मैत्री .....!! तो अन ती दोघांमधली......!!! भाग--४

Submitted by mahesh_engpune on 5 September, 2010 - 13:56

शेवटी कितीही झाल तरी तो एक माणुस होता. माणसाप्रमाणेच त्याच्यातही काही sentiments होत्याच की. तिच्या आयुष्यातुन जाण किती त्रासदायक असेल याचा अनुभव घेण्यासाठी की त्याची सवय करुन घेण्यासाठी तो आता तिला टाळत होता.अन नेमकं हेच वागण तिला पटत नव्हतं.पण तोही तिच्यात तेव्हढाच involved झालेला होता.त्यामुळेच तो ला तिच्यापासुन दुर राहण शक्य नव्हतं.
१७ November ती कुठल्यातरी बँकेच्या territory manager च्या opening साठी interview देणार होती. पण ती opening non technical होती, तरीही रोजच्या येणार्‍या अपयशाला कंटाळत ती ने तो द्यायचा ठरवल होतं. interview छान झाला. तिच selection ही झालं.तिच्यासाठी फारच अनपेक्षीत अस काही घडत होतं. खुप खुष झाली होती ती,लगेच तो ला call करत तिन त्याला बोलावुन घेतलं. आज तिन स्वताहुन त्याला भेटायला बोलावलं होतं. तो ही लगेच तिन बोलावलेल्या ठिकाणी १५ मिनिटातच पोहचला. तिच्याबरोबर तो common friend होताच. तिचा तो खुललेला चेहरा पाहताच त्यान ओळखल की ही आज भलतीच खुश आहे. तस तिन तो ला अगदीच थंडपणे मी select झाले अस सांगितलं. त्यान लगेच तिला congrats करत

"नालायक..!! हे तु आत्ता सांगतेस..?" म्हणत job profile काय आहे ते विचारलं. तिन non-technical आहे अस सांगताच तो ने तिला "तु हा job करत नाहीएस..OK..!! गेले ६ वर्षे यासाठी diploma n degree नाही केलीस.. जे आपण शिकलो त्यातच career करायच..!! बँकेतच नोकरी करायची होती तर त्यासाठी B.E.COMPUTER कशाला केलसं" अस म्हणत झापलं.
पण ती मात्र खुष होती तिला आज इतक्या दिवसांनंतर होणार्‍या rejection नंतर selection मिळाल होतं. कोणीतरी हो म्हटल होतं. या छोट्याश्या "हो" मुळे तिचं सगळ अंतरंग तरारुन आलं होतं.मुळच्याच expressive चेहर्‍यावर ते अजुनच उठुन दिसत होतं. अन हेही त्याला जाणवत होतं..!! पण मुद्दामच तो तिला हे जाणवुन देत नव्हता. तिला bus stop पर्यंत सोडायला आला तेव्हा ती मात्र त्याच्या त्या attitude वरुन त्याला खुप बोलत होती. तशी दोघांची मैत्री खुप गाढ होती,म्हणुनच तो तिला

"मी तुझ्यावर खुप खुष आहे..!! मला आजवर फक्त तु हरवलयस..!! मी तुझ्याकडुन हरलोय रे..! पुर्वी एखाद्या सम्राटाने एखादं राज्य जिंकल की कसा तो हरलेला राजा त्या सम्राटाला त्याच्या पराक्रमाच प्रतिक म्हणुन काहीही भेट द्यायचा..!! आपल पुर्ण राज्य त्या सम्राटाच्या अस्तित्वाखाली मांडलिक म्हणुन द्यायचा..!! अगदी तसच तु मला हरवलयस रे.. माग काहीही माग.. ते मी देणारच.. माझ्याकडुन मी तुला दिलेला वर समज..!! तु मला मागितलेल काहीही मी द्यायला तयार आहे..!!" अस म्हणायचा.

अन ती ही त्याच बोलण चेष्टेवारी नेत त्याला "येडा..!!" म्हणत त्याच्या त्या काहीतरी वेगळ्यापणावर ठाम रहायच्या प्रयत्नाला हसायची.पण आजच तिच बोलण , आपल्या त्या attitude वरुन तिच फटकारणं, त्याला त्यानं दिलेल्या वराची आठवण करुन देत होतं.अन तो ही या भ्रामक समजुती मुळे "काहीही माग म्हटलं होतं.. पण attitude..!! will it change for any one..? हो.. बदलेल.. फक्त तुझ्यासाठी..!! माझ्या एकुलत्या एक मैत्रीणींसाठी...!! मी तो ही सोडायला तयार आहे रे..!! माहीत नाही त्याच्याशिवाय मी कसा जगेन..? पण तुला जर तोच हवा असेल तर मी हसत हसत देइन तो..!!"असं तिला म्हणत होता.
तसं तिला त्याचा attitude च खुप आवडायचा..!! खरतर या खराब attitude मुळेच दोघांची मैत्री एव्हढी बहरली होती. अन "तो" ATTITUDE तिनं मागणं म्हणजे अशक्य होतं. तिनं ही त्याला मग समजावलं,

"तुझा attitude तुझी strength आहे रे.. तो कसा मी मागेल..? पण तु एव्हढा चांगला असुनही लोक तुला तुझ्या त्या attitude मुळे वाईट म्हणतात, याचा मला खुप त्रास होतो रे..म्हणुन म्हट्ल रे मी... मी तुझा attitude नाही हिरावुन घेऊ शकत..!!"
जमेल तितक्या समजुतीच्या स्वरात ती त्याला समजावु पाहत होती.

"अरे पण त्यामुळे तुसुध्दा hurt होतेस ना..?"
"नाही होत मी hurt .. झाली तर सांगेन तुला..!!"

अस म्हणत तिनं तो चा निरोप घेतला. पण आज तो खुपच दुखी होता. काहीतरी विचित्रच भावना त्याच्या मनात दाटुन आल्या होत्या. अन या भावना फक्त त्याचा तो true boyfriend च समजुन घेऊ शकत होता.त्यानं लगेच त्याला आपल्या कडे बोलावुन घेतलं. त्यानं सुध्दा आपली हातातली सगळी कामे टाकुन आपल्या boyfriend ला सावरायचं म्हणुन गाडीवर टांग टाकत १५ किमी अंतर पार करत त्या दोघांचा अड्डा गाठला. आज त्याचा नुर जरा वेगळाच होता. उगीच बाहेरच्या जगाला फसवायचं म्हणुन डोळ्यांच्या कडावर आलेले अश्रु तो वाहत्या वार्‍याला पापणी न मिटता समोरे जात थांबवत होता.अन चुकुन जर एखादा अश्रु बाहेर आलाच तर लोकांना तो त्या वार्‍याच्या झोतामुळेच आला असेल अस वाटेल अस्साच काही तो स्वताचा भ्रम करुन घेत होता.खरं तर तस आज त्यानं खुष असायला पाहिजे होते, त्याची एकुलती एक मैत्रीण track वर येऊ लागली होती. इतके दिवस त्याला तिच्यात लपलेला न्युनगंड छळत होता.अन आज त्याच्या ठिकर्‍या ठिकर्‍या सुरु होण्यास सुरुवात झाली होती.पण त्याला आठवत होता तो त्याने दिलेला शब्द..!! "तिला job लागला की १० दिवसांच्या आत तिच्या आयुष्यातुन निघुन जाईन..!!" त्या दोघांच्या common friend ला दिलेला तो शब्द त्याला छळत होता. आपण आता हिच्या आयुष्यातुन कस जायचं अन तिला कमीत कमी त्रास होईल अस वागायच हेच तो ठरवत होता.पण इतक्या दिवस एकमेंकांच्या जवळ असल्यामुळे,एकमेंकाना जवळुन अनुभवत असताना असं एकाकी सोडुन जाण्यामागे काय बर कारण असावं? कारण ही तसच होतं. कितीही असलं तरी तो सुध्दा एक माणुसच होता. एक असा मुलगा आजवर ज्याच्या आयुष्यात त्याला समजणारी कोणीच मुलगी नव्हती,त्याच्या आयुष्यात ती आली होती. त्याला "त्या" दिवशी junior ने त्याला समजवण्यासाठी म्हटलेलं वाक्य आठवत होतं

"तुझ्या आयुष्यात तुला समजणारी नक्की कोणीतरी येईल..!! तु आहेसच असा..!! बघ एक दिवस ती मुलगी तुझ्या आयुष्यात येईल्.जी तुला तुझ्यापेक्षाही जास्त समजुन घेईल..!!"

अन junior च बोलण तंतोतंत खरं झालं होतं. त्याच्या आयुष्यात आता ती आली होती.त्याला समजणारी एकमेव त्याची एकुलती एक मैत्रीण..!! पण तो मात्र तिच्यापासुन लांब रहायचा प्रयत्न करीत होता.त्याला आज व्यक्त व्हायला कोणाची तरी गरज वाटत होती,अन म्हणुन तर त्याने आपल्या boyfriend ला बोलावल होतं.तासभर तो त्याला त्या दोघांची मैत्री कशी फुलली, कसं ते दोघ एकमेंकाच्या जवळ आले या सगळ्यांची गोष्ट सांगत होता. तो एकटाच बडबडत होता.पण तो का एव्हढा विचलीत होत होता त्याचं त्यालाच माहीत होतं. त्याला खरतर तिच्या आयुष्यातुन निघुन जावं हिच कल्पना सहन होत नव्हती.अन त्याचाच तर त्याला त्रास होत होता. त्याला वाटत होतं

"कदाचीत मी जर थांबलो तर जे नको ते घडेल. आजवर मी जितकी जिवापाड माझी मैत्री जपली ,त्याला कुठेतरी बट्टा लागेल्.मला तिच्या त्या आधीच्या दोन मित्रांसारख नाही जायचं. मी नाही बोलणार..!! पण जर ती व्यक्त झाली तर..? नाही ..!! तिला नाही म्हणनं मला शक्य नाही होणार्.पण मी खरच तिच्या लायकीचा नाही.आजवर तिच्या जवळ जायचा प्रयत्न केला ते फक्त तिला कोणीतरी समजुन घेणारं असावं अस वाटत होतं म्हणुन..!! एक true friend म्हणुन्..!!मला ते वाटलं..पण पाण्यात उतरुन कोरडं राहणं खुप अवघड असतं. मी माझ्या भावना लाख थोपवीन..!! पण जिला मी व्यक्त व्ह्यायला शिकवलं,तिला नाही जमणार..!! अन ती व्यक्त झाली तर..!! मला ती च्या first hero ला हरवायचं नाही..!! ती व्यक्त होण्यासाठी आजवर मी काय नाही केलं..?कित्येकदा माझ्या मर्यादेच्या बाहेर गेलो..!! पण तिन आपला एक सच्चा मित्र म्हणुन नेहमी माझ्या चुका माफ केल्या.किती मोठ्या मनाची आहे माझी मैत्रीण..!! तिच्या आयुष्यात माझ्यासारखे कितीतरी मित्र आहेत्.पण आज ती मला सगळ्यांपेक्षा वेगळा मानते. माझा एकमेव true friend म्हणते मला..!! मला माझ्या भावनांच काही नाही, पण तिच्या भावना कुस्करल्या जाऊ नयेत म्हणुन अलगद तिच्या आयुष्यातुन बाहेर पडायचय्...!! तिला त्रास होईल्.पण मी फक्त तिच गोष्ट चांगली करु शकतो.. एखाद्याला त्रास देणं!! पण मला त्या आधीच्या दोन मित्रांसारख होऊन नाही जायचं.मी तस वचन दिलय माझ्या मैत्रीणीला..! मी तिला म्हणतो..तु हरवलयस मला.. काहीही माग.. देणार..!! पण ती काहीच नाही मागत.. आज माझी जायची वेळ आली आहे तरीही ती काहीच मागत नाहीए..!! ती गोष्ट तिन मागितल्याशिवाय अन मी ती दिल्यशिवाय कसं काय जाऊ तिच्या आयुष्यातुन..?"
बोलताना तर त्याला अश्रु अडवणं खुपच त्रासदायक होत होतं.अन तो च्या मित्राला हे समजुन चुकलं होतं की आपला मित्र ती मध्ये खुप गुंतला आहे पण त्याला ती चा मित्र म्हणुनच राहयचय्,पण त्याच्या त्या खराब attitude मुळे कदाचित ती ही त्याच्यात तेव्हढीच गुंतली आहे.त्या boyfriend ने त्याला सांभाळल अन खर्‍या मैत्रीत असं अर्ध्यावर एकमेंकाना सोडुन जात नसतात हे त्याला समजावलं. जो पर्यंत तिच्या हातात offer letter येत नाही तोपर्यंत तरी एक खरा मित्र म्हणुन तिच्या पाठीशी उभा राह्, असा सल्ला त्यानं तो ला दिला.तो आपल्या मनातलं बोलल्या मुळे खुपच relax feel करत होता.आजच्या तिच्या त्या आनंदात तो पुन्हा त्याच caliber ने सहभागी होणार होता. ती मात्र या सर्वांपासुन अलिप्त..!! आज कोणीतरी "हो" म्हटलं आपल्याला याचा आनंद तर तिला गगनातसुध्दा मावत नव्हता. संध्याकाळी लगेचच तिचा sms आला.

"काय रे.. तु म्हणतोस ना पुण्यात खुप छान non-veg मिळतं.कुठ मिळतं रे..? यार मला खुप खाऊ वाटलय non-veg..?"

तिचा तो sms पाहुन त्याला आता आपली तारेवरची कसरत सुरु होणार आहे याची कुणकुण लागली. तसं तो ला non-veg फारस आवडायचं नाही,फक्त मित्रांच्या आग्राहा खातर तो त्यांच्याबरोबर non-veg खायचा. दोघांचही पुण्यातल्या non-veg वरुन खुप वाद व्हायचे.तिच्या म्हणण्यानुसार "पुण्यातली लोक फार मिळमिळीत असतात्.त्यांना non-veg करायला जमत नाही. non-veg म्हणजे कोल्हापुर्-सांगली-सातार्‍या कडचं..!! पुण्यात एकाही hotel मधे छान non-veg मिळत नाही." तिच्या या प्रतिक्रियेवर तो मात्र जाम भडकायचा अन "चुकीच्या माणसांबरोबर पुणं बघितल्यावर असा ग्रह होणारच.. कधी सही माणसाबरोबर ज्याला पुण्याची माहीती आहे त्याच्याबरोबर फिर पुण्यात्..!! कळेल तुला कुठं non-veg छान मिळतं..!! " असं म्हणुन आपल्या पुण्याची बाजु safe करायचा अन "तु माझ्याबरोबर कुठं एव्हढं पुणं फिरलीस रे" असा टोमणाच तो तिला मारायचा. पण आज तिनं त्याला indirectly "आपण non-veg खायला कधी जायचं..?" अस विचारलं होतं. तिला तसं नाही म्हणनं म्हणजे तो साठी एक मोठ दिव्यच होतं. त्या sms ला reply म्हणुन त्याने बर्‍याच वेळाने तिला पुण्यातल्या "निंवात, निर्सग,up&above, कोंबडा, कोंबडी ,srushtee,गारवा, garden court, स्वराज गार्डन, गोविंद गार्डन,"अशी १०-१२ नाव sms केली.
ती आज खुप खुष होती. कुणीतरी हो म्हटल्याचा तिला किती आनंद झाला होता.तिचा तो आनंद पाहुन ती च्या पप्पांना तर खुपच गहिवरुन आलं होतं. ती सारं त्याला sms करुन सांगत होती.पण त्यानं पाठवलेल्या hotel च्या लिस्ट वर तिनं त्याला

"मला नुसती नावं नकोयत. मी तुझ्याबरोबरच जाणारेय..!! तु म्हण्तोस ना तुला तुझ्या मित्रांनी non-veg खायला शिकवलय.. तु मी अन +++++ आपण तिघं जाऊयात..? कधी जायचं ते सांग..? i want sea food..!!"
असा त्याला अपेक्षीत reply केला. पण तो तिच्यापासुन दुर जायच्याच प्रयत्नात होता.पण तिनं अजुन त्याच्याकडे काहीच मागितलं नव्हतं. त्यामुळे त्या रात्री खुप विचारांती त्यान तिला एक sms पाठवला.

"काहीही माग्..काहीही म्हणजे काहीही रे..तु फक्त माग रे.. माझ्या एकुलत्या एक मैत्रीणीसाठी मी काहीही देईन.. मी वाट बघतोय्..फक्त मी दुर जायच्या आधी ते माग..!!".
त्या sms मधुन जणु तो काही तिला सांगत होता "आता माझी घटका भरली.. माझ जाणं जवळ आलय..!! फक्त तु मला निघुन जा म्हणायची देरी आहे..!!". अन तिला ही हे सार समजत होतं. पण दोघांनाही एकमेंकाची ,त्यांच्या असण्याचीच काय पण, फक्त नावाची इतकी सवय झाली होती की दोघही दिवसातुन कमीत कमी ५० वेळा अशीच एकमेंकांची नावं घेत होते.पण ती कधीच त्याला निघुन जा असं म्हणनार नव्हती.त्याला अजुन काही दिवस तिच्या आयुष्यात रहावसं वाटत होतं.कारण अजुनही ती पुर्णपणे व्यक्त व्ह्यायला शिकली नव्हती.तिला कुणीतरी समजणारा, आपल मन मो़कळं करणारा सखा हवा होता,अन कोणीच नाही म्हणुन ती त्या कृष्णाला आपला सखा मानत होती. त्याच्या मनातील बोच तिला कुठतरी जाणवत होती.त्याच्या त्या आग्रहामुळे अन घरच्यांच्या सल्ल्यानुसार ती तो job join करणार नव्हती. त्यामुळे आता job शोधण्याची मोहीम पुन्हा सुरु होणार होती. या दरम्यान त्यानं मात्र आपल्या job साठी काहीच हालचाल केली नव्हती.पण आता घरच्यांच्या नकोश्या बोलण्यामुळे अन मित्रांच्या आग्रहामुळे तो ने job शोधायला सुरुवात केली. कारण आता त्याची मैत्रीण बरोबर track वर आली होती. नैराश्य कुठल्या कुठे सोडुन ती आता मोठ्या उमेदीने job शोधत होती. फक्त त्या एका "हो" मुळे..!! तिच्या त्या मनमिळावु स्वभावामुळे तिच्या job साठी तिचे सगळेच मित्र मैत्रीणी देवाकडे प्रार्थना करायचे. तिच्या एका मैत्रीणीने तर तिला job मिळावा म्हणुन मार्गशीर्षातला पहिला गुरुवार तिच्यासाठी करण्याचा मनसुबा रचला होता.
मार्गशिर्षातला तो पहिला गुरुवार..!! कदाचित ते दोघही विसरतील..!! पण त्याचा बप्पा अन महालक्ष्मी हे दोन देवता कधीच विसरणार नाही. त्याला कारणही तसच होतं.त्यान तो मार्गशीर्षातला पहिला गुरुवार आपल्या मैत्रीणींसाठी निरंकार उपवास केला होता.खरतर तिला तो उपवास करण्याची इच्छा होती,पण तो फक्त फळावरच करावा लागणार असल्याने तिच्या आईने तिला तो सहन होणार नाही म्हणुन करु नकोस अस बजावलं होतं.पण आपल्या मैत्रीणीची ही एव्हढीशी इच्छा आपण सहज पुर्ण करु शकतो,अन तिला नाही जमला उपवास करायला तर तिच्यावरचा मी केला तर काय बिघडलं ? फक्त एव्हढ्याच भावनेने त्यानं तो निरंकार उपवास केला होता,दिवसभर काहीही न खाता.पण तो फक्त एव्हढच करुन थांबला नव्हता. गुरुवारची पोथी वाचुन तो चक्क आज स्वताहुन गणपतीच्या मंदीरात गेला होता.ज्यानं आजवर नेहमी "त्याच्या" असण्याला आपल्या खराब attitude च्या जोरावर आव्हान दिलं होतं त्यानं आज स्वताहुन त्याच्या द्वारी एव्हढ्या श्रध्देने जाण म्हणजे काहीतरी अजबच होतं. त्याची ती आपल्या मैत्रीणीसाठी चाललेली धडपड पाहुन तो बप्पा बिचारा सुध्दा वैतागला असणार्.आज एव्हढ्या नम्रतेने इथ आलास तेही फक्त मैत्रीणीसाठी..!! असच काहीस त्या गजाननाला वाटल असणार्.पण त्याला मात्र कशाचीच फिकीर नव्हती .जसं मन वाहावत जाईल अगदी तसच वाहण्याचा घाट त्याच्या आयुष्यरुपी खळखळणार्‍या झर्‍याने घातला होता.देवापुढे नतमस्तक होताना त्यानं काहीस अनपेक्षीत असचं मागितल होतं.

"देवा किती छान मैत्रीण दिलिएस रे मला..!!किती साधी,सरळ आहे रे ती..!! कायम सुखी ठेव तिला..!!माझ्या वाट्याला जेव्हढी म्हणुन तु सुखं दिली असशील ना तेव्हढी सगळी तिला दे..!! बिचारी job मिळवण्यासाठी किती कष्ट करतेय बघतोयस ना..? का छळतोयस तिला..? तुला इतक्या दिवसात इतकं साधही नाही का रे करता आलं. तुझ्याच्याने नाही जमत म्हणुन तर..!! जाऊ दे मी आहे..!! तुला काय वाटतं रे तुझ्याशिवाय तिला job नाही मिळणार्..पण मीही माझं potential आजमावुन बघणारेय्..मिळेलच तिला job तिच्या स्वताच्या हिमंतीवर्..किती कोमेजलीए रे ती..पण सगळ्या जगाला ते पटतच नाही.. बिचारी ते संमजसपणाच ओझं वाहुन थकली आहे रे ती.ह्म्म पण जाऊ दे रे ते सगळं संभाळायला मी आहे..ते मी तुझ्याकडे नाही मागत.. मला दुसरंच काही मागायचय्..बघु जमतय का तुला द्यायला.देवा तुला माहितेय सगळ..!! तिच्यासाठी कुणीतरी तिला समजणार हवय रे तिच्या जवळ..!! मी ती चौकट फक्त त्याचसाठी तोडली रे..पण आता आम्ही दोघं इतक जवळ आलोय की...!! तुला माहितिय की तस काही शक्य नाही. मी तिला आजवर व्यक्त व्ह्याव म्हणुन मी किती प्रयत्न केलेत अन मी त्यात यशस्वीसुध्दा होतोय.पण ती व्यक्त व्हायला लागली अन..!! एकवेळ मी माझ्या भावना आवरेल ही..पण ती जर व्यक्त झाली तर..? plz तिच्या मनात तसं काही येऊ देऊ नकोस्.मला माहितिय माझ्या आयुष्यात पुन्हा काही तरी घडतय,मला जसं हवय अगदी तसं,पण मला ते तसं घडु द्यायचं नाही रे..!! मी तिचा true friend आहे,अन कदाचित तिला जर माझ्याबद्दल वेगळं काही वाटायला लागलं अन ती व्यक्त झाली तर ..!! मला तिच्या 1st hero ला नाही हरवायचं..!! किती जीव आहे तिचा तिच्या पप्पांवर्..!!अन माझ्यामुळे दोघांत निर्माण झालेला दुरावा मला नाही चालणार रे..!! बाकी सगळं माझ्या control मधे आहे रे. मला काय वाटावं यावर तिचा control आहे म्हणुन मी तुला हे मागतोय्..माझ्या मैत्रीणीला जोपर्यंत job मिळत नाही ना तो पर्यंत मी काहीही झालं तरी तिथं थांबणार आहे रे पण या दरम्यान तिच्या मनात माझ्याबद्दल काही वेगळच वाटु देऊ नकोस्. मी फक्त त्रासच देऊ शकतो, पण मला तिला नाही त्रास द्यायचा.तिला माझ्यासारखे किती तरी मित्र आहेत रे..!!! अन तरीही ती फक्त मलाच तिचा true friend म्हणते,इतका जीव नाही कुणी लावला मला.माझ्याकडे फक्त ती एकच आहे रे मला समजणारी,किती भांडलो आजवर पण तरीही आमची मैत्री शाबुत आहे रे तिच्यामुळं..तिला मी कमीत कमी त्रास द्यायचा प्रयत्न करतोय. एव्हढं माझ म्हणन पुर्ण कर..!! बप्पा म्हणशील किती पकवतोयस..!!! बस्सं एव्हढच मागायचं होतं चल अजुन बरीच खैरात तुला वाटायाची असेल नाही का..? पण या सगळ्यात आपलं काम विसरु नकोस चल आता निघतो.ह्म्म येईल परत, माझ्या मैत्रीणीला घेऊन..!!".

त्याचा तो confidence अन खराब attitude पाहुन तो बप्पाही नक्कीच थक्क झाला असणार. तस बप्पाकडे जाताना त्यान तिला कळवल होतच अन येतेस का म्हणुन विचारलही होतं. आज सकाळी बोलताना मात्र तो तिच्याशी थोडा वेगळा वागतोय अस तिला वाटत होतं. तो इतका softly बोलु शकतो हे कदाचित तिलाही पटल नसावं.बोलता बोलता त्यान "मी माझ्या attitude ची intensity थोडी कमी केली आहे म्हणुन तुला माझं वागणं वेगळं वाटतयं" अस तिला सांगितलं. पण "acting" कधी त्याला जमलीच नाही. तिच्या कुठल्याश्या वाक्यावर "time please " म्हणत आपला तो hopeless attitude त्यानं पुन्हा दाखवलाच. अन त्याच ते 'normal' वागणं पाहुन तिला ही बर वाटलं. ती त्याला म्हणाली सुध्दा "अत्ता जे time please मधे बोललास ना dats your true reaction!! फक्त मला attitude दाखावायाचा नाही म्हणुन तु वेगळ> बोलतोस. don't do that. i dnt want any artificial words from you. plz express your true emotions when you talk with me. मग त्या with attitude असल्या तरी चालतील रे..!!"
ह्म्म true emotions..!! जी आपल्या "superb acting" च्या जोरावर आपल्या भावना व्यक्त करीत नव्हती ती त्याला हे सांगत होती. पण त्याच ते artificial वागण हे फक्त मी बाकीच्यांच सारखा तुझा एक मित्र आहे कुणी वेगळा नाही हेच तिला पटवुन देण्याचा प्रयत्न होता. संध्याकाळी पुन्हा त्यानं फोन केल्यावर

"मी आज उपवास धरला ते ही तुझ्यासाठी तुला नाही आवडलं का..? तु माझ्यावर इतका अधिकार गाजवतेस्..अन मला मात्र माझ्या एकुलत्या एक मैत्रीणीसाठी साधा एक उपवास करयला परवानगी नाही मिळत..!! नाही आवडल ना तुला..?"
असच काही तिच्या "कशाला ताप करुन घेतोयस माझ्यासाठी उपवास करुन..!!" या बोलण्याला तो प्रतिउत्तर देत होता. तो चक्क आज स्वताहुन मंदीरात गेला होता. म्हणुअनच तिनं मोठ्या उत्सुकतेने त्याला विचारलं

"काय मागितलस रे बप्पा कडे..?"
"ह्म्म मागितलं काहीतरी..!! वेळ आल्यावर सांगेन..!!"
"ह्म्म वेळ आल्यावर..!! म्हणजे..!! right things at right time..!! सुधारलास रे..!! पण तुला कसं कळणार रे की बरोबर वेळ कुठली ते..? तुच म्हणतो ना मी सगळ्या बरोबर गोष्टी चुकीच्या वेळी करतो..?"
"हो..पण यावेळेस नाही करणार..!! अन तु tension घेऊ नकोस .. मी काही तसं नाही मागितलं..!!"
"तसं..!! म्हणजे..? काय तसं नाही मागितलं..!! सांगायच नाही का..?"
"म्हटलं ना वेळ आल्यावर सांगेन..!!"
"ठीक आहे.. सांग वेळ आल्यावर सांग..!! मला खुप bore होतय रे इथं.. घरी जायचय..!! i want to go home..!!"
"अरे उद्या तुझा interview आहे ना.. तो आटोपुन जा..!!"
"मला खुप आठवण येतेय रे घरची..!!"
"ठीक आहे मग जा उद्या..!!"
"अहा रे हुषार.. उद्या नाही काय जाणार ..!! परवा जाईन मी ..!!"
रात्री १०.३० पर्यंत असे त्यांचे संवाद sms मधुन चालुच रहायचे. दुसर्‍या दिवशी त्यानं सकाळ पेपर मधे संदीप खरे च्या 'आयुष्यावर बोलु काही..' ची जहिरात बघितली. शो दुपारी १२.३० चा होता. त्यानं लगेच तिला घरी न जाण्यासाठी आग्रह केला. पण तिला घरी जायच होतं.कारण मधे दोन सुट्ट्या होत्या शनिवार्-रविवार च्या..!! अन सोमवारी पुन्हा तिचा एका ठिकाणी interview होता. त्यामुळे ती "नको रे मी उद्या थांबले तर मला एकच दिवस घरी थांबायला लागेल्..अन मम्मी मला एका दिवसासाठी नाही थांबवणार..!! चांगले २-३ दिवस थांबवेल्.मग सोमवारी माझा interview बुडेल ना..?"
त्याच्या त्या आग्रहाला तिनं पुरतच बोथट केलं होतं. पण त्याची घाई ही फक्त त्यालाच माहित होती.आपण तिच्या आयुष्यातुन जाण्याआधी तो शो तिच्याबरोबरच पहायचा हा त्याचा हट्ट होता.पण ती ला घरी जाण्याची ओढ होती. दुसर्‍या दिवशी ती तिचा interview आटोपुन घरी जायला निघाली होती.जाण्या आगोदर दोघंही तस बोलले होते.त्याला त्याच्या एका family problem मुळे तिला सोडायला येता आलं नव्हतं. ती कात्रजच्या घाटात असतानाच तो ने तिला एक sms पाठवला.

"TO..देवबप्पा,
CC.. '.......'
काय रे देवा हिला थोडी बुद्धी दे.. 'आयुष्यावर बोलु..' पाहु नये असं वाटत का तुला? का तुला ही वाटतय मी जरा जास्तच अपेक्षा ठेवतोय तिच्याकडुन्..!! मी तिला जास्तच छळतोय..!! देवबप्पा मनापासुन काहीही मागितलं तर मिळत म्हणतात रे..!! येऊ दे ना तिला माझ्याबरोबर 'आयुष्यावर बोलु..' पहायला..!"
ह्म्म त्याचा तो देवबप्पाला पाठवलेला sms तिला थोडा विचित्रच वाटला. पण तिला त्यावर काय reply द्यावा हे सुचलच नाही. त्यान पुन्हा तसाच एक sms पाठवला.

"TO..देवबप्पा,
CC.. '.......'
काय रे देवा माहितीये तु किती busy असतोस ते..? म्हणुनच तर तिला cc त.. ठेवलं होतं..!! पण बघ ना रे ती पण काहीच नाही बोलत..!!
तु तरी सांग रे '.....' तुला नाही का यावसं वाटत माझ्याबरोबर .. तस सांग पुन्हा नाही कधीच विचारणार..!! sms direct देवाला पाठवलाय्..तो साक्षं राहिल..!! plz reply.."
आता reply करण तिला गरजेच वाटलं.

"To:'.......',
subject: Reply from देवबप्पा...
'.....' अनेक आशीर्वाद ..!! काही वेळा काही गोष्टी मनापासुन मागुनही मिळत नाहीत.त्यांची वेळ यावी लागते.आता हेच पहा ना उद्या Abk आहे अन आज माझी '....' घरी चाललिए.यात तिची काय चुक्?इतके दिवस ती इतक्या मनापासुन job साठी प्रयत्न करतेय्,पण मी दिलाय का अजुन तो? तर प्रत्येक गोष्टीची वेळ येऊन द्यावी लागते.आणी तुला असं वाटल की तु तिला जास्त छळतोस का? यातच तुझा होकार आला ना? तु इतकं मनापासुन विचारलस म्हणुन हे उत्तर पाठवतोय. शुभम भवतु..!! तुझा देवबप्पा..!!"
तिचा तो reply पाहुन त्याला मात्र देवबाप्पाच आपल्याशी बोलतोय असं भासत होतं,पण त्या message मधलं
"ती इतक्या मनापासुन job साठी प्रयत्न करतेय्,पण मी दिलाय का अजुन तो?" हे वाक्य त्याला जरा जास्तच लागलं अन मना च्या अगदी अतिउच्च निर्मळतेला जाऊन भिडुन सुद्धा तिचा तो न्युनगंड काही केल्या जात नव्हता याचीच जाणीव त्याला होत होती. अन म्हणुन तर त्याला तिची ती अभेद्य चौकट तोडुन तिला जे जमत नव्हतं ते साध्य करायच होतं.लगेच स्वताला सावरत पुन्हा आपल्या देवबप्पाला त्यानं reply केला.

"To: '....'
cc: '....' बप्पा मी तुला फक्त विचारलं तिला माझ्याबरोबर मनापासुन Abk यावसं वाटतं का? मग जरी ती नाही आली तरी चालेल रे..! बप्पा मला फक्त एव्हढच विचारायच होतं. अन तु एव्हढी मुद्द्याविना प्रस्तावना दिलीस, अगदी माझ्यासारखीच..!! बप्पा तुही मला त्याच नावाने हाक मारत जा ज्या नावाने तुझी '....' मला बोलावते."

त्याचा तो भाबडेपणा पाहुन तिला खरच खुप आश्चर्य वाटत होतं,वरुन इतका रुक्ष वाटणारा इतक सहज कसं वागु शकतो? याचं आता तिला नवल राहिलं नव्हतं. कारण दोघही तसे आता एकमेंकाना चांगलच ओळखत होते. त्याच्या त्या भाबडेपणाला तितक्याच भाबडेपणाने तिने उत्तर पाठवलं त्याचा देवबप्पा म्हणुन ..!!

"To:'.......',
Cc: ......
subject: DAMN...!!
मी तुला त्या नावाने बोलवाव इतकं कुठे तु मला जवळचा मानतोस..? राहता राहिला तिनं तुझ्याबरोबर येण्याचा प्रश्न तर येइल ती तुझ्याबरोबर..! पण तोपर्यंत सारखं विचारुन त्रास दिला नाहीस तरच..!! आणी एक..!! माझं बोलणं समजावुन घ्यावं लागतं,तु समजुन न घेता त्याला प्रस्तावना म्हणालास हे अयोग्य आहे.तिच्याबाबततीतही तु असच वागतोस्.तिला काय म्हणायचय हे तु समजुन घेत नाहीस अन नंतर म्हणतोस 'why don`t you share..?' अन थोडं स्पष्टच बोलतो ABK पाहणं हे तुझं स्वप्न आहे,त्यात तु तिला न विचारता सामाविष्ट केलस इथंपर्यंत ठीक होतं,पण तिनं ते पुर्ण करावं हा तुझा अट्टाहास का?"
हंम्म बप्पा रागवला असं समजुन तो ही जरा जास्तच attitude त्याला दाखवत होता.पण ज्याच्या attitude समोर त्याला त्याचा बप्पा ही काहीच वाटत नव्हता.त्या बप्पाकडुन आलेल्या attitude पुर्ण उत्तराला अगदी तसाच reply त्याने पाठवला.

"To: देवबप्पा,
Cc:'......'
बरोबर म्हणतोस बप्पा तु..!! मी कुठे तुला जवळचा मानतो..? आजवर मी इतक्यावेळा तुझ्याकडे आलोय पण तुच सांग कधी त्यात" भक्ति दिसली का? कधीच नाही ना..? पण मागच्या गुरुवारी दिसली ना? का तुझ्यापेक्षा ती जवळची वाटते मला? तुझं एकवेळ नाही ऐकणार्..!!पण तिनं काहीही सांगु दे..? बप्पा तु काय म्हणाला हेही मला समजतं अन माझी "...." काय म्हणते हेही मला समजतं.तिला नकोय रे माझी जवळीक मला त्रास होईल म्हणुन..!! बप्पा तिला नाही ठेवलस cc त..!! लक्ष्य असु देत रे तिच्यावर..!"
त्याच्या या sms च्या शेवटच्या दोन ओळीवर ती जाम भडकली. पण त्याला ते "जवळीक" कुठल्या अर्थाने म्हणायचय हे तिला कळलच नाही. अन ती एकदम देवबप्पाच्या character मधुन बाहेर आली अन आता "ती" म्हणुन तिनं त्याला reply केला.

"नालायका "तिला नकोय माझी जवळीक" म्हणजे ? कळलं नाही मला तुला काय म्हणायचय ते..!"
पण त्याची जवळीक हे थोड्या वेगळ्या अर्थानेच होती. त्याच्या साठी तिन केलेला reply हा देवबप्पानेच केलाला reply समजुन त्याने आपल्या देवबप्पाला च reply केला.

"To:"....."
Cc: "..."
बप्पा तिला मी माझ्या स्वप्नात न विचारता घेतलं.. तुच सांग आपल्या माणसांना असं विचाराव लागतं? माझा अट्टाहास का म्हणशील तर ऐक.. तिनं माझी सगळी स्वप्न जवळुन पाहिलित रे.माझं हे शेवटच स्वप्न तिनं पुर्ण नाही केलं तरी चालेल...!! मी तिला तु ज्या नावाने बोलवतोस त्या नावाने बोलावणं टाळतो.नाही आवडत मला ते.. अन बप्पा जवळीक म्हणजे emotional involvement.... जाऊ दे तुलाही नाही कळलो मी, फक्त माझी '......' माझी एकुलती एक मैत्रीण च मला समजुन घेऊ शकते मला.."

त्याच ते हक्कान तिला माझी म्हणनं तिला भारावुन टाकत होतं.किती सहज हा मला आपली म्हणतोय अन कधी कधी इतका attitude दाखवुन मला hurt करतो नक्की कुठला "तो" खरा ह्यातच तिचा गोंधळ उडला होता.पण त्याला जमेल तितक्या समजुतीच्या स्वरात समजावता येईल तितक्या आवेषात ती ने त्याचा तो आक्रकपणा झेलत, त्याला पुन्हा त्याचा देवबप्पा म्हणुन reply केला.तिला ही आता त्याच्या सारखं पटकन track बदलण जमायला लागलं होतं.

"To:"....."
Cc:"...."
माझी "......" ह्म्म ... सगळेच कसे रे तुम्ही तिला माझी म्हणता..? अर्थात मीही मानतो..पण मी पण तिचा आहे अगदी तिनं मला "माझा" म्हणावा इतका..!! खुप हळवी आहे रे माझी "....." माझी सखी एकमेव...!! शब्द मनाला खुप लावुन घेते जपुन बोलत जा तिच्याशी .. तुला इतकी चांगली मैत्रीण दिली आहे मी तिला कधीही दुखवु नकोस. तिनं आजपर्यंत तुझ्याकडे फक्त निखळ मैत्रीशिवाय काहीच मागितलेल नाही . शुभम भवतु..!!! तुझा देवबप्पा ....!!!"

ह्म्म त्या शेवटच्या दोन ओळीत त्याला जणु परवा बप्पाकडे मागितलेलं पुर्ण झाल्याचा भासच होत होता.पण तिला माझी म्हणन हे बप्पाला खटकतय हे काही त्याला रुचल नाही असच त्याला वाटलं.

"To: देवबप्पा,
Cc:'......'
ऐक बप्पा तिच्याकडुन तु बोलतोस का तुझ्याकडुन ती.. मला माहीत नाही पण आजपासुन नाही म्हटणार तिला माझी... मी आयुष्यभर तिला माझी निखळ मैत्री दिलीय रे..जर तिला काहीतरी वेगळ वाटत असेल तर ठीक आहे तिनं माझ्यापासुन दुर जायच्या आधी मीच तिच्या पासुन दुर जावं हेच बरं ना? काळजी घे तिची माझी एकुलती एक मैत्रीण म्हणुन्..माझ्या वाटणीची सगळी सुखं तिला दे..माझं आयुष्य तिला दे..पण माझ्यासारखा नालायक मित्र नको देऊस..!! "

त्याच्या त्या बोलण्याची खोच त्यालाच ठाऊक होती. त्याच्या प्रत्येक गोष्टीभवती त्याची ती "third side of coin " नामक philosophy फिरायची. त्याच सारं वागणंच त्या philosophy ला धरुन होत होतं. ४ august 2009 ला त्यानं ठरवलेली ती गोष्ट साध्य करताना कदाचित त्याला त्याची मैत्रीण कायमची गमवावी लागेल याची कल्पना असुनही तो ती ठरवलेली गोष्ट करणार होता फक्त आपल्या एकुलत्या एक मैत्रीणीसाठीं. पण ती मात्र या सर्वांपासुन अलिप्त होती. तसं पाहिलं तर त्यानं मुद्दामच तिला या सर्वांपासुन अलिप्त ठेवायचा प्रयत्न केला होता. ती मात्र आपला मित्र किती बिंधास्त जगतोय्,कधीच कुणाची पर्वा करीत नाही त्यामुळे त्याच्या जवळची माणसं किती hurt होतात असच त्याच्याबद्दल विचार करायची.पण तो बेफिकीर नव्हता..!! पण कधीच दुसर्‍याला जाणवेल इतकी त्याची पर्वा करायचा नाही. काही गोष्टी सांगायच्याच नसतात्,त्या अपोआप कळतात. पण हे सगळ सांभाळताना त्यानं कधीच आपल मन मारलं नाही.ती तारेवरची कसरत तो लीलया पेलत होता. तिला त्याच्या त्या sms ला खुप विचार करुन reply करावा लागला.

"To:"...."
बघितलसं किती लवकर विपर्यास केलास माझ्या बोलण्याचा ? मीच बोलतोय..!! ती फक्त लिहितिये..!! मला म्हणायच होतं, ती आहेच इतकी आपली.. इतकी जवळची... समजुन घेणारी..त्यामुळेच तु तिला तुझी म्हणतोस.. समजलं का? आणी सारखं मी जातो तिच्या आयुष्यातुन असं म्हणत जाऊ नकोस...!! खरा मित्र आहेस ना तिचा? मग?"

तिचा हा reply तिनं पाठवलाय हे मात्र त्यान लगेचच ताडलं.पण तरीही त्यानं देवबप्पालाच sms केला.पण पाठवायचा होता तो तिलाच.तिला cc त न ठेवता.

""To: देवबप्पा,
मी कोण ठरवणार रे..? मी तिचा खरा मित्र का ते? ठरवु दे तिलाच..!! पण तिला job मिळाल्याशिवाय कुठेही जाणार नाही..!! मी फक्त तिच्याकडुन हरलोय्..तुझ्याकडुन नाही.. ज्या दिवशी तिला job मिळेल त्या दिवशी तुझी "....." किती खुष असेल रे. मी का कमी प्रयत्न करतोय तिच्यासाठी? बघ तिला एक दिवस नक्की छान job मिळेल. मी तिला इतका त्रास देतो तर का रे तुझ्या सखीला माझ्या आयुष्यात पाठवलसं..? माझ्यात अजुन लई attitude आहे...!!"

त्याचा तो reply पाहुन तिलाही कुठतरी जाणवलं की हा कुणाची तरी पर्वा करतो. हो तो तिची पर्वा करायचा.पण तिला कधीच दाखवायचा नाही. नेहमीच मला कुणाचीच गरज नाही हा attitude तो तिला मात्र हटकुन दाखवायचा.त्याच्या त्या प्रश्नाला काय बर उत्तर पाठवावं ह्या विचारत तिला त्याच ते बेफिकीरपणाचा अन मला कुणाचीच गरज नाही ह्या attitude मुळे hurt होणारी त्याची आपली माणसं याचाच भास झाला असावा.

"To:"...."
job तर माझ्या "......." मिळणारच आहे चांगला आणी हो मी तिला तुझ्या आयुष्यात पाठवलय ते तु सुधारावसं म्हणुन.....आणी कोणाला looks देतोस रे तु?"

तिचा तो reply पाहुन मात्र त्याला आपली मैत्रीण किती जीव लावते आपल्याला की तिला अस वाटत की मी याला सुधारायला आलेय याच्या आयुष्यात असच तिला वाटत होतं.पण तिचं ते उत्तर तिच्या मनातुन आलेलं होतं. अगदी खरं..!! त्याला सुधरण्यासाठी...!! त्याला समजावयाला "त्याच्या पुढे तु काहीच नाहीस..!!" पण तो इतक्या सहज सुधारण्यातला नव्हता. म्हणुनच तेव्हढ्याच उत्स्फुर्तपणाने तिला त्याचा देवबप्पा म्हणुनच तिला reply केला.

""To:"देवबप्पा.."
हा..हा.. देवबप्पा... तिचं माझ्या life मधे influence आहे, पण तुझ्याही...!! म्हणे कोणाला looks देतोस रे...!!तु म्हणायचं काम नाही. तो फक्त तिचा अधिकार आहे, तुझा नाही. मला सुधारण्यासाठी तिला का रे इतका त्रास दिलास... बप्पा लई येडा आहेस तु.. माझ्यापेक्षाही..अन हो... ती फक्त माझी एकुलती एक मैत्रीण आहे तुझी नाही....!!"

त्यांच्या या अनोख्या संवादात ती केव्हा घरी पोहचली हे तिच तिलाच कळलं नाही. शनिवार - रविवार असे दोन दिवस घरी मस्त enjoy केल्यावर ती पुन्हा पुण्याला आपलं नशीब आजमावयाला आली होती.पण मधल्या दोन दिवसांत दोघांच्या मैत्रीवर संशय घेण्यार्‍यांच्यात आता तिच्या एका college-mate ची ही भर पडली होती.पण हे सगळ घडत होतं ते त्याच्या तिच्याबद्दल असलेल्या possiveness मुळे.पण ती आपल्या मुळच्या संजसपणामुळे सगळंच संभाळुन घेत होती.त्याच्या त्या so called possessiveness चा तिला खुप त्रास होत होता.अन हे सारं त्याला ही जाणवत होतं.आपल्या एकुलत्या एक मैत्रीणीला आपल्या त्या nature चा त्रास होतोय हे त्याला पाहवत नव्हतं. पण तीच त्याची originality होती.ती तो कशी काय बदलु शकत होता.? म्हणुनच आता तो तिच्या पासुन दुर दुर रहायचा प्रयत्न करत होता.पुर्वीसारखे तासातासा ला sms फोन सगळच त्यान आता कमी करायचं ठरवलं होतं.तिला त्याचं हे अचानक बदललेलं वागणं, तिच्याशी तुटकपणाच बोलणं सारच तिला सहन होत नव्हतं.त्याला ती या वागण्याचं कारणही विचारत होती.पण तो तिला सरळ उडवुन लावत होता .आता मात्र तिच्यातही त्याच्यासाठी नकळत एक possessiveness येत होता, तिच्याही नकळत्..!! त्याचं ते अबोल, अलिप्त वागणं तिला खुप खटकत होतं. त्याला बोलतं करण्याचा हर एक प्रयत्न ती करत होती. तिच्या त्या काळजी करण्याला मात्र तो "माझा मी समर्थ आहे..मला कोणाचीच गरज नाही..I dnt need any one..!!" असा आपला hopeless attitude दाखवत तिच्यापासुन जितकं दुर राहता येईल तितका तो राहत होता.अन ती त्याच्या उलट त्याच intensity ने त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती. अन त्याला तेच नको होतं. तिला या दुर राहण्याच कारण सांगण तस त्याला कठीण नव्हतं.पण मुद्दामच त्यान एक sms तिला पाठवला.

"A cute sentence for friendship....
IF NOTHING CAN LAST FOREVER MAY I BE YOUR NOTHING...?"

त्याचा तो sms पाहुन अन मागच्या दोन्-तीन दिवसांतल ते वागणं या सार्‍याचाच तिला खुप त्रास होत होता.त्या sms चा रोख कदाचित तिला कळत होता पण तरीही ती न कळण्याचा आव आणत होती.त्याच्या त्या sms ला तिन reply पाठवला,

"you are not nothing for me... you are my true friend and my friends are more than every thing for me" असा reply करत तिनंही त्याला प्रतिप्रश्न केला. अन त्यानही तिला बिंधास्त reply केला.

"IF NOTHING CAN LAST FOREVER MAY I BE YOUR NOTHING..? yes for me if my friendship last for nothing i`ll be nothing for you....
but you are everything in nothing..!!"

but you are everything in nothing ह्म्म.. या वाक्यामागची त्याची philosophy फक्त त्यालाच कळु शकत होती. पण त्याच्या या प्रतिसादामुळे ती खुपच हळवी झाली अन त्याला reply केला.

"बदलास तु.. असं वाटल मला आज.. you are changed..!!"
"बदल चांगला आहे की वाईट ? देवबप्पा म्हणाला होता "मी" सुधारावं म्हणुन त्यानं तुला माझ्या आयुष्यात पाठवलयं..!! खरचं मी इतका बिघडलो होतो का की तुला यावं लागलं माझ्या आयुष्यात मला सुधारायला? अन आता सुधारलोय का रे मी? तुला का वाटलं मी बदललोय म्हणुन? काय बदलोय मी सांगशील ..?"
त्याचा तो भाबडेपणा तिला कधी कधी मोठ्या पेचात टाकायचा, त्याचे ते भोळसट प्रश्न.!! किती तरी खोली असायची त्या प्रश्नांना..!! पण ती ही तितक्याच purity ने त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायची.

"मला असं का वाटलं? may be तुझ्या बोलण्यावरुन..!! truly speaking आज जेव्हा आपण बोललो तेव्हा मला वाटलं.. you just don't care .. what i think.. what i speak..what i feel may be तु आज जास्त looks दिलेस म्हणुन... मला असं वाटलं की जसं काही तु म्हणतोयस की बस्सं खुप ताप दिलास मला, now its enough मी आहे हा असा आहे..!!"

तिला काय वाटतं याचा त्याला काहीच फरक पडत नव्हता.!! असं आज तिला वाटत होतं,फक्त त्याच्या ते न जाणवु देण्यामुळे..!! पण ते दाखवलं तरी तिला त्रास होत होता अन नाही दाखवलं तरी..!!

"मी फक्त तुला त्रासच देऊ शकतो रे...अन तु काय ताप दिलायस मला? मीच तुला किती ताप दिलाय ? मैत्रीणी हा त्रास बंद करताना मी बदललो तर कुठे बिघडल..? तु नाही रे ताप दिलास मला..!!"

"plz.. dnt change yourself आजचा माझा पुर्ण दिवस याच विचारात गेला. i cant handle change in my friends .coz i cant live without them.सगळ्या गोष्टी कश्या रे तुला सांगाव्या लागतात.i cant express everything.i am expressive पण खुप गोष्टी मी नाही बोलु शकत . you don't need any one..!! fine but I NEED YOU MY FRIEND..!!"

"माझ्यासाठी काहीच impossible नाही.. काहीच नाही.. just b`coz my attitude.. पण म्हणुन मला कुणाचीच गरज नाही असं नाही रे ..."परस्पराविन ना गंत्यंतर्..कितीक हळवे कितीक सुंदर किती शहाणे आपुले अंतर्..मी आहे इथे ... तुला जितका मी हवाय तितकीच तु मला हवीयस...? पण तु सांगितल नाहीस खरच मी इतकं बिघडलो होतो का की तुला यावं लागलं माझ्या life मधे... टाळी एका हातने वाजत नाही.सांगु शकशील मी का आलो तुझ्या आयुष्यात ते..? मैत्रीणी खुप नशीबवान आहे मी तु आलीस माझ्या आयुष्यात्.आता नको म्हणुस कौतुक पुरे...!!"

त्याच्या या प्रश्नाच उत्तर बहुतेक तिच्याकडे नसावं म्हणुनच तिनं आपल्या कृष्णाला हा प्रश्न विचारला.अन तो sms कृष्णाला पाठवताना त्याला cc त ठेवलं. त्याच्याकडुन काय उत्तर येईल या अपेक्षेपायी.

"To:कृष्णा,
cc:"....."
कृष्णा तु म्हणतोस की "......" सुधारावा म्हणुन तु मला त्याच्या आयुष्यात पाठवलं. पण मग त्याला माझ्या आयुष्यात का पाठवलसं.?"

पण त्याला तरी कुठे या प्रश्नाच उत्तर माहीत होतं? पण तिन एव्हढ्या सरलतेने हा प्रश्न विचारला होता की त्याला त्याच उत्तर तिचा कृष्णा म्हणुन देण भागच होतं.

"To: "........"
Cc:"......"
"....." तुला मी नेहमीच तुझ्याबरोबर आहे अस वाटतं ना? हो मी हजोरों अंशानी इथं आहे.त्याला मी तुझ्या आयुष्यात पाठवलय ते तुझा खरा मित्र म्हणुन...!! तुझे अश्रु पुसणारे खुप मित्र मी तुला दिलेत...!! पण तो आहे ते त्या अश्रुंमागची हजारो कारणे शोधायला.तुला जाणीव करुन द्यायला "I CAN MAKE IT HAPPEN..." तुझ्या आयुष्यात तु दोन माणसांना कधीच विसरणार नाही जे दोघं तुला खुप त्रास देतात अन तितकाच जीव लावतात.'तो' त्यातला एक आहे. कार्टं लय अगाऊ आहे, माझं पण नाही ऐकत..!"

खर तर या दोन दिवसातल तिचं वागण त्याच्यासाठी अनपेक्षीत असच होतं. तिचा त्याच्याबद्दल असलेला तो possessiveness च आज दिसुन येत होता. आणी म्हणुनच तो तिला you are copying me असंच डिवचत होता. पण ती मात्र त्याच्यावर जाम भडकली. अन त्याला मी तुला copy नाही करत हे सांगण्यासाठी sms पाठवला.

" मी म्हटलं, I need you my friend कारण मी अशीच आहे. I can`t say 90 % things directly to any one. the rest 10% I speak & people says I am expressive..!! and you thought I am copying you. हेच ओळखल का? "

तिच्या या sms ला त्याने मात्र मुद्दामच reply केला नाही. दिवसभर तो फक्त त्या दोघांच्या बदललेल्या नात्याच अवलोकन एक खरा मित्र म्हणुन करत होता.तो खरा मित्र आपल्या एकुलत्या एक मैत्रीणीसाठी उधळत असलेल्या त्या मैत्रीच्या अत्तरात आता एक वेगळाच गंध मिसळु पाहत होता.पण तो रंग "त्याला" नको होता. आपल्या मैत्रीला चढणारा तो रंग तर प्रत्येक मुलाला हवाहवासा वाटत असतो.पण त्याला मात्र तो नको होता,आपल्या एकुलत्या एक मैत्रीणीला त्याला कधीच दुखवायच नव्हतं.पण ती मात्र त्याच्या त्या अनभिद्ण वागण्यामुळे जास्तच hurt होत होती. शेवटी न रहावुन त्यानं तिला खुप उशीराने sms केला.

"'......' मी तुझ्या आयुष्यात आहे ते फक्त 'ते ९०%' ऐकायला.. i am not interested in that 10%... तुझ्या कृष्णाने मला त्याचसाठी पाठवलय... पण आता वाटतय अजुनही मला ते जमल नाही.. तुझा कृष्णाच काल बोलत होता... अश्रुंमागची हजार कारण शोधायला मी इथे आहे सदैव... मैत्रीणी फक्त तुझ्या साठी..!!"

त्याचा हा reply पाहुन ती खरच भारावुन गेली होती. "मी तुझ्या आयुष्यात आहे ते फक्त 'ते ९०%' ऐकायला.. " ह्या वाक्याने तिला मात्र त्यान पुरतं जिंकल होतं. पण तिचा तो आनंद तिला कसा express करावा हेच तिला समजत नव्हतं. कुणीतरी आहे माझ्या आयुष्यात ते ९०% ऐकायला ही भावना तिला सगळ्या reality पासुन दुर नेत होती.पण त्याच्या या उशीराने आलेल्या reply मुळे तिला त्याचा खरच खुप राग आला होता. किती वाट पहायला लावली होती त्याने तिला.

"' ....'हा reply तु थोड्या आधीही पाठवु शकला असतास..? today you have hurt me a lot..! हा reply तु अगदी लगेच नाही ,पण संध्याकाळी तरी पाठवु शकला असतास?"

तिच ते लटकं रागावणं तो समजु शकत होता.पण त्याला तो reply पाठवताना त्याच्या मनात चाललेले द्वंद शमवताना थोडा वेळ लागणं सहाजिकच होता. ते द्वंद कसलं होतं ह्या पासुन ती मात्र अगदीच दुर. तिच्या त्या लाडिक तक्रारीला मात्र आता लगेच उत्तर देऊ शकत नव्हता,कारण अजुनही त्याला जे साध्य करायच होतं ते काही घडलं नव्हतं.म्हणुन उगीच त्या फाट्याला वेगळीच कलाटणी देण्याच्या प्रयत्नात त्याचं वागणं घडीघडीला बदलायचं.तिच्या या sms ला त्याचा गेलेला reply हेच तर सांगत होता.

"'....' खरचं रे... पण तुच सांग तुला पटलं का मी तुझ्या आयुष्यात आहे ते फक्त त्या ९०% साठी..!! वेडी..!! जितकी वाट तु पाहिली माझ्या sms ची त्यापेक्षा जास्त वाट मी तुझ्या sms ची पाहत होतो....!! ५ वाजल्यापासुन ५० वेळा फोन पाहिला असेन..!!"

त्याचा तो reply पाहुन तिनं मात्र त्याला सावरुन घेत त्या आपल्या 90% च गुढ उकलण्याचा प्रयत्न म्हणुन त्याला पुन्हा sms पाठवला.

"I can`t say 90% म्हणजे ते सगळे माझे problems असतात असं नाही रे..!! बर्‍याचदा त्या खुप चांगल्या गोष्टी असतात, but i am not able to express them.!! आणी ५० वेळा फोन बघुन एकदाही reply करावसा वाटल नाही.लक्षात आलं नाही का मुद्दामच करतोयस असं?"

तिच्या या sms मधे त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्त्तर मात्र काही मिळाल नव्हतं.तो त्या ९०% आहे का नाही? याच उत्तर त्याला ही माहेत होतं पण त्याला ते तिच्याकडुनच ऐकायचं होत. म्हणुनच त्यान तिला विचारलं,

"नाही वाटलं मला reply करावासा..!! मी काय विचारलं होतं..?diplomatic answers नकोयत..!! हो की नाही ते सांग..!!"

ह्म्म तसं आजवर ती त्याच्याशी diplomatic न होता वागण्याचा प्रयत्न करत होती.पण अजुन काही तिला ते जमत नव्हत. अन " मला नाही हे जमत..!! तुला माहिती असुनही तु का असं विचारतोयस की तु माझ्या life मधे त्या ९०% आहेस का? नाही बोलु शकत ही गोष्ट मी तुला?" असा attitude मात्र ती आपल्या मनातच लवपत होती. अन तो त्याला कळु नये म्हणुन त्याच्या त्या भाबड्या प्रश्नाला हवेत उडवत लावत त्याला तु अजुनही मला नाही समजलास, ह्याची जाणीव करुन देण्यासाठी तिनं reply केला.

"diplomatic? go to hell with that? काय हो की नाही? मी मनापासुन बोललेलं एक वाक्य पण तुला diplomatic वाटतं? तर मग त्या ९०% share केलेल्या गोष्टींना तर तु drama च म्हणशील..!!"

ह्म्म drama? किती छान acting जमायची ती ला या ड्राम्यात..!! पण आता तो मात्र तिच्यापासुन दुर रहाण्याचा हर एक प्रयत्न करु लागला. आपल्यात तिची होणारी involvement खुपच intense होतीय. हे त्याला आगोदर फक्त जाणवल होतं, पण आज त्यान ते अनुभवलं होतं. जितक्या लवकर त्याला तिच्या पासुन दुर जाता येईल तितक्या लवकर तो जाणार होता.आपल्या ताकदी पेक्षा आपल्यातल्या कमीपणावर त्याचा जास्त विश्वास असावा बहुतेक? त्याचं ते तुटक पणाच वागणं आता त्यानं जरा गडद केलं होतं. तिला msg /फोन सगळ बंद करायचं ठरवलं होतं. बसं तिला कमीत कमी त्रास देण्याच्या प्रयत्नात स्वताला मात्र कित्तीतरी पटीन त्रासवुन घेत होता. त्याचं वागण मात्र त्याला पटत होतं,अन इतर कोणाला पटावं असा हेका तो मुळीच मिरवायचा नाही ते आपोआपच पटायच्,त्याच्या त्या intensity अन प्रामाणिक प्रयत्ना मुळं..!! ती मात्र त्याच्या या वागण्याचा खुप विचार करत होती. त्याला सारखं हटकत होती. काय झालं? म्हणुन विचारत होती. अचानक बंद झालेल्या फोन/sms च कारण विचारत होती. तिच्या त्या कालच्या शेवटच्या sms चा राग आला का विचारत होती. काय चुकलं माझं की तो असा वागतोय..? मला avoid करतोय. माझ्या असण्याचा त्याला इतका का त्रास होतोय की तो मला, त्याच्या एकुलत्या एक मैत्रीणीला avoid करतोय? एक ना दोन असे कितीसे प्रश्न आज तिनं त्याला विचारले होते, पण त्यानं तिच्या एकाही प्रश्नाला उत्तर नाही दिलं.मुद्दामच..!! पण ते अबोल क्षण त्याला आतुन किती तरी पटीन जाळत होते.त्याचं हे वागन पाहुन तिनं त्याला खुपच emotional sms केला,

"sorry तुला मी त्रास दिला. sorry for all the moment I shared with you. sorry for all the question I asked you. मी इतकी वाईट आहे... जाऊ दे..!! मी तुझ्या life मधे यायलाच नको होतं."

sms च शेवटच वाक्य मात्र त्याला रात्र भर झोपु देत नव्हतं. खरच नसती आली ती त्याच्या life मधे तर..? किती सुखात जगत होता बिचारा..!! एक स्वप्न अपुर्ण राहिल्याचं दुख मनाच्या एका बंदिस्त कोपर्‍यात लपवुन..!! तस त्यानं तिला आपल्या आयुष्यात येण्यापासुन खुप रोखायचा प्रयत्न केला होता. ७ एप्रिल २००८ चा दिवस तर तिला त्याच्या आयुष्यात न येण्याचा निर्वाणीचा इशाराच होता.पण तिन अगदी बेधडक त्याच्या आयुष्यात मुसंडी मारली. त्याचाच त्रास त्याला होत होता. खरा मित्र..!! त्याची व्याख्या मात्र त्याच्यासाठी खुप वेगळी होती. तिला तो म्हणयाचा तु मला ९९.९९% ओळखतेस..!! पण कुठेतरी तो ०.०१% तिला समजायला अवघड जात होतं. कारण तो तिला ते ०.०१% कधीच दाखवणार नव्हता. एक खरा मित्र म्हणुन..!! तिच्या त्या sms ला त्यानं reply नाहीच केला. तिन मात्र अगदीच काकुळतीला येऊन त्याला पुन्हा तोच प्रश्न विचारला,

"मी पाठवलेल्या शेवटच्या sms ला reply नाही केलास? एका शब्दांनही काही नाही बोललास? खरच तुलाही असं वाटत का की मी तुझ्या life मधे यायला नको होतं. plz reply..!! "
ह्म्म.. plz reply..! लोण्याच्या गोळ्याला आगीजवळ नेण्याचा तिचा हा प्रयत्न मात्र यशस्वी झाला,अन लोणी वितळलं...!!

"हो मला असं वाटतं तु माझ्या आयुष्यात यायला नको होतं.. तुला इतका त्रास नसता झाला रे..!!"

"मला नाही झाला काही त्रास. पण मला असं वाटतय कि आता तुला त्रास होतोय, माझ्यामुळे.. may be म्हणुन तु असं behave करतोयस '....' "

तो मात्र खुप गुढ विचारात गढलेला. उगीचच लोक त्याला बेदकार म्हणायचे.पण त्याची प्रत्येक गोष्ट ही फार विचारांती तो करायचा, उदभवणार्‍या सार्‍या परिस्थीतीची जाण ठेऊन..!! त्याच्या त्या अबोला ने मात्र ती ला वाटायचं ती त्याला खुप त्रास देतेय..!! सुमारे अर्ध्या तासाने त्याचा sms तिच्या inbox मधे पडला. मेसेज ची टोन वाजताच मोठ्या उत्सुकतेने तो वाचला.

"'.....' चल ना रे आपण कोथरुडच्या भवानी मातेला जाऊयात..!! तुलाही बरं वाटेल..!!"

पण ती कालच एका मैत्रीणीच्या कामानिमित्त दिवसभर खुप भटकली होती, त्यामुळे तिला थोडा थकवा आला होता,म्हणुन तिनं त्याला एकट्याला जायला सांगितल.अन त्याची मी एकुलती एक मैत्रीण आहे हे त्याला दाखवण्यासाठी मात्र एक काळजीचा सुर लावत "दुपारी ऊन उतरल्यावर जा..!!"असा एक प्रेमळ सल्ला दिला. तो मात्र तिच्याविना आज पुन्हा एकदा त्या देवाकडे चालला होता स्वताहुन.. त्याला पडलेल्या कोड्याच उत्तर त्या भवानी मातेकडे तरी सापडतय का ते बघायला. मंदीराच्या गाभार्‍यात जायच्या आधी मात्र त्याने तिला फोन केला अन तो मंदीरात आहे अन फोन चालु ठेऊनच "मी आत जाणारेय अस तिला सांगत देवीकडे काय मागायचयं ते माग मी फोन चालु ठेवलाय" अस काहीस बडबडत, मंदीराचे सगळे नियम धाब्यावर बसवत आत शिरला अन देवीसमोर नतमस्तक होऊन तिच्याकडे आपल गार्‍हाण मांडु लागला. फोन मात्र तसाच चालु होता. तिनं तिकडुन तिला काय मागायच ते मागितलं. अन तो मात्र त्या देवीला आपल्या भाबड्या प्रश्नान तिचं सारं लक्ष फक्त आपल्यावर केंद्रीत करत होता.

"देवी माझ्या मैत्रीणीला कायम सुख ठेव गं..!! खुप हळवी आहे ती...!!किती जीव लावते ती मला..पण मी मात्र तिला त्रासाशिवाय काहीच नाही देऊ शकत गं.. का मला असं बनवलस...? तिला तिच्या मनात लपलेल ते सार व्यक्त करायच्..पण तुला सगळच माहीतिये..!! ती व्यक्त झाली तर..!! खरं तिचा true friend फक्त ह्याच कारणासाठी तिच्या आयुष्यात आलाय गं.. पण देवी तिच्या आयुष्यात मला तु पाठवायला नको होतस.. पण एकच विनंती आहे.. तिला जे वाटत तेच घडु दे..!! आजवर कधीच तिला तिच्या मनासारख वागता आलं नाही. पण आज माझ्यामुळे तिला मनासारख वागता येईल असा विश्वास आलाय. मी चुकलो अस वाटायला लागलय रे.. तिला तिच्या मनासारख वागु दिलं तर कदाचित तिचे पप्पा हरतील रे.. मी हरलो तरी चालेल.. असं काही तर कर की , मी तिच्या आयुष्यातुन जेव्हा जाईन तेव्हा ती मला कायमची विसरुन जाईल रे..!! पण शेवटी माझं एकच मागण आहे. तिला काय वाटत तेच घडु दे..!!"

तिनं मात्र फक्त "माझ्या true friend '....'ला कायम सुखात ठेव..!! त्याची सगळी स्वप्नं पुर्ण होऊ देत..!!" एव्हढच काय ते मागितलं. पण आज तिला मात्र माझा मित्र मला बरं वाटाव म्हणुन देवीच्या मंदीरात गेला, अन मला शक्य नाही म्हणुन फोनवरुन तिचं दर्शन घडवलं.. म्हटलं तर तो काहीही करु शकतो. घरबसल्या देवी दर्शन..!! असं म्हणुन माझ्याकडे असा मित्र आहे म्हणुन त्या परमेश्वराचे अभारच मनत होती. अन तिनं मागितलेलं तिला मिळणार याचा तिला खुप विश्वास होता. कारण मनापासुन wish केलेली कोणतीही गोष्ट मिळतेच हे तर तिला तिच्या true friend ने च तर शिकवलं होतं. या नंतर मात्र तो तिला तिच्या आयुष्यात ज्या कारणासाठी आला होता, ते मला जमत नाहीये, अन नाही जमलं म्हणुन काय होतं खुप गोष्टी नाही होत जश्या आपल्याला हव्या तश्या..!!नाही जमलं ते ..!!"मला वाटायच मी तुझ्या आयुष्यात आहे ते फक्त ते ९०% ऐकण्यासाठीच..!! पण नाही जमलं रे ते..!! मी समजावीन तुझ्या कृष्णाला.. नाही जमत काही गोष्टी आपल्याला..!!" अस तिला समजावत तो तिला फक्त एव्हढच सांगायचा प्रयत्न करत होता की माझी लायकी तुझं ते ९०%share करण्या इतपत नाही. तिला मात्र त्याचं ते बोलण फार खटकत होतं. ती आजवर त्याच्याशी ते ९०% च share करत होती.पण आज त्याला अस वाटत होतं की नाही मला ते जमत नाही. ज्याच्याकडे फक्त i`ll make it happen हा एव्हढाच attitude होता, त्याला आज ही गोष्ट जमत नव्हती. अशक्य ही गोष्टच त्याच्यासाठी अशक्य होती. पण खर तर तो मुद्दामच ते ९०% समजत असुनही न समजल्याचा आव आणीत होता.अन तिला नको करुस इतका विचार माझा म्हणुन स्वतापासुन जितकं दुर ठेवता येईल तितका ठेवायचा प्रयत्न करीत होता. अन ती मात्र त्याला म्हणत होती

"' ....' i always share with you dear friend ... thanx you are here. पण काल मला खरच खुप वाईट वाटलं. तु माझा इतका चांगला मित्र आहेस मग मी तुझा विचार का नाही करणार..!! अन तु काय समजावशील ? अन काय नाही जमत.?"

तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडे होती.पण वेळ आल्यावरच ती उत्तरे तिला तो देणार होता. तुर्तास त्यानं दोघांच्याही मनाची फरफरट चालुच ठेवली होती.ती मात्र अजुनही त्याच्या या वागण्याचा अर्थ शोधत होती,पण तो मात्र् त्याच्या वागण्याचा थांगपत्ता लागु देत नव्हता. तिच्यापासुन लांब जाण्याच्या गोष्टी करताना तो तिच्यासाठी job opportunities सुद्धा पाहत होता.अन तिला तसं inform पण करत होता. पण त्याचं ते वागणं तिला खुपच formal वाटत होतं.त्याचे तिला job साठी येणारे sms आता take care बरोबरच यायचे. त्याला कंटाळुन शेवटी तिने त्याला निर्वाणीचा इशारा देत sms केला,

"'...' आता जर तु नीट नाही वागलास तर बघ...!!!! यापुढे जर formal वागलास तर... लय म्हणजे लय वाईट होईल. आणी या message ला धमकी (च) समज."
पण त्याच वागण काही बदलत नव्हतं.तिच्या रोज येणार्‍या sms ला तो ज्या intensity ने reply करायचा ती कुठतरी हरवली होती.अन त्याचा तिला त्रास होत होता.तिचे त्याला असे किती तरी sms येत होते.

"'...' काय झालय? you feel good when I get hurt, ना? का असं वागतोयस'...' आपल्या मैत्रीवर विश्वास नाही का? तुला तुझी मैत्रीण नकोशी झालीये का? plz reply..!".

तो मात्र जाणुन बुजुन तिच्या त्या sms कडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होता. पण तो प्रयत्न किती पोकळ होता हे त्याला ही माहीत होतं. तिच्या त्या sms ला उत्तर तर त्यानं पाठवलच पण तो reply त्यानं तसा का पाठवलाय हेच त्याला माहिती नव्हतं."असं काही नाही रे .. तुला काहीही वाटु शकतं..!! रुममधे एकटी आहेस ना..? जास्त विचार करु नकोस. मी तुझा खरा मित्र आहे.. हे आठवण करुन द्यायची गरज नाही. i am always with you. sms केला नाही म्हणुन एव्हढं upset काय व्हाययचं.... मैत्रीणी मी तुझ्याबरोबर कायम असणार आहे.. तुझ्या कृष्णासारखा... don't worry..!!" तिच्या कृष्णासारखा...!! त्याच्या प्रत्येक शब्दाला खरच खुप वजन असायचं , पण त्याच्या त्या I `ll make it happen attitude मुळे तो जे काही बोलतोय ते फक्त एक attitude म्हणुनच बोलतोय असच तिला वाटायचं. पण तो ही शब्द खुप जपुन वापरत होता.

"'...' रुममधे एकट असण्याचा आणी विचाराचा काय संबध? तो मी नेहमीच करते. छोट्या छोट्या गोष्टींचाही. sms न करण्यावरुन नाही बोलत तुला. तुझं बोलणं, तुझी sms ची language खुप वेगळी वाटतेय गेले काही दिवस. आणी मला काहीही वाटत नाहीए o.k., इतकं तरी मी तुला ओळखते की तुझ्या वागण्यातला बदल कळावा..!!"

"वागण्यात काहीच बदल नाही.. तोच वाईट attitude आज ही आहे.. कायम राहिल..!! फक्त थोडी intensity कमी झालिए..(केलीए).. बाकी काही नाही..!!"

"तु तुझा attitude कमी केलास की नाही I dnt know '...' . तु अस वागतोयस जस की माझ्याशी जास्त बोलायचं नाही .. अळवावरच्या पाण्यासारख रहायचं..!!".

तिचा तो sms पाहुन तो तिच्यासाठी जे म्हणायचा की मला समजणारी तु एकमेव आहेस.. एकमेव..!! हेच वाक्य त्याला आठवलं. किती ओळखायची ती त्याला. त्याच ते अळवावरच्या पाण्यासारखा वागणं मात्र त्याच्या third side चाच एक भाग होता एव्हढं मात्र तिला कळत नव्हतं.तिच्या एकाही sms ला तिला अपेक्षीत असा एकही reply तो करत नव्हता.तिच मात्र त्याला sms मधुन विनवणं चालुच होतं.अन तो मात्र माझं आत्ताच वागणं हे तुला कमी त्रास व्हावं म्हणुन आहे, हेच तिल सांगत होता.

"मला त्रास तुझ्या आत्त्ताच्या वागण्याचा होतोय्.तुझ्या आधीच्या वागण्याचा मला नव्हता त्रास होत. please असं नको रे वागुस..!!are you judging my patience.? ठीक आहे तुला ही असच वागायचय का माझ्याशी..? आता मीही तुला त्रास देणार नाही. मला काहीही वाटु शकतं..? त्याचा तुला ताप का? आता इथुन पुढ मला तुझ्यामुळे बदलाव लागेल. if you will be happy with this then it`s fine. I can do that happily for my TRUE FRIEND..!!"

तिच्या प्रत्येक विनवणीला तो मात्र अगदी सहज धुडकावत होता.

"वेडी आहेस "...." काय बदलोय मी? आधीही त्रास द्यायचो... अन आत्ताही तेच करतोय्..!!मी फक्त त्रास देऊ शकतो तुला.अन तु का बदलतेस स्वताला ? मैत्रीणी plz रे मी माझी intensity फक्त १०% ने कमी केलिए , माझ्या एकुलत्या एक मैत्रीणीला कमीत कमी त्रास व्हावा म्हणुन..!! मी कधीच नाही बदलणार तुझ्यासाठी...!!"

पण त्याच्या कुठल्याच उत्तराने तिच समाधान होत नव्हतं. त्याच ते अळवारच्या पाण्यासारख वागणं सतत तिला बोचत होतं. तिचं ते बिथरणं त्याला ही पाहवत नव्हतं.पण तो हे सार जाणीवपुर्वक करीत होता.तिला जितकं आपल्यापासुन दुर ठेवत तिच्या जवळ जाता येइल तितका प्रयत्न तो करत होता. त्यानं गृहित धरलेल्या काही गोष्टी घडु नयेत म्हणुन तो तिच्याशी इतका तुटक वागत होता.पण ती ही तितक्याच सहजतेने त्याला दुर रहाण्यापासुन रोखत होती.तो मात्र तिच्यापासुन दुर राहण्यासाठी तिला

"अरे तुला कितिदा सांगायच नाही बदलो मी..!! फक्त ती intensity कमी झालिए रे..!! अन आता तरीही तुला पटत नसेल तर जा मर तिकडं. लय ताप दिलायस तु मला.कितीवेळा सांगायच तुला." असच काहीस तुटकपणे बोलत होता.

त्याच ते 'जा मर तिकडं' हे वाक्य मात्र तिला खुपच लागलं. "मी मरावं असच वाटत ना तुला" अस म्हणत पुन्हा ती त्याच दुर जाण रोखत होती. अन तो ही लगेच तिला बरं वाटाव म्हणुन "तुझी शप्पथ रे नाही बदललो मी..अन कधीच नाही बदलणार माझ्या एकुलत्या एक मैत्रीणीसाठी..!!" असं म्हणत तिला "मी आहे तुझा true friend " म्हणुन धीर देत होता.पण त्याच वेळीस "मी किती स्वार्थी आहे हे तुला माहीत नाही, खुप वाईट आहे मी.. खराब..!! तुला ते वेगळ संगायची गरज नाही. का लावतेस तु मला एव्हढा जीव..? नको लावुस..?" असं म्हणत तिला तितकच दुर ढकलु पाहत होता.तो तिला त्याच्या वाईट बाजुच आज मुद्दाम दाखवत होता. किती सामान्य आहे मी.. का एव्हढ महत्व देतेस मला..? म्हणुन तिला कोड्यात टाकत होता. माझ्या तुझ्याबरोबर होण्यार्‍या संवादामुळे हल्ली मी बिघडलोय असच लोकांना म्हणजे माझ्या मित्रांना वाटतय, असं म्हणत आपल्या hopeless वागण्याच समर्थण तो करीत होता. पण तिला मात्र तिच्या आयुष्यात तो खुप महत्वाचा वाटत होता. त्यानं त्याच कारण विचरताच तिनही त्याच्याच intensity ने त्याला उत्तर दिलं

"you are so much important in my life '.......' पहिली गोष्ट मी तुझ्याकडुन शिकली म्हणजे तो good leader अन successful leader मधला फरक्..!!एखादी गोष्ट ठरवली की ती काहीही करुन करायचीच हा attitude, तुच शिकवलास मला. आणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, एकदा कोणाला मित्र मैत्रीण मानलं की किती max limit पर्यंत त्यांची care करु शकतो याचं perfect example आहेस तु..!! जेव्हांही मला त्रास झालाय.. you were there.. you care.. I treasure your friendship'...'"

तिच ते उत्तर मात्र त्याला फारच अंतर्मुख करुन गेलं. किती सहजतेने ती त्याची प्रत्येक गोष्ट आत्मसात करायची अन किती प्रामाणीकपणे 'हो ही गोष्ट मी तुझ्याकडुनच शिकले, अन तुला सगळच कसं रे सांगाव लागतं' असं म्हणायची. ती मात्र त्याला त्याच्या बिघडण्याविषयी समजावीत होती.

"'....' मी थोडा विचार केला, आणी मला पटलं तुझ्या मित्रांना असं वाटणं स्वाभाविकच आहे की तु बिघडलायस्...!!बघ ना आधी तु किती वेगळा होतास, DON type होतास (आताही आहेस..!!!) पण त्यांना हे पचवायला थोडा ताप होत असेल की तु एका पोरी शी इतकं soft वागु शकतोस्..!!थोडक्यात तु बिघडत चाललायस..!! sorry रे '....' मी तुझ्या life मधे permission न घेता आले, I braked that boundary around you."

आता मात्र त्याला खरच तिन तोडल होतं. त्याचा प्रत्येक प्रयत्न तिन अक्षरशः माती मोल केला होता. कसं जमतं हिला मला handle करणं..? म्हणुन तो आणखीनच चकीत होत होता.खरच संवादाच्या पुढचाही संवाद आता दोघांमधे विना शब्द विनासायास अगदी सहज सुरु झाला होता.एकमेंकाच्या मौनातही आता एकमेंकांच अस्तित्व दोघांनाही जाणावयला लागलं होतं. ती आता व्यक्त व्हायला लागली होती अगदी निर्भीड पणे..!! पण तिच्या त्या शेवटच्या sms ला त्यानही अनोखा reply धाडला. त्या शेवटच्या ओळीसाठी. त्याच्या भवतीच्या त्या चौकट तोडण्याच्या तिच्या माफी मागण्यासाठी..!!

"ह्म्म.... चिमटा काढायचा अन दुखलं का विचारायचं..!! अरे काय'......' काय रे.. जाऊ दे..तुला सगळच सांगायला पाहिजे..? म्हणजे..?"

"चिमटा काढयायचा अन दुखलं का विचारायच... म्हणजे..?
काय जाऊ दे..? काय सगळच? म्हणजे? " तिचा पुन्हा तिला प्रतिप्रश्न.

"म्हणजे ... म्हणजे वाघाचे पंजे..? अरे मी विचारल कुठल्या गोष्टी न सांगताच कळल्या पाहिजेत..?"

"कुठल्या गोष्टी न सांगताच कळल्या पाहिजेत..? कुठल्या पण..the perfect definition of understandin is to understand without conversation म्हणजे मला असं वाटतं हां..!!"

"तुला काहीही वाटु शकतं..!! असं असत तर माणसान भाषा कशाला निर्मिली असती..? माणसाने आहे त्याचा पुरेपुर उपयोग करुन घ्यावा.... पण तुला काहीही वाटु शकत..!!"
"ह्म्म हे मी खुप जणांकडुन ऐकलय. सगळे म्हणे तु जर बोलली नाहीस तर समोरच्यांना कळणार कसं? I said असं नाही पाहिजे यार, कुणालाच कस नाही कळणार?"

"'.....' कधी कधी अंदाज चुकतात रे.. म्हणुन काही गोष्टी बोललेल्याच चांगल्या असतात.. जरी समोरच्याला न बोलता समजल्या तरी..."

"ते जाऊ दे रे..पन मघाशी तु अस का म्हणालास चिमटा अन something जरा जास्तच स्पष्टच बोलले का मी..पण '....' i can be that much frank with you only my friend."

"नाही रे..'....' मला ते आठवल . मी तुझ्या hostel वरुन परत येत होतो तेव्हा तु मला म्हणाली होतीस तो 'ती फुलराणी' मधला dialogue आठवला.. मला बदलण्याचा हक्क फक्त तुला आहे खुद्द मला ही नाही रे.. हे मला आठवत होतं..!!"

"अरे तो dialogue चिमटा गमतींत काढला तरी दुखायच थोडीच थांबतो..!! असा आहे. अरे मी आता RHTDM मधलं 'दिल को तुमसे..' गाणं ऐकतेय.. दुपारी पोरींबरोबर या movie वरुन बोलत होते, यात सैफ allows her to go with maddy, that's why they met..!! "

"ह्म्म अन maddy न एव्हढी मेहनत केली ते काहीच नाही का रे..!! remember mechiets don`t need anyone..!! कळलं का?"

"don`t need any one? मग त्याला इतका त्रास होतो जेव्हा दिया मिर्झा सैफ बरोबर जाणार असते तेव्हा? don`t need any one.!!"

"डोळे झाकुन तिला कोण दिसतो रे..? maddy च ना? मग सैफ बरोबर ती तिच्या मनाविरुद्ध जाणार असते ना.. म्हणुन त्याला वाईट वाटत असतं. तो राज ला म्हणतो 'तुझे तो कोइ और भी मिल जाये गी..! फिर जिया क्युं..? अन तो त्याला सोडुन देतो.. Ive seen this movie at least for 25 times.. one of my favorite movie..!!"

"एकदम लाखातली गोष्ट बोललास मित्रा. the most important thing is what she wants? कुछ कुछ होता है मधे सुद्धा at the end तेच होत जे काजोल हव असतं."

"च्यायला..!! सगळ्याच love story मधे तिला काय वाट्त हेच महत्वाचं अन तो...? "

"अरे by nature she is emotional, so she takes time for such heart decisions. त्याच काय रे ? त्याच्यासाठी गोष्टी इतक्या complicated नसतात."

"हो म्हणुनच 'तु जाने ना..'
'तुम से ही ..'
'तुने जो ना कहा..' अशी गाणी लिहिली जातात..!!"

"ह्म्म काय तु जाने ना..!! पोरं येडी असतात..!!"

हम्म रात्रभर दोघांमधे असा काही संवाद रंगला होता की त्या संवादामधे दोघांचा डोळा कधी लागला हे कळलंच नाही. तिला मात्र माझा एकमेव true friend पुन्हा पहिल्यासारखाच वागतोय म्हणुन खुप छान वाटत होतं.दुसर्‍या दिवशी सकाळी मात्र तिचा एक sms त्याच्या inbox मधे पाहुन तो जरा चकीतच झाला.

"'....' one complement for you माझी मैत्रीण म्हणाली, मी तुझ्याबद्दल जे काही बोलते त्यावरुन 'तु' म्हटलं की तिच्या डोळ्यासमोर RHTDM चा MADDY उभा राहतो."
तिच्या या sms ला मात्र त्यान "अरे तो picture मधला खोटा आहे, पण मी काय आहे तुला माहीतीये..!! picture मधला MADDY सुध्दा माझ्यापुढे कमी पडेल. आणी एक you know very well मला तुझ्या comment शिवाय इतरांच्या comment चा काहीच फरक पडत नाही..!!" असा आपला रोजचा खराब attitude दाखवला. पण आज तिनं indirectly त्याच comparison फिल्मी लाईफ मधल्या हीरो शी केलेलं त्याला आवडलं नाही. खरतर त्याची प्रत्येक गोष्ट ती एका माणसांशी compare करायची त्याच्याही नकळत. असं तिला वाटायचं, पण तो सर्वद्ण होता.मुद्दामच काही गोष्टी तिला जाणवु द्यायचा नाही. आज तिचे बरेच sms येत होते, पण त्याला काही वेगळच वाटत होतं. ती त्याला एका movie ला घेऊन जाण्यासाठी request करत होती.पण तो मात्र तिच्यापासुन लांब रहायच म्हणुन तिला टाळत होता. पण शेवटी त्याची मैत्रीण म्हणुन तिच्यातही त्याचा थोडा attitude आला होताच की,पण थोडाच..!!

"'....' अजब प्रेम की गजब कहाणी...!! 1st movie that I had seen with you..!! आत्ता एकदम click झालं मला. चल आपण उद्या पा बघायला जाऊयात...!! तु ,मी अन '+++++'"

तिच्या त्या request ला त्यानं मात्र सरळ उडवुन लावलं.पण तिला मात्र वाटत होतं याला बहुतेक job च tension असेल, म्हणुन तो असा वागतोय. त्याचा mood change करावा याचाच प्रयत्न ती करत होती. तसं त्याला खरच job च tension होतं पण त्यच्या नाही तर तिच्या. तिचा result लागुन आता तब्बल ५ महिने झाले होते, अन त्याला job सोडुन ४-साडे-४ महिने..! पण तिला मात्र वेगळच काहीतरी वाटत होतं.पण तो मात्र "मला कुणाचीच गरज नाही.." या आपल्या hopeless attitude ने तिला दुर ठेवत होता.
पण तिनं तरीही त्याला पुन्हा विचारलचं.

"'....' मी तुला पा बघायला चल म्हटल coz तुला थोडं छान वाटेल अन its nice to spent time with friends.. I like to spent time with my friends.. being with friends can change mood.. म्हणुन म्हटलं होतं. Its just the way to be together... dnt you like to spent time with ME &'+++++' I just love to spend time with my friends.. dnt you?"

तिचं या msg मागच intention त्याला कळत होतं. "Its just the way to be together." किती सह्ज म्हणुन गेली होती ती हे वाक्य..!! पण हे वाक्य व्यक्त करताना तिनं हजारदा विचार केला असेल..!! जो तिला इतके दिवस हेच समजावायचा प्रयत्न करत होता तेच ती आज त्याला समजावत होती. अन तो मात्र आपल्या वाईट attitude ला तो का आहे म्हणुन कोसत होता. ४ august ला ठरवल्या गोष्टीची न घडणारी बाजु आज तो घडताना पाहत होता. तिचं त्याच्यात गुंतण तो अनुभवत होता.पण त्याला ते नको होतं.ती चौ़कट तोडण्याचा त्याचा हा उद्देश मुळीच नव्हता.पण कितीही केलं तरी तो माणुस होता. समोरच्याच्याला आपल्याला हवं तसं वागवण्याच्या त्या कसबाला तो आता कोसत होता.अन त्यामुळेच तो तिच्याशी इतकं तुटक वागत होता.बोलता बोलता तिला हेटाळत होता. "जा मर तिकडं..!! का छळतेस..? अरे कितीदा सांगायचं.. मला नाही कुणाची गरज..!!" असंच तो तिच्या त्या intensity युक्त वागण्याला उडवुन देत होता. पण ती मात्र त्याच्या ह्या वागण्याने खुपच hurt होत होती. मी मरावं असं त्याला वाटतं याचं तिला खुप वाईट वाटत होतं. तिला रहावलं म्हणुन तिनं तिला जे फोन वरुन बोलता आलं नाही ते sms करुन त्याला कळवलं.

"अजुन काय ताप देऊ तुला? already मी तुला इतका ताप दिलाय की मी मरावं असं तुला वाटतं तुला. म्हणुनच काल माझी शप्पथ खाल्लीस अन सुटली पण नाही म्हटलास..!! कारण खोटी शप्पथ घेतली की ज्याची शप्पथ घेतलिये तो माणुस मरतो.. कृष्णाला वाटलं तर तुला तीही good news ऐकायला मिळेल."

आता मात्र तिचं ते हळवं मन त्याच्यापुढे पुरतं नमलं होतं. तिचे ते बालिशपणाचे sms त्याला मात्र खुप विचार करायला लावत होते. आपलं ह़ळवंपण तो तिच्यापुढे फक्त एका कारणासाठी व्यक्त करायचा.फक्त तिला थोडी security feel व्हावी, की या जगात इतकी हळवी असणारी माणसं ही त्याच intensity ने जगतात अन त्यांना हवं ते ही मिळवतात जितक की ती कठोर माणसं मिळवु शकतात. अन तिलाही आता जवळ्पास त्याचा हळवेपणा अन त्याची ती अजोड intensity यांच बेमालुम mixture जाणवलं होतं.त्यानं तिच्यात जवळ्पास आपला सगळाच attitude भिनवला होता.पण गेल्या काही दिवसापासुन त्यानं त्याचं ते हळवं रुप तिच्यापासुन लपविण्याचा केलेला प्रत्येक प्रयत्न तिला त्याच्या आणखीणच जवळ नेत होता. त्याला करायच होतं एक अन घडत होतं भलतचं..!! म्हणुनच तर तो असा विचित्र वागत होता. तिच्या त्या sms ला त्यानं मात्र जरा थोडसं नमतं घेत reply केला.

"ह्याट तुला कधीच मला त्रास द्यायला जमणार नाही.!!म्हणुनच एव्हढ्या confidently तुझी शप्पथ खाल्ली ना..!? तुला कधीच नाही जमणार ते..!! फक्त मीच त्रास देऊ शकतो..!!"

"त्रास..? मी तो msg तुला त्रास देण्यासाठी नव्हता पाठवला. मला जे मनापासुन वाटल ते लिहिल होत त्यात मी. माझ्या मित्राला मी इतका त्रास देते की त्यानं माझ्या मरणाची इच्छा करावी? वाईट वाटल मला.. म्हणुन पाठवला होता तो msg..!!"

"ह्म्म तुला काहीही वाटु शकतं..!! मग असं वाटल त्यात काय नवल..? अन तुझ्याकडं माझ्यासारखा मित्र असे पर्यंत नाही मरणार तु..? मी आहे ना..!!"

"तुझ्या सारखा मित्र असेपर्यंत ..? पण तुलाच असं वाटत ना..?"

त्याचं ते बोलणं तिनं खुपच मनाला लावुन घेतलं होतं.पण आपल्या मित्राला कसं वठणीवर आणायचं हे तिला आता खुपच छान जमत होतं. इतके आढे वेढे घेत शेवटी तो तिच्याबरोबर movie पहायला तयार झाला. दुसर्‍या दिवशी एका class च्या inquiry साठी ती अन त्या दोघांचा तो common friend कोथरुडला आले होते. class ची inquiry करुन झाल्यावर तिनं तो ला कोथरुडला बोलावुन घेतलं.पण अजुनही तिच्या मनाचं समाधान होतं नव्हतं. आपल्या एकुलत्या एक TRUE FRIEND ने आपल्या मरणाची इच्छा करावी..? हा विचार तिला खुपच छळत होता. पण तो मात्र आपला तो hopeless attitude तिळमात्र ही कमी करीत नव्हता. फक्त तिला आपल्या पासुन दुर ठेवता यावं म्हणुन..!! पण तिच्या मनात मात्र एकच भावना होती.

"गम की राते देनेवाले ही सुबाह की उजालों की बातैं करतें हैं.... जिनके वजाह से जिंदा हैं हम वो हि हमारी मौत के ख्वाईश करते हैं...!!"

किती वेडी होती ती..!! छोट्या छोट्या गोष्टींचाही किती विचार करायची..!! पण त्यानं मात्र जाणुन बुजुन तिच्या या भावनेला उत्तर देणं टाळलं. अजुन ती वेळ काही आली नव्हती. योग्य वेळ....!! तिच्या सगळ्या अबोल अन अनुत्तरीत प्रश्नांची जे कधी तिला तो ला विचारायला जमलच नसते अश्या सर्ब प्रश्नांची त्याला माहीत असलेली उत्तरे तो तिला देणार होता पण योग्य वेळ आल्यावरच..!! तुर्तास स्वताचंही मन तो तसचं जळवत होता. तिघांनीही movie पाहिल्यावर थोडावेळ एकमेंकाबरोबर घलविण्याचाच घाट घातला होता. तीन सुशिक्षीत बेरोजगार..!! दोघे recession चे बळी..!! अन तिसरा मात्र फक्त आपल्या I WILL MAKE IT HAPPEN या ATTITUDE चा!! तिच्या चेहर्‍यावरचे आजचे ते भाव तो बराच निरखुन पाहत होता. अगदी तिच्या अंतरंगात डोकावुन तो तिला काय वाटतय हेच जणु अनुभवत होता.पण फक्त तिला ते बोलुन दाखवत नव्हता. चौकटीची अगदी शेवटची कडी आता जवळ्पास तुटल्यातच जमा होताना तो बघत होता.अन तिला मात्र मी इतका जीव लावुनही हा माझ्या मरणाची इच्छा कशी काय करतोय..? मला दगड म्हणनारा आज इतका दगड कसा काय झालाय..? म्हणुन या प्रश्नांची उत्तरे तिचा त्या खुपच expressive चेहर्‍याद्वारे त्याला विचारत होती. अन त्याला उगीच खिजवायचं म्हणुन

"माझ्या कृष्णाला असं वाटतं की कुणीच माझ्या आयुष्यात कायम राहु नये...!! तो कुणालाच माझ्या आयुष्यात कायम ठेवत नाही. त्याला वाटतं की मी नेहमी फक्त त्याच्याकडेच जावं..!!"

तिचं हे बोलण त्यानं खुप मनावर घेतलं होतं." आजवर मी इतका प्रयत्न करतोय,,!! पण तिला का असं वाटतं की कोणीच मला समजावुन घेत नाही. कसं होणार हिचं. तिला वाटतं तिला समजुन घेणं फक्त त्या कृष्णाचच काम आहे.माझा attitude ही आता कमी पडायला लागलाय की काय? पण नाही माझ्या इतकं potential कुणाच्यातही नाही, खुद्द तिच्या कृष्णातही नाही. मी जे ठरवलय ते मी करणारच..!! माझ्या मैत्रीणीचा true friend म्हणुन नाही तर माझा attitude potential अन ती भेदक intensity या सार्‍यांच अस्तित्व पणास लागलय म्हणुन?" त्याच्या मनातला हा विचार मात्र तो तिला बोलुन दाखवत नव्हता. त्याला वाटायच एक दिवस तिला स्वताहुन वाटेल की मीच फक्त तिला समजवुन घेऊ शकतो...!! तिच्या आयुष्यात मी तिला समजणारा एकमेव असेन..!! त्याची ती intensity खुद्द त्यालाही दाद लागुन द्यायची नाही.म्हणुनच तर ती त्याला म्हणायची "एखादी गोष्ट ठरवली की ती काहीही करुन करायचीच हा attitude, तुच शिकवलास मला."ह्म्म पण त्याला मात्र ती दुर जाण्याची गोष्ट सहन करण्यासाठी हवी असणारी सहनशीलता जमवायचा त्याचा प्रयत्न तिला, तो तिला AVOID करतोय याचाच feel देऊन जात होता.खरतर तिनं आपला मित्र आता घडवायला सुरुवात केली होती, तिला जसा हवा अगदी तसा. स्वताचं अस्तित्व हरविण्याच्या तयारीतच जणु तो स्वताला ढकलत होता. तिला तिच्या त्या वरच्या वाक्यावर अगदी तटस्थ उत्तर देत त्यानं आपली बाजु safe करुन घेतली.

"असं तुला वाटतं.. तुझ्या कृष्णाने काहीतरी ठरवुनच तुझ्या मित्रमैत्रीणींना तुझ्या आयुष्यात पाठवलय असं तुला वाटत ना? मग त्यांनी तुझ्या आयुष्यात कायम रहायचं की नाही हे ठरवायचा हक्क फक्त तुलाच आहे.. तुच जाऊन देतेस तुझ्या आपल्या माणसांना आपल्या पासुन दुर..!! तो नाही कुणाला नेत..!! after all तु म्हणतेसच की my life my decisions...!!".
त्याच्या या उत्तराने तिला आत कुठतरी तप्त धारित्रीवर पावसाचा सडा शिंपडावा तसं वाटत होतं. कुणीतरी मला समजतय ही feeling सकाळ पासुन कुणीच कसं मला समजुन घेत नाही या feeling मुळं तिचा उतरलेला चेहरा फुलवुन गेली होती. पण आपल्या त्या समजुतदारपणाच्या चौ़कटीतुन वर डोकवण्याची हिम्मत तिला कधीच झाली नाही , इच्छा असुनही.पण आज मात्र तिला ती हिम्मत करावीशी वाटत होती. बराच वेळच्या भटकंती नंतर तिघांनीही एकमेंकांचा निरोप घेतला.पण त्या चौकटीतुन बाहेर डोकविण्याचा मोह आज तिला आवरता आला नाही.म्हणुनच hostel वर पोहचल्या पोहचल्या आपल्या त्या कृष्णाकडे स्मित हास्य करत mobile ची बटणं दाबत त्याच्याशी संवाद साधत होती, जणु काही तो कृष्णाच त्याला जे हवय ते तिच्याकडुन तिच्या text message मधे type करुन घेत होता. तो msg तिने लगेचच त्याला forward केला.

"हम को गिले तुम से ना जाने क्युं..??" अजब प्रेम की गजब कहाणी मधलं ते तुमसे ना जाने क्युं हे गाणं तो ला फार आवडायचं इतकं की तो दिवसातुन कमीत कमी वेळा ५० वेळा ऐकायचा अगदी झोपेपर्यंत कानात ear plug टाकुन..!! अन ती जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकायची तेव्हा तेव्हा तो तिच्या समोर उभा रहायचा. तोच का तिच्या डोळ्यासमोर यायचा याचं उत्तर तिच्याकङे असुनही ते तिनं कधीच नाही सांगितलं.पण
"whenever I listen this song माझ्यासमोर उभा राहतोस "तु" really it`s you are song..!!" असं मात्र ती त्याला म्हणायची.जणु काही तो हेच गाण जगतोय..!! ह्म्म खरतर तो तिच्यासाठी एक गाणं जगत होता. गेले दीड वर्ष त्याने आपल्या mobile ची caller tune 'तुम से ही.. तुम से... ही..' ठेवली होती.पण अचानक October मधे त्यानं ती बदलली होती आपल्या मैत्रीणीला सांगण्यासाठी की मी आहे सदैव तुझ अबोल बोलणं ऐकायला. ते गाण होतं "तुने जो ना कहा मैं वो सुनता रहा..!!". पण त्यानं कधीच तिला या बदललेल्या caller tunes च रहस्य सांगितल नाही. तिचा तो sms पाहुन तो खुपच बैचैन झाला होता. आपल्या पासुन तिला दुर ठेवण्याचा प्रत्येक प्रयत्न त्याच्या अंगलटी येत होता. तिच्या या sms ला काय reply करावा याचा त्याने खुप विचार केला..? अन शेवटी त्याला त्याचं उत्तर त्याच गाण्याच्या त्याच ओळीच्या शेवटी सापडलं..!! अन आजवरचा त्यानं तिल पाठवलेला सगळ्यात छोटा sms पाठवला.पण त्याच्यात मात्र खुप मोठा अर्थ होता, त्याचं आयुष्य बदलणारा अर्थ..!! म्हणुनच त्याला तो reply करताना इतका वेळ लागत होता.एरव्ही त्याचे निर्यण फार फटाफटा व्ह्यायचे.अन त्यामुळेच कदाचित सर्वांना तो विचार न करता decision घेतो असच वाटायचं अगदी तिला ही.पण त्याचा प्रत्येक निर्यण हा सर्वस्वी विचारांतीच घेतलेला असायचा.. त्याच्या मनाला पटेल असाच्..!!पण त्यानं आज जरा जास्तच वेळ घेतला होता. तब्बल दोन तासांनी त्यानं तिला sms केला.

"मिलों के हैं फासलें... तुमसे ना जाने क्युं.." त्या "जाने क्युं" नंतर मात्र त्याने मुद्दामच प्रश्नचिन्ह घातलं नव्हतं..कारण त्याच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरे होती त्याला पटणारी.. अन या प्रश्नाचही उत्तर होतं..पण तेच त्याच्या मनाला पटत नव्हतं. दोघंही त्यादिवशी बराच वेळ बोलत होते. तो तिला म्हणत होता

"काय हमको गिलें तुमसे ना जाने क्युं..? नको लावुस इतका जीव..!! सवय नाही रे मला..!! त्रास होतोय खुप..!! तु इतका जीव लावुन मी तुला फक्त त्रासच देऊ शकतो..!! माझा जन्मच त्रास द्यायला झालाय. I can only hurt people..!!खुप वाईट आहे रे मी.बघ ना आजही मी तुला किती ताप दिला. तु मरावं असं म्हणालों. नाही जमतं रे मला खोट वगायला. मी फक्त त्रासच देऊ शकतो.पण मला तुझ्या बोलण्याचा खुप फरक पडतो रे..!! नाही करायच तुला hurt..!! एकुलती एक मैत्रीण आहेस माझी तु..!!"

त्याच्या या बोलण्यावर ती मात्र जाम भडकली.खोटं वागणं? तिनं मात्र फारच attitude ने त्याला फटाकरलं...!

"तु स्वताला काय समजतोस रे..? हा..? ज्यादा टिवटिव नाही करायची, कळलं ना? नालायका इतक्यांदा म्हणतोस 'मी फक्त त्रास देऊ शकतो, दुसरं काहीच नाही' तेव्हा हा विचार करतोस का , की मला तो त्रास handle करताना किती त्रास होत असेल? मी मुलगी आहे '....', माझी त्रास सहन करण्याची क्षमता तुझ्यापेक्षा by default कमी आहे."

"'.......' माझ्याबद्दल विचार करणं थांबव रे ....!! तुझा त्रास थोडा तरी कमी होईल..!! मी फक्त त्रासच देऊ शकतो.. असाच आहे मी 'IDIOT'."

"'....'" तु म्हणतोस ना माझ्या बोलण्याचा तुला फरक पडतो, मग तुझ्या बोलण्याचा मलाही तेव्हढाच फरक पडतो हे का नाही कळत तुला?तु जेव्हा माझ्या मरणाविशयी बोललास्,मला खुप वाईट वाटलं. तु बोललेल्या प्रत्येक शब्दाचा मला फरक पडतो my dear friend.. आज माझ्या चेहर्‍यावरचे expression तेच सांगत होते."

"तुला काहीच फरक नाही पडायला पाहिजे.... अन मी आपल्या एकुलत्या एक मैत्रीणीला मरु देईन...? मी तुझ्या कृष्णाशीही भांडेन रे तुझ्यासाठी.. फक्त तुझ्यासाठी.."

"का नाही पडायला पाहिजे? मला कशाने फरक पडावा ते माझं मी बघेन."

"'......' देवबप्पाकडे काय मागितलस आज? मला न सांगण्यासारखं नाही ना काही मागितलं. मला आज तुझ्या चेहर्‍यावरचे expression फार वेगळे वाटले.. एकदम वेगळे.. का माहित पण नेहमी सारखे नव्हते. "

"ह्म्म..!! बप्पाकडे काही मागितलं नाही.त्याला म्हटलं नेहमी असच माझ्यासोबत रहा.माझ्या चेहर्‍यावरचे expression वेगळे होते? म्हणजे? उलट माझ्या चेहर्‍यावर एकच expression होत, मला वाईट वाटतयं, पण ते कुणालाच कळत नाही. तुला का वेगळे वाटले.?"

ह्म्म..!! तो तिला नेहमी म्हणायचा "मी आलोय ते तुझ्या अश्रुंमागची हजारों कारणे शोधायला". या वाक्याचा अभास सदैव त्याच्या भवती घोंघवयचा.तिच्या प्रत्येक गोष्टीचा तो खुप बारकाईणे अभ्यास करायचा. पण तिला याचा कधीच थांगपत्ता लागु नाही द्यायचा.तो तिला म्हणायचा तु मला ओळखणारी एकमेव आहे,पण तुला मी ९९.९९% च माहीती आहे. तो .००१% मी तुला कधीच नाही दाखवणार..!! त्याच्या या वाक्यालाही नक्कीच काहीतरी अर्थ आहे हे तिला मात्र सांगायची गरज नव्हती. या सगळ्यां दरम्यान दोघंही आता नोकरी शोधत होते. त्याने नुकतीच कुठं job शोधायला सुरुवात केली होती,फक्त आता तिच्यापासुन दुर जाण्याची तयारी करावी या एकाच विचाराने..!!
८ डिसेंबर २००९..!! त्यानं एखादी गोष्ट ठरवलीय अन ती केली नाही असं कधी झालच नाही. आज त्याला कुठल्याशा project related company तुन call आला होता. फोनवरुनच interview झाला होता. अन त्यानं तो आपण या company त जायचच आहे या attitude नेच interview दिला होता. आता तो salary वरुन घासाघीस करत होता. पण interview घेणार्‍याने त्याला एक प्रश्न विचारला होता ज्याचं त्यानं उत्तर खुपच अदबीने दिलं होतं,पहिल्यांदा कुणाशीतरी खोटं बोलत होता. त्याला प्रश्न विचारला होता

"why did you left your previous job?"

ह्म्म काय देणार होता उत्तर तो..? त्याने recession ची ढाल पुढे करत त्या प्रश्नाला वेळ मारुन नेली.पण खरं उत्तर त्याच्या मनात एक दुखरी जखम करुन जात होतं. मी हे का केलं याचं उत्तर त्याच्याकडे होतं खरं पण ते त्याला कुणालाच सांगता येत नव्हतं. technical interview व्यवस्थीत दिल्यामुळेच पलीकडुन त्याला हैद्राबादच्या project साठी विचारणा झाली. त्याने salary बाबत च्या discussion साठी थोडा वेळ मागुन घेतला. त्यानं मात्र आत्तापर्यंत ही गोष्ट ती पासुन लपविली होती. मी पुणं सोडुन जातोय हे त्याला तिला कसं सांगाव हेच कळत नव्हतं.त्याला स्वतालाच ही गोष्ट पटत नव्हती,पण तिची आपल्याकडे वाढत चाललेली ओढ त्याला नको होती.पण काही केल्या त्याला हे तिला समजावताच येत नव्हतं. ही गोष्ट तशी तिला ही पटणं अवघडच होती.म्हणुनच तो तिला थोडा वेगळ्या पध्दतीने समजाऊ पाहत होता.तसं सकाळपासुन आज त्याचे sms तिला जात होते.पण प्रत्येक sms मधे तो तिला मी तुझ्यापासुन दुर चाललोय याचीच hint तो देत होता. तिला तो ते 3 IDIOTS मधलं गाणं "बहती हवा सा था वो..!! उडती पंतग सा था वो..!!"आवडलं का म्हणुन विचारत होता. जणु काही तो तिला सांगत होता मी ही असाच आहे..!! मी ही कधी ना कधी असाच त्या बहती हवा सारखा तुझ्या आयुष्यातुन निघुन जाईन. अन ती मात्र त्याचा meaning खुप छान आहे म्हणुन मला ते आवडलं असच म्हणत होती. अन काल जसं मी बप्पाकडे मागितलं तसं तु काय मागितलसं? अन मला उडवा उडवीची उत्तरे नकोयत म्हणुन त्याच्या त्या खोल मनाचं तळ गाठायचा प्रयत्न करीत होती. त्यानं मात्र तिला सांगितल

"'......' i said you are copying me... but no, you like to copy me.. dnt know why but that's the truth.. and you always try to suppress the truth..!! you know I am IDIOT..!! काल मी बप्पाकडे जे मागितलं ते मला मिळाल्यासारखं वाटलं आज..!! ह्म्म देव आहे रे .. फक्त तो माझ्यावर रुसला होता... thank you देवबप्पा..!! देवबप्पा रुसला होता..? पण believe me तस्स काही नाही मागितलं? योग्य वेळ आल्यावर सांगेन.. मिळाल्यासारख वाटल... आणी माझ्यावर तुझा पुर्ण control आहे dnt worry..!! तस्स काही मागितल नव्हतं..!!""
त्याच्या या उत्तरावर ती मात्र चक्रावुन गेली होती. पण त्याला त्याची philosophy च आपली life वाटत होती.

"what तस्सं काही नाही मागितल? काय'....' ? तस्स काही काय? आणी योग्य वेळ आल्यावर सांगेन म्हणजे? कसली योग्य वेळ? so right things at right time? आणी तुला कसं कळणार रे it`s right time ते..?"
ह्म्म तिच्या या उत्तराने तो मात्र हिला किती छान acting जमते म्हणुन मनातल्या मनात तिच कौतुक करायचा.पण तिच्या आयुष्यातुन आपलं जाण तिला सहन होईल का? ही चिंता त्याला छळत होती. आपलं जाणं आता जवळ आलय हे तिला सांगयाच्या प्रयत्नात आज त्यान बर्‍याच दिवसांनी काहीतरी लिहिलं होतं, त्याच्या नकळत ते लिहिलं गेलं होतं. त्यानं सरळ ती लिहिलेली कविता तिला पाठवुन दिली.

"माहीत नाही का..? आलो तेव्हा वणव्यासारखा होतो.
जाईन तेव्हा मात्र ओहोटीची लाट होऊन..!!
माहीत नाही का..? आलो तेव्हा सुर्याचा एक किरण होतो,
जाईन तेव्हा चंद्राची शीतलता होउन...!!
माहीत नाही का..? इथच आलो.. अन इथुनच चाललोय..!!
येताना एक विचारही नाही आला अन जाताना फक्त विचारच विचार..!!
माहीत नाही का..? मी जसा आलो तसच मला जायचं होतं.
कुणी बदलावं अस काहिहि माझ्यात नव्हतं..!!
कुणी ज्वालामुखीला का करतो जवळ..!!
पण आता शुभ्र हिमालय होऊन चाललोय..!!
माहीत नाही का..?
THANX "......."..!!"

या ओळी लिहिताना मात्र त्याची झालेली केविलवाणी अवस्था तिला समजणं खरच खुप अवघड होतं. कारण हे सगळं त्याच्या त्या ०.०१% मधलं होतं. जे तो तिला कधीच कळु देणार नव्हता. तिला मात्र या कवितेचा अर्थ फारसा कळाला नाही. त्याची philosophy तिला फारच bore वाटायची पण त्याचं ते convince करणं.. attitude च्या पुढ गेलेली philosophy मात्र तिला पटायची.
तिनं त्याच्या sms ला मात्र फक्त

"कुठ चालयास '....' ?" एव्हढच प्रश्नार्थक उत्तर पाठवलं. पण शेवटी तिला ही हे कळालं होतं की तो कुठंतरी जायच्या तयारीत आहे. म्हणुनच तर तिने तो प्रश्नार्थक reply त्याला पाठवला होता.
त्यानं ही लगेचच तिला उत्तर पाठवलं.

"अजुन वेळ आहे त्याला..!! तो पर्यंत सहन कर मला...!! तुझ्या कृष्णाने पाठवलयं म्हणुन..!!"

"किती लवकर चिडतोस '....'? मी तसं विचारल कारण मी अजुन तुला कुठ त्रास दिलाय? इतक्या सहज तुला सोडणार नाही OK? " तिचा हा reply म्हणजे तिनं ही त्याला थांबवाव असं वाटत असल्याचं proof च त्याला वाटत होतं. पण ती इतकी सरळ होती की तिला त्या गुढ philosophy चा अर्थ कळुन घ्यावासाच वाटत नव्हता. त्याला मात्र माझी मैत्रीण मला कधीच त्रास नाही देऊ शकणार याचीच खात्री होती. म्हणुनच तो तिला म्हणाला

"तु '....'ला कधीच त्रास देऊ शकत नाहीस.. OK.."

"आणी तोच तर problem आहे ना..? की मी तुला त्रास नाही देऊ शकत. मी काहीही म्हटलं तरी तुला ते त्रास होण्याच्या योग्यतेचंच वाटत नाही. जाऊ दे. आणी थोडं चुकतोयस का? ओहोटीची लाट ही तेव्हढीच वाईट असते. कारण ती किनार्‍यावरची प्रत्येक वस्तु आपल्या बरोबर नेते."

तिच उत्तर असं का आलय याचा विचार करताना त्याला मात्र त्याने ४ august ला घेतलेल्या निर्णयाची घडणारी दुसरी बाजु दिसत होती. पण त्या true friend आणी attitude वाल्या '....' ला दोघांना बरोबर घेत चालताना त्याची मात्र बरीच तारांबळ उडत होती.पण ती मात्र त्याला संभाळुन घेत होती. कारण तिचा true friend तिनं घडवला होता अगदी तिला हवा तसा. कुठल्याच चौकटीत बसायला तयार नसलेल्या आपल्या या 'बिघडलेल्या' मित्राला मात्र ती आपल्याला जसं हव तसं वागवत होती.जणु काय तिचंच जगण जे तिला जगता येत नव्हतं ते तिच्या true friend च्या रुपाने ती जगु पाहत होती.तिचं येणं त्याला आता खरच त्रासदायक वाटत होतं. आपलं अस्तित्व हरवणं कुणाला आवडेल? पण तो त्यासाठीही तयार झाला होता.फक्त आपल्या एकुलत्या एक मैत्रीणीसाठी..! बराच वेळ होऊन ही त्याचा काहीच reply आला नव्हता.ती ला मात्र त्याच्या उत्तराची बरीच आस लागली होती.अन तिथे त्याच्या अस्तित्वाची अन true friend ची एकमेंकात चाललेला द्वंद..!! पण जिंकणार कोणीच नव्हतं. अन हे ठाऊक असुनही ते द्वंद सुरुच होतं. न राहुन शेवटी तिनं त्याला sms केलाच.

"no reply..? का..?" तिच्या का? या प्रश्नाला मात्र त्याच्याकडे उत्तर होत.पण यावेळी तिला पटणारं.

"किनारा तर नाही नेणार ना लाट..? i am always right ..!!"

किती attitude होता त्याच्याकडे..!! कुणीच हिरावुन घेऊ शकत तो..!! स्वताच अस्तित्व हरवताना ही नाही..!! तिला मात्र याच्याकडे माझ्या प्रत्येक प्रश्नाच उत्तर असतं, मला हवं असणारं..!! अन ते का नसणार होतं. तो फक्त तिच व्यक्त होण्याचा निमित्त मात्र ठरत होता. अन तिनंही मग त्याच्या त्या i don't need any one च्या attitude समोर नमत घेतं त्याला प्रतिउत्तर केलं

"हो.. you are always right. ती लाट किनारा नाही येणार.. ह्म्म.. किनारा..!!"
तिला तो कुणाला किनारा म्हणतोय हे चांगलच ठाऊक होतं.तिच्या या उत्तराने मात्र तो थोडा सावरला. तिला जे तिच्या पर्यंत पोहोचावच होतं ती बरोबर पोहचवत होती.पण त्याला आज हेच जमत नव्हतं,आजच असं नाही पण ३० November पासुन..!! आज मात्र त्याने ती ला फोन करुन मला हैद्राबादची offer आहे असं सांगितलं. ती मात्र त्याला हैद्राबादला तु जाणं शक्यच नाही म्हणुन हेटाळत होती. तिला तो आपली थट्टा करतोय असच वाटत होतं.तिच्या मते तो आजवर कधीही होस्टेल ला राहिला नसले कारणाने त्याला तो job करणं जमणार नव्हतं. "तु आजवर कधीच hostel वर नाही राहिलास रे.. खुप problems असतात इथं.. नाही जमणार रे तुला..!! कशाला पुणं सोडुन चाललायस..? तुच म्हणत होतास ना मी पुणं सोडुन जाणार नाही..!! मग..? तु नाहीच जाऊ शकत..!!" असच काहीतरी त्याला समजावत होती. पण त्याला मात्र हा job म्हणजे तिच्या आयुष्यातुन हळुच सटकण्याची आयती संधीच वाटत होती. अन म्हणुनच तो तिच्याशी जमेल तितक दुर राहण्याचा प्रयत्न तो करत होता. अन तिला ते जाणवाव म्हणुन "I don't need any one." अस म्हणत तिला आणखीणच ताप देत होता. तिला असं hurt करताना त्याला मात्र होणार्‍या वेदना सहन करण्याची ताकद त्याने कुठुन एकटवली असावी कोण जाणे.पण कुठेतरी आत आपली एकुलती एक मैत्रीण म्हणुन त्याला त्याच ते वागणही पटत नव्हतं. अन स्वताच दिलेल्या जखमेवर हळुवार फुंकर द्यावी म्हणुन तो तिला म्हणत होता

"'.......' I said I don't need any one that's true.. why should I need any one if I have 'YOU' in my life.. your my COLORFUL DROP..!! I don't need any one just b`coz of you."

त्याचं हे दुहेरी वागणं तिला मात्र चक्रावुन टाकायचं. हा don't need any one म्हणतोय अन मला colorful drop ही. तिला खरच काहीच कळत नव्हतं. तिला आठवत होता तो संदीप खरेंच्या मुलाखतीचा दिवस.. ते नटराज होटेल.. त्याची ती colorful drop ची philosophy.. अन तिला झालेला प्रचंड ताप..!! तिच्याही नकळत ती त्याला बोलुन गेली

"'......' आठवतय नटराज मधे मी काहीतरी म्हटलं होतं आणी तु म्हणाला होतास , ग्लास फुल्ल भरलाय रे, तरी लोक त्यात पाणी ओततायत. मला लय ताप झाला होता तेंव्हा. At that time I never expected not even thought की एक दिवस तुच मला colorful drop म्हणशील...Life changes, people changes, their view changes.."

तिच्या या प्रतिक्रियेवर त्याने मात्र अगदी सहजच उत्तर दिलं अगदी आपल्या मनापासुन,

"Yes life changes पण मी कधीच नाही बदलणार.. फक्त तु बदलवु शकतेस मला.. Thanks for coloring my life ... तुला आवडल नाही का तो colorful drop होणं..?"

"I don't know about colorful drop वगैरे. मी अशीच आहे, '.....' तेव्हाही मी अशीच होते. may be तेव्हा तुला तसं वाटल नसेल..?"

"तु खुष नाहीस का मी तुला माझा colorful drop म्हटलं म्हणुन? अन मला माझं answer already मिळालय..!Thanks देवबप्पा..!!"

"कसलं answer ? अन त्यात एव्हढं खुष होण्यासारखं काय? अन देवबप्पाला का thanku..?"
तो मात्र तिच वेड पांघरुण पेडगावला जाणं सहज ओळखत होता, अन कधीतरी आपण दिलेले एक suggestion ती किती सहजतेने implement करु पाहत होती हे ही..! "तुझे expression control करायला शिक..!!" असं तोच कधीतरी तिला म्हटला होता. ते expression control करण्याची सगळी धडपड त्यालाही कळत होती. पण तो तिच्याकडुनच याचं confirmation मागत होता. इतक्या सहज तो तिला colorful drop म्हणेल यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. पण त्याच्या त्या पाण्याने भरलेल्या ग्लासात तिने तिच्या मैत्रीचा तो एक छोटासा colorful drop त्याच्याही नकळत बेमालुम मिसळला होता की त्यानं हे म्हणाव की तु माझ्या आयुष्यातला colorful drop आहेस..? खरतर तो तिला colorful drop फक्त एका कारणासाठी म्हणत होता. जसा तो colorful drop पाण्यात मिसळल्यावर त्या पाण्याचं अस्तित्व नाहीस होतं तसच काहीसं तिच्या येण्याने त्याचं आयुष्य झालं होतं. खरतरं ४ august ला च. पण तो तिला हे आज मुद्दाम सांगत होता. आता आपली वेळ भरलीय असच जणु तिला तो जाणवु देत होता.त्याचं आयुष्यच तिच्या येण्याने बदलल होतं. ह्म्म खरतर तिच आयुष्य तो बदलणार होता. तिच ते अव्यक्त जगणं सत्यात उतरवण्यासाठी आपलं अस्तित्व हरविणं त्यानं स्विकारलं होतं. पण तिच्या आयुष्यतुन जाताना तिला थोडं तरी छान वाटावं म्हणुन तो तिला colorful drop म्हणत होता. अन तिला त्या आनंदापेक्षा त्याच्या त्या विचित्र वागण्याचाच खुप जास्त त्रास होत होता. जाताना तिच्या ओंजळीत असा एकतरी सुखाचा क्षण मी द्यावा ही एकच भावना त्या colorful drop म्हणण्यामागे होती. त्या colorful drop ची खरी third side मात्र त्याला ठाऊक होती. त्याचा प्रत्येक निर्णय तो खुप विचारांतीच घ्यायचा, पण त्याची निर्णय घेण्याची क्षमता फारच जबरदस्त अन विनाविलांब होती, अन कदाचीत याचमुळे त्याचे निर्णय इतरांना विना विचारांचे फलीत वाटायचे. पण तो मात्र या दुनियेची कधीच फिकीर नाही करायचा. आपलं जगणं याची व्याख्या त्याच्यासाठी जितकी निराळी होती तितकीच ती साठी. ती मात्र नेहमी आपल्या आगोदर आपल्याशी संबंधीत सगळ्यांच व्यक्तींचा विचार करायची, पण मनातुन आत कुढत बसायची. स्वतासाठी जगणं तिनं अजुन कुठं अनुभवलं होत. दोन पर्स्पर्विरोधी व्यक्तिमत्व आपल्या अस्तित्वाची लढाई एकमेंकासमोर लढायचं कारण मात्र त्या दैवानं फारच निराळं ठेवलं असावं. त्याचा मात्र एकच प्रयत्न तिनं तिच्या मनासारख जगावं, अगदी माझ्यासारखं...!! झर्‍यासारखं निखळ...!! पण तिच्या मनासारखं जगताना तो त्याचं ते अवखळ जगणं हरवुन बसणार होता, हे ती ओळखुन होती. माझ्यामुळे तो ने त्याचं अवखळ जगणं का म्हणुन थांबवावं.? हा एकच प्रश्न तिला आपल्या मनासारखं वागण्यापासुन रोखायचा. तिच्यासाठी तो नेहमीच तिच्या जवळ होता. त्याचं अस्तित्व आता एका देहात सामावत नव्हतं.त्याच्यासाठी बनवलेली प्रत्येक चौकट त्यान अक्षरशा तुकड्यात भिरकावुन लावली होती. पण आता आतुन तो कुठे तरी आपल्यासाठी, आपल्या अनिर्बंध वागण्यासाठी एक सीमारेषा ठरवत होता. अन नेमकी हीच गोष्ट आपल्या ती ला पटत नव्हती. त्याच्या त्या बदललेल्या वागण्याच कारण हेच होतं. त्यान स्वताभवती आखलेली ती सीमारेषा..!!
दुसर्‍या दिवशी त्याला पुन्हा त्या हैद्राबादच्या company तुन call आला. त्यानं salary expectation ची ढाल करत त्यानं कशीबशी joining साठी थोडा वेळ मागुन घेतला. तसं तो त्यांना लगेचच confirmation देऊ शकत होता. पण अजुन ती ला job मिळाला नव्हता. ही एकच गोष्ट त्याला ते confirmation देण्यापासुन रोखत होती. पण company खुपच घाईला आल्याने त्याने उद्यापर्यंत तरी offer घेणं टाळलं. दुपारी त्यानं तिला फोन करुन त्या offer बद्दल सांगत तिला "मी जाऊ का हैद्राबादला..? तुला काय वाटतं..? मला जमेल..?" हे विचारताना मात्र त्याने खुपच casually विचारलं. तो फक्त तिचा अंदाज घेऊ पाहत होता, पण खुपच सावधपणे..!! त्याच्या त्या casual वागण्यामुळे तिलाही हा मस्करी करतोय असच वाटलं. पण त्याला उत्तर द्यायचं म्हणुन ती त्याला खुपच समजुतीच्या स्वरात सांगत होती.

"....., अरे तु कधीच घरापासुन दुर राहिला नाहीस..? अरे पुणं सोडुन कधी २ दिवस राहिलास का तु? मग अचानक हैद्राबाद? तु कधीच hostel वर राहिला नाहीस..? अन तुला बाहेरचं जेवण आवडत नाही..? काकुंच्या हातच्या जेवणाशिवाय कधीच काही खात नाहीस , मग जमेल तुला हैद्राबादला एकटं रहायला..? नको जाऊस बाहेर कुठे ही..!! तुला पुण्यात नाही का मिळणार job ? तुला जायचय की नाही? नको जाऊ रे..?"

तिच्या या बोलण्यावर मात्र त्याने काहीच प्रतिक्रिया नाही दिली. आता त्याला वेळ हवा होता तो स्वताच्या मनाची तयारी करायला. त्याच पुणं सोडुन तो जाणार होता. खुपच अवघड होतं त्याच्यासाठी..!! घरचेही त्याला विरोध करत होते..!! पण त्याने कधीच त्यांना जुमानलं नव्हतं तो आज तरी कसा जुमाननार होता? बस्सं आता decision final झाला होता. ती मात्र आता खुपच व्याकुळ झाली होती. तिलाही आता त्याच्या जाण्याची चाहुल लागली होती. संध्याकाळ पर्यंत त्यानं काहीही reply केला नव्हता. ती मात्र मी कुठल्या अधिकाराने याला थांबवु याच प्रश्नाचं उत्तर सकाळपासुन शोधत होती, अन तो मात्र आपल्या मनाची तयारी करण्यात मग्न. मी कोणाला तरी माझ्यासाठी थांबवाव हे तिच्या त्या संमजस मनाला पटतच नव्हतं. अन का पटावं..? कोण कोठला एकदम वाया(!) गेलेला "तो"...!! कुठल्याच मुलीशी बोलण्याचे manners नसणारा..!! नेहमी माझं तेच खरं करणारा..!! सदैव अहंपणा मिरवणारा..!! काय होतं त्याच्यात म्हणुन तिनं त्याला थांबवाव..? या अश्या अनेक प्रश्नांनी तिच मन पोखरलं जात होतं. शेवटी बर्‍याच वेळाने तिने तिचा तो संमजसपणाचा ego बाजुला ठेवत रात्री त्याला फोन केला अन त्याला त्याचा decision बदलण्याचा हट्ट करत होती. किती लाडीकपणे आज ती त्याच्याकडे हट्ट करत होती. त्याला तर नेहमी, कोणीतरी आपल्याकडे असा हट्ट करावा असंच वाटायचं. पण आजचा तिचा हट्ट मात्र त्याला खुपच अंतर्मुख करत होता.तो मात्र त्या हट्टाला आपल्या त्या तुफानी attitude पुढे टिकुच देत नव्हता. शेवटी तिचं ते गळं घालण सहन न होऊन त्याने तिला "फोन ठेव...!! फोन ठेव...!! बस्स आता या topic वर अजुन discussion नकोय..!! ठेव फोन..!!" असं म्हणत स्वताच फोन कट केला. ती मात्र त्याच्या या विचित्र वागण्याला आता सरावली होती. थोडावेळ जाऊन देत तिनं रात्री १०.३० ला त्याला sms केला.

" '....' ...... काय करतोयस..? '.....' please जाऊ नकोस रे..? का जायचय तुला? मी पुणे सोडुन कुठेच जाणार नाही असं तुच म्हणाला होतास ना..?"

पण तिच्या या ही sms ला त्याने उत्तर पाठवल नाही, मुद्दामुनच..!! काय पाठवणार होता तो reply.. त्यानं त्याचा decision केव्हाच घेतला होता. १५ मिनिटे वाट पाहुन तिने पुन्हा त्याला sms केला.

"झोपलास का रे? इतक्या लवकर..?"
ह्म्म्म.. रात्री चे पावणे अकरा म्हणजे त्याच्यासाठी लवकरच होते. तसं ती आधी १० लाच झोपायची पण या नालायक कार्ट्यामुळे ती ही आता रात्र जागवायला लागली होती. अगदी रोज नाही पण वारंवार..!! तिचं ते आपल्या साठी जागं राहण पाहुन, अन तिचा तो लाडीक हट्ट पाहुन त्यालाही तिचा कळवळा आला, अन मग तिला sms केला.

"नाही जाणार..
'.......' तुला जोपर्यंत job नाही मिळत तोपर्यंत नाही जाणार कुठेच..."

तिला मात्र तो जाणार नाही यापेक्षा "तुला जोपर्यंत job नाही मिळत तोपर्यंत नाही जाणार कुठेच" त्याच्या या वाक्याचाच अर्थ खुप काही सांगुन गेला. तिला रहावला नाही अन तिनं लगेच त्याला reply केला.

"मला job मिळण्याचा अन तुझ्या जाण्याचा काय संबंध..? तसं असेल तर जा आत्ताच..!! I need you my dear friend till I am alive... you got it? आणी इतका वेळ काय करत होता रे..? अजुन जागा आहेस ना..? नालायका reply करायला एव्हढा वेळ? का? अन मघाशी 'फोन ठेव' असं तीनदा म्हणुन फोन ठेवलास... कसला बाद आहेस..!! "

तिच्या या उत्तरावर ती अजुनही जागी आहे म्हणुन त्याला आश्चर्य वाटत होतं. पण तिन विचारलेल्या प्रश्नाला सरळ उत्तर देणं त्यानं टाळलं. अन आपली पडती बाजु संभाळत

"तुला job मिळाल्यावर जाईन असं नाही म्हटलं.. पण तेव्हा पुणं सोडुन जावं लागलं तर जाईन...!! तोपर्यंत नाही..
अन मी असाच आहे नालायक, बाद, येडा, वाईट, DON ,IDIOT, डाकु...
अन अजुन काय काय....तरीही त्याला "TRUE FRIEND" मानतेस.. का लावतेस एव्हढा जीव..?".
तिला पुन्हा आपल्यापासुन दुर राहण्याची विनवणी करत होता.

"काय माहीत? देवबप्पान पाठवलय ना मला तुझ्या आयुष्यात, मग त्याला हेच सांगायचं असेल की त्याचा तुझ्यावर किती जीव आहे...!!"

तसा त्यानं तिच्यासाठी बदलेला हा काही पहिला निर्णय नव्हता. पण अजुन सुद्धा तो त्या निर्णयावरुन मागे हटला नव्हता. फक्त आजची वेळ तिला कमीत कमी त्रास देत कशी मारुन घ्यायची हाच त्याचा प्रयत्न होता. आज त्यानं ती वेळ कशीबशी मारली होती. उद्या त्याला त्या company ला उत्तर द्यायच होतं. तुर्तास आजच्या दिवसापुरती त्याने तिच्या मनाची होणारी घालमेल थांबवली होती. ती मात्र आज त्यानं आपल्यासाठी त्याचा निर्णय बदलला म्हणुन खुप आनंदात होती. जणु काही त्या कृष्णानेच त्याला तशी सदबुद्धी दिली असच तिला वाटत होतं. पण त्यानं मात्र आज मनाशी काहीतरी ठरवलं होतं. तो तिला एकदा असच म्हटला होता "मला तुला एक गिफ्ट द्यायचय... पण मला ते अजुन सापडल नाही. अन मी जेव्हा जाईन ना तेव्हा ते मी तुला देईल. तुला खुप आवडेल ते. अजुन मला मिळालं नाही पण जेव्हा ते मिळेल तेव्हा ते मी तुला देइन अन मगच तुझ्या आयुष्यातुन जाईन..!!". आज तो त्याच गिफ्ट्च्या विचारात होता. अजुन कसं नाही बरं सापडल ते गिफ्ट मला.? की मला माहितीए तिला काय गिफ्ट द्यायचय ते..!! खुप आधीच मी ते ठरवलं होतं. कदाचित ४ august लाच ...!! बस्सं.. त्याला तिला काय gift द्यावं हे कळालं होतं. दुसर्‍या दिवशी त्याने आपल्या true boyfriend ला आपल्याला एक गिफ्ट घ्यायच आहे '.......'. तयार रहा... म्हणुन निरोप दिला. तो दिवस होता मार्गषीर्शातला शेवटचा गुरुवार...!!

क्रमश :

गुलमोहर: 

खुपच छान आहे... मनाला चटका लावून जाणारे.
सत्य-कथा आहे ना? कमीत कमी अर्ध्-सत्य..

पु. ले. शु.

--आनन्दा

पलक..!!
कथा ती च्या नजरेतुन पाहिली तर नक्कीच रटाळ आहे..!!
पण लिहिणाराच "तो" आहे ना..!!
ठीकाय..!! तरीही आपण एव्हढी तसदी घेतलीत...!!! अन तेही आम्ही न बोलावता...!!

आनंदा..!! कथा अजुन संपायचीय राव..!!
मग म्हणा जिवाला चटका लावुन गेली ते..!!
खुप खुप धन्यवाद..!!

महेश घुले...!!

ओ डेलीयाचं "फुल"..!!
लई धन्यवाद..!!
आम्हाला टिंबच आवडतात..!! कथा वाचाच असा आग्रह नसताना आपण वाचलीत..!!
एव्हढा वेळ कसा मिळतो हो तुम्हाला..!!
पलक आम्हाला कडुच खायची सवय आहे.. never mind..!!
अपमान करायला येत असला तरी अपमान सहन करायची ही तयार आहे..!!
उगीच फालतुक comment देऊ नका..!!
माझ्याकडे तितका वेळही नसतो..!!
आणखी एक माणसाने साहित्य निर्मिलं ते त्याच्या अभिव्यक्ती साठी..!! अभिव्यक्तीला का म्हणुन नियमांची बंधन घालायची..!! माझा boss मला म्हणतो "Mahesh there should be a thought process matching..!!"
येडाय तो..!! कसं शक्य आहे..!! प्रत्येकाला देवानं डोकं दिलय..!! प्रत्येकाचं मन वेगळं असतं. मी सरळ त्याला उडवतो..!! तुम्ही काय चीज आहात? अन तरीही तो मलाच विचारुन कुठलही decision final करतो..!!
कारण त्यालाही आत कुठेतरी पटत असणार ना माझं वागणं..!!
असोत..!!
मी असच लिहिणार..!! कुठ साहित्य मंडळात तक्रा घेऊन जायची ते जा..!! नाही भीत कुणाला..!

महेश घुले

येवढच रटाळ लिहिणार....!!!! लिहा, तुमच्या कडुन अपेक्षा नाही. रटाळ लेखना साठी शुभेच्छा

बिचारा बॉस....!!!!!

हो लिहिणार..!!
गाढवाला गुळाची चव काय म्हणा..!!
उगीच दुसर्‍यांच्या कामात अडथळे नकोत..!!
टीका करण्याइतपत लायकी अंगी बाणवा..!!
अन तुमच्या फालतुक comments चा आम्हाला काहीच फरक पडणार नाही..!!
आम्ही वाचावयास आमंत्रण दिले नव्हते..!!
मुद्दामच .......!!!! टाकतोय...!!
या जगाला न भिता जो निर्भीडपणे लिहु शकतो ना तो खरा जातिवंत लेखक होऊ शकतो..!!
निर्भीड तर मी आहेच..!! त्या निर्भीडपनाची intensity आणखी वाढवल्या बद्दल खुप खुप धन्यवाद..!!

bhava comments var chidu nakos.. tyatach khare kay te kalate.. Kataha kadachit changli zali asti jar to, ti hyachya jagi nave vaparali asti.. to ti mule khuch gondhal hotoy vachnyat