युएस ओपन सिरीज - २०१०

Submitted by Adm on 5 August, 2010 - 12:10

क्ले आणि ग्रास कोर्टचा सिजन संपल्यानंतर आता हार्डकोर्ट सिजन सुरु झाला आहे. हा धागा ह्यावर्षीच्या युएस ओपन सिरीज तसेच सरत्या उन्हाळ्यात येणार्‍या युएस ओपन टेनीस स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी.

युएस ओपन टेनीस स्पर्धा २०१० सोमवारपासून सुरु होत आहे. रफाएल नदाल आणि कॅरोलाईन वोझनियाकी ह्यांना अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीमध्ये अग्रमानांकन मिळालं आहे.

महिला एकेरीमध्ये सेरेना विल्यम्स आणि जस्टीन हेनीन अश्या दोन दिग्गज खेळाडू यंदा अनुपस्थित असल्याने बाकींच्या खेळाडूंमधे विजेतेपदासाठी चुरशीसी स्पर्धा दिसेल. मानांकनाप्रमाणे खेळाडूंनी आपले सामने जिंकले तर उपांत्यपूर्व फेर्‍यांचे चित्र असं असेल.
महिला एकेरी :
वोझनियाकी वि ना ली (शारापोव्हा, कुझनेत्सोवा ह्याच क्वार्टरमधे आहेत).
यांकोविच वि झ्वोनारेवा
स्क्विवोनी वि व्हिनस विल्यम्स
स्टोसूर वि किम क्लायस्टर्स

पुरुष एकेरी :
पुरुष एकेरी
नदाल वि व्हरडास्को
अँडी मरे वि बर्डीच
डेव्हीडँको वि जोकोविच (रॉडीक ह्या क्वार्टर मधे आहे)
सॉडर्लिंग वि फेडरर (हेविड ह्या क्वार्टर मधे आहे)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विजेत्या ब्रायन्सचे अभिनंदन Happy
उपविजेत्या बोपण्णा आणि कुरेशीचेही अभिनंदन Happy चांगली लढत दिली ब्रायन बंधूंना..

कमॉSSSन वॉझ्नीSSS

अरे मंडलीनो, पुढची मॅच, ताबडतोब आहे की ७.०० नंतर? वेबसाईट तर ३.३० च्या आधी नाही असं सांगते. आताची मॅच संपायला फर वेळ नाही लागायचा, मग तर ५.०० पर्यंत सुरु होऊन जाईल मॅच!

सेमी-फायनलच जोरात टस्सल होणार आहे! फायनल जरा वन सायडेड होणार.

>>यु एस ओपन ऑर्ग किती भयानक बनवली आहे
सहमत !! त्यापेक्शा विम्बल्डन्ची साइट खुप चान्गली आहे.
यु एस ओपन ऑर्ग स्कोर पण नीट दाखवत नाही. आय.बी.एम. ने बनवली आहे

पुरुष दुहेरी फायनलाचा दुसरा सेट पाहिला(पहिला सेट चालू असताना मुंबई इंडियन्सची धुलाई पाहिली). बोपन्ना कुरेशी मस्त खेळले, ब्रायन्सपेक्षा आक्रमक्,सर्व्हिस गेममधे दोघांचेही नेटवर आक्रमण, तिथले बॅक हँड ड्रॉप शॉट्स ही त्यांची खासियत ठरावी. दुसर्‍या सेटच्या बहुधा १०व्या गेमपर्यंत त्यांनी ब्रेक पॉईंट येऊ दिला नाही. ब्रायन्सच्या सर्व्हिसवर मात्र किमान ५ ब्रेक पॉईंट्स आले.
अखेर महत्त्वाचे पॉईंट्स आणि टायब्रेक जास्त चांगले खेळल्याने ब्रायन्स जिंकले.
कुरेशी बोपन्नाच्या समझौता एक्स्प्रेस कडून भविष्यात नक्कीच खूप अपेक्षा आहेत.

यु एस ओपनमधे मिश्र दुहेरीत ड्युस नंतर लगेच डिसिजिव्ह पॉईंट होतो, पण पुरुष दुहेरीत मत्र अ‍ॅड्व्हांटेज!

अरे, आज कोणीच नाही का इथे?
मस्त चाललीये मॅच! दोघंही कसले स्मार्ट प्लेयर्स आहेत! जोकोविच आजाबात दबकत नाही फेडरर ला!!
काहीच सांगता येत नाही ह्या घटकेला! फेडरर इतका अ‍ॅक्युरेट नसला जोको तरी पायांमध्ये खुपच दम आहे जोकोच्या, कायच्या कवरेज आहे कोर्टचं.

जोको-फेडरर भारी चालू आहे मॅच. तिसरा सेट जोको वेड्यासारखा हारला एका गेममधे वाईट खेळल्याने. आता चौथ्यात लगेच गेम ब्रेक केला आहे.. पाच सेटपर्यंत जाणार बहुदा.

येस्स.. जॉको डबल ब्रेक.

जोकोssssssssssssssss जोकोssssssssssssssssssss

aha.gifaha.gif

राफाssssssssssssssss राफाssssssssssssssssssssss

aha.gifaha.gif

हारला रे हारला फेडी. पण लै भारी मॅच. फेडीच्या विरुद्ध कुणी मॅच पॉइंट कन्सीड करुन जिंकलय का?

पराग Lol
मी बघेपर्यंत दोन प्रतिसाद नवीन होते. मला वाटलंच एक तुझा असेल...

मस्त झाली मॅच.. फार मजा आली. भारी खेळला जोको. फेडीपण भारी खेळला.
खरंतर नदालला हरवायला जोको समर्थ आहे आता फेडररपेक्षा. फायनलला मजा येईल.

मला शेवटच्या पॉईंटपर्यंत वाटत होते की फेडीला वाटतंय आपल्याला आता टेनीस मध्ये मिळवण्यासारखं काही राहिलं नाही म्हणून आपण जोकोला मॅचपॉईंट देऊ आणि मग तो वाचवून मॅचपण जिंकून दाखवू. Sad

किम बाई फारच भारी खेळत आहेत. मला रेवा बाई पण आवडतात. टॉस करावा लागेल.

नदालला हरवायला जोको समर्थ आहे >> फचिन नदाल जिंकणार. Happy

किम चे अभिनंदन. Happy
मॅच खूपच एकतर्फी झाली. बहूतेक वीराला काही कळायच्या आधी किमने मॅचवर स्ट्राँग कंट्रोल मिळवला होता...

मघाशी झालेली टेन्शनभरी मॅच पाहिल्यावर ही मॅच फारच शांततेत संपली. !

महिला एकेरीची फायनल आधीच झाली होती -किम वि.व्हीनस. त्यात किमने शिक्का मारला. आता फक्त कव्हर सील करायचे होते, ते केले.
पुरुष एकेरीत आणखी एक ऐतिहासिक क्षण. २००४ नंतर प्रथमच फेडरर फायनलमधे नाही, तर राफाची पहिली फायनल.
क्वार्टर फायनलनंतर समोर राफाला बघूनच युझ्नीचे अवसान गळाले बहुधा....कसा पाय ओढत, हात लोंबकळत चालत होता....तिसर्‍या सेटमधे राफाची सर्व्हिस ब्रेक करून त्याने टुर्नामेंटची इतिकर्तव्यता साजरी केली.
आता जोकोविच नंबर टु होणार!
मागच्या ३ लढतीत जोकोविचने राफाला स्ट्रेट सेट्स मधे हरवलेय, आणि तीनही वेळा हार्ड कोर्ट स्पर्धांमधे. पण राफा यंदा युएस मधला त्याचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट खेळ देतोय, त्याच्या सर्व्हचा स्पीड पण वाढलाय, आणि नो फिटनेस वरीज.
राफाचे करीअर स्लॅम....
जोको कॅन वेट फॉर अनादर डे.

Pages