शुभेच्छा

Submitted by कौतुक शिरोडकर on 22 October, 2008 - 02:38

जखमेवर मीठ.. खरचं नाही तशी इच्छा
दिपावलीच्या तुम्हा सर्वास हार्दिक शुभेच्छा !!!

म्हटल तर सारं आहे आलबेल
उभी जखडून महागाईची ही वेल
आवाक्याबाहेर धान्य, डाळी आणि तेल
त्यात नाही कुठे डिस्काऊंट वा सेल.....
............तरिही दिपावलीच्या तुम्हा सर्वास हार्दिक शुभेच्छा !!!

फटाक्याचे दर असे भिडले आभाळी
आवाजविरहीत यंदाची दिवाळी
तोंडी लावण्यापुरते जिन्नस फराळी
सणासुदीतही तीच रोजची भुपाळी.......
............तरिही दिपावलीच्या तुम्हा सर्वास हार्दिक शुभेच्छा !!!

खिडकीत डोकावते बघ मंदीची लाट
बोनस, इन्क्रिमेंटला केव्हाच चाट
मिठाईच्या डब्यात बिस्कीटांचा थाट
कपातीची तलवार मारतेय काट.......
............तरिही दिपावलीच्या तुम्हा सर्वास हार्दिक शुभेच्छा !!!

आशेची पणती पेटवू दारात
स्वप्नांचे कंदिल झुलवू नभात
प्रेमाचे उटणे अपुल्या नात्यात
सुखदु:खाची रांगोळी येऊ दे भरात
............म्हणूनच दिपावलीच्या तुम्हा सर्वास हार्दिक शुभेच्छा !!!

गुलमोहर: 

कौतुक,

छान लिहिलयेस..
"तरिही" आणि "म्हणुनच"-- योग्य वेळेस टाकलयेस..
-------------------------------------

ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

प्राप्त परिस्थिती छान चितारली आहे, परिस्थिती अशी असली तरी ॠण काढून सण करणारे लोक आहेत.

~~~~~~~~~
दक्षिणा...... Happy
~~~~~~~~~

वास्तववादी कविता... आवडली
-मानस६

............तरिही दिपावलीच्या तुम्हा सर्वास हार्दिक शुभेच्छा !!!
Happy

दिसलीस तू...फुलले ॠतू..................

खरच करावे तेवढे कऊतुक कमि आहे तुझे.......

मनापासुन कौतुक, कौतुकदा !

भा. पो.

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

वा मस्तचं!!!!

Good one !

परागकण

खुप Relevant वाटतेय ही कविता....

'सण' ह्या संकल्पनेकडे एका वेगळ्या Context मधे खुप Subtly पाहीलं आहेस असं मला वाटत.

(इंग्रजी शब्दांबद्दल माफी पण हे असंच मनात आलं )

महागाईच्या या भस्मासुराला
पणतीच मिळविल मातीला
मंदीच्या या काळोखाला
उजळविल अनार भुईनळा
नका म्हणु दीवाळी या दीपावलीला
चार दिवस सुखाचे पुरतील आपुल्या जन्माला
बाकी आजच्या वस्तुस्थितीच वर्णन उत्तम. छान.