पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फ्रोझन कीस म्हण्जे ओलं खोबरचं न. त्याचा नारळीभात येतो करता. जुन्या मा. बो मध्ये निनावी ने दिलेल्या रेसिपीने मी नेहमी करते. छानच होतो.

नव्या मायबोलीत स्वाती आंबोळेने दिला आहे नारळी भात. पण तो गूळ घालून करायचा आहे (बहुतेक).

नव्या मायबोलीत स्वाती आंबोळेने दिला आहे नारळी भात.>>> तीच रेसिपी जुन्या मायबोलीत तिच्या जुन्या आयडीने आहे Happy http://www.maayboli.com/node/9687 ही घ्या. गूळ घालूनच आहे.

मला नारळीभातच करायचा आहे. मला वाटलं साखरभात नारळीभात दोन्ही म्हणजे एकच!!! मी साखरभात अशी शोधली म्हणून मिळाली नसेल मला वर दिलेली कृती. धन्यवाद सगळ्यांना.

लाजो काहीजण खातात उपासालाही भेंडी पण माझ्या माहेरी सासरी मी कधी पाहिल नाही कोणाल उपासासाठी भेंडी वापरलेली त्यामुळे मी नाही खात

भगर (वरी ) व साबुदाणा २:१ प्रमाणात रात्रभर भिजवून सकाळी मिक्सरमधून काढुन दोसे करावेत. आंबवण्याची गरज नाही. छान होतात.

हो, कारण मला आठवत होत आई करायची भेंडीची ताकातली भाजी ते. आईला फोन करुन विचारलच शेवटी Happy

धन्स मने, अरु Happy

वर्षा, निनावी म्हणजेच स्वाती_आंबोळे, नव्या मायबोलीतली तिच्या पाकृची लिंक वर सावनीने दिली आहे बघ. त्या पाकृवरच्या प्रतिक्रियाही वाच.. बर्‍याच जणांनी करून पाहिलेली पाकृ आहे.

गूळ घातला तरी पाणी दुप्पट घातल्यामुळे तांदूळ व्यवस्थित शिजतो.

एके ठिकाणी मध्ये चिंच गुळ घालुन केलेली कार्ल्याची भाजी खाल्ली होती. आंबट गोड आणि किंचीत कडु अशी चव होती. ती कशी करायची? भाजीला रस होता.

स्वातीची नारळिभाताची क्रुती वापरुन मी खुप वेळेला केलाय नारळिभात, खुप सोपी आणि एररप्रुफ रेसिपी आहे.

धन्स ग अरुंधती. पण माझा प्रश्न चुकला वाटते... मला विचारायचे होते की फक्त ज्वारीचे पीठ वापरून मुठिया बनवता येतील का?

५ दिवसांच्या प्रवासात टिकतील अशा पुर्‍यांची रेसिपी सांगा. साध्या पुर्‍या नकोत. सोबत एक मैत्रिण आहे ती मेथीचे ठेपले घेणार आहे. त्यामुळे मेथीच्या पुर्‍या पण नकोत. उद्या निघायचय त्यामुळे आजचा दिवस हातात आहे.

मितान --- इथे बघ, पुर्‍याच पुर्‍या आहेत : पालक पुरी, मसाला पुरी, मखमल पुरी, मटकीच्या डाळीच्या पुर्‍या वगैरे

http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/93035.html

http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/131919.html?1190298863

अरुंधती, पालकाच्या पुर्‍या सोयीच्या वाटतायत. सोबत एखादी कोरडी चटणी नेली की काम होईल. करते आज.
दुवा शोधून दिल्याबद्दल तुला दुवा Wink Happy

आज घरात कांदा सोडुन एकही भाजी नाहीये. पोळीला लावयला काय करता येईल? चटणी आणि पिठले सोडुन?
शक्यतो बिनकांद्याचे?

मुगाची किंवा वालाची डाळ भिजवुन मोकळी डाळ कर ना

डाळ भिजव मग ती फोडणी करुन वाफेवर शिजव. तिखट मिठ घाल छान लागते.

शेंगादाण्याची आमटी कर मस्त.
कच्चे शेंगादाणे, जिरे, लाल तिखट आणि लसूण मिक्सरमधून पाणी घालून काढायचे आणि मग कढिपत्ता कोथिंबीर घालून मस्त फोडणी घालायची. पोळीबरोबर, भाताबरोबर आणि ब्रेडबरोबर पण छान लागते ही आमटी. Happy

Haloumi Cheese च काय करता येईल? माझ्याकडे ग्रील नाही आहे. अजून काय करता येईल?

Pages