जागा
जागा
‘अरे ऐकतो आहेस ना. तर मी जागा बघायला गेलो होतो. होती बर्यापैकी. काय भाव वाढलेत हो जागेचे आता. ‘ अंतु नानांची बडबड ऐकत होता.
समोरच्या खोलीत सोमणकाका सुर धरुन बसले होते. कुठली तरी लांब तान घेऊन ते समेवर आले. आणि स्वतःशीच बडबडले ‘ वा, काय छान जागा आहे’.
समोरच्या वहीनी आपल्या मुलीवर खेसकल्या ‘दोन ओळीमद्ये कीती जागा सोडलीस . आता काय लिहीणार आहेस या मोकळ्या जागेवर ‘.
हरीभाऊंच किर्तन रंगात आल होत. ‘ म्हणुन संतानी म्हंटलय .. तुझ आहे तुजपशी परी तु जागा चुकलाशी ‘.
सिनेमाच्या रंगेत ऊभा राहिलेला समीर आपल्या मित्राला म्हणाला ‘ मी जरा पाणी पीऊन येतो, तु जागा सोडु नकोस.’
समोरच्या बंगल्यातले अण्णा आपल्या नोकरावर ओरडले ‘ हरामखोर पाजी माझ्याशी तोंड वर करुन बोलतोस. थांब तुला तुझी जागा दाखवतो ‘. नोकराचा म्हातारा बाप त्याला घरी नेत म्हणाला ‘अरे बाबा, आपण आपली जागा सोडुन कस चालेल. ती मोठी माणसं ‘.
काकु आपल्या जावयाचं कौतुक सांगत होत्या . ‘लवकरच वरची जागा मिळणार आहे हो त्याला'. आमची कमू भाग्याची हो.’
अशाच जागा शोधता शोधता आणखी एक सुरेख जागा सापडली. खुपच आवडली बुवा आपल्याला ही जागा. म्हंटल.. सगळ्यांच्या ह्रदयात जागा करणार्या जागेबद्दल कुठेतरी काहीतरी लीहायला हवं,. म्हणुन ही जागा केली.
आरेच्या झोपला वाटट. आता तर जागा होता.
- अनिलभाई
खुप छान
खुप छान लिहले आहे
******************************
__"()"
\__/ शुभ दिपावली !!!!!!!!!!!
दिसलीस तू, फुलले ॠतू
अनिलभाई, छा
अनिलभाई,
छान लिहिलंय.... आवडलं
भाई, मस्तच,
भाई, मस्तच, एकदम वेगळा विषय