कविता
बाळकवी आणि रेव्यू
या कविता सगळ्या माझ्याच आहेत. सर्वप्रथम त्या दि. ०५ सप्टे १९९४ ला शिक्षक दिनाच्या दिवशी शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, नांदेड इथं काव्य्संमेलनात मी सादर केल्या, त्यानंतर मी आमच्या बॅचच्या गेट्-टूगेदर ला (१९६९ बॅच) १८ डिसें १९९४ ला औरंगाबाद इथं पण सादर केली
-अशोक
मामी.... तुम्ही तुमच्या
मामी....
तुम्ही तुमच्या प्रतिसादात खालील लिन्क दिली आहे
http://www.maayboli.com/node/1843
त्यावर टिचकी मारली असता काही फूले दिसतात. तुमचा झब्बू नाही. मला तरी ही कविता या समुहात यापूर्वी दिल्याचं आठवत नाही!!!!!!!
या समुहावर (मायबोली) मी केलेलं लेखन "पाऊलखुणा" या टॅबवर टीचकी मारली की दिसते. त्यावर ही मी हे लिखाण यापूर्वी सादर केलेले दिसून येत नाही
-अशोक
एका डॉक्टरच्या कविता-३:
एका डॉक्टरच्या कविता-३: रिटायरमेंट
डॉ अशोक | 4 August, 2010 - 21:30
( थोड़ी प्रस्तावना: फ्यामिली डॉक्टरचा जमाना गेला, स्पेशालिस्टचा ज़माना आला. स्पेशालिस्टला काही संवयी असतात, त्या चिकटल्या की चिकटल्या. अशाच काही सवयी आणि त्यांचे हे किस्से, खरे नव्हे, पण खोटे तरी कसे म्हणू ? )
रिटायरमेंट
१. Orthopedician
साठाव्या वर्षी
शेवटचं ट्रयाक्शन लावून
ओर्थोपीडीशीअन घरी आला
दारातच पाय घसरून
वोर्डात परत गेला
२. फिजिशियन
फिजिशियन ची साठी आली
हातात काठी आली
अंगात कंप आला
डोळ्यात मोती आला
तरी सुद्धा आपल्या बधीर कानाला
त्यान स्टेथो लावला
आणि स्वत:चाच हार्ट-रेट मोजू लागला!
३. सर्जन
हजार अपेंडीक्स, सातशे हायड्रोसील
आणि पाचशे हर्निया करून
सर्जननं नाईफ खाली ठेवली
नाईफ सुटली
अन वाइफ हंसली !
४. सायकीयाट्रीस्ट
रिटायरमेंट च्या दिवशी
सायकीयाट्रीस्टनं केली घोषणा
"आता माझा एकाच बाणा
आज पर्यंत वेड्यांची सेवा
आता करींन समाज सेवा"
मिसेस सायकीयाट्रीस्ट म्हणाल्या :
" यानी कसलं खूळ काढलय
याना नक्कीच वेड लागलय !"
5. Pediatrician
रिटायरामेंट च्या दिवशी
pediatrician रंगात आला
रंगाताच घरी येवून
"Pedaitric ड़ोस" दिला
गोरी-मोरी बायको झाली
लाजून मुरकून ती म्हणाली
"इश्श, हे हो काय
सारखं सारखं
लहान मुला सारखं!"
6. Pathologist
रिटायरमेंट च्या दिवशी
Pathologist सासरा झाला
मुलगा सून दोघं आले
पाय त्याचे धरू लागले
मुलगा म्हणाला
"बाबा, सून तुमची कशी आहे
निवड माझी कशी आहे?"
Pathologist म्हणाला
"काहीच सांगण जमात नाही
Microscope शिवाय काहीच दिसत नाही!"
7. Cardiologist
हार्ट स्पेशालिस्ट रिटायर झाला
त्याच दिवशी प्रेमात पडला
पिकलं पान
हिरवं रान
कसं काय झालं
त्याला विचारलं
तो म्हणाला:
"मैंने उसको नहीं देखा
उसका दिल देखा!"
-अशोक
निवडक १० त नोंदवा कविताडॉक्टरच्या
एक मुलगी | 5 August, 2010 - 00:16
आवडल्यात
प्रतिसादडेलिया | 5 August, 2010 - 00:22
भन्नाट!!
प्रतिसादआर्च | 5 August, 2010 - 00:27
प्रतिसादमामी | 5 August, 2010 - 00:40
अरे वा, एकदम झक्कास कल्पना! अशा बाकीच्या प्रोफेशन्स च्या देखिल retirement कविता बनवता येतील.
Fire Brigade:
फायर ब्रिगेडवाला रिटायर झाला,
सरकारी घरातून स्वतःच्या फ्लॅट मध्ये आला.
सकाळी अलार्म वाजल्यावर....
सांडपाण्याचा पाईप धरून ग्राउंड फ्लोअरवर उतरला.
डॉ, हे पहा आधीचं हेच लिखाण -
डॉ, हे पहा आधीचं हेच लिखाण - आधीच्या तारखेसकट. माझ्या पाऊलखुणातून मिळवलेलं. त्यावेळी चार प्रतिसाद होते.
डॉ, माझ्या पाऊलखुणा मधून जाऊनच वरिल लिंक दिली होती. आता त्याजागी फुले कशी काय आली कोण जाणे ... किंवा अॅडमिन जाणे!
मामी... धिस इज जस्ट अमेझिंग.
मामी...
धिस इज जस्ट अमेझिंग. मी खरंच सांगतो, मी मायबोलीवर या कविता टाकल्या नव्हत्या. इतर समुहावर (कम्युनिटीवर) टाकल्या होत्या. कविता एखाद्या समुहावर टाकली की तशी नोंद मी ती कविता माझ्या ज्या डायरीत लिहीली आहे त्याच डायरीत त्याच कवितेसोबत तशी नोंद करून ठेवतो. त्यामुळे माझ्या कडून मला खात्री आहे.
आता मला नकळत ही कविता सकाळ किंवा मटा त पण आलीय असं दिसतंय म्हणजे पहा!
-अशोक
मस्तच
मस्तच