युएस ओपन सिरीज - २०१०

Submitted by Adm on 5 August, 2010 - 12:10

क्ले आणि ग्रास कोर्टचा सिजन संपल्यानंतर आता हार्डकोर्ट सिजन सुरु झाला आहे. हा धागा ह्यावर्षीच्या युएस ओपन सिरीज तसेच सरत्या उन्हाळ्यात येणार्‍या युएस ओपन टेनीस स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी.

युएस ओपन टेनीस स्पर्धा २०१० सोमवारपासून सुरु होत आहे. रफाएल नदाल आणि कॅरोलाईन वोझनियाकी ह्यांना अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीमध्ये अग्रमानांकन मिळालं आहे.

महिला एकेरीमध्ये सेरेना विल्यम्स आणि जस्टीन हेनीन अश्या दोन दिग्गज खेळाडू यंदा अनुपस्थित असल्याने बाकींच्या खेळाडूंमधे विजेतेपदासाठी चुरशीसी स्पर्धा दिसेल. मानांकनाप्रमाणे खेळाडूंनी आपले सामने जिंकले तर उपांत्यपूर्व फेर्‍यांचे चित्र असं असेल.
महिला एकेरी :
वोझनियाकी वि ना ली (शारापोव्हा, कुझनेत्सोवा ह्याच क्वार्टरमधे आहेत).
यांकोविच वि झ्वोनारेवा
स्क्विवोनी वि व्हिनस विल्यम्स
स्टोसूर वि किम क्लायस्टर्स

पुरुष एकेरी :
पुरुष एकेरी
नदाल वि व्हरडास्को
अँडी मरे वि बर्डीच
डेव्हीडँको वि जोकोविच (रॉडीक ह्या क्वार्टर मधे आहे)
सॉडर्लिंग वि फेडरर (हेविड ह्या क्वार्टर मधे आहे)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे तो जोको हातातले पॉइंट का घालवतोय कळेना. चौथ्या सेटच्या तिसर्‍या गेममध्ये दोन-चार सुंदर मुली दाखवल्या प्रेक्षकातल्या त्या बघितल्या का? Wink

दमलाय खरं जोको. त्याला त्या पावसाच्या ब्रेक मुळे जरा चान्स मिळाला नाहीतर त्या आधी सुद्धा जरा हुकत होते शॉट्स.
राफा कसला कसलेला आहे! त्याचं ट्रेनिंग रेजिमेन जबरी असणार एकदम.

अंगात ताकद नसेल तर मग जिंकणं अवघडच आहे पण ताकद असेल तर बिंदास खेळावं. फेडरर विरुद्द असेच तर ओढले त्यानी २ मॅच पॉईंट?

अबाबाबाबाबाबा.... काय ती पावर ? तो राफा तर एकदम बाजी प्रभु देशपांडेंसारखी रॅकेट फिरवतो शॉट मारल्यावर (डोक्यावरुन). रॅकेटबाज बाजी राफा Proud

अभिनंदन राफा !!!

पूर्ण मॅच मध्ये जोको फार कमी वेळेस चांगला वाटला. त्याला राफाने नाचवले. त्या ड्रॉप शॉट तर इतक्या अबसर्ड होत्या की, त्या त्याला एक दोन वेळ सोडून दरवेळी महागात पडल्या. फिजीकल अन मेंटल गेम मध्ये त्याची हार झाली. राफा दोन्हीत उच्च आहे, म्हणूनच तो चॅम्प.

जोको, बेटर लक नेक्स्ट टाईम. Happy

aha.gifaha.gifaha.gif

करीयर गोल्डन स्लॅमबद्दल राफाचे हार्दीक अभिनंदन.. Happy

मॅच अमेझिंग झाली. काही काही रॅलीज केवळ उच्च होत्या. नोव्हाकचा खेळ खूपच उंचावलाय आणि त्याने मारलेले फोरहॅंड विनर्स अप्रतिम होते. राफाने नंबर १ रँकिंगला साजेसा खेळ करत सगळी आव्हानं परतून लावली. राफाच्या सर्व्हिस आणि फोरहँड्स तसेच डबल हँडेड बॅकहँड्स म हा न होते. कोर्ट कव्हरेज मात्र क्वचित काही पॉईंट्सना गंडल्यासारखे वाटले. पण एकूणात राफा मस्तच खेळला. !

नोव्हाकला लवकरच पुढचे ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळण्यासाठी खूप शुभेच्छा. Happy

आता ऑस्ट्रेलियन ओपन पर्यंत सारं कसं शांत शांत... Happy

अभिनंदन राफा !!! विनर मारुन घेतली असती तर मजा आली असती. जोकोने मध्येच काय बाहेर मारला.

मुकुंद ह्यांनी अवतार घ्यायची वेळ आली आहे Proud

करीयर गोल्डन स्लॅमबद्दल राफाचे हार्दीक अभिनंदन..
जोकर म्हणाल्याप्रमाणे राफाच यु.एस ओपन विजेतेपदाचा दावेदार आहे. Happy
वेल प्लेड राफा!! सद्यातरी तो अप्रतिम टेनीस खेळत आहे. २४व्या वर्षी फेडरर पेक्श्या ४ ग्रँडस्लॅम ने पुढे आहे.

राफ़ाचे अभिनंदन!!!
राफ़ाला जोकोव्हिचचा ऎतित्युद(किती गोड) आवडतो ना? कोणाला नाही आवडणार? सामना चालू असताना प्रतिस्पर्ध्याच्या चांगल्या खेळाला दाद देणारा, जिंकल्यावर पण माझ्यासाठी नाही प्रतिस्पर्ध्यासाठी टाळ्या वाजवा असे प्रेक्षकांना सांगणारा आणखी कोणी खेळाडू आहे? फ़िटनेस आणि निर्धारात आणखी भर पडली तर नंबर टू आणि मागच्या खेळाडूंमधली दरी आणखी रुंदावेल.
राफ़ा म्हणजे फ़क्त माश्याच्या डोळ्यावर लक्ष ठेवणार्‍या अर्जुनाची मूर्तिमंत एकाग्रता. त्याच्याइतका मनोनिग्रह्(मेंटल स्ट्रेंग्थ कुणाकडेही नाही. (एका वर्षातली) ग्रॆंड स्लॆम करू शकेल असा सध्या तो(च) आहे.

एकदम झकास जिंकला राफा..... दुसरा आणि तिसरा सेट बघितला सकाळी लवकर उठून... तिसर्‍या सेट पासून जी पकड घेतली ती सोडलीच नाही..

राफा बर्‍याच वेळेस असे करतो.. एकदा सामना हातात आलाय असे त्याला वाटले की मग समोरच्याची धडगत नसते अजिबात.. फुल स्पीडमधे बुंगाट सुटतो तो... त्याला फक्त बाजूच्या दोन रेघाच दिसतात.. आणि कुठूनही शॉट मारला तरी तो बरोबर त्या दोन रेघांच्या मध्येच पडतो.. क्रॉसकोर्ट पासिंग शॉट्स काय किंवा प्लेस केलेले शॉट्स काय.. काहीच चुकत नाही... आणि एकदा मॅच हातात आलीये असे जाणवले की कुठेही घाई गडबड न करता शांतपणे समोरच्याला हरवतो तो.... आणि त्यात जर समोरचा चिडणारा असेल तर मग विचारायलाच नको.. अजूनच वाट लावतो त्याची..

फक्त शेवटच्या सामन्यात एक सेट हरालाय तो यंदा... आणि त्याच्या समोर खेळणारे आधीच्या फेरीत घाम गाळूनच त्याच्या समोर आले होते खेळायला.. नाही म्हणायला ह्याचा फरक पडतोच.. जर रविवारीच मॅच झाली असती तर कदाचित एकतर्फी झाली असती... अर्थात राफा राफाच आहे.. त्याला काहीच फरक पडला नाही...

USOPEN च्या साईटवर राफा आणि फेडेक्सच्या आत्ता पर्यंतच्या खेळातील काही गोष्टींची तुलना केली आहे.. राफा फेडेक्सच्या आत्ताच पुढे आहे.. फेडेक्स एवढा खेळला तर अजून खुप पुढे जाईल..

वर कोणी तरी USOPEN च्या साईटला शिव्या घातल्या आहेत.. माझेही त्याला अनुमोदन.. तिथेच असलो तरी... विम्बल्डन, फ्रेंच ओपन च्या साईट्स खूपच बर्‍या आहेत..

Pages