Submitted by मेधा on 22 August, 2010 - 11:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
भिजवून, मीठ घालून शिजवलेले काबुली चणे वाटीभर ( गार्बान्झो बीन्स ) .
एक मध्यम लाल कांदा, बारीक गोल चकत्या कापून
एक अव्हाकाडो - गराचे १/२ इंच चौकोनी तुकडे करून
४-६ काड्या कोथिंबीर बारीक चिरून.
एक थाय बर्ड ( किंवा इतर तिखट ) मिरची अगदी बारीक चिरून
एका लिंबाचा रस
मीठ,
एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल
क्रमवार पाककृती:
अव्हाकाडो च्या तुकड्यांवर थोडा लिंबाचा रस शिंपडुन हलक्या हाताने मिक्स करावे.
कांदा, चणे, मिरची, कोथिंबीर एकत्र करून त्यावर उरलेला लिंबाचा रस घालावा. ऑ ऑ व मीठ घालावे. शेवटी आव्हाकाडो चे तुकडे घालावेत.
वाढणी/प्रमाण:
२-३ लोक
अधिक टिपा:
यात आपल्या आवडीप्रमाणे बरेच घटक घालता येतील. मी कधी कधी शिजवलेले चिकन चे तुकडे घालते. कोथिंबीरीऐवजी पुदिना घालते. ऑऑ वगळून वसाबी मेयोनेज + रेड वाइन व्हिनेगर घालते.
तसेच राजमा , व्हाइट बीन्स, एडामामे बीन्स , लिमा बीन्स यातलं काही घालते.
माहितीचा स्रोत:
स्वत:चे प्रयोग
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तय. एकदम सोपे. मला हे
मस्तय. एकदम सोपे. मला हे स्टार्टर म्हणून पण चालेल.
भारीच... अव्होकॅडो लय भारी
भारीच...
अव्होकॅडो लय भारी असतं सध्या मेक्सिकन रेस्टॉरंट मधे गेलं की खातो... देशात मिळतं का?
http://evolvingtastes.blogspo
http://evolvingtastes.blogspot.com/2009/11/chickpeas-and-avocado-salad.html
अगदी या रेसिपी सारखी आहे ही रेसिपी.
माझे थोडे अॅम्पडप व्हर्जन इथे आहे - http://vadanikavalgheta.blogspot.com/2009/08/visit-to-farmers-market-and...
मेधा मस्त आहे रेसिपी. रुनी
मेधा मस्त आहे रेसिपी.
रुनी म्हणते तसं स्टार्टर म्हणुन चालेल.