शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ८

Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 10:48

मॉल असो वा रस्त्याच्या कडेला भरणारा बाजार. चोरबाजार ते जुना बाजार. काहीही न घेण्याचा पण करुन घराबाहेर पडलो तरी काहीतरी विकत घेण्याचा मोह पाडणारी ही ठिकाणे. तर टाका या मोहमयी जगताची छायाचित्रे आजच्या झब्बूमध्ये.

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

आजचा विषय - बाजार

तुमच्या गावातला बाजार, उरूस, किंवा एखादा मॉल यासारखी छायाचित्रे इथे येऊ देत.

2010_MB_Jhabbu_Bajaar.jpg
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

..

फोंडा, सिंधुदुर्ग येथे रात्री ११-१२ वाजता भरणारा पान बाजार. इथे पानं ट्रक भरून येतात आणि करंड्या शेकड्यावर विकल्या जातात. भाव ठरतो तो पण हातावर रूमाल टाकून. ते पण खूप इंटरेस्टींग असतं बघायला.

fonda-paan-bajar.jpg

>>भाव ठरतो तो पण हातावर रूमाल टाकून
वाशीच्या बाजारात एकदा बघितला होता हा प्रकार... नक्कीच इंटरेस्टेंग!

सगळ्यांची चित्रे छान.... आता मी धुंडाळतो माझ्याकडे!

नीधप.. मस्त फोटो कुडाळ म्हणजे कोकणातलं गाव ना समुद्र किनारी वसलेलं. कोकणात फुलांची अशी दुकानं खुप पहायला मिळतात.

हा कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदीराच्या बाहेर असलेला फुलांचा बाजार. दसर्‍याला तिथे प्रचंड गर्दी असते. विकणारे आणि विकत घेणारे यांची. Happy

.

गिरीविहार
त्या ट्रे मध्ये ठेवलेल्या बांगड्या आहेत का नैनीताल बाजारातल्या? एकदम मस्त व्हायब्रंट रंग आहेत.

नीधप,
तुमचा फोंडा येथील पानबाजाराचा फोटो आवडला !
आमची ,आमच्या गावची पानं इथ नेहमी येतात ...
Happy

हेवर्ड मार्केट, बॉस्टन

DSC01418_0.JPG

या ठिकाणी मी अमेरिकेत पहिल्यांदाच लोकांना भाजीच्या भावावरून कचाकचा भांडताना पाहिलं आणि काय धन्य वाटलं म्हणून सांगू :p

Pages