शब्दांकुर : पर्ण- २

Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 23:28

2010_MB_kavyasphurti-2.jpgस्पर्धेचे नियम :
१. ही स्पर्धा फक्त मायबोलीकरांसाठी आहे.
२. ह्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
३. ह्या स्पर्धेसाठी एका व्यक्तीला एकापेक्षा जास्त प्रवेशिका (चारोळी/कविता) पाठवण्याची मुभा आहे.
४. आपली कविता १८ सप्टेंबर २०१० पूर्वी इथेच लिहा. त्यानंतर नविन विषय देण्यात येईल.
५. आपली कविता ही स्वतः लिहिलेली असावी. तसेच पूर्वप्रकाशित नसावी.
६. स्पर्धेचा निकाल परीक्षकांमार्फत लावण्यात येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्षितिजा लालसर व्हायला आली...
हलकेच पश्चीमा उजळु लागली..
पक्षी घरट्यांकडे परतायला लागले
आपली रोजची शतपावली संपवून...
दमलेले भास्करबुवा घरी परतले...
तुझ्यातच रमलेल्या...
माझ्या स्मृतींना...
कसलीच..., 'गंधवार्ता' असु नये?

आशु.. आता बघ Happy

बेभान शोध रानोमाळ
पसरली गंध वार्ता
कुठली तृषा?
अंतरीची....

आपलीच तिजोरी खुली
नाही तयाला गंधवार्ता
कसली नशा?
कस्तुरीची....

उधळू नको फुलाना वार्‍यात गंधवार्ता
सजणा फुलाफुलांच्या मार्‍यात गंधवार्ता

हे प्रेम पारदर्शी झाले असे सुगंधी
रागावता सख्या तू पार्‍यात गंधवार्ता

प्रत्येक पूर्णतेच्या असतो सुगंध ओठी
पुनवेत भारलेल्या तार्‍यात गंधवार्ता

ही बाग शिंपणारा माळीच तू असावा
ही बा तुझीच लीला सार्‍यात गंधवार्ता

'दम' गड्या रे,
'हाक' नित्यच 'एचार' बाई देई,
'काम' आले 'पुर्ण कर' तु,
'पी एम' सांगुन जाई...

'काम' झाले, सर्व 'चाले',
'बग'ही फार काही नाही,
'सप्टें.' चाल्लाय!! 'अपरेजल'ची
गंधवार्ता नाही... Wink

विशाल, अश्विनी, छान कविता
छाया, मस्त. आवडली Happy
ऋयाम, Lol मस्त आहे. आवडली.

थकलेल्या गात्रांना हवी विश्रांती
गाण्यांच्या भडिमारातून
ढोल-ताशांच्या व स्पीकर्सच्या भिंतींतून
अर्वाच्य डिस्कोगीतांच्या मार्‍यातून....
गहिरी.... अविचल....

डोळ्यांच्या धुक्यातून अंधुक
कधीतरी दिसतो बाप्पा टी.व्ही. स्क्रीनवर
त्यालाच जोडतो मनापासून हात
म्हणतो, देवा आता इच्छा नाही कशात
घरकैद्याला कसली नाही गंधवार्ता
ना फिकीर ना चैन....
उरली आहे फक्त तळमळ
तुला भेटण्याची!!!

आमचीही मिरवणूक आता लवकर निघू द्यावी....

बघ झाली संध्यावेळा...
क्षणात खगही उडाले
नभ सावळे सैलावले
अन तू समीप नसावी..!
स्मृतीत भिजले डोळे...
क्षण सरले अन ओले...
लागल्या जिवा कळा
तुज गंधवार्ता नसावी...!

'लय उकाडतंय' म्हनलो नै तर,
पाऊस 'वळवाचा' आलाया.
'पाऊसपानी' चिंब झालो..
'याद' मनी दाटलीया.

सांग गड्या तुच मला मग,
आता याला काय म्हनु?
मनात आलं, दिसली 'ती' पन
गंधवार्ताच लागलीय जनु? Happy

जपले मनात काही..
कुठले? दुजात नुरता..
मधुमीलनात अपुल्या..
माझे तुझे न उरता..

या,या दशदिशांनो..
का चांदण्यात झुरता?..
या घेऊनी सख्याची
वार्‍यात गंधवार्ता..

मोकळी केली कळीने एकेक अपुली पाकळी
मंद मंद पवन लहरी, गमते गुंफ़िती साखळी
गंध घाली बंधने हा, मार्गिका त्याने रोधिली
जवळ येता बोचते का, मग कंटकाची ही सळी?

दोर गळ्यात लटकवून
बाप झुलतोय झाडावर
माय निपचित पडलीय
हृदय फाटता धरतीवर

बाळ खिदळतंय मनीसंगे
मिशा तिच्या धरता-धरता
नाही जराशी त्याला
कसलीsssचं गंधवार्ता

माझीया रक्तातले
सुप्त गाणे तुच आहे...
मम वेदनी संवेदनी
ते भोगलेले तुच आहे...

व्यापलेल्या या मनाचे
सत्व सारे तुच आहे..
सुकुन गेले पुष्प जरी
परी गंधवार्ता तुच आहे...

दिवस सरले, टक्कल पडले
विचार करता करता
काय म्हणुनी काव्य करू मी
वापरूनी शब्द "गंधवार्ता" Happy

आयोजक हि "वात्रट " अमुचे
न देती शब्द सरळ सादा
वरुनी घेती आनंद काव्यासुरी ["काव्य -असुरी "]
घालूनी ओळींची मर्यादा Lol

वैद्यबुवा | 17 September, 2010 - 18:34

पग्या,
तुम्ही अटलांटाकर एकदम जीटीजी किंग झाला आहात. दर २-३ आठवड्यांनी जीटीजीची गंधवार्ता येत असते

बुवांच्या ह्या पोस्ट वरुन सुचलेली (बळच जुळवलेली) कविता...

तुम्ही अटलांटाकर एकदम जीटीजी किंग झाला आहात
दर २-३ आठवड्यांनी जीटीजीची गंधवार्ता येत असते
न्युजर्सी, डिसी आणि चुकीच्या किनार्‍यावरील मायबोलीकरांना
"चुकीच्या ठिकाणी राहतो आपण" अशी जाणीव करुन देत असते

जीटीजीचं नाव काढताच अकर्स एकदम तयार असतात
फक्त वार आणि वेळ कळवा, खायला एक्सॉटिक डेझर्ट्सच असतात

सगळे अकर्स कधीही कुठेही जायला तयार असतात
जीटीजीचं नाव काढताच छोटेही बागडत असतात

मायबोलीच्या कार्यक्रमातही अकर्सच पुढे असतात
गणेशोत्सव, दिवाळी अंकात आपला ठसा उमटवत असतात

प्रत्येक जीटीजीची काहीतरी नविन कल्पना असते
कंपूबाजीची मात्र अकरांना गंधवार्ताही नसते!!

वा वा.. विनायकच्या काव्यपुष्पासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.. Happy