क्ले आणि ग्रास कोर्टचा सिजन संपल्यानंतर आता हार्डकोर्ट सिजन सुरु झाला आहे. हा धागा ह्यावर्षीच्या युएस ओपन सिरीज तसेच सरत्या उन्हाळ्यात येणार्या युएस ओपन टेनीस स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी.
युएस ओपन टेनीस स्पर्धा २०१० सोमवारपासून सुरु होत आहे. रफाएल नदाल आणि कॅरोलाईन वोझनियाकी ह्यांना अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीमध्ये अग्रमानांकन मिळालं आहे.
महिला एकेरीमध्ये सेरेना विल्यम्स आणि जस्टीन हेनीन अश्या दोन दिग्गज खेळाडू यंदा अनुपस्थित असल्याने बाकींच्या खेळाडूंमधे विजेतेपदासाठी चुरशीसी स्पर्धा दिसेल. मानांकनाप्रमाणे खेळाडूंनी आपले सामने जिंकले तर उपांत्यपूर्व फेर्यांचे चित्र असं असेल.
महिला एकेरी :
वोझनियाकी वि ना ली (शारापोव्हा, कुझनेत्सोवा ह्याच क्वार्टरमधे आहेत).
यांकोविच वि झ्वोनारेवा
स्क्विवोनी वि व्हिनस विल्यम्स
स्टोसूर वि किम क्लायस्टर्स
पुरुष एकेरी :
पुरुष एकेरी
नदाल वि व्हरडास्को
अँडी मरे वि बर्डीच
डेव्हीडँको वि जोकोविच (रॉडीक ह्या क्वार्टर मधे आहे)
सॉडर्लिंग वि फेडरर (हेविड ह्या क्वार्टर मधे आहे)
>>जोको कॅन वेट फॉर अनादर
>>जोको कॅन वेट फॉर अनादर डे.
अजुन किती दिवस?
मान्य आहे नदाल खुप खुप छान खेळत आहे पण जोको त्याला उद्या चान्गलाच त्रास देणार.
अजुन किती दिवस? पुढच्या
अजुन किती दिवस?
पुढच्या ऑस्ट्रेलियन ओपनपासून त्याला रान मोकळं.
क्ले कोर्ट आणि ग्रास कोर्ट राफाला, हार्ड कोर्ट बाकीच्यांना.
जोको मस्तच खेळला.. पण फेडीने
जोको मस्तच खेळला.. पण फेडीने खूप चुकाही केल्या.. दुसर्या आणि चौथ्या सेटमध्ये फारच जाणवलं हे.. :(. उद्या जोको नदालला चांगली लढत देईल पण नदालचा सध्याचा एकुण फॉर्म आणि फिजिकल फिटनेस बघता राफाला रोखणे कठीण जाईल जोकोला. तेव्हा उद्याचा माझा चॉईस नदाल.. तो करियर स्लॅम उद्या पूर्ण करणार :). (पुन्हा एकदा नदाल फेडी ड्रिम फायनल पहायचे स्वप्न अपुरे :()
फेडीला वाटतंय आपल्याला आता
फेडीला वाटतंय आपल्याला आता टेनीस मध्ये मिळवण्यासारखं काही राहिलं नाही >>>>>
१. ऑलिंपीक एकेरी सुवर्णपदक
२. गोल्डन स्लॅम
३. डेव्हिस कप मधे देशाला विजय मिळवून देणे.
आत्ता तरी एव्हड आठवतय..
आवडता खेळाडू आहे मान्य, पण म्हणून "टेनीस मधे मिळवण्यासारखं आता काहीच उरलं नाही" हे विधान फारच भावनेच्या भरात केल्यासारखं वाटतय.
आजची फायनल मस्त होणार !!!
खरय! आजची फायनल मस्त होणार!
खरय! आजची फायनल मस्त होणार! दोघंही कमालीचे फास्ट रनर्स आणि पॉवरफूल हिटर्स आहेत. फेडरर खरं ह्या दोघांपेक्षा शॉट प्लेसमेंट मध्ये "कट अबव" आहे पण एकदा तेच बरोबर होत नाही म्हंटल्यावर जरा अवघड होऊन बसतं. काल पण इतक्या चुका करुन सुद्धा शेवटच्या सेट मधल्या शेवटच्या गेम पर्यंत मॅच नेली.
राफा आणि जोको स्कील्स बाबत एकदम "इक्वल्स" वाटतात.
पण वैद्यबुवा, "जो जिता वही
पण वैद्यबुवा, "जो जिता वही सिकंदर" जोकोने बरिच वाट पाहिली आहे. जोको जिंकला मला आनंद झाला. फेडी खुप ग्राण्ड्स्लाम जिंकुनही दडपण नाही झेलु शकला सिंडी.
फेडीला काय वाटतंय ते आपल्याला
फेडीला काय वाटतंय ते आपल्याला काय माहीत?
कालही फर्स्ट सर्विस पन्नास टक्क्याजवळ!
पराग, ऑलिम्पिक गोल्ड आणि गोल्डन स्लॅम या दोन्ही एकच गोष्टी आहेत. पुरुषांमध्ये आत्तापर्यंत तो एकानेच केला त्याचे नाव आन्द्रे
बायकांमध्ये स्टेफीने केला.
डेव्हिस कप एकटा माणूस कसा जिंकून देणार? आणि शेवटी या गोष्टींना 'व्यावसायिक' टेनीसपटू किती महत्त्व देतात कल्पना नाही.
'प्रत्येक पॉइंट जीव तोडून खेळणे' असा त्याचा गेम कधीच नव्हता. (म्हणून कधीकधी कंटाळा आला म्हणून मॅच सोडली की काय असे वाटते.) तसा तो सॅम्प्रसचाही नव्हता. त्यांचा सहज आणि स्मार्ट गेम. म्हणूनच दोघेही फारसे कधी इजा-दुखापत, फिटनेस प्रॉब्लेम्स कारणाने ब्रेक न घेता इतकी वर्षं खेळले. हे माझे मत आहे. अर्थात पॉवर गेमही खेळत होते दोघे. परवा हिन्गीस काय म्हणाली ते ऐकले, तिचा पण गेम स्मार्ट होता पण पॉवर नव्हती, बायकांच्यातही hard hitting आल्यानंतर ती संपली.
गोल्डन स्लॅम म्हणजे एकाच
गोल्डन स्लॅम म्हणजे एकाच वर्षात चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा + ऑलिंपिक गोल्ड जिंकणे, जे स्टेफीने केले.
आंद्रे आगासीने करीअर गोल्डन स्लॅम केले, एका वर्षात नाही.
A singles player or doubles team that wins all four Grand Slam tournaments in the same year is said to have achieved the "Grand Slam". If the player or team wins all four consecutively, but not in the same calendar year, it is called a "Non-Calendar Year Grand Slam". Winning all four at some point in a career, even if not consecutively, is referred to as a "Career Grand Slam". Winning the four Majors and a gold medal in tennis at the Summer Olympics has been called a "Golden Slam" since 1988,[3] when Steffi Graf became the only person to accomplish that feat in a single calendar year. Andre Agassi is the only other player to achieve a "Golden Slam", but Agassi did not do it in one calendar year, so his is called a "Career Golden Slam
विकीमधून.
ऑलिम्पिक गोल्ड आणि गोल्डन
ऑलिम्पिक गोल्ड आणि गोल्डन स्लॅम या दोन्ही एकच गोष्टी आहेत. पुरुषांमध्ये आत्तापर्यंत तो एकानेच केला त्याचे नाव आन्द्रे >>
फेडीने नाही का केला??
फायनलची दोन तिकिट्स आहेत.
फायनलची दोन तिकिट्स आहेत. कुणाला हवी आहेत का ? PDF आहेत त्यामुळे मी इ-मेल करु शकते. कायद्याने हे अलाउड नाहीये वगैरे भानगडी काढु नका प्लीज. मॅच बघायची असेल तर सांगा.
सुमंगल, फेडीला अजून ऑलिंपीक
सुमंगल, फेडीला अजून ऑलिंपीक मिळायचे आहे.
मला आधी ते 4PM PT वाट्लेलं आणि लवकर घरी जायचा विचार करत होते. पोपट 
श्या आजची मॅच ऑफीस मध्ये बसून live scorecard वर समाधान मानत बघावी लागणार. 4PM ET
कायद्याने हे अलाउड नाहीये
कायद्याने हे अलाउड नाहीये वगैरे भानगडी काढु नका प्लीज. मॅच बघायची असेल तर सांगा. >>
अलाउड असते गं काळजी नको करु. मी अनेकदा तिकिटे ऐनवेळी विकली आहेत.
मधुरा CBSSPORTS वर जा लाईव्ह बघायला मिळेल.
ऑफिसमध्ये एकाला दिली तिकिट्स.
ऑफिसमध्ये एकाला दिली तिकिट्स. फायनल फायनल पे लिखा है देखनेवाले का नाम
गेल्या वर्षी तरी एक दिवस आधीच माहिती होतं जाता येणार नाही त्यामुळे क्रेग्सलिस्टवर विकली होती.
अरे ते जोकोविच पागल झाला आहे.
अरे ते जोकोविच पागल झाला आहे. त्याने रॅकेट तोडली. त्या आधी दोनदा आपल्या बुटांवर मारुन घेतले. त्याला मानसिक स्वास्थ्याची गरज आहे.
अरे ते जोकोविच पागल झाला आहे.
अरे ते जोकोविच पागल झाला आहे. त्याने रॅकेट तोडली. त्या आधी दोनदा आपल्या बुटांवर मारुन घेतले. त्याला मानसिक स्वास्थ्याची गरज आहे.
>> परवाही तो असलं काय काय करत होता .. डोक्यावर मारून घेतलं, एकदा बूटांवर फटके मारले ..
पण मग नंतर शांत होता बराच!
केदार, लींक साठी धन्स . विंडो
केदार, लींक साठी धन्स :). विंडो उघड-झाप करत का होईना बघता येईल आता.
जोको भारी खेळतोय !!!
जोको भारी खेळतोय !!!
पहिला सेट राफा नेच घेतलाय ना?
पहिला सेट राफा नेच घेतलाय ना? आणि एकच तर सर्व्ह ब्रेक झालीये ना दुसर्या सेट मध्ये?
पाहिला सेट नदालने घेतला आणि
पाहिला सेट नदालने घेतला आणि जोकोने त्याची एकच सर्व्ह ब्रेक केली म्हणजे जोको चांगला खेळूच शकत नाही असं होतं का ???? (की दात विचकावायचे राहिलेत?)
मॅच अजून बरीच आहे. दुसर्यात
मॅच अजून बरीच आहे. दुसर्यात ४ -३ मला नदाल दरवेळी जोकोच्या शॉट मधिल पावर काढून घेत होता ते आवडले.
पाहिला सेट नदालने घेतला आणि
पाहिला सेट नदालने घेतला आणि जोकोने त्याची एकच सर्व्ह ब्रेक केली म्हणजे जोको चांगला खेळूच शकत नाही असं होतं का ???? >> नादालने परत सर्व्ह ब्रेक केली म्हणजे आता ब्रेक-इव्हन आणि वरच्या पोस्ट चा अर्थ अजून तरी जोको नादालला हरवेल असा खेळत नसावा ..
राफा रिटर्न्स! अरे काय तडाखे
राफा रिटर्न्स! अरे काय तडाखे लावले त्यानी!
फेडरर एखाद्याच्या गेमचे किती बारा वाजवू शकतो ह्याचा प्रत्यय आला. जोको विरुद्ध कसले वाटतायत राफा चे फटके! लाजवाब! पार कुठून कुठून कोर्टाच्या कोपर्यातून फॉरहॅन्ड्स/ बॅकहॅन्ड्स क्रॉस कोर्टात लाईनीच्या जवळ अचूकपणे हाणतोय!
आता तर एका सर्व वर जोकोची रॅकेट १ सेकंद उशीरा फिरली, बॉल कवाच निघून गेला होता, साईड मारके!
जोको दमलाय!
वरच्या पोस्ट चा अर्थ अजून तरी
वरच्या पोस्ट चा अर्थ अजून तरी जोको नादालला हरवेल असा खेळत नसावा .. >>>>> जोको नदालला हरवेलं असं खेळतोय असं मी वर कुठे म्हंटल्याचं मला कुठेही दिसत नाहिये. दुसर्या सेटच्या सुरुवातीला जोको अशक्य भारी फोरहँड मारत होता. एकीकडे मॅच बघताना लिहिलेलं "जोको भारी खेळतोय !!!" इतकच विधान होतं ते.
जर तार्किक वाद घालायचे असतील तर घालावे. पोस्ट्सचा किस पाडायचा असेल तर इथे नको, इतर वाहत्या बाफंवर भेटू. धन्यवाद !
रच्याकने, आता राफा भारी खेळतोय !!!! (ह्याचा अर्थ जोको भयंकर वाईट खेळतोय असा नाही, पण राफाने त्याचा खेळ खूप उंचावला आहे. धन्यवाद !!)
श्या पाऊस परत
श्या पाऊस परत
पराग, भावना आवरा! सध्या तरी
पराग, भावना आवरा! सध्या तरी तुम्हाला कुठेही भेटायची इच्छा नाही! धन्यवाद!
हो ना. चांगली मॅच रंगली होती.
हो ना. चांगली मॅच रंगली होती.
मी वरच काहीही कुठल्याही
मी वरच काहीही कुठल्याही भावनेच्या भरात लिहिलेलं नाही !
असो. त्या विषयाबद्दल हेमाशेपो.
सरकतय वादळ, इथे जर्सीत पण
सरकतय वादळ, इथे जर्सीत पण चांगलच कोसळतोय पाऊस. आज कामाहून लवकर आलो, आज तरी पुर्ण होऊ देत मॅच.

)
सशल, पगेंदर चिल! (कोण बोलतय बघा
पगेंदर, खरय, त्याचा गेम खुपच ऊंचावल्यासारखा वाटतोय. पहिल्या वहिल्या यु एस ओपन टायटल ची संधी इतकी जवळ असल्यामुळे जरा जास्त रश आला असेल अंगात. तुफान शॉट्स टाकतोय!
तिसर्या सेटचा चौथा पाँईट
तिसर्या सेटचा चौथा पाँईट अबब, केवळ अप्रतिम. राफा !!
दोघही सॉल्लीड खेळतायत! मजा
दोघही सॉल्लीड खेळतायत! मजा येतेय बघायला.
राफाच जिंकेल असं वाटतय. जोको बराच वेळा फक्त रिटर्न करत असतो शॉट, कधी कधीच प्लेसमेंट बघून करतो असं वाटतं. राफा प्रत्येक वेळा चांगली प्लेसमेंट करायला बघतो आणि त्याला जमते.
मस्त मॅच!!!
Pages