टेक्नीकल अॅनॅलिसिस ओळख - २
Submitted by केदार on 2 September, 2010 - 17:10
आपण सर्वच जन नेहमी ऐकत असतो की फलाण्या माणसाला शेअर्स मध्ये एवढा फायदा झाला, तेवढा फायदा झाला. प्रत्येक गुंतवणूकदाराला वा ट्रेड करणार्याला असे वाटते की आपल्यालाही हा फायदा झालाच पाहिजे.
पण बाजारात शेअर्सचे, फ्युचर्स / ऑप्शन्सचे ट्रेडिंग करताना बरेचदा नुकसान होते व ह्या सर्वातील आधी असणारा उत्साह मग कमी होतो.