ती..!!
एका शब्दात वर्णायचं झाल्यास "समंजस"...!! पण एका शब्दात वर्णन करुन "ती" वर जरा अन्यायच होईल नाही का...?
तर "ती"..!!
भिरभिरणार्या नजरेची..!! सतत काहीतरी शोधणारी ..!! काय ते माहीत नाही..? पण नक्किच काहीतरी शोधायची..!! दिसायला साधारण..!! लांबसडक केसांची नेहमीच चापुन चोपुन वेणी घालणारी...!! चारचौघींसारखी..!! पण तरीही चरचौघींपेक्षा थोडी हटके..!! कोणाला जर साधेपणातलं सौंदर्य दाखवायचं असेल तर "ती" म्हणजे या साधेपणातल्या सौंदर्याचा उत्तम आविष्कार..!! फार साधी अन तितकीच सरळ..!! म्हणतात साधी अन सरळ माणसच समजायला फार अवघड असतात..!! अगदी तशीच साधी.. अन सरळ..!! गंगेच्या पवित्र पाण्यासारखी, पण हिमालयाच्या पायथ्यासारखी निश्चल..!! अवखळ झरा म्हणावा अशीही काही नाही पण प्रवाही..!! सत्याला धरुन जीवन अनुभवनारी..!! अन आपुल्या आई- पप्पांची आर्दश लेक..!! दहावी- बारावी distinction ने पास झालेली.. !! शिक्षकी आई वडिलांचे शिक्षकी संस्कार आनंदाने जपणारी.. " स्वप्न... फक्त पाहनारी..!!" "डोकयाने काम अन मनाने फक्त विचार करणारी..!!" अन आयुष्यातल्या सत्याला धरुन जमिनीवरच लक्ष असणारी..!! आसमंतात पाहुन हसणारी..!! पण जमिन पाहुन अंतर्मुख होणारी..!! वरवरुन शांत..एखाद्या निद्रिस्त ज्वालामुखी सारखी..!! मिटलेल्या कळीसारखी अबोल.. अविचल..!! फार महत्वकांक्षी वगैरे काही नाही..!! पण जबाबदरींची जाणीव असलेली..!! थोडक्यात "तो" च्या अगदी विरुध्द स्वभावाची..!!
या "ती" चा एक ध्यास होता..बारावी नंतर डॉक्टर (M.B.B.S.) होण्याची..!! त्यासाठी तिची चाललेली अविरत मेहनत..!! पप्पांचा असलेला पाठींबा..!! आईच मिळणारं उत्तम मार्गदर्शन..!! सारं कस तिला हवंहवसं वाटणारं..!! हे क्षण कधी संपुच नयेत असं तिला वाटायचं..!! आहे तो क्षण भरभरुन जगायचा...!! एव्हढंच काय ते तिला माहीत होतं..!! छोट्या छोट्या गोष्टीतही मोठा आनंद शोधणारी..!!अन आपले मध्यमवर्गीय संस्कार कुठल्याही कुरबुरीशिवाय जिवापाड जपणारी..!!
ती चा तो ध्यास पुर्ण व्हावा म्हाणून तिचे अविरत कष्ट चालु होते.तहान भुक विसरुन ती CET ची तयारी करीत होती..!! पण आपल्याला जे हवय ते असचं इतक्या सहज मिळतं नाही हे अजुन तिला कुठं माहीत होतं..? दैवानं तिच्यासाठी काहीतरी औरच नियोजन केलेलं असावं..!!अविरत कष्टाचे फळ म्हणून "CET"त १४७ चा score आला खरा.. पण सारं व्यर्थ..!! शेवटच्या round पर्यंत थांबूनही कुठेच M.B.B.S. ला अॅडमिशन मिळालं नाही..!!
झालं..!! स्वप्न भंगाची ही तर सुरुवात होती..!! तेही उमलत्या वयात..!! फार जिव्हारी लागलं ते तिच्या..!!पण पप्पांसारखा खंबीर मित्र तिच्यापाठीशी होता म्हणुन यातून ती कशीबशी सावरत होती..!!
किती सहज समजून जायची ती.. पप्पांनी समजावल्यावर..!! सगळं दुख तसचं मूकपणे गिळून तिनं "ENGINEERING" करायचं ठरवलं..!! पण.. बारावीला फक्त "PCB" हाच group असल्यामुळे तिला दहावीच्या base वर DIPLOMA साठी अॅडमिशन घ्यावं लागणार होतं..!! दहावीलाही बर्यापैकी मार्क्स असल्याने तिला diploma ला अॅडमिशन मिळेल याची खात्री होती..!! तिसर्या round मधून तिला कोल्हापूर च्या government polytechnic ला अॅडमिशन मिळालं..!! मनाविरुध्द..!! छे..!! काही मनाविरुध्द वगैरे नसतं..!! सगळं आपल्याला हवं तसंच होतं असतं, फक्त परिस्थीती आपल्या बाजूने नसते..!! यावर तिची अपार श्रध्दा..!! जशी श्रीकृष्णावर अन पप्पांवर..!!
आहे हे असचं आहे.. म्हणून तिनं ती परिस्थिती स्विकारली..!! अन घर सोडुन आता आई पप्पांपासून दुर hostel ला रहायला लागणार म्हणून ती रडवेली झाली..!! पण याशिवाय गत्यंतर नव्हतं,याची जाणीव तिला आपल्या पप्पांच्या उबदार छायेखालून दुर hostel वर जायला भाग पाडत होती..!! पप्पा म्हण्जे life मधला पहिला HERO..!! काय नाही केलं त्यांनी माझ्यासाठी..? सगळे हट्ट आपली लाडकी लेक म्हणून त्यांनी पुर्ण केले..!! कधीही आपल्या मुलापेक्षा कमी नाही लेखलं त्यांनी..!! त्याच पप्पांन सोडुन आयुष्यातली नवी शिखरं धुंडाळायला ती diploma in INFORMATION TECHNOLOGY पूर्ण करण्यासाठी आपल कराड सोडुन कोल्हापूर ला चालली होती..!! तिला जितकं भरुन आलं होतं त्याच्या कैक पटीनं तिच्या पप्पांना भरुन आलं होतं..!! आपुल्या मुलीचा 1st HERO म्हणुन त्यांनी ते अश्रू डोळ्यांच्या बंदिस्त पेटित बंद करुन,ती ला धीर द्यायचा म्हणून..!! एक पुरुष म्हणून.. !! आपल्या लाडकीला hostel ला एकटी सोडुन जड पावलाने ते परत माघारी फिरले..!! ती चं clg सुरु झालं..!! hostel वर जुळवून घेणं तिला फार अवघड गेलं..!! पण थोड्या दिवसातच तिनं छान बस्तान बसवलं..!! ती चा मस्त १३ जणांचा एक group तयार झाला होता..!! त्या सगळ्यांच servicing center चं झाली होती ती तिच्या group मधे..!!ती १३ जणांच्या group मधे चमकत होती अन प्रत्येक परिक्षेतही तितकीच..!! ती अबोल्..अविचल कळी उमलत होती.. आपुल्या निर्बंध मैत्रीचा निराळा सुगंध सर्वांवर बरसवत होती..!! बंधनाच्या पाकळ्या अत्ताच कुठे सैल होत होत्या..!! group मधल्या प्रत्येकाचे problem ती आपुलकिने सोडवायची.. अन तिच्या दोन खास मित्रांचे तर खूप अलगद..!! तिचे ते दोन मित्र..!!
सगळ्या group मधे ती फक्त या दोघांशीच व्यक्त व्हायचा प्रयत्न करायची..!!
त्यातला एक फारच अबोल.. लाजाळू.. सुस्वभावी.. मनातली प्रत्येक गोष्ट डोळ्यातूनच कळावी.. अन ती कळते यावर विश्वास असणारा.. अन समोरच्याला ते कळावं म्हणून अडून बसणारा..!!
असं असतं तर माणसान भाषा निर्मिली नसती नाही का..? पण तरीही ती त्याला समजायची..!! तिच्या मुळच्याच संमजसपणामुळे बहुतेक..!!अन दुसरा मित्र तर अगदी नक्षत्रच होता..!!बड्बडा..!! एखाद दिवस तिच्याशी न बोलता गेला तर.. फार कसंतरीच व्हायचं त्याला..!!अति बडबडा..!! गरजेपेक्षा अधिकच EXPRESSIVE..!! मनात आलेलं लगेच बोलुन टाकणारा..!! त्या दुसर्याच्या अगदी उलट..!!
तर अश्या दोन परस्पर विरोधी मित्रां बरोबर ती फुलत होती.. !! दोघांच्याही विचारांचा सुवर्णंमध्य साधत होती..!!किती समंजस होती ती..!! सगळ्यांचं servicing center..!! तिघांचीही मैत्री गुलमोहरासारखी फुलत होती.. बहरत होती..!! पण गुलमोहर जसा झडतो, तशी ही मैत्री पानगळीसारखी तर नाही ना..? म्हणून ती ला थोडी भीती वाटायची..!! आई-पप्पांच्या उपजतच आलेल्या शिक्षकी संस्कारामुळे आलेला समजुतदारपणा या सर्व शंकाना तिलांजली देत होता अन.. आलेला क्षणाचा निर्भेळ आनंद कसा घ्यायचा हेच तिच्या भिरभिरत्या नजरेतून ती सार्या जगाला दाखवायची..!! किती PURE.. ORIGINAL.. होती ती..!!
त्या दोघांच्या मैत्रीत अखंड बुडालेली..!! पण संस्कारांचे धागे दोरे तितकेच करकोचून आवळणारी..!!
पण नियतीलाही काही औरच मंजूर असावं..!! हेही सुख ती तिच्यापासून हिरावून घेणार होती..!! तिचा तो अबोल मित्र असं काही करेल हे तिला आजही पटत नाही..!! ज्याला वाटायचं डोळ्यातूनचं व्यक्तं व्हावं.. त्यानं असं करावं..?? त्याने तिला propose केला होता..!! अन तिनं सरळ नाही म्हणत त्याच्यासाठी उधळत असलेला तो मैत्रीचा सुगंध कायमचा कळीत मिटून घेतला..!! ती चा तो नकार त्या अबोल मित्राने त्याच्या मनाला लावून घेतला..!! अन तिच्यापासून दुर जायचा प्रयत्न करु लागला..!! पण त्या अधीच ती त्याच्यापासून खूप दुर केली होती..!! मनातलं व्यक्तं होण्याची एव्हढी मोठी शिक्षा मिळणार होती तर तो कधीच बोलला नसता..!! कायमचा अबोल राहिला असता..!! चितेवर पडलेल्या प्रेतासारखा निश्चल..!! तो तुटला होता..!! काहीसा आपल्या गोष्टीतल्या तो सारखाच..!!
"नाही..!!"
किती वाईट शब्द आहे नाही हा..!! ज्याने उच्चारला त्यालाही त्रासवत होता..! अन ज्याच्यासाठी उच्चारला त्यालाही जाळत होता..!! एव्हाना काहीतरी बिनसलयं हे ती च्या group मधे सर्वांनाच कळलं होतं.पण ती कुणाशीच बोलत नव्हती..!!ती चा तो बडबडणारा मित्र, तोही काय झालं हे ती ला विचारत होता.. अन तीच जखम पुन्हापुन्हा चिघळवत होता..!! त्याला झालेली हकिकत कळली अन फार वाईट वाटलं..!! त्या दोघांची तूटलेली मैत्री पाहून तो हळ्हळत होता...!! त्याने काहीतरी मनाशी ठरवून ती ला एकटीला गाठलं..!!अन थेट विषयाला हात घालत तिच्याशी बोलु लागला.. !!
"बरेच दिवस तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं पण कसं ते कळत नव्हतं..??
मला तू आवडतेस.. खूप मनापासून.. तुला मी हे कधीच सांगू शकलो नसतो पण मला वाट्लं की तू .. तू.."
तो बोलत होता.. अन ती तशीच स्तब्ध.. !! तिला काय बोलावं ते क्षणभर सुचेच ना..? तिने सरळ त्याला नाही म्हणत hostel गाठलं..!! रूमवर जाऊन ती खूप रडली..!! आपल्या कृष्णाला समोर धरुन ती त्याच्याशी बड्बडतं होती..!!
"का म्हणून मी कुणाच्या इतक्या जवळ जावं की कुणाला तशी feeling यावी..? "
तिला फार अपराध्यासारखं वाटत होतं. पण ती चा त्या तिच्या एकमेव सख्यावर, त्या श्यामनिळ्या कृष्णावर पूर्ण विश्वास होता..!! तो कितीही दुखं देत असला तरी तो कायम माझ्या बरोबरच असेन.. यावर ती चा खूप विश्वास होता..!! खूप कृष्णवेडी होती ती..!! त्या़ कृष्णावर सारं सोडुन आहे हे असं आहे..!! म्हणत तिने सर्व स्विकरलं होतं..!!
दिवसांमागून दिवस जात होते..(त्याशिवाय कथा पुढे कशी सरकणार..!!) तशी ती या सर्वांतून सावरत होती..!! कळी मिटली होती. कुठेच तिच्या मैत्रीच्या सुगंधाचा मागमूस नव्हता..!!
शेवट्ची परिक्षा संपली..!! छान गुण मिळवून (नेहमीप्रमाणे) ती distinction ने पास होऊन diploma in information technology घेऊन ती कोल्हापूर सोडून जाणार होती..!! इथल्या सार्या आठवणींना मनाच्या एका कोपर्यात कायमचं कोंडून..!! ती चे दोन ही मित्र ती पासून कायमचे दुरावले होते..!!
तो भूतकाळ तिथचं सोडुन ती पुन्हा पुढच्या प्रवासास त्या श्याम निळ्यावर सर्व काही सोडून निघाली..!!
पुढे तिला degree करायची होती..!! तसं तिनं तिच्या पप्पांना सांगितलं..!! आपल्या एकुलत्या एक लेकीचा हट्ट म्हणूण त्यांनी ही लगेच परवानगी दिली..!! तिला पुण्यातूनच degree करायची होती..!! तसे अॅडमिशनस चे सर्व सोपस्कर पार करून मेरिट वर तिला पुण्यातल्या एका clg ला B.E. COMPUTER च्या course साठी direct S.E. (second year engineering) ला अॅडमिशन मिळालं..!! ती च्या group मधे ती ला एकटीला पुण्यात अॅडमिशन मिळालं होतं..!!
ती खूश होती..!! आता तरी मनासारखं झालं म्हणून..!! पण पुन्हा hostel ला रहावं लागणार होतं..!! पण यावेळ्स तिनं सर्व व्यवस्थित सांभळून घेतलं..!! इथंही रुळायला ती ला थोडा वेळ लागला..!! मेस्स बरोबर नसल्याने ती ची तब्येत खालावू लागली.. s.e. admission late झाल्यामुळे बराच अभ्यास बुडालेला होता..!! पण हळूहळु ती सावरत होती.. जम बसवत होती.. नव्या मैत्रीणी लगेच झाल्या ती च्या "संमजसपणामुळे"..!! पण ती मुलांपासून मात्र थोडी बिचकूनच होती. कशीबशी 1st sem दिली..अन result ची वाट पाहू लागली. या दरम्यान ती ला तिच्या त्या जुन्या group मधल्या सर्वांचे मेल्स ,फोन यायचे..!! त्या दोन मित्रांचे ही..!! पण ती त्या घडलेल्या प्रसंगातून अजूनही सावरली नव्हती दोघाशीं ती फारच तुटक बोलायची.. !!
कसातरी 1st sem ला तिने first class काढला..!!(हे कसातरी म्हणजे बाकिच्यांसाठी खूप काही असतं. कारण ENGINEERINGला1ST CLASS मिळवणं काही खायचं काम नसतं. 3 idiots मधे फार थोड च दाखवलय असो कथेच्या बाहेर विषय नको... !!) तर ती इथं आता रुळायला लागली होती..!! सगळं छान चाललं होतं..!! ती पुन्हा मैत्रीणींच servicing center झाली होती..!! अगदी पहिल्या सारखीच..!! कळी पुन्हा उमलायला लागली ..!! पुन्हा अगदी पहिल्यासारखीच मैत्रीणींसारखीच मित्रांमधेही मिळुन मिसळुन राहु लागली. एव्हढ्या सगळ्यातही काही बदललं नव्हतं ते म्हणजे ती चे भिरभिरणारे डोळे..!!
काय बरं शोधत असावी ती..?
हंम्म तर अशी ही ती..!!
आता गोष्ट पुढं जायची म्हणून म्हणा किंवा योगायोग म्हणा..!! हे तर आलच की..!! ती "तो"च्या त्या सुमार clg ला आली होती..!! हा.. आपली ती तर computer engineering ला होती अन तो.. mechanical engineering ला ...!! अगदी परस्परविरोधी..!! या दोन branch चा तर ३६चा आकडा..!! मग दोघांत मैत्री झाली कशी..? तेही तो सारख्या hopeless, अगाऊ, idiot पोराबरोबर..!!! हीच तर खरी गम्मत आहे ना..?
तर ती तो च्या सुमार clg ला आली होती..!! ती S.E. COMPUTER ला अन तो T.E. MECHANICAL ला..!! तसं दोघांची मैत्री होणं फारच दुरापास्त..!! पण ती झाली..!! त्या श्याम निळ्याच्या मनातच तसं असावं..!! ती third year (T.E. त ) ला येईपर्यंत दोघंही एकमेंकाना ओळखत नव्हते..!! अन तसं काही कारण नव्हतंही..!!पण ती च्या group कडून MECHANICAL वाल्यांची अपकिर्ती ती ला कळत होतीच..!! पण ती त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत होती.. !!त्या HOPELESS कार्ट्यानीं clg days मधे नुसता उच्छाद मांडला होता..!! mismatch day च्या नावाखाली भाई डे करून त्यांनी डेज मधे नवाच पायंडा पाडला होता..!! traditional day ला तर चक्क clg campus मधे तो त्याच्या hopeless group ने लग्नातला band आणला होता..!! अन आख्या clg ला त्या band च्या तालावर नाचवलं होतं..!! त्यात ते नाकं मुरडणारे, तो च्या group ला hopeless म्हणवणारे सगळेच होते..!! पण त्याला तो च्या hopeless group चा काहीच आक्षेप नव्हता..!! कारण ते सर्व फक्त त्यात enjoyment पाहत होते..!! अन तो काहीतरी वेगळं..!! तो clg चा cultural coordinator म्हणून काम करत होता.. !!अन त्याला फक्त दिसत होतं ते या वाईटातलं चांगल..!! त्यांची अभेद्य unity ज्या पुढे त्याने clg management लाही नमवलं होतं..!! याच unity चा तो विधायक कामासाठी उपयोग करायचा अगदी त्या hopeless टाळक्यांच्याही नकळत..!!
असो.. तर तो असा एक salient leader..!! पण तो अजूनही त्या जुनियरच्या प्रकरणातून सावरत नव्हता..जेव्ह्ढा वरून अलिप्त अन रुक्ष वाटायचा त्याहूनही अधिक हळवा.. अन भावनिक..!! पण हे सर्व तो त्या रुक्षपणाच्या कातडीखाली ओढून जगत होता..!!
ती ही असंच काहीसं जगत होती..!! clg ची टारगट पोरं म्हणूननच ती तो च्या त्या hopeless group कडे पहायची..!! तर असेच दिवस बदलत होते..!! त्या एक मजली निर्मिती अवस्थेतील इमारतीला आता कुठे clg च खरं clg पण मिळत होतं..!! ते तो च्या ६० जणांच्या इरसाल अन खोडसाळ पणामुळे..!! T.E. च्या लास्ट सेम ला तो कुठल्याशा एका company त place झाला..!! आता तो आणखीणच free झाला होता..!!आपल्याला हवं ते करायला मिळेल..!! clg च magazine करता येईल..!! फिरोदियात काम करायला मिळेल..!! अन काय काय..? या सर्वांमधे त्याचं कविता लिखान चालुच असायचं..!! तो कविता करतो यावर कोणाचाच विश्वास बसत नव्ह्ता..!! अन का बसावा..? mechanical engineer अन कविता..? त्याच्या training n placement officer ला याचं फार कौतूक वाटायचं..!! झालं कसबसं त्याने T.E. काढलं.. अन B.E. च्या FINAL YEAR ला आला..!!
आता एकच वर्ष राहिलं होत त्याचं clg संपायला..! अन खूप स्वप्नं..!! B.E. FINAL YEAR असताना एव्ह्ढं सगळं करणं म्हणजे अवघडच होतं..!! पण आपण हे सारं करायचं असा त्याचा हट्ट..!!B.E. FIRST CLASS हवा म्हणून तो खूप कष्ट घेत होता..!! शेवटच्या सेम चा backlog घेउन त्याने B.E. FIRST SEM दिली..! result मनासारखा आला होता..!! Engineering मधे आयुष्यात पहिल्यांदा तो first class बघत होता..!! नोकरी अन first class या दोहोच्या खुशीत त्याने सर्वांना पेढे वाटले..!! काहीतरी मिळवल्याचा आनंद कसा enjoy करायचा हेच तो कोणातरी दाखवत होता..!! फारच expressive होता तो..!! "आयुष्यात पुन्हा काही तरी घडत होतं अन तेही मला हवं तसं हवं तेव्हा..!! यावेळी मी misfire नाही झालो..!!" ह्म्म ..!! Engineering च्या प्रत्येक गोष्टीला, theory ला तो आपली philosophy लावून पहायचा अन जाम खूश व्हायचा..!! Engineering त्याचं passion होतं अन philosophy आयुष्य..!!
Engineering च्या प्रत्येक theory त तो आयुष्याची philosophy आपल्या style ने शोधायचा..!!
"THIRD SIDE OF COIN" असंच त्या STYLE ला तो म्हणयाचा..!! फारच येडा.. !!
"आपलं वयं काय अन आपण करतोय काय..? आई-बापानं मोठ्या आशेने आपल्याला इथं पाठवलं ते ही philosophy पाजळायला का..?" असंच काहीबाही म्हणत, सारेच त्याला वेड्यात काढायचे..!! पण त्याला याचा काहीच फरक पडत नव्हता..!! फक्त आपल्या terms वर life कशी जगायची हेच त्याला माहित होतं...!! कुणाचीही पर्वा न करता..!! बेजबाबदारपणे..!! अगदी आपल्या ती च्या उलट..!
तर ह्या तो च एक स्वप्न होतं ,ती "THIRD SIDE" सार्या जगाला दाखवायची..!! आयुष्यातलं सर्वात मोठं अन जिद्दीचं स्वप्न..!!"THIRD SIDE OF COIN" मराठी तून लिहायचं..!! सगळेच त्याला वेड्यात काढायचे अन "अभ्यासात लक्ष घाल, लास्ट सेम ला distinction काढशील..!" असा नकोसा सल्ला द्यायचे..!! झालं first sem संपली अन B.E. ची खरी धावपळ सुरु झाली..!! project work, submission, viva`s, days, annual gathering, industrial visit, first class, send-off..!! अन आपल्या hopeless कार्ट्यांसाठी नोकरी (placement) बाप रे....!! या सगळ्यात तो आपली स्वप्न पूर्ण करील असं कधीच वाटत नव्हतं..!! तो clg culture committee मधून बाहेर पडला होता तरीही, यातलं एक तरी स्वप्न तो पुर्ण करणारच होता..!! त्या श्यामसुंदराने असंच काहीतरी ठरवलं असणार आपल्या एकमेव सखी साठी..!! या सर्व व्यापातून तो clg cultural committee ला magazine साठी पाठपुरावा करत होता..!! अन शेवटी तेही त्याच्या हट्टा पुढे नमले.. अन magazine committee form झाली..!! कशीबशी clg magazine committee form झाली अन तो च्या एकाधिकारशाहीमूळे (?) तो आपल्या clg च्या first magazine चा chief editor झाला..!! तो editor झाल्यामूळे magazine ला खूपच थोडा प्रतिसाद मिळत होता..!! पण याचा तो वर काहीच परिणाम होत नव्हता..!! तो समर्थ होता..!! फार जबरदस्त उत्साह अन ATTITUDE याच्यां जोरावर त्याला कोणाची ही गरज वाटत नव्ह्ती..!! अन हे सारं ती मोठ्या कुतुहुलाने पाहत होती..!! magazine फसलं तर किती त्रास होइल याला..!! अशीच मनोमन विचार करीत होती..!!
ती आता त्याच्या team ची १ member होती..!! ENGLISH section ची editor होती.. !! पण अजूनही दोघांत हवा तसा संवाद घडायचा होता.. !! committee होऊन बरेच दिवस झाले तरी काहीच action होत नव्हती..!! तो च्या उपस्थितीमुळे बर्याच जणांनी committee तून माघार घेतली होती..! पण त्याला त्याचा काहीच फरक पडत नव्ह्ता..!! बस्सं, हे magazine माझं आहे..!! अन ते मी करणारच एव्ह्ढचं त्याला माहीत होतं..!! ती ला कधी कधी या महत्व़कांक्षी so called leader चा फार त्रास ह्वायचा..!! पण तो तसूभरही आपल्या आक्रमकतेपासून हटत नव्हता..!! सगळ्याच team member ना त्याची भिती वाटायची..!! magazine committee form होऊन् बरेच दिवस झाले होते, पण तरीही मैत्री व्हावी असा काही संवाद त्या दोहोंत होत नव्हता..!! तो त्याच्या B.E. busy schedule मधून आपल्या hopelessकार्ट्यांसाठी industrial visit organize करत असल्यामूळे त्याचं जरा magazine कडे दुर्लक्ष होतयं..!! असंच काहीसं सर्वांना वाटायचं, पण रोज किमान अर्धा तास तरी तो त्यासाठी स्वताच विचार करत बसायचा..!! तो अर्धा तास कुठे मिळेल याची त्याला सुध्दा खात्री नसायची..!! म्हणूनच लेक्चरला मागे बसून, research work चा project असून, workshop मधे ,जिथं म्हणून वेळ मिळेल तिथं तो magazine साठीची रूपरेखा तयार करायचा..!! ती ही आपल्या clg magazine साठी काम करण्यास आतूर होती..!! तो चं ते dedication अजूनही कोणालाच दिसत नव्ह्तं..!! या सर्वांत त्याच्या बाकीच्या activity (clg days, submissions, campus placement, mesa (MECHANICAL ENGINEERING STUDENT ASSOCIATION),annual day साठी ची hopeless theme ) चालूच होत्या..!!
तो अन ती यांची खरी ओळख झाली ती, त्याने अन त्याच्या T.P.O.(TRAINING AND PLACEMENT OFFICER ) ने आयोजित केलेल्या READERS CLUB SUMMIT मुळे..!!
readers club च्या उदघाटनाच्या वेळी तो ने जबरदस्त कहर केला..!! अन तो पटण्यासारखा होता..!!
तो च्याच branch च्या कोणा एका मास्तराने..
" मला कुसुमाग्रज फार आवडतात..!! माझे सर्वात आवडते कवी आहेत, अन मी इथे आज त्यांचीच कविता सादर करणार आहे.."
त्याच्या या प्रतिक्रियेला कारण नसताना त्यांच्या भाषेत आक्षेप नोंदवत.. "आजकालच्या मुलांचं वाचन फार कमी आहे, त्यांना शाळेत कुठेतरी शिकलो म्हणून कुसुमाग्रज माहीत आहेत..!! पण विंदा सारखा कवी माहीत नाही.. !! त्यांना फक्त जे प्रसिद्ध तेच दिसतं अन पटतं..!!" अ॑सच सूमारे १५ मिनिटांचं बोरिंग लेक्चर दिलं.. !! तो चा चेहरा रागाने फणफणत होता..!! कधी हा मास्तर ह्याचं लेक्चर संपवतोय अन कधी त्याला झापतोय असचं त्याला वाटत होतं..!! झालं एकदाचे ते मास्तर त्यांचे विचार ओकून मोक़ळे झाले..!! तो तसाच ताडकन उठला.. अन बोलु लागला.. तेही ३०-४० जणांच्या समूहासमोर.. समूहच होता तो..!!!
"फार चुकीचं बोलला सर आपण.. !!"
अन तो त्याने वाचलेल्या मनाच्या श्लोकांपासून सुरुवात करत विषय थेट तुकारामांच्या अभंगापर्यंत आणला..!! संत रामदास अन संत तुकाराम या समकालीन कवींची उदाहरणे तो मुद्दामच देत होता..!! हेच पटवुन द्यायला की विंदा असोत वा कुसूमाग्रज कवी फक्त कवी असतो..!! त्याची तुलना कधीच दुसर्या कवीशी करता येत नसते..!! कारण सृजनशीलतेला व्यक्तींची बंधने नसतात...!! त्यामुळेच ती व्यक्तींव्यक्तींनुसार बदलत असते..!!
"विंदा अन कुसुमाग्रजांबद्दल बोलायला आपन खूपच लहान आहोत हे मलाही कळतय पण कोण श्रेष्ठ हा अट्टाहास कोणासाठी अन कशासाठी ..?"
तो बोलतच होता.. सारा समूह स्तब्ध..!!
अन ती.. ती ची भिरभिरणारी नजर पहिल्यांदाच कुठेतरी स्थिरावली..!!
"हा तोच magazine committee चा chief editor आहे का..?"
ती संभ्रमात..!! किती आत्मियतेने बोलतोय हा..!! आपला मुद्दा बरोबर आहे हे समोरच्याला किती आक्रमकतेने पटवतोय..!! की समोरचाही याबद्दल नक्कीच विचार करेन की आपलं कुठं चुकलं!! अन तेही तो हे सारं आपल्या मास्तरांपुढे बोलतोय..!! ज्यांच्याकडे कदाचित त्याचे viva/orals चे मार्क्स असतील..!! किती निर्भीड..!! अन आक्रमक..!! great attitude..!! माझं ते खरं पेक्षा कुणीतरी खरं ते माझं असं म्हणत होतं..!! अन ती हे सर्व पाहत होती..!! स्थिरावलेल्या नजरेने..!!
ती ला कुठेतरी आतून त्याचं समर्थण करावं असं वाटत होतं.. पण..? जाउ दे म्हणत तिने विषय सोडुन दिला..!! ती ला हे पटतचं नसावं की कोणी सत्यासाठी एव्हढं तळमळीने बोलु शकतो..!! वागू शकतो..!! पण तो फारच उद्दाम.. अगाऊ..! आपलं तेच खरं करवून घेणारा..!! किती सहज जमायचं ते त्याला..!! कारण ज्याला तो आपलं म्हणायचा तेचं खरं असायचं..!! ती नं आज तो चं एक वेगळंच रूप अनुभवलं होतं..!! फक्त ती लाच ते अनुभवता येत होतं..!! हळूहळू तो ची ती बुरसटलेली image ती च्या मनातून पुसली जाऊ लागली होती..!! अशीच एकदा magazine ची meeting चालू असताना तो फार भडकला होता..!! ३ आठवड्यांनंतरही कामात काहीच प्रगती दिसत नव्हती..!! त्याने सगळ्यांनाच फैलावर घेतले होते..!!
"लोक इथे फक्त magazine मधे आपलं नाव येइल म्हणुन आलेत..!! त्यांना कामाशी काहीच देणंघेणं नाही ..!! मी फक्त तुमच्याकडून काम करून घेणार आहे..!! तुम्ही मला कामचुकार म्हणा नाहीतर काहीही...!! मी सगळी कामे तुमच्याकडूनच करून घेणार आहे..!! ज्याला कोणाला interest नसेल तो बाहेर पडू शकतो..!! मला असल्या पोकळ लोकांची काहीच गरज नाही..!! उद्या तुम्ही जेव्हा पुढचं magazine कराल तेव्हा तुम्हाला कोणालाच माझी आठवण येता कामा नये..!! कुठलंही काम करताना मी तिथं असायला हवं होतं असं तुम्हाला बिलकुल वाटलं नाही पाहिजे..!! तुम्ही independent असायला पाहिजे..!! कोणा एका व्यक्तीच्या अस्तित्वामुळे किंवा गैरहजेरीमुळे आपलं कुठलंच काम अडायला नाही पाहिजे..! तुम्हाला खूप वाईट वाटलं असेल माझं बोलण ऐकून , कारण तुम्ही सर्व मन लावून काम करताय हे मलाही दिसतय.. हे magazine होणार हे मला माहित आहे ..!! कारण आज मी आहे..!! पण पुढलल्या वर्षी मी नाही म्हणून magazine बंद पडायला नाही पाहिजे..!! मला चांगला leader व्हायचयं, successful leader नाही..!!"
सगळ्यांनाच त्याचं बोलणं खूप लागलं होतं.आपल्या ती ला ही..!! ती ला ते सहन होत नव्हतं..!! कारण ती नाव करायला इथं नव्हती आली..!! ती ला खरच मनापासून काम करायच होतं,तिथं त्या meeting म॑धे ती काहीच बोलली नाही., त्याने board वर लिहिलेला त्याचा mobile number तिनं आपल्या वहीत लिहून ठेवला..!! सगळ्यांनीच घेतला..!! आख्खा lunch hour तो चं ते lecture ऐकण्यात गेल्याने सगळेच वैतागले होते. अन ती तर खूप..!! मेस्स आता बंद झाली होती..!! बाहेरच खावं लागणार होत ती ला..!!
संध्याकाळी ती ने तो ला call केला..!! तो कुठल्याश्या design च्या class (CATIA) ला बाइक वरून चालला होता. तरी तो ने तो call घेतला.ती चा नंबर तो कडे नव्हता. तरी तो unknown call त्याने घेतला..!! ती ने सरळ त्याला
"मी magazine मधे नाव होइल म्हणून नाही आले.. मला मनापासून काम करायचंय..!! म्हणून मी आले..!! तुझा काहीतरी गैरसमज झला आहे..!!"
असं सांगत तिच्या मनातली बोच बोलवून दाखवली..!! तो ती ला फक्त
"मी जे काही बोललो ते in general होतं.. कोणालाही personally target करायचं नव्हतं..!!" एव्हढंच बोलून फोन ठेवून उद्या बोलु म्हणून तिला झिडकारलं..!
दुसर्या दिवशीच्या magazine meeting मधे कालच्या त्या "चांगला leader व्हायचयं, successful leader नाही.." चं त्यानं स्पष्टीकरण दिलं..!!
" चांगला leader नेहमी leader च बनवतो.. पण successful leader फक्त follower बनवतो.. मला माझे follower नाही, leader बनवायचेत, उद्याच्या magazine चे leader..!! जे पुढचं magazine lead करतील..!!" म्हणूनच मला चांगला leader व्हायचयं, मझ्यानंतर हे magazine बंद नाही पडायला पाहिजे..!!"
तो चं ते बोलणं ती तल्लीन होऊन ऐकत होती.त्याची third side ती ला हळूहळू उमजत होती..!! आता तिचं तो बद्दलचं मत पुर्णपणे बदलल होतं..!! आता ती त्याला रोजच फोन करून त्रास (!) द्यायची..!! हळूहळू दोघांचीही चांगलीच गट्टी जमली..!! रोजच फोन, sms चालू लागले..!! पण तो म्हणावा इतका involved होत नव्हता. हे ती ला ही उमजत होतं..!! तो जमेल तितकं ती पासून दूर रहायचा प्रयत्न करायचा,अन ती ही तितकंच त्याला आपलसं मानायची..!! तो अजूनही जुनियर च्याच विचारात गुंतलेला असायचा.एव्ह्ढ्या सहज तो तिला विसरणार नव्हता. असेच दिवस जात होते, ती T.E.च्या LAST SEM ला होती, अन आता campus placements साठी प्रयत्न करित होती. academics चांगल असल्याने ती चं नक्कीच कुठल्याना कुठल्या चांगल्या company त place होईल यावर ती च्या सर्व हितचिंतकाना विश्वास होता. झालं... clg ला L & T आली..!! software मधली एक मोठी company..!!
ती ची जोरदार तयारी चालली होती..!! त्यात तो च्या so called magazine साठीचं काम पण सूरु होतं. अन मैत्रिणींच servicing center ही..!! apti छान गेली होती..!! त्यामधे ती नं TOP केलं होतं..!! आता HR ROUND होणार होता. ती पुर्ण तयारीत होती..!! प्रत्येक प्रश्नाला ती मोठ्या आत्मविश्वासाने सामोरे जात होती. interview व्यवस्थित झाला होता. ती खुश होती. result ची वाट पाहत होती.
L&T ने RESULT OUT केला..!! ती त्यात select नाही झाली..! फार upset feel करत होती ती. एवढ्या मेहनती नंतर ही ती चं selection झालं नव्हतं..!! फारच खचून गेली होती ती..!! या servicing center ला ही आता servicing ची गरज होती..!! कुणाशी तरी मन मोकळं करावसं वाटत होतं ती ला. पप्पांना फोन केला तर ते शाळेत होते, फारसं बोलता आलं नाही..!! आता कोणाशी बोलावं..!! अन ती ला तो आठवला..!! सकाळीच तो ने ती ला result साठी best luck wish केलं होतं..!! ती नं तो ला फोन लावला. पण तो चा फोन बिझी...!! १० मिनिटांनी पुन्हा लावला.. पुन्हा बिझी..!! सुमारे अर्धा तास तो चा फोन बिझी होता..!! ती जाम वैतागलेली..! रूमवरच्या त्या कृष्णाच्या फोटोकडे मोठ्या आशेने पाहत,डोळ्यांच्या कडांपर्यंत आलेली अश्रु रोखत तो आहे म्हणून स्वतालाच धीर देत होती..!! थोड्यावेळाने पप्पांचा फोन आला. ती फोन वर मनोसोक्त रडली..!!
"का तो माझी एव्हढी परिक्षा पाहतोय..?"
ती चे पप्पा तिला समजावत होते. ती ला ते सर्ब समजत ही होतं.. पण पटत नव्हतं..!! सुमारे १ तास ती पप्पांशी बोलली.. अन i am OK paa..!! म्हणत फोन ठेवला. पण तरीही ती चं काही समाधान होत नव्हतं..!! पुन्हा ती ने तो ला फोन केला.. फोन पुन्हा बिझी..!! मागचा गेला दीड तास ह्याचा फोन बिझी लागतोय..!! माझा फोन येत असूनही कोणाशी हा एव्हढं बोलतोय..? ती ने तो ला येतील तेव्ह्ढ्या शिव्या देउन झाल्यावर, तो ने आलेले ती चे १० miss call पाहून लगेचच तिला miss call दिला..!! ती अजूनच उखडली..!! अन लगेच त्याला call back केला..!!
"काय मग कसा झाला interview.. !! चांगलाच गेला असणार म्हणा"
तो चा सर्द आवाज..!! ती फक्त "हेलो.." म्हणून शांत झाली होती. फक्त तिचा हुंदका ऐकू येत होता. तो ने मग तो मस्ती मजाक वाला आपला नेहमिचा hopeless tone बाजूला ठेवत ती ला seriously काय झालं म्हणून विचारलं..!! ती ला अजूनच भरभरून येत होतं. सुमारे १५ मिनिटे ती तसाच हुंदका दाबून रडत होती..!! अन तो फक्त निशब्द..!!
"झालं रडून ..? की अजून रडायचंय..?"
ती ला वाटलं "का आपण याला फोन केलाय? कशाला? याला काहीच नाही वाटलं?"
"किती रडायचंय तेव्हढं रड..!! डोळ्यातून अश्रु गेले ना की फार हलकं वाटतं.. मन मोकळ होतं अन पुढची कामं करायला उत्साह येतो..!! मला कोणीतरी म्ह्टलं होतं अश्रू हे जिंवत पणाचं लक्षण असतं म्हणून.. काय झालं रडायला..?"
"मी नाही झाले L & T त select..!! H.R.मधूनच बाहेर..!!" ती चा हुंदका वाढतच होता..
"ठीक आहे ना मग.. एव्हढ्यात हरलीस..? अन रडून काय करणारेस..? मी तुला रड म्हणतोय ते तुला हलकं वाटावं म्हणून.. अश्रुंच्या आड पराभव कधीच लपत नाही.. आपण कुठे कमी पडतोय हे नको का बघायला..? जिथं कमी पडलो तिथं नको का सुधारणा करायला.. पराभवाची कारणं शोधं..!! अन प्रत्येक वेळीस आपण कमी आहोत म्हणून च आपला पराभव होत असतो असं काही नाही..!! आपण प्रत्येक बाजुत श्रेष्ठ असूनही आपले पराभव होत राहतात काळाची गरज म्हणून.. एक दोन परभवानेच खचून गेलीस..? अजून खूप पहायचेत असले क्षुल्लक पराभव ...!!"
ती चा हुंदका थोडा थोडा थांबत होता.. डोळे पुशीत त्याचं ते सांत्वन स्विकारत होती. तो ती ला बरीच उदाहरणे देत होता.. बरीचशी ती ला माहित होती.. पण तरीही ती तल्लीन होऊन ऐकत होती. सुमारे तासभर दोघं बडबडत होते..!! तो ती ला नकोश्या वाटणार्या interview tips देत होता..!!
" आपण ठरवलं तर आपण कुठेच कमी नाही पडत..!! बस्स.. मन लावून काम करायचं..!! इतकं की यश सुध्दा हसत हसत आपल्याकडे यायला आसुसेल ..! आपली बलस्थानं कोठली ती ओळखून वापरायला शिकलं पाहिजे..!! तू खूपच expressive आहेस.. तू काही बोलायच्या आधीच तुझा चेहरा सगळं काही सांगून जातो..!! ते expression control करायला शिक..!! तुझे प्लस पोईंट मी नाही सांगणार ते तुला चांगलेच माहित आहेत.. !! हार जीत तर चालतच राहते रे.. अन एक सांगू हार असल्याशिवाय जीत ला महत्व नाही रे.. खूप कष्टाने एखादी गोष्ट मिळाली ना तिचा आनंद असा काही लूटायचा की बस्स.. त्या आनंदाला स्वताहून तुझ्याकडे यावसं वाटेल.."
ती ला आता सर्व काही पटलं होतं..!! साडे-सहा वाजून गेले होते..!! तो चा सात ला CATIA चा class होता.पटकन आवरत.. ती ला थोडी उमेद देत फोन ठेवत त्याने बाईकला किक मारली अन भुर्र उडाला.. !! हो ती च्या साठी त्याचं ते पटकन track change करण भुर्र उडण्यासारखंच होतं.
किती काही शिकायला मिळालं होत त्या एक दिड तासात ती ला..!!
अन तो ला..? त्यालाही..!! ती चा फोन यायच्या आधी तो जुनियरशी बोलत होता..!! तिचे आभार मानत होता..!! अन तो ही रडत होता..!! पुर्ण न होणार्या स्वप्नांसाठी..!! अन दुसरीकडे कोणाला तरी "हार जीत तर चालतच राहते रे" असंच समजावत होता..!! दोघंही एका वेगळ्याच मूड मधे..!!
त्या दिवसापासून ती तो ची खरी फॅन झाली होती.. तो च्या भाषेत "भक्त". त्याला खूपच जवळचा मानू लागली..!! महिनाभरापुर्वी ती तो बद्दल करत असलेला विचार अन आज करत असलेला विचार यात जमिन आसमानचा फरक होता. पण त्याला याचा काहीच फरक पडत नव्हता..!! अन पडणारही नव्हता..!! तो फक्त आपल्या terms वर life जगत होता..!! कोणाचीही पर्वा न करता..!!अगदी भरभरून..!!आत कुठेतरी कोणीतरी नाही म्हटल्याचं दुख लपवून..!! ती आता पुन्हा बोलकी होऊ लागली होती. पुन्हा काहीतरी गवसलं होतं तिला. अन तो अजूनच अंतर्मुख..!! अगदीच अळवावरच्या पाण्यासारखा..!! अन ती त्याला स्पर्शीण्याचा ध्यास घेतलेली..!! magazine चं बरचस काम संपत आलं होतं. annual day ही झाला, त्यात तो चा hopeless group पुन्हा गाजला. पण यावेळी चांगला म्हणून!! अन तो खुश होता ते त्यांच्यातलं एक अनोखं रूप जगाला दाखवलं म्हणून.. ती third side यशस्वीपणे त्याने सर्वांपुढे मांडली होती, अन सर्वांनाच ती पटली होती. गेली ३ वर्षे त्याच्या hopeless group बद्दल असलेली सर्वांची मते त्या एका दिवसाने बदललेली होती..!! एका रात्रीत सर्व hopeless कार्टी star झाली होती..!!
असेच दिवस पुढे जात होते.
७ एप्रिल २००८ तो चा वाढदिवस..!! ती च्या तो लक्षात होता.कसा ते माहित नाही..!!
अन तो ला तो का आहे म्हणून वाईट वाटायचं..!! कारण २ वर्षांपुर्वी याच दिवशी तो ला जुनियर कडून नकार मिळाला होता. काही केल्या तो ते विसरवू शकत नव्हता. ती अन बाकीच्या magazine team ने त्याचा birth-day celebrate करून तो ला surprise द्यायचं असं ठरवल होतं. ती ने सगळी जय्यत तयारी केली होती. मीटींग झाल्यावर ते सगळे पी. जी त (clg जवळ चा एक छोटेखानी कट्टा) जमणार होते अन त्याला तिथं बोलावून surprise birthday wish करणार होते. सकाळपासूनच तो चा मूड छान होता. त्यामुळे सगळेच बिनधास्त..!! एरव्ही तो चा मूड संभाळुनच सगळी कामं करायचे सगळे magazine वाले..!! (हे तो च्या hopeless group ने दिलेलं विशेषण!! ) मीटींग झाल्यावर ती ने तो ला पी.जी. त यायला सांगितलं..!! तो project work मधे बिझी असल्याने थोड्यावेळाने येतो म्हणून ती ला उडवलं..!!
तोपर्यंत ती ने cake वगैरे बाकीची सगळी तयारी केली होती. १२.३० ला तो पी.जी.त आला. तिथं फक्त ती, ती ची एक मैत्रीण अन एक मित्र तिघेच..!! (बाकी कुणालाच तो च्या birthday बद्दल उत्सुकता नव्हती. ते दोघंही फक्त ती च्या आग्रहामुळे आले होते.) तो आल्याआल्या तिघांनीही त्याला wish केलं. तो ला सारचं अनपेक्षित..!! wish करून तिघे त्याला cake लावायला पुढे सरसावले. त्याने पटकन त्या सर्वांना अडवलं. अन "कोणी करायला सांगितला हा शहाणपणा? मला नाही आवडत असली थेरं करायला.कोणी सांगितलं माझ्यासाठी एव्हढं करायला..!! नाही आवडत मला माझा birth-day celebrate करायला..!! "
सगळेच स्तब्ध..!!
"किती नालायक आहे हा.. आम्ही एव्हढ्या आपुलकिने याचा birth-day celebrate करतोय अन हा..!"
येणार्या सगळ्या प्रतिक्रिया त्याला माहित होत्या.अन तरिही तो असा वागत होता. कारण त्याला त्याचा काहिच फरक पडत नव्हता. ती च्या डोळ्यांत मात्र दोन अश्रु हळूच तरारले. पण तो ने च सांगितल्याप्रमाणे तिनं ते control केलं. तो थोडा शांत झाला, अन मग cake फक्त खायला असतो.. तोंडायला फासायला नाही म्हणत त्याने cake कापला. त्याचं ते वागणं सर्वांनाच खटकलं होतं. उपकार केल्यासारख त्याचं ते येणं..!! अन मला कुणाचीच गरज नाही हा अहंभाव असलेला खराब ATTITUDE या सगळ्यांचाच ती ला खूप त्रास होत होता..!! पण तो निर्विकार!! अगदीच अळवावरच्या पाण्यासारखा अलिप्त..!!
त्याचं ते वागणं ती ला खूपच लागलं होतं. पण त्याच्याकडे त्याच्या प्रत्येक विचित्र वागण्याचं समर्थण होतं.. !!त्याला पटलेलं..!! अन इतरानांही ते पटावं असा त्याचा बिलकुल अट्टाहास नसायचा..!! ते त्याच्या अतिआक्रमकतेमुळे अपोआपच समोरच्याला पटायचं. ती तो च्या या विचित्र वागण्यामुळे खुपच दुखावली गेली होती. रूमवर जाउन खूप रडली.
"का मी त्याच्यासाठी एव्हढं करतेय? त्याच्यासाठी मी काहिच नाहिये..!! मी त्याला आपला मित्र मानलं म्हणुन त्यानं सुध्दा मला तसचं आपली मैत्रीण मानावं ही चुकीची अपेक्षा का करावी मी..? मी सगळ्यांनाच एव्हढा जीव लावते मग का रे कोणीच मला जीव लावत नाही. एव्हढी का रे वाईट आहे मी..?"
त्या श्यामसावळ्या ला समोर धरून ती खूप रडली. फारच हळवी होती ती. प्रत्येक छोटी गोष्ट मनाला लावून घेणारी. जितकं छोट्या गोष्टीतून ती ला मोठा आनंद मिळायचा त्याच्या कैक पटीने त्या छोट्या गोष्टींचा ती ला त्रास व्हायचा. पण तो जे काही वागला ते सर्व ती दुखरी जखम चिघळल्यामुळेच..! हे ती ला कुठे ठाऊक होतं..? त्यामुळेच तो ने आपल्या भवती एक अभेद्य अशी महत्वकांक्षी चौकट उभी केली होती. त्याच चौकटीचा त्रास ती ला होता. अन तो.. त्याला तर त्याहुनही अधिक...! चौकटीतल्या जगण्याचा तर त्याला फार तिटकारा यायचा. पण आज ती ने त्याची ती अभेद्य चौकट भेदली होती. अगदी सहज्,त्याच्याही नकळत! त्याच्या त्या वागण्याचा त्यालाही त्रास होत होता. त्याला रहावलं नाही. त्याने सरळ ती ला clg library च्या reading hall मधे बोलावल अन आपल्या sack मधून एक diary काढली,अन ती च्या पुढ्यात कुठलसं पान काढून
" इथून पुढं वाच, याच्या व्यतिरिक्त काहिच वाचु नकोस! ही पाचच पानं वाच्,उगीच इथं तिथं डोकावू नकोस!!"
म्हणत आपल्या त्या विचित्र वागण्याचं कारण सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
"कोण समजतो हा स्वताला? त्याची diary वाचायला देऊन माझ्यावर उपकार करतोय असं वाटतय याला!किती नालायक आहे..बाद !! एकदम बाद!!"
तिची प्रतिक्रिया मात्र अशीच काहीशी होती. पण तरीही ती ने त्याची ती diary वाचायला सुरुवात केली. तो ची ती diary त्याने English मधून लिहिली होती. ती अजूनच tense!! English तेही तो चं!! जो मराठीतून कविता करतो, त्याची English मधे लिहिलेली diary पाहून ती ला आलेलं tension स्वाभिवकच होतं. ती न ती पाच पानं वाचली.. त्यातलं ते दर्द English मधे असूनसुध्दा ती पर्यंत पोहोचत होतं. ती ला ते वाचून दोन गोष्टीं तर नक्कीच कळल्या होत्या!! पहिली म्हणजे वरवरून रुक्ष वाटणारी माणसं आत किती दर्द घेऊन जगत असतात्,ते दर्द लपविण्यासाठी त्यांना बाहेरून किती ओबड्धोबड असावं लागतं ना..? अन दुसरी म्हणजे मराठीत कविता करणार्याच English हे मराठी इतकंच fluent असु शकतं!! त्या diary त त्यानं बंदिस्त केलेली तो ची ती अपुर्ण स्वप्नच जवळून अनुभवत होती. अन एव्हढं होऊनही हा काही सुधारत नाही. उलट आधीच्या intensity पेक्षा जास्त intensity ने तो पुढची स्वप्न पहायचा..अगदी बिनधास्त..!! कसं काय जमतं याला..? ती आजवर फक्त स्वप्नच बघायची..! पण खरं तर ज्या गोष्टी तिच्या आवाक्याबाहेर असायच्या त्यांना ती स्वप्न म्हणायची. पण स्वप्नही पुर्ण होतात्,अन नाही झाली म्हणून ती बघणं सोडुन द्यायचं नसतं!! असंच काहीतरी वेगळं तिला तो ची diary वाचुन कळलं होतं. त्याची त्या पाच पानांतली दोन पानं असलेली त्याची अधुरी प्रेमकथा..!! सगळं काही ती अनुभवत होती. तीन पानात घरच्यांवर असलेले अपार प्रेम अन बापाबद्दल व्यक्त केलेला आदर अन लिहिलेल एक वाक्य
"papa i just want to be like you.. i am sorry dad.. i am sorry i failed.."
ते सगळं ती च्या डोळ्यापुढे फिरत होतं. तो ती diary घेऊन ती ला कालच्या असभ्य वागण्याबद्दल sorry म्हणत भुर्र उडाला..!! किती सहज जमायचं त्याला आपला track change करणं. १० मिनिटांपुर्वी इथं समोर रडवेला झालेला तो कुठल्या तरी गर्दीत मिसळून टवाळक्या करण्यात दंग होऊन गेला. जसं काही झालचं नाही. ती ला त्याच्याशी काहीतरी बोलायचं होतं! पण तो कुठं ऐकायला तिथं होता.केव्हाच पसार झालेला!! आज ती ला खूप बरं वाटत होतं. का कोणास ठाउक पण काहीतरी परत मिळाल्यासारखं वाटत होतं. कदाचित आधी ती पासून दुर गेलेले दोन्ही मित्र तो च्या रुपाने ती च्या आयुष्यात आज अवतरले असावेत म्हणून!! त्या दिवशी ती नं तो ला एक mail पाठवून आपल्या आयुष्याची कहाणीच सांगितली. त्यानं न विचारता, स्वताहून!! ती आज पहिल्यांदाच स्वताहून व्यक्त होत होती !! त्यानं तो mail वाचला. पण त्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. या सगळ्यात clg ला campus साठी अनेक company येत होत्या. ती मोठ्या आत्मविश्वासाने प्रत्येक apti crack करत होती final round पर्यंत जात होती. पण कोठेच select होत नव्हती. फार वाईट वाटायचं ती ला. पण मनात कोठेतरी तो सारखा मित्र आहे मला support करायला म्हणुन सगळं दुख विसरून पुन्हा जोमाने पुढच्या तयारी ला लागायची. दोघांची मैत्री फोनवरूनच फुलत होती. तो ती ला clg मधे मुद्दामच टाळायचा,ते आपल्या त्या hopeless image मुळे!! आपली ती hopeless image change करावी असं कधीच त्याला वाटलं नाही.आता तो ही ती ला आपली मैत्रीण मानु लागला होता. तो च्या extra attitude मुळे दोघांच्यात खूप भांडणे व्हायची.पण सगळी लटकीच असायची. कोठल्याही साध्या गोष्टींवरून त्यांच्यात जुंपायची !!त्यांची मैत्री अशीच फुलत होती. त्याच clg life आता संपत आलं होतं. फिरोदिया करण्याचं त्याचं स्वप्न अधुरच राहणार होतं!!
magazine ही जवळ जवळ पुर्ण होत आलं होतं. त्याची बरीचशी स्वप्न आता ती ला माहित होती. त्यातलच एक म्हणजे त्याचा idol संदीप खरे ला भेटण्याचं!! अन ते ही तो पुर्ण करणार होता. आपल्या magazine साठी त्यांची मुलाखत घेण्याचा योग तो च्या T.&.P मुळे आला होता. तो ने लगेच आपली team कामाला लावली. अर्थात त्यात ती ही होतीच. मुलाखतीसाठी दोघंही खुप मेहनत घेत होते. २८ एप्रिल २००८ सकाळी १० वाजून ३० मिनिटे.. मुलाखतीची वेळ ठरली. तो, ती अन दोघांचा एक मित्र (common friend हे असण फार गरजेचे!! ते असल्याशिवाय कथा कलाटणी घेत नाही!!) असे तिघे संदीप खरें ची मुलाखत घेण्यास त्यांच्या घरी गेले. मुलाखत व्यवस्थित झाली. त्या मुलाखतीं दरम्यान ती तो च पुर्ण होणार स्वप्न फार निरखून पाहत होती. किती आनंद दिसत होता त्याच्या त्या रुक्ष चेहर्यावर!! सगळ ती अनुभवत होती. त्याच्या diary त ल्या पानावर लिहिलेल एक स्वप्न तो किती सहजपणे सत्यात उतरवत होता!!
मुलाखत संपली तिघांनी ही संदीप सरांचा निरोप घेतला. मुलाखत संपवून ते स्वारगेट जवळच्या नटराज मधे काहीतरी खायला म्हणून थांबले. तो चा काहीतरी मिळवण्यातला आनंद तो, त्या दोघांबरोबर उधळत होता. बोलता बोलता तो हळूच म्हणून गेला
"मला आपल्या माणसांसाठी काहीही करायला आवडतं त्याच्यांसाठी काहीही..!! मग त्याच मोल पैशानं सुध्दा मी करत नाही."
यावर ती ची प्रतिक्रिया थोडी वेगळीच होती.
"तू कुठे कोणाला आपलं मानतोस रे..? तुझं आपलं माणूस म्हणजे नेमकं काय रे..?"
"आपल्या माणसला तु आपला आहेस हे सांगाव लागत नाही.. त्याला ते कळलचं पाहिजे..."
जवळ ठेवलेल्या पाण्याने भरलेल्या ग्लास कडे पाहत तो पुटपुटला
"काय आहे.. ग्लास फुल्ल भरलाय पाण्याने, पण लोक तरीही त्यात पाणी ओततात पण ते पाणी वाहूनच जाणार आहे..!! पण त्यात जर एखादा colorful drop टाकला ना ते रंगीत होतं.. ज्या color चा drop टाकलाय ना अगदी त्याच color च ते पाणी होतं".
glass full of water theory.. philosophy.. अगदीच कडु..!! फार लागलं ते तिला..!! का मी भरलेल्या ग्लासात पाणी ओततेय असच तिला वाटलं. फारच उखडली ती..!! पण तो colorful drop म्हणजेच आपली माणसं असतात असच काहीसं त्याला म्हणायचं होतं.
clg आता जवळ संपलच होतं.project work,submissions,send off सगळ उरकलं होतं. B.E.च्या orals ही जवळ आल्या होत्या. सगळ्याच hopeless कार्ट्यांनी आता clg ला येणं बंद केलं होतं.पण तो magazine च्या कामामुळे clg ला अधून मधून चक्कर मारायचा. तो असाच एकदा clg मधे आला होता. अन नेमक त्याच दिवशी ती ला घरी जायचं होतं. त्यान ठेवलेल्या मीटींगमुळे ती ला उशीर झाला होता.
तो मीटींग झाल्यावर ती ला भेटला अन म्हणाला
"हरकत नसेल तर मी तुला सोडतो स्वारगेट ला..!!"
ती एकदम चाटच.. "हा विचारतोय..? ह्याला कधीपासून दुसर्यांची काळजी वाटायला लागली?"
तिन नको म्हणून त्याला झिडकारलं.. पण तो ऐकेल तर शप्पथ ना?त्यान तिला तिचं सगळ सामान घेऊन clg च्या थोडं पुढेच मुद्दामून बोलावल. दोघही त्याच्या बाइकवरुन निघाले. तो नेहमीच तिच्याशी तुटक तुटक वागणारा आज एकदम मोकळेपणाने बोलत होता..!! अन ती त्याची ती बडबड गप्प ऐकत होती. रस्त्यावरुन जाणार्या प्रत्येक गोष्टीत तो आपली स्वप्न पहायचा अन ती ला
"हे बघ मी हे पण स्वप्न पुर्ण करणार आहे.. !! बघ करतोच की नाही..!!"
असच त्याच्या i will make it happen .. attitude मधून सांगायचा प्रयत्न करत होता.
"ऐ ती बघ Toyota Camry S8 MY DREAM CAR with 2362cc, 2.4 ltr.4 cylinder petrol engine, price rs. 24 lac on Indian road !!!"
रस्त्यावर जाणारी ती silver car बघुन तो जोरात ओरडला. जशी काही कोणीतरी याचीच कार पळवून नेतय. ती मनातल्या मनात उगीच बडबडत होती,
"याला स्वप्नां शिवाय दुसरं काही दिसतं की नाही..? माणसान स्वप्न पहावित पन इतकी झपाटल्या सारखी..?"
जी आजवर फक्त स्वप्नच पाहत होती ती..,ती आज त्याच्या स्वप्न पाहण्यावर आक्षेप घेत होती.पण त्याला आपल्या प्रत्येक स्वप्नावर जिवापाड विश्वास होता, ते पुर्ण होण्याचा..!! अन ती कसं काय हा एव्हढा बिनधास्त स्वप्न पाहु शकतो म्हणून अचंबित होती.
"किती आत्मियतेने पाहतोय तो ही सारी स्वप्नं..!! यातलं एक जरी स्वप्न पुर्ण नाही झालं तर किती त्रास होईल याला.. !!कदाचित तो उन्मळूनच पडेल..!! "
असाच विचार तिच्या मनात डोकावुन गेला. पण त्याला कशाचीच फिकीर नव्हती. १५ मिनिटात स्वारगेट आलं..!! गाडी नटराजच्या बाजूला पार्क करुन त्यानं ती ला कराडच्या S.T.त बसवल, अन ती चा निरोप घेत पुन्हा भुर्र उडाला..!!
तुमच्या की बोर्ड चा काही
तुमच्या की बोर्ड चा काही प्रॉब्लेम आहे का ? (.) पूर्णविरामाएवेजी (..!!) हे चिन्ह येतेय का ???????
राजे, फार भारि!!!
राजे, फार भारि!!!
मस्त........ पुढच्या भागाची
मस्त........
पुढच्या भागाची वाट पहतोय................
जेवढी वाचली तेवढी ठिक
जेवढी वाचली तेवढी ठिक ठिक.
त्या (!!) अवतरण (चूभुद्याघ्या) चिन्हामुळे पोथी वाचल्याचा फिल आला. आणि पहिले १,२ पॅरा म्हणजे रोहिणी मासिकातलं स्थळाचं वर्णन वगैरे.
वो!! मस्तच!!
वो!!
मस्तच!!
सुरेख लिहिल आहे, कथेचा वेग
सुरेख लिहिल आहे, कथेचा वेग आवडला