अनुत्तरीत प्रश्न

Submitted by शुभांगी. on 9 September, 2010 - 05:03

वय वाढत तस मुलांचे प्रश्न पण वाढत जातात आणि जास्त प्रगल्भ होत जातात. जेव्हा बाहुल्यांबरोबर खेळणारी चिमुरडी विचार करायला लावणारे प्रश्न विचारते तेव्हा पालक होण्याची जबाबदारी फक्त मोठीच नाही तर कठीण वाटायला लागते.
किमया जेव्हा पाचवीत गेली, तेव्हा आपली लेक आता मोठी झालिये अस समजुन (किंबहुना मला सुद्धा गोष्टी सांगुन जबाबदार पालकत्व निभावता येत हे दाखवण्यासाठी) हेमंत एक दिवस तिला अ‍ॅडम आणि ईव्हची गोष्ट सांगत होता. पृथ्वीच्या उत्पत्तीच्या वेळी असणारे दोन मानव सदृष्य(??) जीव, सफरचंदाच झाड, त्यांच भांडण,आपण सगळे कसे त्याचे वंशज आहोत वगैरे आणि पुढची सगळी कथा अगदी रंगात आली होती. किचन मधे स्वयंपाक करत असले तरी माझे कान त्याच्याकडेच होते.
सगळ शांतपणे ऐकणारी किमया अचानक हेमंतला म्हणाली,"बाबा, पृथ्वीच्या उत्पत्तीच्यावेळी फक्त अ‍ॅडम आणि ईव्ह हे दोघेच जर मनुष्यप्राणी असतील तर त्यांची मुले म्हणजे एकमेकांचे बहिण-भाऊ झाले, मग पुढची पिढी कशी काय जन्माला आली?आणि आपण त्यांचे वंशज कसे काय???"
हेमंत आणि मी दोघेही एकमेकांकडे बघतोय आणि चेहरे पांढरे फटक. काहीतरी थातुरमातुर उत्तर मीही देवु शकले असते पण त्यामुळे माझ्याही मनात अनेक वर्षे दबा धरुन बसलेला हाच प्रश्न वर आला. भिडस्त स्वभाव म्हणा किंवा आई-बाबा सांगतात ते सगळ बरोबरच अशी झापड लावल्यामुळे मी कधी हा प्रश्न विचारला नव्हता पण प्रश्न मनात आला होता जरुर.
असा प्रसंग दुसर्‍यांदा आला जेव्हा आजी (साबा) सगळ्या नातवंडांना कृष्णजन्माची कथा सांगत होत्या. त्या नेहमीच पौराणिक कथा सांगत असतात आणि बदलत्या विश्वाबरोबर आपली नातवंडे आपली संस्कृतीही जपतील याची पुरेपूर काळजी घेत असतात.
साबा अगदी तल्लीन होऊन सांगत होत्या,'देवकी आणि वसुदेवाचे लग्न झाले आणि त्यांची वरात स्वत: कंस रथ हाकत घेऊन चालला होता. अचानक आकाशवाणी झाली, "ज्या देवकीसाठी तू इतका आनंदीत आहेत त्याच देवकीचा आठवा पुत्र तुझा वध करेल"
झाल सगळ तिथेच बिनसल, कंस चिडला आणि रागाने त्याने देवकी आणि वसुदेव यांना तुरुंगात टाकले. त्यांच्यावर कडा पहारा ठेवला. देवकीच्या सातही मुलांना त्याने निर्घुणपणे मारले. आठवा कृष्ण मध्यरात्री जन्मला आणि वसुदेवाने त्याला आपल्या परम मित्राकडे यमुनेचा पूर पार करुन सोडले. नंतर कंसवधाची कथा.
मुले पण तल्लीन होऊन ऐकत होती. शेवटी 'सार्थक' माझा भाचा (इयत्ता ६वी) म्हणाला, "आजी कंस काय मुर्ख होता का ग? त्याला जर माहित होते की देवकीचा आठवा मुलगा आपल्याला मारणार आहे तर त्याने देवकी व वसुदेवाला एकाच तुरुंगात का ठेवले? वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले असते तर पुढे काही घडलच नसत ना!"
आजी खरतर अनुत्तरीत झाल्या. रागतिरेकाने त्यांनी धपाटा जरी मारला असला तरी त्यांच्याकडेही उत्तर नव्हते या प्रश्नाचे.

आतापर्यंत असे अनेक अनुत्तरीत प्रश्न मला विचारले असतील किमया आनि येशाने ज्यांची उत्तरे मी देवू शकले नाही किंबहुना माझ्या उत्तरांनी त्यांच समाधान झाल नाही.
"सीता जमीनीखाली पेटीत सापडली, आई तिचा श्वास थांबला कसा नाही ग??"
"रामाने अग्नीपरिक्षा द्यायला लावल्यावरच सीता जमीनीत का नाही गेली? वनवास भोगायची तिला हौस होती का?"
"नुसत सुर्याकडे बघितल्यावर आणि इंद्राकडे बघितल्यावर कर्ण, अर्जुन कसे जन्मले??"
"कृष्ण जर अवतारी होता तर त्याने स्वत:ची गीता फेमस Lol करायला महाभारत घडवल का??

असे असे अनेक प्रश्न तुम्हालाही विचारले गेले असतील ना? किंवा पडले असतील. मग पौराणिक कथा काय बिनबुडाच्या का??

गुलमोहर: 

गुब्बे असले लय प्रश्न तुला इथे वाचायला मिळतील बघ आता...
>>> "नुसत सुर्याकडे बघितल्यावर आणि इंद्राकडे बघितल्यावर कर्ण, अर्जुन कसे जन्मले??" <<<

ह्याच्यामधे माझं अन इंद्राचं काहीच कॉन्ट्रिब्युशन नाहीये ...

गुब्बे.. नुसते प्रश्न काय टाकतेस उत्तरे पण टाक Lol

पण खरच अवघड असते अशा प्रश्नांना उत्तरे देने.

Lol

थोडंस गंभीर. आपल्याकडे खरं काय घडलं ते माहीत नसेल तर त्याला चमत्कार किंवा चिरंजीवित्वाचा मुलामा चढवला गेला आहे.

मुलं मोठी झाली की त्यांना नरेंद्र कोहली यांची रामायण व महाभारत तसंच कॄष्ण यांच्याविषयीची एक पुस्तकमालिका आहे (हिंदीत आहे) ती वाचायला दे व तूही वाच. सगळ्या गोष्टी पटल्या नाहीत तरी अनेक गोष्टी समजतील, स्पष्ट होतील.

छान लिहिलय गुब्बी. लहान मुले चौकस असतात. आपल्या कल्पनेपेक्षा जास्त गोष्टी त्यांना माहीत असतात. त्यांच्या शंकांचे समाधान केले नाही, तर त्यांच्या परीने, आपापसात चर्चा करुन, ते उत्तरे शोधतातच.

माझे मत जरा विचित्र वाटेल, पण या नीतिकथा, पुराणकथा आता रेलेव्हंट राहिलेल्या नाहीत. त्यापेक्षा वागणुकितून मूल्ये शिकवून, गोष्टींच्या रुपात सामान्य ज्ञान वाढवणे गरजेचे आहे.

दिनेशदा,

अगदी योग्य मत मांडले, पण सगळ्याच गोष्टी कालबाह्य झाल्यात असे नाही.

दिनेशना माझं संपुर्ण अनुमोदन.
पौराणिक कथा ज्या काळात निर्माण झाल्या आणि त्यानंतर त्या गोष्टी ऐकणारी पिढी was not allowed to ask such questions. पण सध्याच्या काळातली नविन पिढी, उत्तर तुमच्याकडून नाही मिळवता आलं तर इतर कुठुन काधायचं ते जाणते व्यवस्थित... त्यामुळे पौराणिक कथा नकोतंच... हा सुर्य आणि हा जयद्रथा सारखं प्रत्येक अनुभवातून त्यांना समृद्ध करणंच गरजेचं आहे.

तर त्याने देवकी व वसुदेवाला एकाच तुरुंगात का ठेवले? वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले असते तर पुढे काही घडलच नसत ना!">>> हा प्रश्न तर मला कायमच पडलाय, आताची पिढी हे प्रश्न विचारते, आपण विचारायला घाबरायचो!
या कथांचा वापर; मनोरंजनासाठी, धर्म-संस्कॄती कळावी म्हणून की मूल्ये शिकवण्यासाठी हा विचार जरुर व्हावा.

माझे मत जरा विचित्र वाटेल, पण या नीतिकथा, पुराणकथा आता रेलेव्हंट राहिलेल्या नाहीत. त्यापेक्षा वागणुकितून मूल्ये शिकवून, गोष्टींच्या रुपात सामान्य ज्ञान वाढवणे गरजेचे आहे. >>>>
दिनेशदा अगदी १००% अनुमोदन ...
मला पण बर्‍याचदा बर्‍याच गोष्टी नाही पटत .. उदाहरणार्थ भोंड्ल्याची गाणी किंवा कहाण्या... केवळ पारंपारिक चालु आहेत म्हणुनच ठीक म्हणायच.. अर्थाचा किंवा logically विचार करायला लागलो की आजिबात नाही पटत...

नाईलाज आहे पन डॉ. प.वि. वर्तक यांची " वास्तव रामायण" आणि महाभारताचा खरा नायक भीम" ही दोन पुस्तके या अनुषंगाने जरुर वाचावीत. नाईलाज अश्यासाठी डॉ. प.वि.वर्तकांचे नाव ऐकले की काही माबोकरांना आवडत नाही यासाठी.

.

नाईलाज आहे पन डॉ. प.वि. वर्तक यांचे " वास्तव रामायण" आणि महाभारताचा खरा नायक भीम" ही दोन पुस्तके या अनुषंगाने की अनुशंगाने जरुर वाचावीत>>> त्या 'काही' माबोकरांपैकी मी एक आहे. आपण सूक्ष्म रुपाने मंगळावर जाउन आलो असाही वर्तकांचा दावा आहे. तो कुठल्या अनुषंगाने पहावा? उत्तम विनोदी लिखाण म्हणून त्यांचे वाचन जरुर व्हावे.

आगावा मला कधी तो प्रश्न पडला नाही कारण मी जवळ जवळ १२ वी पर्यंत अज्ञानीच होते. आताच्या पिढीला भयंकर एक्सपोजर आहे. (एक्सपोजर आहे याची चिंता करावी, की आनंद बाळगावा तेच कळत नाही.. :()

धपाटे मारून त्यांची चौकस बुद्धी आपणच मारतो. शाळेत शिक्षकही हेच करतात. पण प्रश्णाचं त्यावेळी जरी उत्तर देता आलं नाही तरी 'हे मला माहीत नाही याचं उत्तर मी नंतर देईन' असं सांगायला पाहीजे. आणि मुख्य म्हणजे नंतर माहिती जमवून जे काही त्यातून निघेल ते सांगितलं पाहीजे.

एक्सपोजर आहे याची चिंता करावी, की आनंद बाळगावा तेच कळत नाही
चिंता करु नये, सद्दयस्थितीत मुले संस्काराच्या बाहेर जाणार नाही.

चिमण अगदी खरं आहे रे तुझं, अध्यात्मिक अन पौराणिक कथा ऐकण्याची आवड निर्माण करायची असेल तर त्या योग्य रीतीने समजावून सांगितल्या पाहिजेत. लहान मुलांना देवळात गेल्यावर हमखास पडणारे प्रश्न..

१. देवळाबाहेर चपला, बुटं का काढायची?
२. देवळात कासव , नंदी अन घंटा का असते ?
३. काही देवळात मांसाचा नैवेद्य चालत नाहीत मात्र.. देवीच्या नावानं, जागरणाच्या नावानं सर्रास बळी दिले जातात.

ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हमखास चिमुकल्यांना पडतात.

काशीच्या वाटीने .. सांधेवात बरा होतो.. मग आजोबांना रोज त्या वाटीने चोळा म्हणजे उसेन बोल्ट सारखे धावतील Proud असे बोलणारी मुलेही पाहीली आहेत मी..

>>>माझे मत जरा विचित्र वाटेल, पण या नीतिकथा, पुराणकथा आता रेलेव्हंट राहिलेल्या नाहीत. त्यापेक्षा वागणुकितून मूल्ये शिकवून, गोष्टींच्या रुपात सामान्य ज्ञान वाढवणे गरजेचे आहे<<< दिनेशदांना अनुमोदन .
दक्षीणा, >>>एक्सपोजर आहे याची चिंता करावी, की आनंद बाळगावा तेच कळत नाही<<< अगदी खरं .
चिमण >>>पण प्रश्णाचं त्यावेळी जरी उत्तर देता आलं नाही तरी 'हे मला माहीत नाही याचं उत्तर मी नंतर देईन' असं सांगायला पाहीजे. आणि मुख्य म्हणजे नंतर माहिती जमवून जे काही त्यातून निघेल ते सांगितलं पाहीजे.<<< लाख मोलाची बात.

गुब्बी,
एक वेगळा मस्त विषय !!
खरचं हे आणि असे अनेक प्रश्न नक्कीच पडतात , ज्यांच उत्तर आपल्याकडे नसतं !!
दिनेशदा, मंदार..
अनुमोदन !
Happy

मस्त लिहीलंयस गं गुब्बे Happy माझा पण लेख आठवला त्या निमीत्ताने.
दिनेशदांना आणि चिमण गुर्जींना १००% अनुमोदन.

मला नाही आवडल.
स्वतःच्या मुलांवर कंट्रोल नाही मग असले मुर्खासारखे प्रश्न विचारणारच ती.
गुब्बी तुम्ही अस लिहाल अशी अपेक्षा नव्हती. काहीतरी मटेरियलिस्टिक लिहा की. स्वतःच्या नवर्‍या मुलांची नावे कशाला जाहिर करताय्?कुणाला काडीचाही इंटरेस्ट नसतो असल्या फालतू विषयात.

गुब्बे....लई भारी लेख!

माझी भाची २वर्षाची असतांना ...भावाने असच तिला (मेंदुला चालना मिळावी म्हणुन.... :P) विचारलं "अप्पु, आपण कपडे का घालतो गं?" यावर आपल्याला ऊन, वारा, पाऊस लागु नये म्हणुन असे उत्तर अपेक्षित होते. पण थोडा वेळ विचार करुन आणी चेह-यावर खट्याळ भाव आणून डोळे मिचकावत बाईसाहेब म्हणाल्या " कोणी आपल्याला नंगु नंगु नै म्हणावं म्हणुन"
मुलं प्रॅक्टीकल जगतात हेच खरं!!! Happy

हे सगळे तुमच्याच कंपुतले का? म्हणुनच तद्दन फालतू लिखाचं कौतुक करताहेत.
आपणच लिहायच आणि आपल्याच लोकांना वाह -वाह लिहायला सांगायच. त्याने तुमचा लेख सुधारत नाही. जरा मॅच्युअर्ड लिखाण करा आता. नावाप्रमाने बालिश नका लिहू.
मुर्खांना हे पण कळत नाही की कशाला चांगल म्हणाव आणि कशाला वाईट.

सगळे पळाले वाटत शेपुट घालुन. खर बोलल की लागत. आता कुणी येणार नाही तुमची बाजू घ्यायला. जरा चांगल लिहिल असतत तर आले असते आमच्यासारखे धावुन्.:स्मित:

स्वराली..! किती छान बोलता हो तुम्ही. अगदी अगदी कौतूक करावं असं. Proud बाकी.. स्वत: नागडं राहून, लोकांच्या कपड्याला हसणारी व्यक्ती मी पहिल्यांदाच पाहीली. तुम्ही जाऊद्यात, उगाच इथे डोकं लावत बसू नका, तुम्हाला तुमचा नागलँड का काय ते असेल तिथे जा नाहीतर एखाद्याला तुमचा मोह व्हायचा अन मग व्हायची पंचायत. Proud

Pages