वय वाढत तस मुलांचे प्रश्न पण वाढत जातात आणि जास्त प्रगल्भ होत जातात. जेव्हा बाहुल्यांबरोबर खेळणारी चिमुरडी विचार करायला लावणारे प्रश्न विचारते तेव्हा पालक होण्याची जबाबदारी फक्त मोठीच नाही तर कठीण वाटायला लागते.
किमया जेव्हा पाचवीत गेली, तेव्हा आपली लेक आता मोठी झालिये अस समजुन (किंबहुना मला सुद्धा गोष्टी सांगुन जबाबदार पालकत्व निभावता येत हे दाखवण्यासाठी) हेमंत एक दिवस तिला अॅडम आणि ईव्हची गोष्ट सांगत होता. पृथ्वीच्या उत्पत्तीच्या वेळी असणारे दोन मानव सदृष्य(??) जीव, सफरचंदाच झाड, त्यांच भांडण,आपण सगळे कसे त्याचे वंशज आहोत वगैरे आणि पुढची सगळी कथा अगदी रंगात आली होती. किचन मधे स्वयंपाक करत असले तरी माझे कान त्याच्याकडेच होते.
सगळ शांतपणे ऐकणारी किमया अचानक हेमंतला म्हणाली,"बाबा, पृथ्वीच्या उत्पत्तीच्यावेळी फक्त अॅडम आणि ईव्ह हे दोघेच जर मनुष्यप्राणी असतील तर त्यांची मुले म्हणजे एकमेकांचे बहिण-भाऊ झाले, मग पुढची पिढी कशी काय जन्माला आली?आणि आपण त्यांचे वंशज कसे काय???"
हेमंत आणि मी दोघेही एकमेकांकडे बघतोय आणि चेहरे पांढरे फटक. काहीतरी थातुरमातुर उत्तर मीही देवु शकले असते पण त्यामुळे माझ्याही मनात अनेक वर्षे दबा धरुन बसलेला हाच प्रश्न वर आला. भिडस्त स्वभाव म्हणा किंवा आई-बाबा सांगतात ते सगळ बरोबरच अशी झापड लावल्यामुळे मी कधी हा प्रश्न विचारला नव्हता पण प्रश्न मनात आला होता जरुर.
असा प्रसंग दुसर्यांदा आला जेव्हा आजी (साबा) सगळ्या नातवंडांना कृष्णजन्माची कथा सांगत होत्या. त्या नेहमीच पौराणिक कथा सांगत असतात आणि बदलत्या विश्वाबरोबर आपली नातवंडे आपली संस्कृतीही जपतील याची पुरेपूर काळजी घेत असतात.
साबा अगदी तल्लीन होऊन सांगत होत्या,'देवकी आणि वसुदेवाचे लग्न झाले आणि त्यांची वरात स्वत: कंस रथ हाकत घेऊन चालला होता. अचानक आकाशवाणी झाली, "ज्या देवकीसाठी तू इतका आनंदीत आहेत त्याच देवकीचा आठवा पुत्र तुझा वध करेल"
झाल सगळ तिथेच बिनसल, कंस चिडला आणि रागाने त्याने देवकी आणि वसुदेव यांना तुरुंगात टाकले. त्यांच्यावर कडा पहारा ठेवला. देवकीच्या सातही मुलांना त्याने निर्घुणपणे मारले. आठवा कृष्ण मध्यरात्री जन्मला आणि वसुदेवाने त्याला आपल्या परम मित्राकडे यमुनेचा पूर पार करुन सोडले. नंतर कंसवधाची कथा.
मुले पण तल्लीन होऊन ऐकत होती. शेवटी 'सार्थक' माझा भाचा (इयत्ता ६वी) म्हणाला, "आजी कंस काय मुर्ख होता का ग? त्याला जर माहित होते की देवकीचा आठवा मुलगा आपल्याला मारणार आहे तर त्याने देवकी व वसुदेवाला एकाच तुरुंगात का ठेवले? वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले असते तर पुढे काही घडलच नसत ना!"
आजी खरतर अनुत्तरीत झाल्या. रागतिरेकाने त्यांनी धपाटा जरी मारला असला तरी त्यांच्याकडेही उत्तर नव्हते या प्रश्नाचे.
आतापर्यंत असे अनेक अनुत्तरीत प्रश्न मला विचारले असतील किमया आनि येशाने ज्यांची उत्तरे मी देवू शकले नाही किंबहुना माझ्या उत्तरांनी त्यांच समाधान झाल नाही.
"सीता जमीनीखाली पेटीत सापडली, आई तिचा श्वास थांबला कसा नाही ग??"
"रामाने अग्नीपरिक्षा द्यायला लावल्यावरच सीता जमीनीत का नाही गेली? वनवास भोगायची तिला हौस होती का?"
"नुसत सुर्याकडे बघितल्यावर आणि इंद्राकडे बघितल्यावर कर्ण, अर्जुन कसे जन्मले??"
"कृष्ण जर अवतारी होता तर त्याने स्वत:ची गीता फेमस करायला महाभारत घडवल का??
असे असे अनेक प्रश्न तुम्हालाही विचारले गेले असतील ना? किंवा पडले असतील. मग पौराणिक कथा काय बिनबुडाच्या का??
धन्स सचिन , शशांक
धन्स सचिन , शशांक
आजी कंस काय मुर्ख होता का ग?
आजी कंस काय मुर्ख होता का ग? त्याला जर माहित होते की देवकीचा आठवा मुलगा आपल्याला मारणार आहे तर त्याने देवकी व वसुदेवाला एकाच तुरुंगात का ठेवले? वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले असते तर पुढे काही घडलच नसत ना!">>>>>>>>माझ्या भावाचा मुलगा एकदा म्हणाला होता " कंसाला कान नव्हते का ? आकाशवाणी झालेली ना की आठवा मुलगा मारेल मग पहिली सात का मारली? बोला आता मलाही ते पटलं
कंस मुर्ख नव्हता. त्याला
कंस मुर्ख नव्हता. त्याला सिस्टिम माहीत नव्हती. आणी सिस्टिम माहीती असली तरी तिचे परिणामांबद्दल तो अनभिज्ञ असावा. अगदी आपल्या आजोबांच्या काळापर्यंत हीच समजुत होती, की मुले ही देवाघरची फुले.. देवाच्या दयेनेच ती होतात ! आता तुम्हीच नाही का लेखात सुर्य-इंद्रादी देवांचा उल्लेख दिलाय ? म्हणुन त्याला वसुदेव तसा निरुपद्रवी वाटला असावा. उगाच काहितरी कुशंका काढते ही हल्लीची पिढी.. तुम्ही पण लागा त्यांच्या नादी. आमच्या देवदेवतांस आणी पुराणांस कोणी नावे ठेवील तर आम्ही ऐकुन घेउ की काय... !
कंसाला कान नव्हते का ?
कंसाला कान नव्हते का ? आकाशवाणी झालेली ना की आठवा मुलगा मारेल मग पहिली सात का मारली?>>>>> यावर नारदांनी येऊन त्याला "शेवटुन आठवा मुलगा नसेल कशावरुन" असे सांगुन पहिल्या मुलाला मारायची प्रेरणा(?) दिली असे काहीतरी वाचल्याचे स्मरतेय.
परेश धन्य आहेस बाबा
परेश धन्य आहेस बाबा
कंसाने देवकीच्या मुलांना
कंसाने देवकीच्या मुलांना मारणे, लाक्षागृहात निरपराध आदीवासीना जाळणे, गंगेने मूलांना पाण्यात सोडणे,
चिलया बाळाला.......
या कथा मला अत्यंत क्रूर वाटतात. खरेच त्या मूलांना सांगायची काही गरज आहे का ?
त्यापेक्षा स्वतः का गोष्टि तयार करु नयेत ? इथे सावलीने काही कथा लिहिल्या होत्या. अशा कथांमधे ते बाळ त्याच्या आजूबाजूचे सर्व काही आणता येईल.
मला इथली इंद्रधनुची कथा खुप आवडली होती. ती कथा सांगून झाल्यावर, लगेच इंद्रधनुष्य का दिसते, कुठल्या वेळी दिसते ते सांगता येईल. घरात प्रिझम (लोलक, असावा घरात ) असेल तर लगेच त्याचे प्रात्यक्षिक दाखवता येईल. त्यामूळे कथा ही केवळ मनोरंजनासाठी असते, तेहि मनात ठसेल.
माला इथे जॅकी चॅनच्या जून्या सिनेमांची आठवण येते. हे सिनेमे संपल्यावर, चित्रीकरणादरम्यान जॅकीला झालेले अपघात, त्याची फजिती, तसेच सिनेमातील शत्रुंबरोबर त्याने केलेले हास्यविनोद, आवर्जून दाखवत असत. अशाने, सिनेमा खोटा होता, त्यातल्या मारामार्या खोट्या होत्या, असे लगेच मनावर ठसत असे.
दिनेशदा अगदी १००% सहमत
दिनेशदा अगदी १००% सहमत म्हणुनच माझ्या (मी स्वतः ज्या सांगते) त्या गोष्टीत सिंड्रेला ऐवजी आमच्या कामवाल्या मावशींचा मुलगा येतो जो स्कॉलरशिपला शाळेत पहिला आलेला असतो.
मला पडणारा नेहमीचा प्रश्न ,
मला पडणारा नेहमीचा प्रश्न , कॄष्ण कथेतील आकाशवानीच झाली नसती तर?
आकाशवानी नसती झाली तर वसुदेवाला व देवकीला त्रास भोगावा लागला नसता.
कॄष्ण समवेत ते दोघे सुखाने राहिले असते.कॄष्णाने कंसाचा वध केलाच असता.
काही चुकीचे लिहीले असल्यास क्षमस्व व देवाची ही माफी.
गुब्बी छान लिहिलं आहेस. इथे
गुब्बी छान लिहिलं आहेस.
इथे आधिच कुणितरी लिहिल्याप्रमाणे मुलांची जिज्ञासा न मारता जीथे माहित नाही तिथे उत्तरे एक्त्र शोधावित. पण या कथांना बर्याच वेळा काही तर्क लावता येत नाही. त्यामुळे सांगण्यात काही फार अर्थ नाही अस मला वाटतं. पण सांगायच्याच असतील तर मग सरळ "हि गोष्ट आहे त्या मुळे त्यात अस होतं. गोष्टीमधे प्राणि नाहीका बोलत ? खरे प्राणि बोलतात का? " अस सांगता येईल.
मला तरी वाटतं मुलांना परिकथा आवडतात. त्यात त्यांना हवा तो कल्पना विलास करता येतो. मुलांना खरे आणि खोटे मधला फरकही कळतो. पण देवांच्या गोष्टी साण्गताना सगळे जण त्या खर्या असल्यासारख्या सांगायला जातात. आणि म्ग मुलांचा गोंधळ उडतो. जर खर्या गोष्टी आहेत तर खर्या आयुष्यासारख्या घडल्या पाहिजेत नाहितर मग त्या गोष्टी खोट्या आहेत असा त्यांचा सरळ सरळ हिशेब असावा हा.
दिनेशदा माझ्या कथांचा उल्लेख केल्यामुळे अगदी छान वाटलं.
तुम्ही म्हणता तसच या कथा मलाही क्रूर वाटतात. अगदी गणपती जन्माची सुद्धा.
या पुराणातल्या कथा आता सांगुन काही फारसा फायदा नाही अस वाटायला लागल्यामुळेच मी नविन कथा तयार करुन सांगायला सुरुवात केली. त्याच इथे लिहुन काढते.
मुलं मोठी आणि वाचती झाली कि त्यांना कदाचित या पुराण कथा देता येतील वाचायला, तेव्हा वाचायला देऊन त्यांना त्यावर विचार करु द्यावा हे मला इथे माबोवर कुणितरी सांगितलंय ते पटल्य
सारा, असेच प्रश्न मुलांना
सारा, असेच प्रश्न मुलांना पडतात. काय उत्तरे द्यायची त्याची ? आकाशवाणी म्हणजे काय ? रेडीओ का ?
मग तिने असे थातूरमातूर का भविष्य वर्तावे ? सरळ का नाही सांगितले ? आठवी मुलगी हातातून सटकली म्हणजे काय ? ...
आम्ही कौतुकाने नील साठी
आम्ही कौतुकाने नील साठी कृष्णा वरची एक डीवीडी घेतली होती.. डीवीडी च्या कव्हर वर गोड बाळकृष्णाचे चित्र होते. पण लावल्यावर धक्काच बसला आम्हाला.. पहिली गोष्ट्,'पूतना वध', दुसरी गोष्ट ,' कालिया वध', तिसरी गोष्ट ,'शिशुपाल वध" मग कंस वध त्या पाहून आम्ही लगेच बंद केली पाहायची.. नील विचारत होता सारखा,'आता कृष्ण कुणाला मारणारे?"
सारा, तुम्हाला हा प्रश्न कधी
सारा,
तुम्हाला हा प्रश्न कधी पडत नाही का की हनुमानाने सीतेला अशोकवनातुन हळुच खांद्यावर बसवुन का आणली नाही? काय गरज होती एवढे मोठे युद्ध करुन रामाने तिला परत आणण्याची?
श्रीकृष्ण जर इतका शक्तीशाली होता तर का त्याने पांडवाना इतका त्रास देउन युद्ध करायला लावले?
सुदर्शन चक्राने कौरवाना कापुन का काढले नाही?
तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचे सोपे उत्तर हे की परमेश्वर लपवुन किंवा कपटाने काही करत नाही. म्हणुन देवाने कंसाला उघड इशारा दिला. त्यावेळी कंसाने शहाणे होउन सन्मार्ग गाठला असता तर हा मृत्युही कदाचित टळु शकला असता.
रामायण , महाभारत या अतिशय सुंदर रुपककथा म्हणा हवे तर. त्यातुन काय बोध घ्यायचा, कुठल्या गोष्टी वगळायच्या आणि तो बोध पुढच्या पिढीपर्यंत कसा पोहोचवायचा ही पालकांची जबाबदारी आहे. आपणच या गोष्टी संदर्भहीन आहेत असा ओरडा करायला लागलो तर या गोष्टी नामशेष व्हायला फार काळ लागणार नाही. या काही गोष्टींचे समर्पक स्पष्टीकरण कसे देता येइल त्यावर विचार करायला हवा. आपल्याला अमुक गोष्ट कळली नाही तर समजावुन घ्यायला हवी. नाही का?
दिनेशदांच्या सगळ्या पोस्टिंना
दिनेशदांच्या सगळ्या पोस्टिंना अनुमोदन.
पौराणीक कथा या काल्पनीक / रुपक / कानगोष्टी म्हणुनच घेतल्या पाहिजेत. त्यात जे वर्णन केलय ते तसच्या तसं प्रत्यक्षात घडलच असेल असं नाही ना.
माला अजुनतरी गोष्टी सांगायचा अनुभव नाही... पण या पौराणीक गोष्टी मी तरी सांगणार नाहीये.
आभार सॅम. मनस्मी१८, मला इथे
आभार सॅम.
मनस्मी१८, मला इथे धार्मिक संदर्भ बाजूला ठेवून मत द्यायचे आहे (कारण या गोष्टींचा विचार आपण लहान मूलांच्या संदर्भात करतो आहोत.)
राम, कृष्ण, परशुराम हे सगळे मानव होते. त्यांना देवत्व नंतर दिले गेले. त्यांनी केलेली प्रत्येक कृति, हि समर्थनीयच होती, असा हट्ट आपण न धरता, या कथा वा इतिहास वा काव्य, जे म्हणाल ते, हे त्या काळच्या सामाजिक परिस्थितीशी ताडून बघावे लागेल.
लाक्षागृहात जाळलेली माणसे आणि गोध्रा हत्याकांड,
रेणुकेचा शिरच्छेद आणि सौदी अरेबियात रोज होणारे शिरकाण
असे संबंध मूले जोडतील, त्याचे काय ?
त्या गोष्टी समर्थनीय करण्यासाठी, त्यांना वेगळे संदर्भ देण्यापेक्षा, नवीन कथा रचणे योग्य असे मला वाटते.
धन्यवाद mansmi18, <<परमेश्वर
धन्यवाद mansmi18,
<<परमेश्वर लपवुन किंवा कपटाने काही करत नाही. म्हणुन देवाने कंसाला उघड इशारा दिला. त्यावेळी कंसाने शहाणे होउन सन्मार्ग गाठला असता तर हा मृत्युही कदाचित टळु शकला असता. >>
खरच योग्य वाटते उत्तर,
म्हणूनच देवाची ही आधीच माफी मागुन घेतली.
गुब्बी, मस्तच लेख मी लहान
गुब्बी, मस्तच लेख
मी लहान असताना (साधारण सहावी/सातवीला असताना) मला एक प्रश्न भेडसावायचा कि आपण उपवास सोडताना ताटाभोवती पाणी का सोडतो? घास काढुन का ठेवतो? तो घास खरंच देव खातो का? आणि न राहवून मी आमच्या सरांना एकदा ऑफ पिरीयड असताना विचारला. त्यांनी त्यावर दिलेले उत्तर मला मनापासुन पटले आणि ते जसेच्या तसे आजपर्यंत माझ्या मनात आहे.
त्यांचे उत्तर होते -
पूर्वी जेंव्हा लोक संध्याकाळी जेवावयास बसायचे (आजही बहुतेक गावात रात्री ७-८ वाजताच जेवण्याची पद्धत आहे) आणि गावात लाईट नसायची, तेंव्हा जेवताना किडे-मुंगी ताटात येऊ नये म्हणुन ताटाभोवती पाणी सोडायचे, जर किडे-मुंगी ती पाण्याची रेषा पार करून आले तर ते सरळ ताटात येऊ नये म्हणुन त्यांच्यासाठी खाण्याचा एक छोटा डोंगर करून ठेवत, जेणेकरून ते ताटात येऊ नये. पण आज आपण टेबलावर जेवायला बसलो तरी ताटाभोवती पाणी सोडतो.
भारतीय पौराणकथाच नव्हे तर इतर
भारतीय पौराणकथाच नव्हे तर इतर देशांच्या पौराणकथा, परीकथा, मिथ्यके यांच्यात अनेक अतार्किक, वेळप्रसंगी क्रूरता व सर्व मानुष व अमानुष भावनांचा खेळ दिसून येतो. त्यांना केवळ रंजन म्हणून पाहिले तर वेगळे, पण त्यातून बोध घ्यायचा झाला तर सर्वच कथांना चाळणी कोठे न कोठे लावावी लागते.
दुसरीकडे सध्याच्या कार्टून्स, चित्रपटांमध्ये चालणारा हिंसाचार, क्रौर्य, लबाडी इत्यादी मुले बघतच असतात की!! उलट अनेकदा मुले हिंसाचार आपल्यापेक्षा रस घेऊन बघतात व एन्जॉय करतात असेच दिसते.
रामायण-महाभारत ह्यांच्यात सर्व प्रकारच्या मानवी भावना, विकार, उदात्तता इत्यादींचे बेजोड मिश्रण आहे. ''एपिक'' असेच म्हणावे लागेल. त्यातील ज्या गोष्टी लहान मुलांना ऐकवण्यास योग्य आहेत असे वाटते त्या जरूर ऐकवाव्यात. सध्याच्या आपल्या दृष्टीकोनांच्या आधारे त्या गोष्टींना जोखायला जाल, तर मला वाटते तो त्या लेखकांवर, गोष्टींवर व काळावर अन्याय होईल. तेव्हा त्यांना त्या त्या संदर्भाने वाचता / जाणता आले तर उत्तमच!
गुब्बी ख्ररेच छान लिहिलं
गुब्बी ख्ररेच छान लिहिलं आहेस, मनापसून पटले.
दिनेशदा आणि मनस्मीच्या
दिनेशदा आणि मनस्मीच्या शेवटच्या post शी पूर्ण सहमत..
गुब्बी, छान लेख..
हे प्रश्न मला लहानपणी पडले की
हे प्रश्न मला लहानपणी पडले की नाही आठवत नाही पण मोठेपणी नक्की पडले. मी माझ्या परीने उत्तरं शोधायचा प्रयत्न केला. ती उत्तरं इथे मांडायचा प्रयत्न करते. पटलं तर बघा, नाहीतर सोडून द्या.
कंसाने आठ मुलं मारेपर्यंत देव का थांबला? त्याने आधीच अवतार का नाही घेतला? जे देव मानतात त्यांच्यासाठी - देव निरपराधाला कधीच शिक्षा करत नाही. शिशुपालाचे देखील १०० अपराध व्हावे लागले. कंस आधीच सुधारला असता तर देवाला त्याला मारायची वेळच आली नसती. आणि आता जे देव मानत नाहीत त्यांच्यासाठी - चांगल्या कामाचं फळ चांगलं आणि वाईटाचं वाईट. किंवा action-reaction principle म्हणा हवं तर. त्याने शिशुहत्या केली म्हणून त्याचा वध झाला.
>>सीता जमीनीखाली पेटीत सापडली, आई तिचा श्वास थांबला कसा नाही ग??
पेटी पूर्णपणे बंद होती असा कुठे उल्लेख आहे का? अजूनही कुठे कुठे माणूस मेला आहे असं समजून त्याला पुरण्याच्या आणि तो माणूस जिवंत सापडल्याच्या घटना घडतात. शिवाय ह्या सगळ्या गोष्टींतून एक शिकवण असते. जानकी भूमीत सापडली तरी तिचं कूळ शोधण्याच्या भानगडीत न पडता जनकासारख्या राजाने तिचं पालनपोषण केलं ह्यावरून मला तरी अपत्य नसलेल्यांनी मूल दत्तक घेण्याची शिकवण आहे असं वाटतं. तसंच मूल कुठे जन्मलं आहे किंवा कोणाचं होतं ह्यापेक्षा त्याला कसं वाढवलं जातं हे महत्त्वाचं आहे हेच ह्यातून शिकता येतं.
>>"रामाने अग्नीपरिक्षा द्यायला लावल्यावरच सीता जमीनीत का नाही गेली? वनवास भोगायची तिला हौस होती का?"
माझ्या मते ह्यातून मिळणारी शिकवण म्हणजे सत्याचा विजय आणि प्रजेचं ऐकायची राजाची तयारी. अर्थात एक धोबी म्हणाला म्हणून रामाने वनवासात पाठव्लं हे मलाही पटत नाही पण कदाचित नशीबाचे भोग देवालाही चुकले नाहीत म्हणून जनसामान्यांना दु:ख सोसायचं बळ यावं हा हेतू असावा.
>>"नुसत सुर्याकडे बघितल्यावर आणि इंद्राकडे बघितल्यावर कर्ण, अर्जुन कसे जन्मले??"
ह्या प्रश्नाचं उत्तर किंवा लॉजिकल स्पष्टीकरण मला सापडलं नाहिये.
>>"कृष्ण जर अवतारी होता तर त्याने स्वत:ची गीता फेमस हाहा करायला महाभारत घडवल का??
ह्यातून मिळणारी शिकवण देव हा सत्याच्या बाजूने असतो आणि न्यायासाठी लढा द्यावाच लागतो ही असावी. त्याने सुदर्शन चक्र सोडून कौरवांना का मारलं नाही? कारण God helps those who help themselves! त्यामुळे पांडवांना लढावंच लागणार होतं.
दिनेशदा, तुमच्या पोस्टसशी सहमत. योगेश२४, ताटाभोवती पाणी ठेवणे आणि घास काढून ठेवणे ह्याचं स्पष्टीकरण पटलं.
स्वप्ना_राज, अतिशय उत्तम
स्वप्ना_राज, अतिशय उत्तम पोस्ट
>>"नुसत सुर्याकडे बघितल्यावर आणि इंद्राकडे बघितल्यावर कर्ण, अर्जुन कसे जन्मले??"
>>>>>ह्या प्रश्नाचं उत्तर किंवा लॉजिकल स्पष्टीकरण मला सापडलं नाहिये.
त्याकाळी टेस्ट ट्युब बेबी वगैरे सारखी वैज्ञानिक प्रगती झाली नव्हती.
त्यामुळे पुराणकाळी मूल होत नसेल तर राजे-महाराजे नियोग पद्धतीचा अवलंब करीत. शब्दातच लिंक दिली आहे.
ह्यात स्त्रीने दुसर्या पुरुषाशी फक्त अपत्यप्राप्तीसाठी रत होणे अपेक्षित आहे. कदाचित भयानक वाटेल पण वरील लिंक मध्ये त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
अर्थातच हे लहान मुलांना सांगणे योग्य नव्हे असं माझं मत आहे.
स्वप्ना छान स्पष्टीकरण...
स्वप्ना छान स्पष्टीकरण...
मला उगिचंच असं वाटतंय की एका धोब्याच्या सांगण्यावरून स्वत:च्या पत्नीची अग्निपरिक्षा घेण्याइतका 'राम'राजा काही हा नसावा.. अग्निपरिक्षेच्या निमित्ताने त्याने भुमिमार्गे तिची सुटका करून वेगळीकडे सोय केली असेल.. (अनारकलीसारखी)
स्वप्ना, छान पोस्ट
स्वप्ना, छान पोस्ट
अग्निपरिक्षेच्या निमित्ताने त्याने भुमिमार्गे तिची सुटका करून वेगळीकडे सोय केली असेल.. >>> काहिही गं दक्षे उलट त्याने असं केलं तर तो खोटारडेपणा ठरेल.
माझ्या माहितीप्रमाणे सीतेचे जमिनीच्या पोटात गडप होणे हे सीतेचे अवतारकार्य संपवण्याचे एक निमित्त होते. रामाचे शरयुमधे आत्मसमर्पण, कृष्णाचे एका यत्किंचित बाणाच्या तळपायाच्या घेतलेल्या वेधाने देह ठेवणे, ही सगळी अवतारकार्यसमाप्तीची निमित्ते होती.
सगळ्या कथा या एका वेगळ्या पातळीवर समजून घ्यायच्या असतात व त्या लहान मुलांना ती पातळी समजणे हे अपेक्षित नाही. या दिशेने ज्याचा प्रवास सुरु आहे अशा मोठ्या वयाच्या व्यक्तीलाही ते जास्त चिंतन, वाचन, श्रवण, मननानेच समजू शकते. अन्यथा असे अनेक प्रश्न आहेत जसे (१) दत्तात्रेयांना ३ तोंडे, गायत्रीला ५ तोंडे, कार्तिकेयाला ६ तोंडे असणे, (२) हनुमंताला शेपुट असणे इत्यादी.
ज्यांना या कथा मुलांना सांगायच्या असतील त्यांनी त्यांचे अगदी त्या पातळीवरील स्पष्टीकरण नाही दिले (त्यांना समजणारच नाही ) तरीही त्या कथेतून योग्य तो बोध, शिकवण काय देऊ शकता ते बघावे. अन्यथा नेहमीच्या आयुष्यात दिसणार्या गोष्टींमधूनही शिकवण देता येते.
गुब्बी, किती योग्य लेख
गुब्बी, किती योग्य लेख लिहिलायसं! आपल्या काळी ज्या गोष्टी आपण गृहित धरायचो, ते ही आजची पिढी करत नाही. 'बाप दाखव, नाहितर श्राद्ध कर' असा रोखठोक मामला असतो.
स्वराली, तु का बरं एवढी पेटून उठलेस? (सॉरी, दुसरा कोणताही शब्द सुचलाच नाही). लेख नाही आवडला तरी सौम्य शब्दात टीका करता येते. या लेखात तर काही controversial ही नाही. उगाचच वाद कशाला?
अकु, तुझ्या भाचीची modern पार्वतीची कल्पना भावली बघ.
स्वप्ना, लहानपणी काहि धार्मिक
स्वप्ना,
लहानपणी काहि धार्मिक पौराणिक चित्रपट बघितले, त्यातले या हिंसाचाराचे दृष्यरुप माझ्या अंगावर आले होते. कंसाने त्या बाळांना आपटून मारणे, माझ्या सहनशक्तीच्या पलिकडचे होते. आणि मी याच कारणासाठी कार्टून, गेम्स यामधल्या हिंसेचे अजिबात समर्थन करत नाही. आणि मुलांनी ते बघू नयेत, असे माझे मत आहे.
मंदार,
कुंतीला जी मूले झाली, ती नियोग पद्धतीनेच झाली, हे तोपर्यंत सांगितले गेले, जोपर्यंत ती पद्धत समाजमान्य होती. ज्यावेळी ती समाजमान्य उरली नाही, त्यावेळी तिला सिद्धी / मंत्र यांचे आच्छादन दिले गेले. आणि हेच मला पटत नाही.
सत्य सांगायची आपली तयारी नाही आणि खोटे सांगितले तर आजकालच्या शेंबड्या (लाक्षणिक अर्थाने) बाळालाही ते पटणार नाही.
मला इथे एक नमुद करावेसे वाटतय
मला इथे एक नमुद करावेसे वाटतय की मुलांच्या प्रतिक्रिया ह्या इंस्टंट असतात (पुर्ण विचारांती नसलेल्या) त्यामुळे कदाचित अजुन १० वर्षांनी जेव्हा त्यांचे विचार परिपक्व होतील तेव्हा आपणच असे प्रश्न विचारले का, असा बाळबोध प्रश्न त्यांना पडेल. त्यांची विचार करायची पद्धत विषयानुसार बदलत असते.
मी स्वच्छतेच महत्व पटवुन द्यायला जेव्हा लेकिला गोष्ट सांगत होते कावळा आणि बगळ्याची, बगळा रोज स्वच्छ आंघोळ करतो, दात घासतो, सगळ्या पालेभाज्या,फळे खातो म्हणुन तो कसा पांढरा शुभ्र आहे आणि कावळा बघ कसा घाणेरडा ब्रश करत नाही, कुठेही कचरा पेटीवर, घाणीवर बसुन चिवडत असतो म्हणुन तो काळा, अस्वच्छ आहे. तेव्हा लेक म्हणाली , "मम्मा नेक्स्ट टाईम बाबा आजोबांना आपण जेवायला बोलावू ना तेव्हा तू ताट बाल्कनीत कुंडीजवळ न ठेवता, नदी किंवा तळ्याकाठी ठेव म्हणजे बाबा आजोबांना स्वच्छ बगळ्याकरवी जेवण मिळेल." मी शांत. कुठला संदर्भ कुठेही जोडतात ही मुल. पण त्यात चुक काहीच नसत, त्यांची प्रतिक्रिया असते कदाचित अजुन ती मला थोडी मोठी झाल्यावर विचारेल की बाबाआजोबांना जेवायचा,गणपती, गौरीचा स्वयंपाक तूच का करतेस आज्जी का करत नाही ? खरतर तुम्ही विचार कराल तसे प्रश्न आणि उत्तर ठरलेली असतात.
दिनेशदा, स्वप्ना, अकु धन्यवाद.
योगेश मला पण हेच उत्तर मिळाल होत लहानपणी जेव्हा मी बाबांना चित्राहुती बद्दल विचारल होत.
शेवटी त्या छोटुकलीने
शेवटी त्या छोटुकलीने पार्वतीला आखूड स्कर्टच घालायला दिला आणि जोशात चित्र रंगवले!! >>>
अकु, ते चित्र टाका ना माबोवर
कुंतीला जी मूले झाली, ती
कुंतीला जी मूले झाली, ती नियोग पद्धतीनेच झाली, हे तोपर्यंत सांगितले गेले, जोपर्यंत ती पद्धत समाजमान्य होती. ज्यावेळी ती समाजमान्य उरली नाही, त्यावेळी तिला सिद्धी / मंत्र यांचे आच्छादन दिले गेले. आणि हेच मला पटत नाही.
सत्य सांगायची आपली तयारी नाही आणि खोटे सांगितले तर आजकालच्या शेंबड्या (लाक्षणिक अर्थाने) बाळालाही ते पटणार नाही.
-----------------------------------------------------------------------------
नियोग पद्धती तुम्ही मुलाना समजावुन सांगणार का? नुसते सुर्याच्या आशिर्वादाने मुलगा झाला असे सांगितले तर काय हरकत आहे (त्याना कळण्याच्या दृष्टीने)?
इथे अश्विनीचे मत अगदी बरोबर आहे.
ज्यांना या कथा मुलांना सांगायच्या असतील त्यांनी त्यांचे अगदी त्या पातळीवरील स्पष्टीकरण नाही दिले (त्यांना समजणारच नाही ) तरीही त्या कथेतून योग्य तो बोध, शिकवण काय देऊ शकता ते बघावे.
मला वाटते मुद्दा मुलाना काय सांगावे हा आहे. मोठ्याना त्याबद्दल काय वाटते हा नाही (निदान या बाफचा तरी).
जर स्वतःलाही पटत नसेल आणि त्यामुळे मुलाना सांगायचे नसेल तर अश्विनीने म्हटल्याप्रमाणे
अन्यथा नेहमीच्या आयुष्यात दिसणार्या गोष्टींमधूनही शिकवण देता येते.
मला मुळात अस वाटत अशा गोष्टी
मला मुळात अस वाटत अशा गोष्टी लहान मुलांना सांगण गरजेच आहे का ? मुल जिज्ञासु असतातच, ती प्रश्ण विचारणारच, हे गृहित धरूनच , त्याची तयारी ठेऊन .मगच असल्या गोष्टी सांगाव्यात. ८/९ वर्षांच्या मुलांना असे प्रश्ण पडत असतील तर आपणच कुठे तरी चुकतो आहे.
मला मुळात अस वाटत अशा गोष्टी
मला मुळात अस वाटत अशा गोष्टी लहान मुलांना सांगण गरजेच आहे का ? मुल जिज्ञासु असतातच, ती प्रश्ण विचारणारच, हे गृहित धरूनच , त्याची तयारी ठेऊन .मगच असल्या गोष्टी सांगाव्यात. ८/९ वर्षांच्या मुलांना असे प्रश्ण पडत असतील तर आपणच कुठे तरी चुकतो आहे.
Pages