Submitted by संयोजक on 3 September, 2010 - 14:00
आजचा विषयः दीपिका पदुकोण आणि दगडु तेली मसाला
नियम :
१. ही स्पर्धा फक्त मायबोलीकरांसाठी आहे.
२. ह्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. एका सभासदातर्फे एका विषयासाठी एकच प्रवेशिका स्वीकारण्यात येईल.
४. आपली प्रवेशिका [काल्पनिक संवाद] स्पर्धेच्या त्या त्या विषयाच्या धाग्यावर आपण स्वतः प्रकाशित करावी. एकदा प्रकाशित केल्यानंतर प्रवेशिकेमध्ये कोणत्याही स्वरुपाचे बदल करु नयेत, केल्यास स्पर्धेसाठी ती प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही.
५. जाहिरात वर्तमानपत्र, मासिकं किंवा अंतर्जाल इ. साठी आहे असे समजून बनवायची आहे. त्यासाठी फोटोशॉप किंवा तत्सम सॉफ्टवेअर वापरण्याची परवानगी आहे.
६. जाहिरातीसाठी मजकूराबरोबरच स्वत: काढलेले चित्र/छायाचित्र याचा समावेश करु शकता. मजकूरासाठी शब्दमर्यादा १५० शब्द आहे.
७. अंतिम विजेता वाचकांच्या मतदान पद्धतीने ठरविला जाईल.
८. विषय जाहीर झालेल्या दिवसापासून ते अनंतचतुर्दशीपर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येतील.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारी जोडी आहे ही !!!!
भारी जोडी आहे ही !!!!
(No subject)
(No subject)
नुसते हसू नका, तिथे दीपिका
नुसते हसू नका, तिथे दीपिका डायलॉग मारायला तयार उभी आहे
जबरी!! दतेम पार्लेबाफ, बारा
जबरी!!
दतेम पार्लेबाफ, बारा एवेएठी नंतर आता गणेशोत्सवही गाजवणार!!!
ही प्रवेशिका नक्की कुठे
ही प्रवेशिका नक्की कुठे प्रकाशित करायची आहे ते कळले नाही.
आपली प्रवेशिका [काल्पनिक संवाद] स्पर्धेच्या त्या त्या विषयाच्या धाग्यावर आपण स्वतः प्रकाशित करावी. >>>>> म्हणजे याच पानावर उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' दिसते तिथे जाऊन नवीन लेखनाचा धागा निर्माण करायचा आहे का? की इथेच खाली प्रतिसादात लिहायचे आहे?
स्पर्धकाचा आयडी गुप्त असणार आहे का मागील वर्षीसारखा?
अरभाट, नविन लेखनाचा धागा न
अरभाट,
नविन लेखनाचा धागा न बनवता इथेच प्रतिसादामधे तुम्ही तुमची प्रवेशिका लिहू शकता. स्पर्धकाचा आयडी गुप्त असणार नाही. स्पर्धकांनी स्वतःची प्रवेशिका आपल्या स्वतःच्या आयडीने इथे प्रकाशित करायची आहे.
धन्यवाद
धन्यवाद
(No subject)
ही स्पर्धा माझ्या आणि
ही स्पर्धा माझ्या आणि वैद्यबुवांच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या पार्ले बीबी वरच्या संवादामुळे सुचली ना संयोजकांना ?
सह्ही आहे!
सह्ही आहे!
ताई -दादा ! अरे इथे पुर्वी
ताई -दादा ! अरे इथे पुर्वी अण्णांचा फोटो होता .[दीपिका पदुकोनच्या फोटोला पहात]
दादा-अग ताई ! अण्णाना आठवायला फोटो कशाला ?
ताई -वा ! रोज बघत बस ,उगाच नको विसरायला .काय ग बाई ,जाता येता माझी नजर या फोटोवरच
रेंगाळते .काय कराव बर ?
दादा -नजर रेंगाळायला दीपिका पदुकोन कशाला ? अग तू आल्यावर मसाले कुटत बसणार ,मग प्रेक्षणीय
पहायला वेळ कसा पुरणार ?हा घे दगडु तेली मसाला .
नजर रेंगाळायला दीपिका पदुकोनच कशाला ?
तुझ्या हातची चव रेंगाळायला दगडु तेली मसाला.
अगदी आईच्या हातची चव रेंगाळायला
भाऊबीजेची ताईला उत्तम भेट ,''दगडु तेली मसाला''.
अगबाई कोण दीपिका? हे स्वप्न
अगबाई कोण दीपिका? हे स्वप्न तर नाही ना ?
अहो नाही, खरंच मी आहे. हात लाऊन पहा हवंतर. (जरासे) तेल लागेलच हाताला.
या या ! अलभ्य लाभ ! कसं चाललं आहे तुमचं? सिनेमे वगैरे मिळतायेत ना?
हो हो ! सध्यातरी (आवंढा) मिळतायेत हो ! तुमचं कसं चाललयं? काय स्वैपाक चाललाय वाटतं.
अहो हो. रोज मेले पार्ल्यात बहारदार मेनु लिहीतात. खरंच करतात एवढे पदार्थ की काय कोण जाणे. रोज मेला काय उठुन वेगळा स्वैपाक करायचा तिन्ही त्रिकाळ सुचत नाही हो. शिवाय यांचे कोलेस्ट्रॉल, माझ्या कमरेचा वाढता घेर.... अहो आम्हाला काय व्यासंग आवडत नाही का? पण सारखा मेला चुलखंड. वेळ कसा मिळावा व्यासंगासाठी म्हणते मी.
तै, तेच तर सांगायला आले. दगडू तेली मसाला वापरून पहा. देशी , विदेशी, सामिष, निरामीष सर्व पदार्थांना हमखास रुचकर बनवण्याचा उपाय. वापरून तर पहा. लोकं बोटं चाटतील आणि तुम्ही मायबोलीवर कुचाळक्या, आपलं ग. आणि वि. चर्चा करायला मोकळ्या ! मीही रोज वापरते. तकतकीत कांती पहा माझी आणि सडसडीत बांधा. नो साईड इफेक्टस.
माझ्या सतेज कांती आणि सुडौल बांध्याचे रहस्य- दगडू तेली मसाला ! आजच खरेदी करा !
सतेज कांती ऐवजी सतैल कांती
सतेज कांती ऐवजी सतैल कांती हवं
दीपिका (पडलेल्या चेहर्याने)
दीपिका (पडलेल्या चेहर्याने) : फिगर अन जिगर दोन्ही फक्त प्रपोज करे पर्यंतच, पुरुषाच्या प्रेमाचा मार्ग पोटातून जातो हेच खरं
(हातातल्या दगडू तेली मसाल्याच्या बाटलीकडे बघत उसासा टाकत) हे (म्हणजे द.ते.म. )आधी मिळतं तर राणुशी ब्रेक अप कशाला झाला असता?
प्रेमी लोकांचा ब्रेक अप टाळी
नात्याला फेव्हीकॉल पेक्षा मजबूत बनवी
दगडूS तेSली मसाSलाSS
सासु सुनेच एकमत होण्याच भाग्य लाभणारा जगातला एकमेव मसाला - दगडूS तेSली मसाSला
आजच वापरा आणि फरक स्वतःच बघा
रैना, कविता
रैना, कविता
बॉलिवुड ची दगडी तेलीण ,
बॉलिवुड ची दगडी तेलीण , अर्थात दीपिका मायबोलीवर घेऊन येत आहे 'दगडु तेली मसाला' !
आजच खरेदी करा आणि दीपिका सारखे गडी तेलकट बना ..
टिंग टाँग !
रैना,कविता,दीपांजली बॉलिवुड
रैना,कविता,दीपांजली
बॉलिवुड ची दगडी तेलीण<<<<<<
चाल : ओम शान्ति ओम चे गाणे -
चाल : ओम शान्ति ओम चे गाणे - दिन ताना तदिन त देरेना
दीपिका किचन मधे नाचते आहे, शहरुख अन दोन गोंडस आगावू मुले टेबल वर जेवणाची वट पहात आहेत.
(शाहरुख ला उद्देशून
दिम ता ना दतेम देरेना दिम ताना दतेम देरेना
कैsssसे पकाऊ मै ये सब्जी अब ये.. कैssssसे
लाके दे दतेम मुझे जल्द सजना
सब्जी का आयेगा फिर स्वाद सजना
(प्रेक्षकांना
आप भी दतेम फिर लेके आओ ना
दिम ता ना दतेम देरेना दिम ताना दतेम देरेना
कैsssसे पकाऊ मै ये सब्जी अब
कैsssसे पकाऊ मै ये सब्जी अब ये.. कैssssसे >>>
वा, काय जोडी जमवलीये.
वा, काय जोडी जमवलीये.
सर्वच जाहिराती भारी आहेत.
सर्वच जाहिराती भारी आहेत.
आदेश बांदेकर : नमस्कार होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपले स्वागत करतो; अंधेरी मधील लोखंडवाला कॉम्प्लेक्स मध्ये आज आपण दीपिका वहिणी आणि ऐश्वर्या वहिणी ह्यांना भेटणार आहोत.
आबा: नमस्कार वहिणी काय म्हणताय?
दीपिका : घाबरत पण.. हसून नमस्कार, (एक टीश्यु नाकावरुन फिरवते)
आबा: घाबरताय कश्याला अन तो टिश्यु का फिरवताय?
दीपिका : अहो आमची की नै खान आहे?
आबा: खान, कोणता? अफजल बिफजल की काय?
दीपिका : नाही हो भाउजी, आमच्या कडे तेल गळती सुरु असते.
आबा : आँ बी पी वगैरेच्या मालक की काय तुम्ही?
दीपिका : नाही काय. मला की नै सैपाक बनवायला खूप आवडतो, पण सतत नाकातून तेल गळतं.
आबा: (खोचकपणे) तेलच ना? मग ठिकै. स्वैपाक तुमची आवड का?
दीपिका : नाही हो मुळी, मला सैपाक येत नाही काय. पण दगडू तेली मसाल्यामुळे काम सोपं झालयं, घे मसाला की टाक कुठही बचकभर, मग टेस्ट म्हणजे की नै, काय सांग.
आबा : दगडू तेली मसाला? हां हां तरीच .. तेल गळती चालू आहे. हं हं हं
दीपिका : भाउजी तुम्हाला सैपाक करता येतो का हो?
आबा : नाही बा.
दीपिका : तरीच. आमच्या वहिणी पागला सारखं का करतात हे कळलं. सगळ्या सैपाकांसाठी हमखास यशाचे एकच उत्तर : दगडू तेली मसाला! आजच घ्या. दगडू तेली खा अन तेल गळती वाढवा.
आबा : धन्यवाद वहिणी, जातो आत्ताच अन घेउन येतो दगडू तेली मसाला.
..
..
हे हे हे सगळ्याच जाम भारी
हे हे हे
सगळ्याच जाम भारी
ते दिपिका आणि दगडु तेली कॉम्बिनेशन तर लयच भा$$$$री.
नेपथ्य : बॅडमिंटन
नेपथ्य : बॅडमिंटन कोर्ट
जाहिरात कलाकारांची पोझिशन : समोरच्या बाजूला दिपिका पदुकोण व प्रेक्षकांकडे पाठ करुन एक पुरुष कलाकार
सीनची सुरुवात -
टॉक्....ढल गया दिन्...टॉक्....हो गयी शाम्.....टॉक......जाने दो, खाना बनाना है....टॉक... (हे बॅकग्राऊंडला वाजतंय)
"काय ! तुझ्या डॅडसारखी बॅडमिंटनवर लक्ष केंद्रित करायच्या ऐवजी तू घरी जाऊन स्वयंपाक करणार?
दिपिका : काय करु? फुलं उडवणं सोडून दुसरं करियर करायला गेले. तिथे मला सगळ्या मुली ज्याच्यासाठी जान कुर्बान करतात तो रणबीर माझ्या आयुष्यात आला. पण हाय रे किस्मत, त्या कपूर खानदानाला आता सुगरण गृहिणी बनेल अशीच सून हवी होती. (बॅकग्राऊंडला - आम्ही साsssरे खवय्ये).
समोरचा (आता फुलाऐवजी दगडू तेली मसाल्याच्या छोटा पॅक रॅकेटने उडवून सर्विस करतो) : माझिया प्रियेलाssss स्वैपाक जमेना. रणबीर गेला तेल लावत. हा दगडू तेली मसाला प्रत्येक भाजीत ओतून ती उकडून काढ, की तय्यार रुचकर भाजी. मग बघ तुझ्या स्वयंपाकघराबाहेर उपवधू बेस्ट एलिजिबल बॅचलर्सची रांग लागेल आणि त्यात पहिला नंबर माझाच असेल.
दिपिका : अय्या खरंच? (रॅकेटवर झेललेला पॅक तिथल्या तिथे फोडून नाक भरुन हुंगते) (बॅकग्राऊंडला - हा हा हा हा हुंगू...)
दिपिका त्याला हातातल्या पॅकने टाटा करत पाठ वळवते पण चेहरा स्क्रीनकडे ठेवूनच जायला लागते (बॅकग्राऊंडला - फज्जा...फज्जा.....फज्जा...)
ढॅण्टॅडॅण्....दगडू तेली मसाला घाला आपल्या ह्यँच्या घशात....आणि ठेवा त्यांना कायमचं आपल्या खिशात..... ढॅण्टॅडॅण्....
दीपिका: मुलाखतक्रार?
दीपिका: मुलाखतक्रार? म्हणजे?
मंकाळ: म्हणजे मुलाखतीच्या नावाखाली मी तुमच्याबद्दलच्या तक्रारी तुम्हालाच सांगणार आहे.
दीपिका: कोणाच्या कसल्या तक्रारी आहेत माझ्याबद्दल?
मंकाळ: अनेकांच्या आहेत. त्यातल्या बर्याचश्या 'दीपिका माझ्याशी लग्न करत नाही' असल्या टाइपच्या आहेत. तिकडे आपण नंतर वळू. पहिल्यांदा माझीच एक तक्रार आहे ती ऐका. तुम्ही खोट्या जाहिराती करता अशी माझी तक्रार आहे. युवीबरोबरच्या 'फक्तमैत्री'ची तुमची जाहिरात, 'फक्तरणबीर'बरोबरच्या तुमच्या प्रेमाची जाहिरात आणि दगडु तेली मसाल्याची जाहिरात या तिन्ही खोट्या आहेत.
दीपिका: वाट्टेल ते बोलू नका. ज्या मालाची जाहिरात करायची तो मी स्वतः वापरून बघते आणि अनुभव चांगला असेल तरच जाहिरात करते.
मंकाळः ही पहा तुमची मसाल्याची जाहिरात -
ती पाहून मीसुद्धा दगडु तेली मसला वापरायला सुरूवात केली आणि काहीच दिवसांत माझे केस झडायला सुरूवात झाली. हा पहा माझा आधीचा फोटो -
दीपिका: बाप रे! पण मला असा काहीच अनुभव नाही. तुम्ही मसाला नक्की कसा आणि कशात वापरलात सांगा.
मंकाळ: दररोज मसाला डोक्याला लावून आंघोळ करत होतो. तर रात्रीत मुंग्या येऊन केस खाऊ लागल्या. काही दिवसांनी पोरे माझ्याकडे बघूबघू खिदळू लागली -
मग सगळा प्रकार लक्षात आला.
दीपिका: डोक्याला? अहो, तो खाण्याचा मसाला आहे, तो तुम्ही डोक्याला लावलात? माणूस आहात की माकड?
दीपिका: सॉरी सॉरी. आय मीन, डोक्याला कशाला लावलात?
मंकाळः मग? जाहिरातीत तुमचे लांब काळेभोर केस पाहून मला वाटले लांब काळ्याभोर केसांसाठी डोक्याला लावायचा मसाला आहे - शिकेकाईसारखा. जाहिरात नीट करता येत नाही का?
दीपिका: ओह! सॉरी हां. पण आता लक्षात ठेवा - दगडु तेली मसाला खाद्यपदार्थांसाठी वापरतात.
फळफळावळ पिकलेली किंवा कच्ची / झाडपाला, भाजीपाला, मांस-मच्छी
वापरा दगडु तेली मसाला, लोक म्हणतील, वा काय वास आला.
हातात ओम शांती ओमचा शोभेचा
हातात ओम शांती ओमचा शोभेचा पीस घेउन स्केटस् वरून दिपीका पदुकोण कोळीवेषात प्रेक्षकांसमोर येते.
प्रेक्षकांचा आवाज : कोऽऽऽण?
दि: अय्या ... कोऽऽण काय? पदुकोण ... दिपीका पदुकोण ..
मी कीनई ...तुम्हाला कीनई ...
प्रे.आ.: काऽऽऽय ?
दि: अय्या .. अहो 'का' नाही काही, दिपीका, दि पी का ...
दि...... पी .... का ....
मी तुम्हाला एक कोडं घालते हं
छत्रपती शिवाजी महाराजांनी एक गड जिंकला नव्हता कोणता ते सांगा बरं?
प्रे: कलिंगड
दि: अं बरं बरं, दोन गड जिंकले नव्हते, दुसरा सांगा बरं.
नाही माहिती ना ... अहो 'द' गड.
त्यावरून प्रेरणा घेऊन बनवला आहे हा ढूंढत-ए-रेहजाओगे, चाटत-ए-रेहजाओगे आणि मसाला-ए-सरताज
दगडू कोळी मसाला.
[कोळी नव्हे तेली, तेली मसाला]
आँ .. हो हो .. दगडू तेली मसाला.
आता मी निघाले - शूटिंगला ..
'कुठे' विचारताय .. धर्मसाला !
अरभाट ती मंकाळची पोरं काय
अरभाट ती मंकाळची पोरं काय क्युट आहेत !
अरभाट, भन्नाट!
अरभाट, भन्नाट!
अरे हे मी पाहिलच नाही!! लै
अरे हे मी पाहिलच नाही!! लै भारी.
Pages