क्ले आणि ग्रास कोर्टचा सिजन संपल्यानंतर आता हार्डकोर्ट सिजन सुरु झाला आहे. हा धागा ह्यावर्षीच्या युएस ओपन सिरीज तसेच सरत्या उन्हाळ्यात येणार्या युएस ओपन टेनीस स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी.
युएस ओपन टेनीस स्पर्धा २०१० सोमवारपासून सुरु होत आहे. रफाएल नदाल आणि कॅरोलाईन वोझनियाकी ह्यांना अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीमध्ये अग्रमानांकन मिळालं आहे.
महिला एकेरीमध्ये सेरेना विल्यम्स आणि जस्टीन हेनीन अश्या दोन दिग्गज खेळाडू यंदा अनुपस्थित असल्याने बाकींच्या खेळाडूंमधे विजेतेपदासाठी चुरशीसी स्पर्धा दिसेल. मानांकनाप्रमाणे खेळाडूंनी आपले सामने जिंकले तर उपांत्यपूर्व फेर्यांचे चित्र असं असेल.
महिला एकेरी :
वोझनियाकी वि ना ली (शारापोव्हा, कुझनेत्सोवा ह्याच क्वार्टरमधे आहेत).
यांकोविच वि झ्वोनारेवा
स्क्विवोनी वि व्हिनस विल्यम्स
स्टोसूर वि किम क्लायस्टर्स
पुरुष एकेरी :
पुरुष एकेरी
नदाल वि व्हरडास्को
अँडी मरे वि बर्डीच
डेव्हीडँको वि जोकोविच (रॉडीक ह्या क्वार्टर मधे आहे)
सॉडर्लिंग वि फेडरर (हेविड ह्या क्वार्टर मधे आहे)
रॉडिक ने खरंच काल निराश केलं.
रॉडिक ने खरंच काल निराश केलं. तो चांगला खेळु शकला असता. रादर, त्याने चांगले खेळायला हवे होते. पण त्याला दडपण झेपले नाही. आणि एकदा खेळ हातातुन गेला तो निसटतच राहिला.
पण त्याला दडपण झेपले नाही.>>>
पण त्याला दडपण झेपले नाही.>>> हे काय पटले नाही बर का... ग्रँड स्लॅम खेळायची आणि दडपण झेपलं नाही म्हणायचं... एक वेळ मिर्झा बाईंच्या बाबतीत हे पटू शकेल पण रॉडीकच्या बाबतीत नक्कीच नाही.. प्रॉब्लेम दुसराच काहीतरी असणार आहे...
पग्या रॉडीक गेला म्हणून फार वाईट कशाला वाटून घेतोयेस... असाही तो तुझ्या संभाव्य QF लिस्ट मध्ये नव्हताच..
मिर्झा बाईंना दडपणाचा नाही
मिर्झा बाईंना दडपणाचा नाही अॅटिट्युड प्रॉब्लेम आहे. तिथे येऊन उगीच नाही ते नखरे करायचे. खेळावर लक्ष नाहीच.
गतविजेता आणि टू टाइम फायनलिस्टला दडपण झेपलं नाही म्हणता ?
रॉडीक थोडा चंचलच आहे. खुप
रॉडीक थोडा चंचलच आहे. खुप लवकर अस्वस्थ होतो. त्याचा प्रतिस्पर्धी खुप शांतपणे आणि चतुराईने खेळत होता.
गतविजेता आणि टू टाइम फायनलिस्टला दडपण झेपलं नाही म्हणता ?>> खरं आहे. आणि म्हणुनच तो गेला.
कालची हंतुकोवा-किंग मॅच
कालची हंतुकोवा-किंग मॅच चांगली झाली. काही रॅलीज अप्रतिम होत्या. दोघींचे रिफ्लेक्सेसही बर्यापैकी चांगले होते.
ती इवानोविक कसली नाटकी आहे. कालच्या मॅचमध्ये पन्नासवेळा तरी तिने सर्विससाठी बॉल वर फेकून फटका न मारता पुन्हा हातात पकडला, आणि त्यावेळी वारा वगैरेही फार काही नव्हता. तरी समोरचीनं काही तक्रार केली नाही.
रॉडीक थोडा चंचलच आहे. >>
रॉडीक थोडा चंचलच आहे.
>> सुमंगलताई, अहो काय काय विशेषणे चिकटवताय रॉडिकला. मला तर ते गाणे आठवले 'देखने मे भोले हो, पर हो बडे चंचल.. " रॉडिकला फिट्ट बसतंय बघा एकदम
चम्या, इव्हानोविचला काही म्हणायचं नाही हां. ती सुंदर आहे आणि अजूनही टेनिस खेळत आहे हेच केवढं कौतुकास्पद आहे! सर्व्हिस केली नाही वगैरे छोट्या छोट्या गोष्टी बघू नकोस..
देखने मे भोले हो, पर हो बडे
देखने मे भोले हो, पर हो बडे चंचल.. >>>
काल रॉडीकच्या मुव्हमेंटस अजिबातच ठीक नव्हत्या.. १०० % फिट नव्हता असं सारखं जाणवत होतं.
इवानोविच >> ती सुंदर आहे आणि अजूनही टेनिस खेळत आहे हेच केवढं कौतुकास्पद आहे!>> तशीही ती अॅना कुर्निकोव्हाच्या लाईनवर गेलेली मागे!
रॉडीकने खुप नाटके केली, बरा
रॉडीकने खुप नाटके केली, बरा झाल तो हारला ते.
टिपसे अप्रतिम खेळला आणि शेवटी छान बोलला पण. त्याचे विनर्स खुपच छान होते. रॉडीक त्याच्या समोर अगदी फिका वाटला.
कालच्या मॅचेस खास झाल्या
कालच्या मॅचेस खास झाल्या नाहीत, बर्याचश्या एकतर्फी झाल्या. जॉको चांगला खेळला.
मारियाचे ड्रेसेस छान आहेत. कालचा आणि पहिलाही छान होता.
पेन्ग नावाची एक चिनीण आहे अजून, ती काल चांगली खेळली.
सोडेर्लिंग विरुद्ध तो डेन्ट
सोडेर्लिंग विरुद्ध तो डेन्ट केवढा बकवास खेळत होता... बकवास म्हणजे अगदी कहर.
पेस या वयातसुद्धा त्याच्यापेक्षा हजार पटींनी भारी खेळला असता सिंगल्समध्ये. असो.
मरेला ब्राऊन नक्की जड जाणार.
मरेला ब्राऊन नक्की जड जाणार. ब्राऊनची सर्विस आणि विनर्स सही आहेत.
ब्राऊन आवडला आपल्याला.
पाऊस पडतोय काय?
पाऊस पडतोय काय?
एक सर येऊन गेली खेळ परत चालू
एक सर येऊन गेली खेळ परत चालू झाला.
जोकोच्या ड्रेसविषयी काय मत ?
जोकोच्या ड्रेसविषयी काय मत ?
काल त्याच्या मॅचमध्ये काय झाले ? मी टीव्ही लावला तेव्हा जोको वर बघून काही तरी दाखवत होता.
स्टॅंडमध्ये मारामारी.
स्टॅंडमध्ये मारामारी.
विनस विल्यम्सचा आजचा ड्रेस
विनस विल्यम्सचा आजचा ड्रेस म्हणजे यु एस ओपन २०१० चं फॅशन स्टेटमेंट
काय झगमगीत ड्रेस आहे.
काय झगमगीत ड्रेस आहे. समोरचीला डिस्ट्रॅक्ट होइल
भूपती पुरुष दुहेरी आणि मिश्र
भूपती पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरी दोन्हीत बाद.
आता मिश्र दुहेरीत पेस आणि पुरुष दुहेरीत बोपन्ना एवढेच भारताचे आव्हान शिल्लक.
बिचारी Beatrice Capra!!!!
अरे मरे गेला की! शेवटच्या १६
अरे मरे गेला की!
शेवटच्या १६ मधे ६ स्पॅनिश ...पण त्यातले ४ एकमेकांशीच झुंजणार...
राफा, लोपेझ, व्हर्डास्को, फेरर..
बोपन्ना-कुरेशी दुसर्या मानांकित जोडीला हरवून क्वार्टर फायनल मधे!
अरे त्या डीमेंटीयेव्हाला
अरे त्या डीमेंटीयेव्हाला शिकवारे कोणीतरी.. प्रत्येक वेळेस मोक्याच्या वेळेस कसे हरायचे नाही ते.. चार मॅच पॉईंट घालवून मॅच हरणे ह्याला काय म्हणणार...
हे काय शारापोव्हा आणि
हे काय शारापोव्हा आणि मरेबरोबर सगळे आपापल्या घरी गेले का? उगी उगी.
लिअँडरपण गेला.:(
आता भारताचे आव्हान फक्त बोपन्नाच्याच रूपाने.
मरे गेला !! बरं झालं..
मरे गेला !! बरं झालं.. !!!!!!!!
शारापोव्हा पण गेली.. अरे अरे !!
आजच्या मॅचेस बर्या व्हाव्या...
मर्या आणि वॉवरिंका यांची सेम
मर्या आणि वॉवरिंका यांची सेम चौथ्या फेरीतली मॅच मी २००८ मध्ये तिथे जाऊन पाहिली होती. मर्या जिंकला होता तेव्हा. आणि यावेळी हरला.
आता जाऊ नकोस मग कधी. आजची
आता जाऊ नकोस मग कधी.
आजची (बायकांची) मॅच पहा.
कालची मॅच लवकर संपवल्याबद्दल फेडरर यांचे आभार.
मरे ने त्याच्या अॅटिट्यूडने
मरे ने त्याच्या अॅटिट्यूडने अर्धी मॅच घालवली असं वाटलं.. वावरिंकाच्या गेममधे फेडीच्या खेळाची छाप दिसून येत होती. स्पेशली शॉट सिलेक्शन मधे.
कालची फेडररची मॅच अन शारापोव्हा-वॉझ्नि मॅच मस्तच!
इजनर-युझनी मॅच चांगली होती,
इजनर-युझनी मॅच चांगली होती, ३५ एसेस केले इजनरने आणि त्याच्या दुप्प्ट अनफोर्स्ड एरर्स.
इजनर बराच बरा खेळतो पण टेंपरामेंटच्या जोरावर युझनीला दुसरा सेट वगळता फार कष्ट पडले नाहीत.
मला राहून राहून वाटतं ६.९ उंचीचं आणि २४५ पौंडाचं धूड टेनीसपेक्षा बास्केटबॉल कोर्टवर चांगलं खेळलं असतं.
मस्त झाली मॅच व्हिनस वि
मस्त झाली मॅच व्हिनस वि स्किव्होनीची !!!!!
दोघीनींही जोरदार खेळ केला आणि बर्याच रॅलीज भारी झाल्या !
काही वेळा खूप अनफोर्स्ड एरर झाल्या पण एकूणात मस्त मॅच..
गो व्हिनस !!!!!!
किम आणि स्टोसुरचे पहिले दोन सेट मस्त झाले. तिसरा सेट दोघीही खूप चुका करत होत्या आणि शेवटी तर स्टोसुरने सोडूनच दिली मॅच जवळ जवळ !! आता व्हिनस वि किम..
व्हरडास्को वि फेरर पण मस्त झाली मॅच... व्हरडास्को पूर्ण मॅच अफाट खेळला... फेररचा खेळ वर खाली जात होता.. शेवटचा टायब्रेकर भारी झाला...
"आता व्हिनस वि किम..
"आता व्हिनस वि किम.. "
फायनलच्या आधीच फायनल!!!
फेडरर आणि व्हीनसला जराही घाम गाळावा लागलेला नाही आतापर्यंत.
दोघेही एकही सेट हरलेले नाहीत. फेडररसमोर एकही सीडेड खेळाडू आलेला नाही, आणि आता सामना सोडर्लिंगशी.
बोपन्ना कुरेशी पुरुष दुहेरीच्या सेमीफायनलमधे!
चला, आता पुन्हा (पुनः) फेडरर
चला, आता पुन्हा (पुनः) फेडरर फॅन व्हायला हरकत नाही.
काल रात्री नदाल चांगला खेळला.
काल रात्री नदाल चांगला खेळला. पण टिव्हीवाले त्याच्या ऊगाचच मागे लागतात आणि त्याच्या काकाच्या पण जो कोच आहे.
"Your serve is improved a lot, what did you do?"
अरे! मी असते तर सांगितले असते कि "nothing just playing my own game."
आणि मग त्याच्या इंग्रजीची टर ऊडवतात. मला नाही आवडले ते.
Pages