माझ्या बागेतील फुले

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 September, 2010 - 03:37

हा आहे सोनटक्का. सोनटक्क्याचे आल्यासारखे मुळ असते. ह्याचे एक मुळ किंवा रोप लावले म्हणजे ते अळुसारखे बाजुला पसरते. आपल्या मंद वासाने हे फुल स्वतःकडे आकर्षीत करुन घेते. सोनटक्क्यामध्ये पिवळा रंगही असतो. पिवळ्यारंगाची फुले थोडी आकाराने लहान असतात पांढर्‍याफुला पेक्षा. बाजारात जुडीने ह्याच्या कळ्या विकायला येतात.
ph.JPG

हा आत्ताच आणलेला डेलिया आहे. ह्यामध्येही मला पिवळा, किरमिजी रंग दिसला. ह्या झुडूपाला एकदाच ५-६ कळ्या आल्या होत्या.
ph1.JPG

खुप ठिकाणी शोधल्यावर हा गावठी गुलाब मला लोणावळ्याच्या नर्सरीमध्ये सापडला. आता रोज ह्या झाडाला ४-५ तरी फुले येतात. मोठे झाल्यावर ह्या झाडाला मी अगदी फुलांनी बहरुन गेलेले पाहीले आहे. त्यामुळे तो लहानपणीपासुन माझ्या स्मरणात होता. ह्याचाही मंद गुलाबी वास मोहुन टाकणारा असतो.
ph4.JPG

हा आहे कलमी गुलाब. हाही लोणावळ्याच्याच नर्सरीमधला. जास्त उन असेल तर ह्याचा रंग फिक्कट होतो. पावसाळ्यात उन कमी असल्याने असा सुंदर रंग येतो ह्या गुलाबाला.
ph2.JPG

हा माझ्या दारातील मिनी गुलाब. खर तर ह्या झाडाला झुबक्यानेच लागतात गुलाब. पण सध्या ह्या झाडावर डबलच्या तगरीची सावली येते त्यामुळे फुलांचा बहर कमी झाला आहे. आता ह्याचे ठिकाण बदलायचे आहे. म्हणजे परत बहरेल फुलांनी.
ph3.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जागू..सुंदर दिसत आहेत तुझी फुलं.. गुलाब तर काय सुरेख आहेत.. ती गुच्छ्यात लागणारी गुलाबाची फुले इकडे भरपूर दिसतात.. बिन वासाची असली तरी रंग मात्र आल्हाददायी असतो नै??

जागू, प्रचि ३ मस्तच आलाय....
ईतका सुन्दर की ते पाण्याचे थेम्ब अगदी प्ल्यास्टीकच्या पारदर्शक खड्यासारखे वाटताहेत....

मस्तच!!!!
सोनटक्क्याचा फोटो जास्त आवडला. आम्ही शाळेत असताना याची आणि जास्वंदीची फुले/कळ्या दुसर्‍यांच्या दारातुन चोरून आणायचो Wink Happy

मस्त गं.. मी उद्या कर्नाळ्याजवळच्या गोग्रीन नर्सरीत जाणार आहे गावी नेण्यासाठी झाडे घ्यायला. सोनटक्काही अ‍ॅड करते लिस्टमध्ये. Happy

जागू, सोनटक्का आणि गावठी गुलाब भारी!! Happy
मला सोनटक्का प्र चं ड आवडतो! काय तो डौल, नखरा, नाजूकपणा आणि निरागस कोवळीक!! शिवाय त्याचा तो मंद, गोडसर सुवास तर वेड लावणारा! मस्तच!

वर्षू, चिमुरी, स्मितहास्य, सुकि, अरुंधती धन्यवाद.
योगेश मी फुलांबरोबर झाडांच्या फांद्याही आणायचे.
संत्या तुमची सुचना मी अंमलात आणेन.
साधना सोनचाफा पण घेउन जा.

पावसाळ्यात रेल्वे स्टेशनवर बायका विकायच्या सोनटक्का. मी दोन्-चार जुड्या घेऊन ऑफिसात जायचे आणि ग्लासात पाणी भरुन त्यात ठेवायचे. सगळीकडे घमघमाट सुटायचा. आताच जुन्या ऑफिसातुन एकाचा फोन आलेला, त्याने खास हीच आठवण सांगितली. मी ऑफिस सोडल्यावर सोनटक्क्यचा घमघमाटही गेला... Sad

साधना Happy
साधना तुझ्या कुंडीत नाही का सोनटक्का ? माझ्याकडे आलीस की घेउन जा. कुंडीतही होतो सोनटक्का.

काय तो डौल, नखरा, नाजूकपणा आणि निरागस कोवळीक!! शिवाय त्याचा तो मंद, गोडसर सुवास तर वेड लावणारा>>>>>>अरूंधतीजींना मोदक Happy