हाफ राईस दाल मारकेचा एच आर डी एम्'चा हा सेकंड लास्ट भाग आहे. मायबोलीच्या संपूर्ण व्यवस्थापनाचा मी शतशः ऋणी आहे. सर्व वाचक, प्रतिसादक व सुचवणी करणारे मित्र.. यांच्या अतिशय प्रेमळ प्रोत्साहनाशिवाय मला काहीही जमले नसते. त्यांचे आभार मानणे योग्य नाही. '-बेफिकीर'!
=================================================
आणि त्याचवेळेस वडाळी भुईला चांदवडच्या पुढार्याचा मुलगा असरार समीरच्या ढाब्यावर आपल्या पाच दाणगट मित्रांबरोबर पीत बसलेला होता अन त्याच्या भोवती विजू, विशाल आणि समीरने कोंडाळे केलेले होते.
विजू - और टेकडीपे जाके सो रहे एकदुसरेके साथ..
असरार - तेरा क्या जलराहाय लेकिन??
विजू - असरारभाई मेरे सामने मेरे होनेवाली बीवीको बंद किया ढाबेपे.. उसकी जबरन शादी बनायी एक लडकेसे.. ढाबेकेच.. और .. मै ये अन्याय सहता रहू क्या आपके होते हुवे..??
असरार - लडकीको मंजूर थाच ना पर?
विजू - लडकी डरके मारे वैसा बोल रही थी...
असरार - लेकिन जब हुवा तबीच क्यों नय बोला बे ***??
विजू - हमकोबी मारा था असरारभाई.. डरगये थे हमलोगां..
असरार - कौन मारा बे??
विजू - वो कोई पद्या करके लौंडा हय.. कोई गणपतचाचा है.. और अबूबकर..
असरार - और तू मार खाके आगया..
विजू - पंधराजन थे वो.. हम तीन और वो लडकी.. पुलीसके पास जानेको बी डरे हम
असरार - अबे ***** पुलीसके **की.. पुलीसवाले अब्बाके सामने जबान नय खोलते अपनी.. पुलीससे क्या डरताय... उठाके कायको नय लाया उसे??
आता समीर बोलला..
समीर - असरारसाहब.. मेरा बी एक लडकीसे प्यार है.. उसीच ढाबेपे... वोबी मुहब्बत करतीच हय.. पर
असरार - पर क्या??
समीर - एक नय होने दिया हमको..
असरार - छक्के है तुम लोगां छक्के.. मुहब्बतमे जमानेके खिलाफ जंग छेडनी पडतीय.. क्या नाम उसका?
समीर - काजल..
असरार - काजल.. अब मर जा काजल काजल करते हुवे ...
विजू - असरार भाई.. वडाळी भुई बेइज्जत हुवी है राम रहीम ढाबेपे..
असरार - बेइज्जत हुई नय.. तुम लोगां होने दी बेइज्जत.. शेण खा शेण सगळे..
दारूच्या नशेत अक्राळविक्राळ गर्जना करणार्या असरार अन त्याच्या मित्रांच्या म्हणण्यावरून वडाळी भुईची इज्जत वाचवण्यासाठी अन मोठा राडा करण्यासाठी दोन जीपमधून हे नऊ जण अन दोन दाणगट ड्रायव्हर हाताला लागेल ती वस्तू शस्त्र म्हणून घेऊन निघाले. काठी, गज..काय हवे ते..
राम रहीम ढाब्याची आज मध्यरात्री युद्धभूमी होणार होती.. जीपमधेही अखंड नशापान चाललेले होते.. शिवीगाळ चाललेला होता.. आणि..
प्रथमच..
अगदी प्रथमच.. समीरला एका जीपमधे बसल्यावर सगळ्यांचा आवेश पाहून...
'आपले आज काहीतरी चुकत आहे' ही जाणीव झाली होती.. ही जाणीव होण्यामागे वर्षानुवर्षे अबू अन चाचाने केलेले संस्कार होते.. आणि.. काहीतरी फार वाईट करायला आपण चाललो आहोत हे त्याला आवडत नव्हते...
बरोब्बर पावणे दोन वाजता रमणने खच्चून मारलेली किंकाळी ऐकून अख्खा ढाबा जागा होऊन गेटपाशी रमणसाठी नवीन बांधलेल्या केबीन कडे धावत असतानाच दोन जीप्स कर्कश ब्रेक्स वाजवत आत आल्या.
सियुरिटी! आपल्या ढाब्याला सिक्युरिटी नावाचा प्रकारच नाही आहे हे त्यातही चाचा अन अबूच्या प्रकर्षाने लक्षात आले. पण त्यावर विचार करण्याची ही वेळ नव्हती. समोरच्या परिस्थितीला आत्ता तोंड देणे आवश्यक होते. यशवंत उठलाच नव्हता. त्याला जास्त झाली होती. सर्वात पहिल्यांदा चाचाने मनीषा अन अंजनाला सांगून दोन्ही लहान बाळे व बायका अगदी मागच्या, म्हणजे मन्नू अन साखरूच्या खोलीत हलवायला सांगीतले. किंचाळ्या मारत बायका तिकडे धावल्या होत्या.
काय होते आहे हे समजायच्या आतच एका काठीचा एक जबरदस्त प्रहार विकीच्या डोक्यात झाला. विकीच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. तोपर्यंत पद्या एक गज घेऊन आला होता. पण तो त्या लोकांपर्यंत पोचायच्या आधीच त्याच्या पोटात जोरात बुक्की बसली. अक्षरशः डोळे पांढरे झाले पद्याचे! पद्या खाली पडल्यावर दोघे त्याच्यावर तुटून पडले होते.
मात्र झिल्या अन बाळू पेटलेले होते. त्यांनी त्यातल्या एकाला धरला अन अक्षरशः लाथा बुक्क्यांची बरसात केली त्याच्यावर! त्याला वाचवायला धावलेल्या दोघांना आडदांड साखरूने नुसत्या मुठी नाकातोंडावर मारून त्यांची शुद्ध जायची वेळ आणली.
असरारच्या गँगच्या अचानक एक गोष्ट लक्षात आली. या लोकांना काहीही माहीत नसताना अन त्यांच्या हातात एक हत्यारही नसताना आपला एक वीर झिल्या अन बाळूमुळे अन दुसरे दोन वीर एकट्या साखरूमुळे आडवेही झालेले आहेत अन आवाजही करत नाहीयेत.
अचानक माघार घ्यावी की काय असा विचार असरार करू लागला. तेवढ्यात चाचाने असरारला धरला अन मधे आणला. असरार सुटायचा प्रयत्न करत असतानाच त्याच्या दोन तंगड्यांमधे चाचाचा गुडघा खटकन बसला.... अन नुसता आवाज ऐकूनच पाणी पाणी व्हावे अशी किंकाळी फोडली असरारने..
यशवंत जागा होऊन तिथे पोचला होता. पण.. असरार गँगमधला विजू कुठे दिसतच नव्हता.
विकी पडल्या पडल्याच मार खात होता. रमण काही करण्याच्या अवस्थेत नव्हता. आणि अबूच्या पाठीवर बसलेली एक काठी मोडली अन अबू मागे वळला. त्याचा महाकार देह पाहून सगळेच टरकले अन हळूहळू मागे सरकू लागले.
अचानक मारामारी थांबली. दिपू, मन्नू अन दादू त्या पोरांच्या मागच्या बाजूला काठ्या घेऊन पोचलेले होते. ती पोरे त्यांच्याकडे पाठ करून मागे मागे सरकत होती. पद्या अन विकी खाली पडूनच ते दृष्य बघत होते. आणि अबू.. एक एक पाऊल टाकत भयाण चेहरा करत त्यांच्याकडे सरकत होता.
चाचाने प्रसंगावधान राखून गल्ल्याला आणखीन एक कुलूप लावून टाकले होते.
आता अबू त्या पोरांकडे पोचणार अन मागून दिपू, दादू अन मन्नू काठ्या घालणार तेवढ्यात तिसर्याच एका लांबवरच्या अंधार्या कोपर्यातून मनीषाताईची किंचाळी ऐकू आली अन पाठोपाठ सगळ्याच बायका किंचाळत धावत आल्या..
विजू अन एक मुलगा मनीषाताई अन तिच्या मुलीला घेऊन एका जीपमधे ढकलत होते...
खाली पडूनच दोन मांड्यांच्या मधे आपले दोन्ही हात दाबून कळवळत असलेला असरार किंचाळला..
असरार - ये हरामी सम्या.. तेरी कौनसी हय बे???
समीरचा चेहरा पांढराफट्ट झाला. अबू अन चाचाने त्याला त्याही अंधारात इसरारने हाक मारल्यामुळे व्यवस्थित ओळखले... समीरने काजलकडे बोट दाखवलेच नाही.. विशालच म्हणला..
विशाल - वो देखो असरार भाई.. वो हेमामालिनी...
असरार - ये गणपत.. वो लडकीको जीपमे भेज.. नय तो मनीषा दिखेंगी नय दुबारा... वो लडकीका ब्याह सम्याके साथ हो रहा कल.. बाअमे वापस भेजदेंगे उसको..
आणि दिपूने हातातली काठी टाकून धावत येऊन खालीच पडलेल्या असरारच्या पोटात खुनशीपणे लाथा घालायला सुरुवात केली.. आज कधी नव्हे ते दिपू अत्यंत हीन शिव्या देत होता तोंडाने...
अबूने असरारला पुन्हा उचलून आपटला.
तेवढ्यात एक रोज अकरा वाजता येणारी पण आज लेट झालेली एस. टी. ढाब्यात घुसली अन ती मारामारी पाहून तशीच घाईघाईत रिव्हर्स मारून निघून गेली. तिकडे मदतीसाठी धावलेल्या चाचाला असरार गँगपैकी कुणीतरी मागून गज मारला. चाचा आधीच जखमी अन त्यात पुन्हा खाली पडला हे पाहून अबू तिकडे धावेपर्यंत असरारकडच्या दोन पोरांनी यशवंतला खाली पाडून मागे पळत पळत चाललेल्या काजलला उचलले अन जीपमधे घातले.
झालेला प्रकार समजायच्या आधीच दोन जीप्स निघून गेल्या होत्या..
झिल्या पिंपळगावच्या दिशेन अर्ध्या रात्री धावत सुटला. मधे दिसेल त्या गाडीला आडवा जात होता. गाड्या ब्रेक्स मारून थांबायच्या अन मदत करणार नाही असे म्हणून निघून जायच्या. आयुष्यात पहिल्यांदा झिल्या अशा वेळी बॉम्बे आग्रा रोडवरच्या झगमगाटात डोळ्यात हारल्याचा अपमान अन पाणी घेऊन गाडी थांबवायला धावत होता....
आणि.. बरोब्बर त्याच वेळी दादू शिरवाडच्या दिशेने गाडी थांबवायला धावत होता..
दहाच मिनिटात दादू गाडी घेऊन ढाब्यावर आला. आता आधी जखमींना पिंपळगावला न्यायचं की मनीषा अन काजलला आणायला धावायचं! काही समजतच नव्हतं! पद्या अन चाचाच मुटकुळ टाकून घाईघाईत दादू अन साखरू जीपवर चढले. सुसाट वेगाने जीप पिंपळगावला निघाली. तोवर झिल्याने एक टेम्पो आणला. त्यात विकीचं अन रमणचं मुटकुळं टाकून यशवंत, मन्नू अन दीपक अण्णू वाठारे हातात गज घेऊन बसले. अबूने सरळ ढाब्याच्या समोर उभा राहून एक ट्रक अडवला. अबू अन बाळू ट्रकमधे बसले.
काशीनाथ एकटा ढाब्यावर थांबला. अन अंजनाने त्याचा तिथेच पाणउतारा केला.. ती स्वतःच गाडी थांबवायला हायवेवर धावली. मग मात्र काशीनाथने तिला परत ढाब्यावर जायला सांगून एक मेटॅडोर अडवली अन दोन तीन बायका अन स्वतः त्यात बसून पिंपळगावकडे निघाला. मेटॅडोरवाला पूर्णपणे नाखुष होता 'सीटा' घ्यायला. पण काशीचा उग्र चेहरा पाहून त्याचे धाडसच झाले नाही.
ढाब्यावर आता फक्त वैशालीची सासू वैशाली स्वतः याच दोघी उरल्या होत्या. झरीनाचाचीही काशीनाथबरोबर निघून गेली होती.
आणि वैशालीला एका कोपर्यात आवाज आला. कुणीतरी हमसून हमसून रडत होतं! कोण ते जवळ गेल्यावर समजलं!
समीर! ... समीर होता तो.. त्याला काजल अशा पद्धतीने मुळीच नको होती.. तो गेलाच नव्हता विजू, विशाल अन असरारभाई बरोबर...
अन पिंपळगाव अन वडाळा भुईच्या मधे तुंबळ झालं पुन्हा! पद्या अन चाचाची जीप पिंपळगावच्या हॉस्पीटलकडे धावली त्या दोघांना अॅडमिट करायला. पण विकी अन रमण असलेला टेम्पो पुढे बसलेल्या दिपूने गावात नेऊच दिला नाही. त्याने सरळ तो टेम्पो वडाळी भुईकडे घ्यायला सांगीतला. मन्नू तर दिपूपेक्षा लहानच होता. दिपूचा चेहरा बघून 'विकी अन रमणला हॉस्पीटलमधे न्यायला हवे' हे वाक्यच तो बोलू शकला नाही. आणि यशवंत होता बाप काजलचा! त्याला सगळी काळजी काजलची असली तरी दिपूच्या आविर्भावाकडे बघताना त्याला 'आपण या मुलाला काय काय बोललो' हे आठवून पश्चात्ताप होत होता.
आणि दिपूच्या अंदाजाप्रमाणे 'एका खराब पॅचवर जर आपलाटेम्पो कसातरी पुढे रेटला तर त्यांची जीप नक्की दिसेल' हे म्हणणे खरे ठरले.
दिपूच्या टेम्पोने चक्का त्या दोन जीप्सना एका ठिकाणि ओव्हरटेकच केले. असरारच्या गँग्जना या लोकांची वाहने माहीतच नव्हती. त्यांना कसलीच शंका आली नाही. आणि जवळपास अर्धा किलोमीटर टेम्पो पुढे नेऊन दिपूने तो थांबवायला सांगीतला. मन्नूच्या हातात दोन मोठे दगड दिले. मन्नूने टेम्पोच्या आड उभे राहून ते येणार्या प्रत्येक जीपवर मारायचे होते. काचेवर! आणि त्या जीप्स निश्चीतच काचा फुटल्या म्हणून शंभर एक मीटर पुढे जाऊन थांबणार होत्या. आणि त्या अंतरावर नेमका दिपू एकटा गज घेऊन अंधारात उभा राहणार होता आणि अंधारातच एकेकेच्या डोक्यात गज घालणार होता.
यशवंत अवाक झाला होता ते वेगळ्याच वाक्याने..
दिपू - मन्नू.. पत्थर ढंगसे फेक.. काजल अगर छुटगयी तो तेरेको जिंदा नय छोडेंगा मै.. और... मै बी नय रय सकेंगा जिंदा... उसके बिना...
यशवंतने कंट्रोलच घेतला नव्हता परिस्थितीचा...
दिपू सुसाट वेगाने धावत अंधारात पुढे निघाला. आणि तो पोचायच्या आधीच त्याला खळ्ळ असा आवाज अन त्या पाठोपाठ ब्रेक्स दाबल्याचा कर्णकर्कश्श आवाज अन पुन्हा खळ्ळ असा आवाज पुन्हा ब्रेक्स अन नंतर जोरात धडक झाल्याचा आवाज आला. दोन्ही जीप्स एकमेकांवर धडकलेल्या होत्या. पुढे गेलेला दिपू तितक्याच वेगात धावत मागे आला अन काही समजायच्या आत असरारच्या डोक्यातून चिळकांड्या उडल्या.
ड्रायव्हर्स अन इतरांना समजायच्या आत तीन जणांची टाळकी फुटलेली होती...
मागे ट्रॅफिक ब्लॉक होऊ लागले होते.. हळूहळू विजूचा अन असरारचा मनीषा अन काजलवरचा कंट्रोल कमी व्हायला लागला होता. जे फारसे जख्मी नव्हते ते बाहेर आले तर मन्नू त्यांना झोडपून काढत होता..
आणि.. जात पात.. अनाथ.. खानदान.. पैसे... बचत.. माझे घराणे.. असे .. तसे..
सगळे सगळे बोलणारा यशवंत चिडीचूप उभा राहून दिपूचा भयानक अवतार पाहात होता...
काही समजायच्या आत खूप गर्दीतून वाट्टेल तशी सैरावैरा धावत काशीनाथची जीप तिथे पोचली.. आणि
वासंती, झरीनाचाची अन .. सीमाकाकू खाली उतरल्या...
सीमाकाकूला दिपूने आपल्या मुलीला वाचवले आहे हे समजायला अर्धा क्षणही लागला नाही..
कारण त्यावेळेस हमसाहमशी रडणारी काजल प्रकाशाने उजळलेल्या भर बॉम्भे आग्रा नॅशनल हायवेवर मध्यरात्री आपल्या आई बापांसमोर ....
... दीपक अण्णू वाठारे यांना मिठी मारून त्यांच्या कपाळाची अनेक चुंबने घेण्यात मग्न होती.. आणि दिपू अजूनही असरारच्या गँगपैकी कुणी हालचाली करतय का हे पाहात होता...
हाफ राईस दाल मारकेची जिवंत, धगधगती प्रेम कहाणी त्या रात्री बॉम्बे आग्रा रोडवरील सगळ्या वाहनांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली होती..
मनीषाताई वासंती अन झरीनाचाचीला मिठी मारत रडत होती..
दिपूच्या अगाध शौर्याचे परिणाम म्हणून काही देह रस्त्यावर आडवेतिडवे पडलेले होते.. त्यांना टाळत वाहने जात होती...
आणि तेवढ्यात दादू अन साखरूची जीप अन अबू अन बाळूचा ट्रक तिथे पोचले.. दोन मिनिटांच्या अंतराने..
आणि बाळूला मिठी मारून मनीषा रडत रडत म्हणाली..
मनीषाताई - दिपू नय होता.. तो हम दोनो.. नय दिखती तुम लोगां को...
यशवंत अन सीमाच्या डोळ्यातून अश्रूंची न थांबणारी धार लागली होती...
पहाटे साडे चारला सगळे ढाब्यावर परत आले तेव्हा समीरने काजलच्या पायांवर लोळण घेऊन सांगीतले की झाले त्यात त्याची चूक नाह.. त्याला ती हवी होती.. पण अशी नाही.. आणि.. तिला दिपूसारखा दुसरा जोडीदार मिळणे शक्य नाही.. आयुष्यात..
कित्येक दिवसांनंतर प्रथमच.. सीमाकाकूने दिपूला जवळ घेतले होते अन यशवंत...
यशवंतसारखा माणूस.. अक्षरशः हात जोडून दिपूपुढे उभा राहिला होता...
सकाळी सात वाजता दिपूला अटक झाली.. सगळ्यांनाच झाली.. अगदी.. जखमी असलेल्यांनाही..
======================================
खूप दिवस झाले त्या गोष्टीला आता.. ! दिवस? अंहं! ...
एक वर्ष झालं! ...
चाचाने हजारो रुपयांचे आमीष दाखवूनही दिपूला एक वर्ष आत ठेवलंच...
कारण असरार नेत्याचा मुलगा होता... मेलं कुणीच नव्हतं सुदैवाने.. पण खुनाचा प्रयत्न हा आळ होता..
बाकी सगळेच्या सगळे सुटले होते.. समीरला अबूने जन्माची अद्दल घडवली होती.. अबूने संतापाने मारलेल्या लाथेमुळे समीरच्या उजव्या घोट्याला दुखापत झाली होती अन आता तो केवळ वाकडाच चालू शकत होता..
चाचा आता नाशिकलाच बरेच दिवस राहायला लागला होता... अबूनेही तिकडे एक घर घेतले होते.. पण तो महिन्यातून पंधरा दिवस तरी ढाब्यावर असायचा.. पद्या ढाब्याचा प्रमुख झाला होता.. होता पगारावरच.. पण सी.ई.ओ... सी.ई.ओ. प्रदीप डांगे.. काशीनाथ अन अंजना संसारात रमले होते... बाळूला आणखीन एक मुलगा झाला होता.. समीरने कायमचे ढाब्यावरच राहायचे ठरवले होते.. रमण कायमचा गावी निघून गेला होता.. झरीनाचाची अन तिचा मुलगा ओढ्यावर बांधलेल्या खोलीत शिफ्ट झालेले होते... वैशालीची सासू संपूर्ण दिवसभर जप करत बसायची... झिल्याने अब्दुलच्या मोडक्या दुकानाचा कायापालट करून तिथे कुहूनतरी परमिट घेऊन बीअर शॉपी काढली होती.. दादू कॅप्टन झाला होता.. साखरू अत्यंत प्रामाणिकपणे गार्डन सांभाळत होता... मन्नू यशवंतच्या चिवड्याच्या दुकानाच्या जागी कॅसेट्सचे दुकान थाटून बसला होता.. त्या दुकानात कॅसेट पासून जीवनावश्यक अशा सर्व वस्तू त्याने ठेवल्या होत्या... फक्त.. आता तिथे चिवडा मिळत नव्हता...
कारण.. यशवंत शिफ्ट झाला होता.. पुन्हा टहेर्याला...
कोण राहू देणार त्याला??? ढाब्यावर??
काजलच्या नवर्याला गुंड अशी पार्श्वभूमी नसावी या अत्यंत स्वार्थी धोरणाने मालेगावच्या एका पुढार्याच्या मुलाशी तिचे लग्न लावून देण्यात आले होते...
शेवटची भेटही होऊ शकली नव्हती दिपूशी.. खूप मार खाल्ला होता तिने .. लग्न होईस्तोवर मार खाल्ला होता... अंजनानेही इतका कडाडून विरोध केला होता की तिलाही मार खावा लागला होता.. लग्न मालेगावला केलं होतं ढाब्यावरचा एक.. म्हणजे एक... माणूस गेला नव्हता लग्नाला...
आता तिच्या घराच्या बंद दारावर मन्नूने मोठ्या अक्षरात लिहून ठेवले होते...
यहां काजल रयती थी... दिपूकी काजल..
आणि दिपूला हे परत आल्यावरच सांगायचे ठरले होते.. परत आल्यावर समजले होते.. त्याने मन्नूने लिहीलेली पाटीही वाचली होती...
दहा मिनीटे.. तब्बल दहा मिनीटे तो त्या पाटीकडे...
आणि.. राम रहीम ढाब्याच्या यच्चयावत गिर्हाईकांकडे संपूर्ण दुर्लक्ष करून सगळा स्टाफ दिपूकडे पाहात होता..
दिपू मृतवत नजरेने आत आला.. कोणत्यातरी टेबलवरील माणसाने त्याला तिथला वेटर समजून.. जो तो होताच.. काहीतरी ऑर्डर सांगीतली...
दिपू काउंटरपाशी गेला.. आत काशीनाथ होता.. कित्येक वर्षापुर्वी याच काउंटरवर अबूला पाहिले होते दिपूने...
काशीनाथ अबोलपणे बघत होता... दिपूने उच्चारलेले वाक्य ऐकून पद्याने मागूनच दिपूला कवटाळले अन हंबरडा फोडला.. वयाने इतका मोठा असूनही.. सगळेच मोडून पडल्यासारखे चेहरे करून बसले..
दिपू - सात नंबर... हाफ राईस................. दा......ल..... मा....र.... के..
झकास...बेफिकिर...पण दिपुच्या
झकास...बेफिकिर...पण दिपुच्या प्रेमकहाणीचा शेवट असा कसा असेल ?
बाकी तुमच लिखाण खासच..
तुमची ही मेजवानी अशीच चालु राहु द्या...
अर्रे? काजलचे लग्न दिपूशी
अर्रे? काजलचे लग्न दिपूशी नाही???![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
हे अपेक्षित नव्हत
हे अपेक्षित नव्हत![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
अरे देवा!!! काय झालं हे
अरे देवा!!! काय झालं हे![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
बिचारा दिपु.....
अस का केलत दिपू बरोबर.....?
अस का केलत दिपू बरोबर.....? काजल त्याची नाही?
अरेरे! हे काहीतरी खरच असा
अरेरे! हे काहीतरी खरच
असा नव्हता पाहिजे.... काजल चा दिपुशी लग्न का नाही झाला?
पन बाकी एकदम छान.
हे सगळ फारच भरभर झाल आहे!
हे सगळ फारच भरभर झाल आहे! पटकन वाचताना लक्षातच आल नाही कि काजलच कोणाशीतरी लग्न झाल ते. ह सेकंड लास्ट भाग आहे का? काय होणार दिपुच??
OH NO!!!!!!!!!!!! आता हे काय
OH NO!!!!!!!!!!!!
आता हे काय मित्रा.
अस नको करुस यार प्लिझ त्या दोघाना वेगळ नको करुस...........
दिपुने खुप कष्ट, दुख, हाल, अपेष्टा सहन केल्या आहेत त्या लहन्ग्या जिवाने.
त्याचा असा अन्त नाहि बघवणार मला.....
दुनियेतल्या सगळ्या प्रेमि युगलुना सलाम जे कधि एक होउ शकले नाहित.
पण कदचित दिपुला अस नाही बघता येणार मला..........
बाकी शेवट तुमचाच आहे.
तुम्हि जो शेवट कराल तो मला मान्य आहे. मी फक्त माझ्या मनातल सन्गितल.
पु.ले.शु.
भाग छान. पण खुपच घाईत
भाग छान. पण खुपच घाईत उरकल्यासारख वाट्तय. आणि दिपुच्या प्रेमकहाणीचा शेवट असा दु:खी.? वाईट वाट्ल.
दिपु बरोबर फार वाईट
दिपु बरोबर फार वाईट घडले..................प्रतीक्रिया देण कठीण झालय माझ्यासाठी................
वाईट वाटलं...
वाईट वाटलं...:(
काजलच लग्न दिपुशी नाही... ...
काजलच लग्न दिपुशी नाही... :अरेरे:... अस कस...
पण मला वाटत ईतक्या दिवस आम्हाला जे दोघांच्या प्रेमाचे दिवस दाखवलेत, त्याचा शेवट देखील चांगलाच असेल... वाट पाहते आहे पुढच्या (अंतिम ) भागाची....
खास वाचकांग्रहास्तव कथेचा
खास वाचकांग्रहास्तव कथेचा शेवट बदला प्लीज
खरंच असं कसं काय. जर दिपूने
खरंच असं कसं काय. जर दिपूने काजलला वाचवल्याचा अभिमान वाटल्यामुळे यशवंत आणि सिमाकाकूने त्याला जवळ घेतले असेल तर त्याच गोष्टीसाठी तो तुरुंगात गेला तर तो एकदम गुंड कसा काय झाला. हे पटत नाही. आणि एकदम पुढाऱयाच्या मुलाशी. त्यांच्या घरच्यांना हे सगळे प्रकरण माहिती नसणार का. किंवा यशवंतची जातपात घराणे काही न बघत त्यांनी असेच लग्न लावून दिले.
मला वाटते शेवट करताना काहीतरी वेगळे व्हायला हवे होते.
ओ ओ.. please ओ असं काय
ओ ओ.. please ओ असं काय करताय?? असं कसं.. बिचरा दिपु.. असं नको व्हायला..
गलबालुन अलयं.. दिपु ला इतकी shiksha.. असं करु नका ओ .. मानलं तुम्ही 'बेफिकीर'.. पण असं करु नका Please..
ह्याला काहीच अर्थ नाही सर्व
सर्व प्रतिसादक, विशेषतः वर्षू नील आणि ashuchamp च्या शब्दा-शब्दाला अनुमोदन!
तुम्हाला सर्व वाचकांना धक्का द्यायचा होता, बहुतेक! सगळंच मनासारखं होत नाही हे दाखवायचं होतं ना?
पण हे फारच घाईघाईने गुंडाळल्यासारखं वाटतं आहे... अज्जिबात आवडला नाही आजचा भाग
इतके दिवस ज्या सुक्ष्मपणे, तरलपणे कथा हाताळली, त्याचा आजच्या भागाच्या उत्तरार्धात मागमूससुद्धा नाहीये...
शेवट काय करणार आहात याची आज काही कल्पनाही दिली नाहीये...
वर्षू-नील ला अनुमोदन!!!!
वर्षू-नील ला अनुमोदन!!!! पब्लिक डिमांड नुसार शेवट बदलाच. मी तर दिपु-काजलच्या लग्नाला यायच ठरवल होत.
खरच नका करु दिपु बरोबर
खरच नका करु दिपु बरोबर अस...........
मलाही वाटत होत की आता दिपुच्या लग्नाला येता येइल.
खुप सवय झाली आहे रोज राम-रहीम ढाब्यावर येण्याची. आता रोज चुकल्या सारख वाटणार आहे.
तुमचे लिखाण खुपच छान आहे. जर ही कादंबरी संपवणार असाल तर नविन कधी चालु करताय?![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
हल्ली इतके सुंदर लिखाण वाचल्या शिवाय दिवस सरतच नाही
धाब्यावरचे कोणी लग्नाला गेले
धाब्यावरचे कोणी लग्नाला गेले नव्हते -- त्याना माहित नसेल -काजल लग्नाआधी पळून गेली असेल- आता तरी दिपू - काजलची भेट होइल?
पिक्चर अभी बाकी है
पिक्चर अभी बाकी है दोस्तों.....
काय प्रतिसाद देऊ. बोलती
काय प्रतिसाद देऊ. बोलती बंद.
पण हे पुनः एकदा पटलं की सत्य हे कल्पनेपेक्षा खुपच विदारक असतं
ओह.. खूप realistic वाटला हा
ओह.. खूप realistic वाटला हा भाग.. अन अजून एकच भाग?? आज येणार का शेवट?? अन दुसरी कादंबरी सुरू करण्याची विनंती.. माबो वाचकांना व्यसन लागलयं आता "बेफिकीर" यांचे लेखन रोज वाचायची..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे मात्र १०० % खर, कि तुमच
हे मात्र १०० % खर, कि तुमच लिखाण वाचायच व्यसन लागलय, लवकर येउ देत.
शेवट गोड होणार नाही तर!
पण हे पुनः एकदा पटलं की सत्य
पण हे पुनः एकदा पटलं की सत्य हे कल्पनेपेक्षा खुपच विदारक असतं
अगदी खरं आहे गुब्बी.... आणि दिपू-काजलसारख्या कितीतरी जणांची आयुष्यं घरच्यांच्या अतिरेकी, अविचारी आणि स्वार्थी निर्णयांमुळे उध्वस्त झाली आहेत, ह्याची तर भरपूर उदाहरणं आपण आजूबाजूला पाहात असतोच...
बाकी, आता ते कटूसत्यच आपल्याला सांगायचं की कधी कधी खरं होणारं असं गोड स्वप्न दाखवायचं हा सर्वस्वी बेफिकीर यांचा निर्णय असेल...शेवटी ही त्यांची कादंबरी आहे...
असो, काय असेल तो शेवट लवकर येऊ द्या, आणि नवीन कादंबरीही लवकरात लवकर सुरु करा...ही विनंती. आम्हा सर्वानांच तुमच्या लेखनाची चटक, व्यसन, ओढ (आमच्या ह्या मनोवस्थेला हवे ते नाव देऊ शकता) लागलेली आहे. हे तर तुम्ही जाणताच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्वांचे मनापासून आभार!
सर्वांचे मनापासून आभार!
प्रतिसादांमुळे बहकलो होतो. दोन दिवस वेगळ्या मनस्थितीत गेले. मंग़ळवार दिनांक १ जून, २०१० (भारत) या रोजी कादंबरीचा अंतीम भाग देण्याचा प्रयत्न करणार आहे. आत्ता या क्षणी (भारत) १ जून, २०१० चे रात्रीचे १२.४२ झालेले आहेत.
सर्वांच्या प्रेमळ प्रोत्साहनाचे मनापासून अनेक आभार!
-'बेफिकीर'!
बेफिकीर, मनापासुन धन्यवाद,
बेफिकीर,
मनापासुन धन्यवाद, तुम्ही खुपच सुंदर लिहिता हे मी परत परत सांगायला नको. आमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर तुम्ही तुमच्या अनेक व्यापातुन वेळ काढुन लवकरात लवकर पुढचा भाग टाकता, तुमच कौतुक कराव तेवढ कमीच.
शुभेच्छा पुढच्या लिखाणासाठी (कथा, कादंबरी, गझल, कवीता आणि बरच काही).
बेफिकीर, मीही
बेफिकीर,
मीही इतरांच्याप्रमाणे 'हाफ राइस---' ची फॅन आहे.
ह्या भागातले काही संदर्भ जरा सुसूत्र वाटंत ना॑हीत. उदहरणार्थ : काजलचा नवरा ९६ कूळी पाहिजे. मंत्र्याचा मुलगा तसा असेल ; पण मग ९६ कूळीवाले काजलची लग्नापूर्वीची भानगड मान्य कशी करतात ? दीपूची इतकी सुंदर कॅरॅक्टर तुम्ही रंगवलीय, एका गरज म्हणुन केलेल्या मारामारीमुळे त्याला लगेच गुंड कसा ठरवला? तुम्हाला दीपुची शोकांतिका दाखवायची असेल तर लेखक म्हणुन तुम्हाला तो फ्रीडम आहेच. त्यासाठी त्याला गुंड ठरवायचं काय कारण ? बघा पटतंय का ?
दीपुवर अन्याय होतो आहे अस वाटलं म्हनुन लिहीलं.
बाकी तुम्ही ग्रेटंच लिहीता. पुढच्या लिखाणासाठी शुभेच्छा !
शेवट नाहि आवड्ला. दिपु किति
शेवट नाहि आवड्ला. दिपु किति छान होता पण बकी सगळ छान . खुपच वाईट वाट्ल.
शुगोल व स्मिता, आपले
शुगोल व स्मिता,
आपले मनापासून आभार
-'बेफिकीर'!
Pages