प्रेमाची बँक
तुझ्या दिलाच्या बँकेमध्ये माझे अकाउंट उघडतेस का?
माझे अकाउंट उघडतेस का?
माझ्या प्रेमाच्या सेव्हिंग्जवर काही रिटर्न देशील का? ||धृ||
खाते ओपनकरण्यासाठी प्रेमपत्राचा अर्ज लिहीला
प्रेमजाणत्या मित्राला ओळखीसाठी तयार केला
इनवर्डला पडला अर्ज, आता सहिशिक्का मारशील का?
तुझ्या दिलाच्या बँकेमध्ये माझे अकाउंट उघडतेस का? ||१||
अकाउंटचे असती करंट, लोन, सेव्हिंग, रिकरींग
सगळे नकोच मजला फिक्स खातेच हवे ग
त्याच्याशी तुझे अकाउंट जॉईंट करशील का?
तुझ्या दिलाच्या बँकेमध्ये माझे अकाउंट उघडतेस का? ||२||
ऑनलाईन प्रेम, मोबाईल एसएमएस प्रेम सुविधांचे काय?
या सोईसार्या मिळती इतरांना मलाही मिळतील काय?
प्रेम धनाची होम डिलीव्हरी सुविधा मला मिळेल का? ||३||
आता स्नेहाची गुंतवणूक करतो
ओव्हरड्राफ्ट प्रितीची इंस्टॉलमेंट मिळवतो
तान्हूल्याच्या रूपात पोस्ट डेटेड चेक देशील का?
तुझ्या दिलाच्या बँकेमध्ये माझे अकाउंट उघडतेस का? ||४||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२७/०८/२०१०
(No subject)
एक ब्यँकर या नात्याने
एक ब्यँकर या नात्याने :
माझ्या कार्यक्षेत्रावर शिंतोडे उडवल्या बद्दल त्रिवार निषेध ....
अरे हा तर जि.गा. चा नवा अवतार
अरे हा तर जि.गा. चा नवा अवतार आहे............!
हा दगड फोडुन कोणी तरी बेडकी
हा दगड फोडुन कोणी तरी बेडकी बाहेर काढा मग गर्वहरण होईल रे
ब्यँकर? तू ब्यांकेत आहेस?
ब्यँकर? तू ब्यांकेत आहेस?
बेडूक कमी झालेत आजकाल.
बेडूक कमी झालेत आजकाल. चिमण्या देखील
निसर्गाचा र्हास मानवाने स्वतःच ओढवून घेतला आहे
हो . आमच्या कडे "असली"
हो .
आमच्या कडे "असली" प्रेमाची अकाउंट काढण्याची कामे सेक्युरीटी करते ...वॉचमन कदाचित कविला 'मदत' करु शकेल
वॉचमन? ईईईईईईई
वॉचमन? ईईईईईईई
पर्यावरणाची इथे कोणाला काय
पर्यावरणाची इथे कोणाला काय पडलिये....जोतो आपापले बँकेत साठवुन ठेवतोय......
<<<चिमण्या देखील<<< मोबाईल
<<<चिमण्या देखील<<<
मोबाईल टॉवरमुळे झालं ते!
पण आमच्याकडे चिमण्या बाराही मास अस्तात्....अगदी उच्छाद मांडतात!
कबुतरांचा ताप मात्र सर्वात
कबुतरांचा ताप मात्र सर्वात बेकार्..........:राग: हिरनंदानीच्या २३व्या मजल्यावर पण येतात म्हणजे बघा.....
चिमणयांचं मास कुणी खालंय का
चिमणयांचं मास कुणी खालंय का कधी ??
पण काही म्हणा ,मसकली भारी
पण काही म्हणा ,मसकली भारी दिसतं हां! गुटुर्गु करतं तेव्हा पाहायचं त्याला!
>>पण आमच्याकडे चिमण्या बाराही
>>पण आमच्याकडे चिमण्या बाराही मास अस्तात्....अगदी उच्छाद मांडतात!
थोड्या पाठ कोथरुडात
अरे एका चिमणीने एक्दा
अरे एका चिमणीने एक्दा बँकेच्या लॉकरमध्ये घरटे केले होते......
>>पण काही म्हणा ,मसकली भारी
>>पण काही म्हणा ,मसकली भारी दिसतं हां!
सोनम पण छान दिसते तशी म्हणा
कोथरुड थोडं सं रुड वाटटं नाई
कोथरुड थोडं सं रुड वाटटं नाई ?!!
मस्सक्कलीचा बाप पण अजुन लय
मस्सक्कलीचा बाप पण अजुन लय भारी दिसतो......
चिमण्यांच्या बाबतीत रुडच हाय
चिमण्यांच्या बाबतीत रुडच हाय ते! म्हणुन बिचा-या उपनगरे शोधतात!
आणि सांगवीकर त्यांना फार प्रिय!
मंद्या तु का लाजतोयेस? तुझा रुद्र रुद्रावतार धारण करेल असं काही कळल्यावर!
>>कोथरुड थोडं सं रुड वाटटं
>>कोथरुड थोडं सं रुड वाटटं नाई ?!!
खत्रूड शी यमक जुळतं नै, कोथरूडचं
प्रेम धनाची होम डिलीव्हरी
प्रेम धनाची होम डिलीव्हरी सुविधा मला मिळेल का? ||३||
यातून कवीला काय नेमकं अभिप्रेत आहे????????
हा दगडफोड्या इकडं काय करतोय???.......:स्वतः चे डोके फोडणारा बाहूला:
या बँकेच्या "शाखा" कुठे कुठे आहेत????
>कोथरुड थोडं सं रुड वाटटं नाई
>कोथरुड थोडं सं रुड वाटटं नाई ?!!
खत्रूड शी यमक जुळतं नै, कोथरूडचं
>>>> ह्यावर एक मस्त कविता लिहिता येईल !!१
चला यमकं जमवुया
ब्यॅक अवर्स संपले बहुतेक
ब्यॅक अवर्स संपले बहुतेक ...म्हणुन ब्यॅक बंद झाली वाटंतं !!!
तान्हूल्याच्या रूपात पोस्ट
तान्हूल्याच्या रूपात पोस्ट डेटेड चेक देशील का?
तान्हूल्याच्या रूपात पोस्ट
तान्हूल्याच्या रूपात पोस्ट डेटेड चेक देशील का?
>>> च्यायला हे मी कसं पाहिलं नाही ...:हहगलो:
बादवे असला प्रपोज केल्यावर वारांगना देखील जोड्याने मारेल ....
तान्हूल्याच्या रूपात पोस्ट
तान्हूल्याच्या रूपात पोस्ट डेटेड चेक देशील का?
पोस्ट डेटेड.टेड???
@ प्रसाद गोडबोले : बँकेच्या
@ प्रसाद गोडबोले : बँकेच्या कार्यक्षेत्रावर कसे काय शिंतोडे उडवले बॉ?
@भुंगा : हा जि.गा.कोण हो? नाही नविनच आहे मी. इतिहास माहित नाही.
@मंदार_जोशी : नाही हो मी नाही बँकेत.
@ प्रसाद गोडबोले : >>> आमच्या कडे "असली" प्रेमाची अकाउंट काढण्याची कामे सेक्युरीटी करते ...वॉचमन कदाचित कविला 'मदत' करु शकेल
कोणती आहे बँक तुमची? अलरेडी "असली" प्रेमाची अकाउंट उघडण्याची सोय पण केली तुमच्या बँकेने? मग किती कस्टमर, ठेवी आहेत? बघा म्हणजे मीच कविता उशीरा केली. तुमच्याकडे असल्या सोई अलरेडी आहेत की! लगेच पत्या पाठवा.
@प्रसाद गोडबोले : >>> चिमणयांचं मास कुणी खालंय का कधी ??
ई..ई.. अरे बाबा श्रावण चालू आहे ना. नंतर बोलू असले काही.
@प्रसाद गोडबोले >> खत्रूड शी यमक जुळतं नै, कोथरूडचं
मग हि घ्या कविता त्यावरची:
http://www.maayboli.com/node/19157
@अमीत, प्रसाद, डॉ. कैलास : >>> तान्हूल्याच्या रूपात पोस्ट डेटेड चेक देशील का?
यात न समजण्यासारखे काही नाही. अन प्रसाद वारांगना का मारेल बाबा? तिला जर उघडउघड मागणी करतोय कोणी (मी नाही बरं का!) अन मुल होवू देशील का असे विचारतो तर कोणती बाई मारेल? हं तिला त्या नरकातून बाहेर यायचे नसेल तरच असे होवू शकेल बाबा.
पाभे....... प्रेमाचं अकाउंट
पाभे....... प्रेमाचं अकाउंट अजून उघडलं नाही आणि तान्हुल्याच्या रुपात पोस्ट डेटेड चेक?
अकाउंट उघडल्यावर..... काही ट्रान्सेक्शन्स झाल्यावर तान्हुला रुपी चेक येईल की नाही..... ?
आता तुम्हाला अकाऊंट उघड ण्या आधीच तान्हुला हवा असेल तर...... तर मी काय म्हणावे...?
मला एक जोक आठवला....
हाईट ऑफ लेझीनेस... = मॅरीइंग ए प्रेग्नंट वुमन
(No subject)
प्रगो.... नेमकं तेवढंच
प्रगो.... नेमकं तेवढंच उचललंस..
Pages