आज आपण काही महत्वाचा व्याख्या पाहू.
१. डबल टॉप
२. रेसिस्टन्स
३. डबल बॉटम
४. सपोर्ट
५. ट्रेन्ड लाईन
तक्ता १. मारुती सुझुकी
तक्त्याकडे लक्ष देउन पाहिले असता १४३५ किमतीला तो समभाग दोन वेळेस गेला व तिथून परत वापस आला. म्हणजे त्या किमतीला डबल टॉप फॉर्म झाला. पुढच्या वेळी जेंव्हा सुझुकी वर जाईल तेंव्हा मार्केट मधिल जाणकार जनता १४३५ किंमत आली की पोझिशन स्वेअर ऑफ करतील कारण तिथेच नेमका त्या शेअरला रेसिस्टन्स आहे असे मागील अनुभव सांगतो. जर त्या शेअर ने ती लेवल पार केली तर मात्र पुढिल ट्रेड पोझिशन घेता येते.
तक्ता २ टाटा मोटर्स -
ह्या तक्तामध्ये टाटा मोटर्स ह्या शेअरची २०१० मधिल वाटचाल दाखवली आहे. चार्टच्या खालच्या भागाकडे पाहा. तिथे मार्केट दोन वेळेस ६७० च्या आसपास आले व परत वापस गेले. म्हणजे दोन वेळेस डबल बॉटम फॉर्मेशन झाले. लक्ष दिले तर लक्षात येईल की ६७० आले की मार्केट मधिल लोकांनी शेअर विकत घ्यायला सुरु केले व हा समभाग वर गेला. म्हणजेच इथे त्याला सपोर्ट मिळाला असे म्हणू.
थोडक्यात -
डबल टॉप - किंमत ह्या किमती पर्यत येते व तिथून परत रिव्हर्सलला सुरु झाले. म्हणजे धिस मार्केट रनिंग आउट ऑफ स्टिम असे ओळखायचे व पोझिशन शॉर्ट करायला सुरु करायचे. सर्वच समभाग डबल टॉप दाखवत नाहीत वा जुन्या टॉपला आला तर तिथून वापस येत नाही. वरच्या टाटा मोटर्सने नंतर ही लेवल ब्रेक करुन १०६० पर्यंत धाव घेतली आहे.
रेसिस्टन्स - स्टिम संपल्यामुळे व जुन्या इतिहासामुळे इथे शेअर आला की डळमळतो. कालचे उदाहरण घ्या. निफ्टीने आजपर्यंत ५४८० ते ८५ ही लेवल चार वेळेस दाखवली, पैकी दोन वेळेस लेवल ब्रेक झाली व दोन वेळेस मार्केट खाली आले. काल जेंव्हा ११ लाख विक्रेते आणि ६ लाख विकत घेणारे पाहिले तेंव्हाच मी लिहले होते की स्टिम संपली आता मार्केट ५५०० वर जात नाही. (५५१५ वरुन रिव्हर्सल झाले.) थोडक्यात तिथे मनातला रेसिस्टन्स निर्माण झाला व लोकांनी प्रॉफिट बुक करायला सुरु केले.
डबल बॉटम - डबल टॉपच्या अगदी विरुद्ध. इथे किंमत आली की लोक तो समभाग विकत घेउ इच्छितात. कारण तो परत वर जाण्याची शक्यता असेत. पण केवळ डबल टॉप, डबल बॉटमला पाहून तो समभाग घेउ नये.
सपोर्ट - एखाद्या समभागाने एकच लेवल जर अनेकदा दाखवली तर तो त्या मार्केटचा सपोर्ट आहे असे गृहित धरले जाते. जितक्या जास्त वेळा ती लेवल दाखवली, तितका तो "सपोर्ट स्ट्राँग". परत निफ्टीचेच उदाहरण घ्या. आजपर्यंत ५३५० ते ५३७० ह्या आकड्यांमध्ये निफ्टी चार वेळा आले व दरवेळी ती लेवल "होल्ड" केली व तिथून "बाउंस बॅक" झाले. फक्त गेल्यावेळी ५३५० पर्यंत गेले, त्या आधी तर ५३७० च्या आसपास १० पाँईट मध्ये मार्केट वर जायला सुरुवात झाली होती. ह्याला सपोर्ट म्हणतात.
तक्ता ३ - लार्सन ट्रेन्ड लाईन.
साधी सोपी ट्रेन्ड लाईन ही एक अत्यंत उपयोगी टेक्नीक आहे. वरच्या तक्त्यास बघितले तर लार्सन अप ट्रेन्ड दाखवतोय. अनेक वेळेस एक तरी OHLC रेषा त्या लाईनला धरुन चालतीये. ट्रेन्ड लाईन काढने फार सोपे आहे. किमान दोन किंवा जास्त दिवसांचे लोज (बॉटम) एकत्र घेउन ती लाईन वर गेली तर तो अपट्रेन्ड आहे व किमान दोन किंवा जास्त दिवसांचे हाय (टॉप) एकत्र घेउन ती लाईन खाली गेली तर तो डाउन ट्रेन्ड.
आजचा व कालचा मिळून अभ्यास
तक्ता ४ - निफ्ट्री ट्रेन्ड - ह्यात मी एकाच बॉटम वरुन अनेक अप ट्रेन्ड दर्शविणार्या रेषा काढल्या आहेत, त्या लक्ष देउन बघा.
प्रश्न
१. निफ्टीचा ट्रेन्ड कसा आहे.
२. ह्या रेंज मध्ये निफ्टीने कुठे कुठे सपोर्ट घेतला?
३. ह्या रेंज मध्ये डबल टॉप किंवा डबल बॉटम दिसत आहे का? असल्यास कुठे?
४. निफ्टीला रेसिस्टन्स दिसत आहे का? असल्यास का?
५. मनातल्या मनात आणखी अप किंवा डाउन ट्रेन्डच्या रेषा आखा.
६. वरचा निफ्टी चार्ट निट पाहा, मी सांगीतलेले असे नाही असे काही दिसत आहे का? असल्यास काय?
७. http://in.finance.yahoo.com/ इथे जाउन किमान एका व कमाल कितीही मार्केटचे चार्ट पाहा.
* मार्केट हे संबंध मार्केटला जसे म्हणले जाते तसेच एखाद्या शेअरला पण कधी कधी संबोधले जाते. उदा टाटा मोटर्स
उत्तरे चुकली तरी हरकत नाही. पण एकदा http://in.finance.yahoo.com/ इथे जाउन विविध चार्ट बघा.
मी प्रयत्न करते. १. निफ्टीचा
मी प्रयत्न करते.
१. निफ्टीचा ट्रेन्ड कसा आहे.
अप्ट्रेन्ड आहे
२. ह्या रेंज मध्ये निफ्टीने कुठे कुठे सपोर्ट घेतला?
४९४०, ५२४०, ५३६२
३. ह्या रेंज मध्ये डबल टॉप किंवा डबल बॉटम दिसत आहे का? असल्यास कुठे?
डबल बॉटम : ५३६२
डबल टॉप : ५५९०(?)
४. निफ्टीला रेसिस्टन्स दिसत आहे का? असल्यास का?
माहित नाही
१,२,३ माझी पण उत्तरे हीच
१,२,३ माझी पण उत्तरे हीच आहेत.
फक्त, एक मुलगी, तुम्हाला 'डबल टॉप : ५४९०' म्हणायचे होते का?
माझ्यामते डबल टॉप : ५४९० आहे
४. निफ्टीला रेसिस्टन्स दिसत आहे का? असल्यास का?
मला वाटते, निफ्टीला ५४८०-५४९० या रेंजमध्ये रेसिस्टन्स आहे.
कारण, ४ वेळा निफ्टी या रेंजमध्ये आला. पण ही लेवल केवळ एकदाच क्रॉस करून तो वर गेला. अदरवाइज, परत खाली आला. (केदार, चूक असल्यास दुरुस्त करा)
६. वरचा निफ्टी चार्ट निट पाहा, मी सांगीतलेले असे नाही असे काही दिसत आहे का? असल्यास काय?
माहित नाही
केदार, १-४ उत्तरे Pals25
केदार,
१-४ उत्तरे Pals25 सारखीच आहेत.
६. वरचा निफ्टी चार्ट निट पाहा, मी सांगीतलेले असे नाही असे काही दिसत आहे का? असल्यास काय?
- निफ्टी हेड अन्ड शोल्डर पॅटर्न दाखवत आहे का?
तुम्ही मस्त समजवून सान्गता. ह्यावेळी निफ्टी ने डबल top दाखवला नाही, म्हणजे ५५१५ त्याचा top समजावा का?
सई
सर्व मुलींनी उत्तरे दिली.
सर्व मुलींनी उत्तरे दिली. मुली सिन्सिअर असतात असा निष्कर्ष काढतो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळ्यांची उत्तरे बरोबर आहे. पण पल्स म्हणतात तसे ५४९० असायला हवे. बहुदा ५५९० हे चार्ट निट न दिसन्यामुळे असावे किंवा टायपो असावा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी सांगीतलेले असे नाही, असे काही दिसत आहे का? असल्यास काय? >>
१. सगळ्यात डावीकडची ट्रेन्ड लाईन ही खरी ट्रेन्ड लाईन आहे. उजवीकडच्या दोनही आहेत, पण थोड्या फसव्या आहेत. खास करुन सगळ्यात उजवी.
२. ब्रॉड लेवल वर ५४७५ ते ५४९० रेंज मध्ये मार्केट आले की "स्टिम" संपते. म्हणून इथे रेसिस्टन्स फॉर्म होतोय. आजचा दिवस पण अपवाद नाही. (५४७९)
३. निफ्टी हेड अन्ड शोल्डर पॅटर्न दाखवत आहे का >> हो. इतर सर्व - लक्ष देउन बघा. सगळ्यात उजवीकडच्या दोन मोठ्या लाल रेषा म्हणजे शोल्डर व वर निर्मान झालेले एक डोके. हा पॅटर्न कधी कधी दोन दिवसात येतो, कधी कधी अनेक महिने पण लागू शकतात.
उत्तरे यायलाच हवीत असे अजिबात नाही, पण प्रयत्न केला तर व थोडे लक्ष देउन चार्ट पाहिला तर हे लक्षात यायला सुरु होते. असे लक्षात यायला काही महिने अभ्यास मात्र लागतो. हे सर्व चार्ट लाईव्ह आहेत. इतर पुस्तकांमध्ये दिसतात तसे बनवलेले नाहीत.
मुख्य टिप : हाव, भिती, ह्या गोष्टी मार्केट मेक किंवा ब्रेक करतात. लोकंच हे मार्केट चालवतात, त्यामुळे लोकांमध्ये असणारे सर्व ट्रेट मार्केट मध्ये असतात. हुशार लोक (म्हणजे जे पैसे कमवतात) ते ह्याचा वापर योग्य रितिने करतात. आपण जर हे शिकलो तर आपणही योग्य वेळी एक्झीट घेउ शकतो. लक्षात ठेवा एन्टर करणे हे फार सोपे असते, एक्झिट करणे अवघड!
उत्तरे द्यायलाच हवीत असेही नाही.
तो फक्त आपल्याला लक्षात आले का ह्याचा अंदाज घेणे आहे व त्यावरुन मी किती फास्ट वा किती स्लो जावे हे ठरवू शकतो.
तसेच इथे वाचून तुम्हाला तोंडओळख होईल, तुम्ही ज्ञानी होणार नाहीत. त्यासाठी इथे शिकलेले सर्व तुम्ही एक / दोन शेअर, इंडेक्स ह्याला लावले तरच तुम्हालाही कळायला सुरुवात होईल.
केदार माझी उत्तरे. १.
केदार
माझी उत्तरे.
१. बुलिश.
२. ४९४०, ५२४०,५३६२,
३. डबल टॉप ५५४०, ५४९०,
ड्बल बॉटम ५२३०, ५३६०,
४. ५४९० व ५५५० हे दोन रेझिस्टंट असू शकतात. मार्केट दोन हि वेळेला, तेथून परत आले.
सईनी ओळखलेला हेड अन्ड शोल्डर पॅटर्न आवडला. लक्षात आला नव्हता.
सुरेश, बुलिश नाही. रेंज
सुरेश, बुलिश नाही.
रेंज बाउंड आहे. फक्त रेंज मोठी होत चाल्ली आहे. आत्ता ती ५३६५ ते ५५०० (त्यातल्या त्यात ५३८०च) एवढी आहे. स्पेशली ऑगस्ट महिनाच पाहा. सुरुवातीला ५३६० च्या आसपास, नंतर परत वर, परत खाली , परत वर आणि परत खाली ५३८०. फक्त पहिली लाईन जी आखली आहे ती पूर्ण बुलिश आहे कारण ट्रेन्ड बुलिश होता.
लार्सन कडे बघा, लार्सन पार १९०० पर्यंत सरळ वर गेला. प्युअर अपट्रेन्ड. मग तिथून घसरुन तो १८०० रेंज मध्ये कन्सॉलिडेट होत आहे. एकदाका कन्सॉलिडेश पूर्ण झाले की तो परत मुव्ह होणार. मग त्यावेळी जर + बातमी (उदा अर्निंग्स) असल्यातर वर जाईल अन्यथा परत खाली. लार्सनचा चार्ट लक्ष देऊन पाहिला तर सगळ्यात डावी कडे पण हेड न शोल्डर दिसेल.
मास्तूरेंनी मागच्या भागात एक प्रश्न विचारला होता, त्याचे उत्तर ह्या माहितीतून हळूहळू देण्याचा प्रयत्न आहे, आणखी चार पाच भागात ही तोंड ओळख पूर्ण होईल.
मग आपण ही सर्व माहिती कुठल्याही तीन-चार शेअर्स वा इंडेक्स वर लावू.
केदार धन्यवाद. चांगले कळतय.
केदार
धन्यवाद. चांगले कळतय. मी जरा वेगळी मेथड वापरतो. येथे शिकलेले पण फॉलो करेन. Tata Motor ला ९८० चा सपोर्ट तू सांगितला होतास. खालि देत आहे. त्या निमित्ताने फाइल लोड होते का बघतो.
केदार काहि तरी लोचा झाला.
केदार
काहि तरी लोचा झाला. वरचा पार्ट आलाच नाही. My apology.
केदार, तुझ्यामुळे यातले
केदार, तुझ्यामुळे यातले काहीकाही कळायला सुरवात तर झाली,नाहीतर नुस्त्या रेघोट्या पाहून कात टीपी चालुए ते कळत नाही.
सुरेश्,हरकत नाही,अभयआहे. पुन्हा प्रयत्न करा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
डबल top ५४९० असव.. मला नीट
डबल top ५४९० असव.. मला नीट दिसलं नाही म्हणून उत्तरात ? टाकलं ..
तुमची लिहण्याची शैली छान आहे.. विषय अगदी सोपा करून सांगताय..पुढच्या भागाची वाट बघतेय.
मला हे सगळ जरा जड गेल केदार
मला हे सगळ जरा जड गेल
केदार सर, मी आधी दुसरा बेसीक अभ्यास करायची गरज आहे का? मी काय अभ्यास करु हे सगळ समजण्या साठी प्लीज गाईड करा.
SBI च्या साईट वर Market Watch
SBI च्या साईट वर Market Watch create करुन मी आज शेअर बाय केल, मार्केट वॉच कशी बनवायची आणी शेअर कस बाय करायच ते समजल पण कोणत्या कंपनिच सेअर घ्याव ? मार्केट वॉच मध्ये कोणत्या कंपन्या अॅड कराव्यात? हे कस ठरवायच
Bid Qty, Bid Price, Offer Price, Offet Qty, LTP, TTQ, Open, High, Low हे सुद्धा मला नव आहे, सध्या ह्याचा गुगल वर शोध करतेय, इथे कुणाला ह्या टर्म समजावता आल्या तर छान होईल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मर्केट वॉचच्या ग्रीड मधले बॉक्सेस लाल, निळे होत रहातात. ह्या रंगाचा इथे काय अर्थ समजावा?
मला अगदि बेसीक सुद्धा माहित नाही म्हणुन हे प्रश्न विचारत आहे.
"Bullish bar reversal chart
"Bullish bar reversal chart pattern" म्हणजे नक्की काय? हा पॅटर्न केव्हा व का तयार होतो? हा पॅटर्न तयार झाल्यास समभागाच्या किंमतीत (नजीकच्या/दूरच्या भविष्यकाळात) काय फरक पडतो? हा पॅटर्न रिव्हर्स होतो का? होत असल्यास कधी होतो?
Bid Qty, Bid Price, Offer
Bid Qty, Bid Price, Offer Price, Offet Qty, LTP, TTQ, Open, High, Low
बिड केआंटिती.. खरेदीला उत्सुक असणार्यांच्या एकून शेअरची संख्या
बिड प्राईस.. त्याची अपेक्षित किंमत
ऑफर ॑वांटिटी.. एकून विक्रीस असलेल्या शेअरची संख्या
ऑफर प्राइस.. त्याची प्राइस
एल टी पी.. लास्ट ट्रेडेड प्राइस
टी टी ॑यु टोटल ट्रेडेड ॑वांटीती.. आतापर्यंट आज झालेली शेअरची उलाढाल संख्या
ओपन हाय लो क्लोज.. सोपे आहे.
डे ट्रेडिंगसाठी मुविंग
डे ट्रेडिंगसाठी मुविंग अॅवरेजची पेअर वापरायची आहे. . कोणती वापरावी?
जा. मो. प्या. आपण
जा. मो. प्या.
आपण किती वर्षापासून ट्रेडिंग करत आहात. आणि आपण किती % सक्सेस आहात.कारण मोठ मोठे दिग्गज एक्सपर्ट सांगतात की ट्रेडिंग करणारे ९८% ट्रेडर loss जातात .यावर आपले मत काय आणि यावर आपला किती विश्वास आहे.किंवा ट्रेडिंग करून आपले जीवन यापन करणारे लोक आहेत का?किंवा करू शकतो का?
ट्रेडींग फॉर लिविंग असा धागा
ट्रेडींग फॉर लिविंग असा धागा आहे.. तिथे चर्चा करा याची...
http://www.maayboli.com/node/22556