स्तुपांची मंदिरं- भाग १ (विठ्ठल मंदिर)

Submitted by मधुकर on 9 August, 2010 - 04:59

पंढरपुरचे विठ्ठल मंदिर हे बुद्ध मंदिर असुन अन्य काहिही नाही अशी महाराष्ट्रात खुप खोल रुजलेली परंपरा पुरातन काळापासुन चालत आलेली होती. पण नंतर हिंदुनी या स्तुपांचे हळू हळू हिंदु मंदिरात रुपांतर केले. पण विठठल मंदिर हे हिंदु मदिर नसुन ते मुळात बौद्ध मंदिर कसे होते याचे काही पुरावे बघु या.

१) १९४०-१९६५ या कालावधित पुण्यावरुन प्राथमिक शाळेचे उजळणीचे (मुळाक्षर व अंकगणित) पुस्तक प्रकाशित होत असे. त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दशावताराचे चित्र असे. त्यात नववा अवतार बुध्द असल्याचे दाखविले जास्त असुन जे चित्र छापले जायचे ते अजिंठा किंवा वेरुळच्या बुद्धाचे नसुन पंढरिनाथ “विठठलाचे” चित्र असे. विट्ठ्ल हाच बुद्ध आहे असे स्पष्ट करणारा हा सगळ्य़ात मोठा पुरावा.
२) कागदाचा शोध लागण्या आधी किंवा त्या नंतरही महाराष्ट्रात शिळाप्रेसवर पंचांगे छापली जात असत. या पुरातन पंचांगाच्या मुखपृष्ठांवर नवग्रहाची किंवा दशावताराची चित्रं छापली जात असतं. या सर्व शिलापंचांगात सर्वत्र नववा अवतार म्हणून विठठलाचे चित्र छापले जात असतं व नावाबद्द्ल शंका येऊ नये म्हणून विठठलाच्या चित्राखाली बुद्ध असे लिहले जात असे. श्री. वा.ल. मंजुळ व डॉ. के जमनादास यानी अशा प्रकारच्या पंचांगाचा संग्रह तयार केला आहे. विठठलाच्या शिल्पाला बुध्द नाव असलेली काही ठिकाणं येणेप्रमाणे आहेत.

अ) तासगांव (जि. सांगली) येथे विंचुरकरानी बांधलेल्या दक्षीणी शैलीच्या गणेश मंदिराच्या गोपुरावर विठठलाचे मुर्तीला बुद्ध असे नाव आहे.

ब) कोल्हापुरच्या महाल़क्ष्मी मंदिराच्या प्राकाराअतिल एक ओवरीत बुद्ध नावाने विठाबो दिसेल.

क) राजापुर (जि. रत्नागिरी) येथील लक्ष्मीकेशव मंदिरात मुर्तीच्या प्रभावळीत जे दशावतार कोरलेले आहेत त्यातही बुद्ध म्हणून जी मुर्ती कोरलेली आहे, ती आज झिजुन गेलेली असली तरी तिच्या उर्वरित आकारातुन ती विठठलाची मुर्ती असल्याचे स्पष्ट होते.

आता बघु या काही पुस्तकांचे व ईतिहासकारांचे या वरिल मत.

डॉ. भाऊ लोखंडे:
यानी संपुर्ण मराठी संतांच्या वाड.मयाची समिक्षा करुन त्यांचा सारांश काढलेला आहे. ज्यानुसार मध्ययुगीन मराठी संतकवीनी विठठलाला, दुसरे काहि नसुन बुद्धच मानलेले आहे. मी तो जशाचं तसं ईथे देतो (लोखंडे : १९७९ पान १२३) “बाराव्या शतकातील ’गीत गोविंद’ कर्ते कवि जयदे वुद्धाची स्तुती नवव्या अवताराच्या स्वरुपात करतात. ती पुराणावर आधारित आहे. मराठी संत त्यांचे प्रमुख दैवत यांना बुद्धच मानतात (विठोबाच्या रुपाने) कारण विठोबाच बुद्ध आहेत असं दशावतारात मांडलेलं आहे. संत एकनाथ विठठलाला बुद्ध मानुन पुढिल प्रमाणे म्हणतात
“ लोक देखोनि उन्मत दारांनी आसक्त।
न बोले बौद्ध रुप ठेवीले जघनी हात।
नववा वेसे स्थिर रुप तथा नाम बौद्धरुप।“
व वारक-याची दिक्षा देताना जी पाच वचने वधविली जातात ती पंचशिलापेक्षा काहि वेगळी नाही.”

श्री. ए. आर. कुळकर्णी.:
श्री कुळकर्णी यांचे मत सर्वविदीत असुन त्यानी संपादन केलेल्या ’धर्मपद’ या ग्रंथाच्य अपरिशिष्टात देलेले आहे. त्यानी मराठी संतकवींव्या साहित्याची समिक्षा करुन निष्कर्ष काढले आहेत जसे कि, आपण पाहिल्या प्रमाणे भाऊ लोखंडे यानी काढले आहेत. कुळकर्णी म्हणतात कि मंदिराच्या मंडपातील खांबावर ध्यानी बुद्धाच्या आकृत्या आहेत. ते असे सुद्धा म्हणतात कि, विख्यात पाश्चिमात्य विद्वान जॉन विल्सन “मेमॉयस ऑन दि केव्ह टेम्पल” नामक आपल्या ग्रंथात विठठल मंदिर हे बुद्ध मंदिर असल्याचे प्रमाण दिलेले आहेत.
पांडुरंगाची मुर्ती हि झिल्लिदार पंजाची एक अप्रतिम नमुना आहे. झिल्लीदार पंजा बुद्धाचे परंपरागत चिन्ह आहे. यावरुन ती बुद्ध मुर्ती आहे हेच स्पष्ट होते.

आर. डी. भांडारकर:
विठालाची मुर्ती हि बुद्ध मुर्ती असल्याचे पुरावे देताना भांडारकर दोन शिलालेखाचे पुरावे देतात. बेळगाव नजीक एका गावाचे दान पुंडरिक क्षेत्रासाठी दिलेले आहे. हे क्षेत्र भिमारथी च्या काठी असुन ते पवित्र आहे. इ. १२४९ व १२७० चा आप्तोराम्य यज्ञ व शिलालेखात पांडुरंग आणि पुंडरिक हि नावे आह्ते. हि दोन्ही नावे बौद्ध परंपरेची आहेत. ’सधर्म पुंडरिक’ नामक ग्रंथ तर प्रसिद्धच आहे. विठ्ठल हे नाव ब-याच नंतरच्या काळात आले हे स्पष्टच आहे असे भांडारकारांचे म्हणने आहे.

रा. चि. ढेरे
ढेरे यांचे “श्री विठ्ठल एक महासमन्वय” (दक्षिण गोपजनांच्या एका लोकप्रिय देवाच्या वैष्णविकरणाची आणि उन्नयनाची शोधकथा) ॥ढेरे: १९८४॥ या ग्रंथात विठठलाच्या अनेक पैलुंचे विश्लेषण केलेले आहे. सर्वच स्थल पुराणांचे विवरण दिलेले आहे. त्यांचे म्हणणे आहे कि, सर्वच स्थल-पुराणातिल “पांडुरंग महात्म्य” विठ्ठल या देवतेचे वैष्णविकरण करण्याचा प्रयास आहे. ते म्हणतात कि वैष्णवानी बुद्ध स्विकारला परंतु बुद्धाच्या विचाराना छेद दिला व त्यात हिंदुत्व पेरलं.

-------------------------------------
पुढिल भागात येणारे लेख
१) आय्यापा मंदिर
२) पुरिचे जगन्नाथ मंदिर
३) द्राक्षाराम
४) श्रीशैलम
५) तिरुपती बालाजी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

<एका संस्थळापुरते मर्यादित न ठेवता राष्ट्रीय व स्थानिक वृत्तपत्रांतून कोट्यावधी लोकांच्या समोर का आणले नाही हे कोडे मात्र मला अद्याप सुटलेले नाही. >

त्यात काय? अहो मायबोली हे अमेरिकन कोर्टांसारखीच आहे - 'This is the court of law and order. Truth or justice have no place here' असे इथे सर्रास म्हंटले जाते.

तसेच इथे 'सत्य काही का असेना, आम्हाला लेखनस्वातंत्र्य आहे म्हणून आम्ही लिहिणार - सत्य लिहिणे, विचार करून लिहीणे, जबाबदारी इ. गोष्टींना इथे किंमत नाही.'

इतर ठिकाणी तसे चालत नाही.

>> मधुकर लिह्तो एकटा त्या विरोध करतात १०० लोकांचे २०० हात आणी प्रत्यकाचा आय डी चेक केल्यावर मला आसे जानवले की मी केलेला प्रश्न . मा.बो.मुस्लीम आय .डी . का नाही , हे माझे निरिक्षण किती अचुक आहे ते ही कळते
हे कसे कळले स्पष्ट कराल का? किती लोक खरे नाव लिहीतात येथे? मी कोण सांगाल का?

>> मा. बो. वर इतर ही हिन्दु धर्मातील लोक आहेत त्यांनी कधी ही या संदर्भात मधुकर बद्दल इतके खालच्या पातळी वर जाउन लिहले नाही वा या वादात स ह भागी झाले नाहीत कारण ती लोक इतर समाजात काही काळ राहीलेली आहेत वावरलेली आहेत .

हि तर फार चांगली गोष्ट आहे. या थोड्यांकडे कानाडोळा करा ईतर १००० रो मायबोली कर काहीच लिहीत नाही यावरुन तुम्ही लगेच आपला निर्‍ष्कश काढला की ती लोक इतर समाजात काही काळ राहीलेली आहेत वावरलेली आहेत व तुमच्या मताशी सहमत आहेत?

लक्ष्मण - आमचाही विचार करा. आम्हीही माणसे आहोत. कोणी आमची श्रद्दास्थाने आमच्यापसुन हिरवुन घेत असेल तर? मधुकरांनी लेख लिहायाच्या आधी हा विचार केला का की या जागेचा संर्पुण ईतीहास लिहवा या माहीत सकट की काही ईतिहास कारांना असेही वाटते के हे जागा स्तुप असावी. एकर्तफी लिखाण कराल तर प्रतीकिया पण एकर्तफी मिळतील.

मी कधी ही धर्म वा जात आणी कोणाला ही इतिहासाचे पुरावे दीले नाहीत >> मधुकर देत आहे ना? हा धागा तू कुठे सुरु केलास? असे लेख तर तोच लिहत आहे ना? इतिहासात पुराव्याशिवायच काही बोलताच येत नाही. नाहीतर मी रामाकडे विमान होतं हे इतर देशांनी मान्य नको का करायला? Happy

मधुकर्चे लिखान कसे पचेल वा झेपेल . >>>

पचायची गोष्ट कशी? पुराव्याने खोडले तरी चुक केले असे तुला म्हणायचे आहे का? मग तू पुरावे दे की. बरोबर असले हो म्हणायला काय हरकत? इतके सोपे आहे ते.

ब्राह्मण जातीशिवाय मायबोलीवर बौद्ध वा इतर जातीतले आहेत हे कसे लक्षात येत नाही तुझ्या?

मधुकर इथे येण्या आधी कधिही हिंदू बौद्ध असे तिढे निदान मायबोलीवर नव्हते. मधुकर नेहमीच हिनतावाचक उल्लेख कुठल्याही बाफवर करत असतो, त्याला विषयाची धरबांध नाही. मधुकरला अनेकदा इथे समजावून पण सांगीतले आहे. पण फरक नाही, उलट असे बाफ ते पण नीट पुरावे न देता काढायचेच कशाला? हां इथे धर्माविषयी जरुर बोलले जाते, पण बौद्ध नाही मुस्लीम!

मधुकरला तर कळलेच नाही, पण तू ही तोच समज करत आहेस. त्याचे हिन उदगार तू वाचले नसतीलच म्हणा.

गंमत काय की आधी काही लिहून ठेवायचे, ते खोडले की कांगावा करायचा, मग आरडाओरडा करायचा तुम्ही निघून जा म्हणून, त्यापेक्षा जे लिहले त्या बाबतीतच नीट पुरावे द्यावेत अन्यथा विचार करुन लिहावे. मी हा लेख व तो पुरीचा लेख खोडला आहे, तो पर्यंत गडबड झाली नाही, त्यानंतर झाली, तस्मात मित्रा, तुला जर मधुकर लिहतो ते योग्य वाटत असेल तर काही हरकत नाहीच, तू अजूनही पुरावे दे.

खरी गोष्ट अशी आहे की त्याला बुद्ध धर्माचे पण किती माहित आहे ह्यावर शंका यावी.

आणि माझ्या आडनावावरुन विचार जोखनार्‍‍या माझ्या मित्रा चार बोटे ह्यावेळी तुझ्याकडे आहेत हे लक्षात ठेव. आफकोर्स तू इथे आडनावावरुन जोखत असलास तरी मी ती चुक कधि करत नाही. मागे ही तुला ह्या मधुकरच्या बाबतीत विपुवर बोलल्याचे आठवत आहे मला. मधुकरला इथे ह्या बाफवर विरोध करणारे जातियवादी, ही तुझी व्याख्या तुला तपासायची गरज मात्र आहे.

महार रेजीमेंटने इंग्रजांबरोबर भारतीयांशी युद्ध केले त्याचे सेलेब्रेशन करणारे जातीयवादावर बोलतात. असो !!

(बायदवे मराठ्यांनीही छत्रपती अन पेशव्यांविरुद्ध युद्ध केली आहेत, त्यांना नाही पाहिलं छत्रपती शाहू विरुद्धचे किंवा पेशव्याविरुद्धचे युद्ध सेलिब्रेट करताना. मी आधी खोडून काढले म्हणून पोस्टप्रपंच, अन्यथा ह्या जातीविषयी चर्चेपासून मी दुरच बरा.)

लक्ष्मण, तुम्ही नक्की काय लिहिले आहे? तुम्ही लिहिलेल्यापैकी ८०% पोस्टीचा इथे चाललेल्या चर्चेशी/वादाशी काय संबंध आहे?

<<मी हे करत नाही.. ते करत नाही.. हे करतो.. ते करतो>>
बर मग? त्याचे काय?

<<मधुकर लिह्तो एकटा त्या विरोध करतात १०० लोकांचे २०० हात ... मा.बो.मुस्लीम आय .डी . का नाही , हे माझे निरिक्षण किती अचुक आहे ते ही कळते>>
देवाने दिलेल्या बुद्धीचा जरा वापर जरा करुन विचार करा की. मधुकरने हिंदूंबद्दल वाट्टेल ते लिहिले आहे (इथे आणि इतरत्र). तर मग त्याच्या विरोधात हिंदूच लिहिणार ना. मायबोलीवर मुस्लिम आयडी असण्याचा, नसण्याचा, त्यांनी इथे प्रतिक्रिया देण्याचा काय संबंध? उगीच काहीतरी वेडपटासारखे अनुमान काढायचे!

<<जातीयवादी म्हणजे काय याचे जर माहीती हावी आसेल ना तर माझ्या सोबत पुण्यातील.... >>
आता काही गरज नाही. मधुकरने पुरेपूर कल्पना दिली त्याची. त्याने ब्राह्मण, हिंदूंपासून ते औरंगजेब, शिवाजी महाराजांपर्यंत सर्व जातीधर्मांवर पुष्कळ मुक्ताफळे उधळली आहेत.

आरे लोकाहो मी स्वतःहा बोध्द नाही , आणी आसेल तर मला बोध्दाची पंचशिल तत्व पालन करण ह्या जन्मात शक्य नाही .
फक्त ब्राम्हण गुरजी लग्न लावत नाही त आणी दुसरा कुटला प्रयाय नाही म्हणुन माझ्या सारखी लोक बोध्द .
माझ्या घरात मोठी आई विठ्ठलाची व तुळजा भावानी ची भक्त , लहानी आई पिराची भक्त
(पिर म्हण्जे सुफी फकीराची कबर) , भाऊ आंबेडकर जंयतीला आंबेडकरांचा भक्त बोध्द जंयती बोध्दा भक्त , शिव जयंतीला महारांजांचा भक्त
( कारण प्रत्येक जंयती पेउन साजरी करण्याची परंपरा सुरु आहे आमच्यात )
..... आम्ही गावच्या प्रत्येक यात्रे जत्राला एक बोकड कापतो व नवस फेडतो तरी आम्ही बोध्द .
माझ्या मतानुसार महाराष्ट्राती जी काही लोक स्वता:हाला बोध्द म्हणुन घेतात( मी पण ) ते एका तरी बोध्द तत्वाचे पालन करतात का ? तरी ही आम्ही बोध्द .
मित्रांनो मला जे कही म्हणायचे आहे ते आजच्या लोकमत मध्ये आहे
जेष्ट लेखिका गिरजा कीर यांची भावना :-"समाजातील वेगवेळ्या घटकांशी समरस होउन , त्यांच्याबरोबर राहुन त्यांच्या वेदना समजुन घेउन मी गेली अनेक वर्ष काम करीत आहे .
जगात अन्याय करणारे आणी अन्याय सहन करणारे अशा दोनच जाती आहेत .
मला तुम्हाला हेच सांगायचे आहे समाजातील वेगवेगळ्या घटकांशी समरस व्हा त्यान्चे ही लिखान वाचा म्हण्जे त्यांना काय सांगायचे आहे ते एकुन तरी घ्या त्यानी कुटे सुरवात केली नाही की दवंडी पिटु नका आरेरेर्रेरेर्रेरेरे धर्मा वर आक्रमण .
जगातील कोणताही जिवीत व्यक्ती आपल्या धर्माच १०० % काय ५०% पालन करत नाही उगीच एक मेंकाना इतिहासाचे दाखले देउ नका व स्वता:चा टेंभा मिरउ नका .
................................................................................................................

मधुकर जी पुस्तके वाचतो ती पुस्तके तुम्हाला कोणत्या ही पुस्ताकाच्या दुकानात मिळणार नाहीत त्या करीता तुम्हाला मी माझ्या एका पोस्ट मधे उल्लेख केलेल्या जागीच जावे लागेल आणी काय हारकत आहे एक वेगळा प्रयत्न करायला .
माझ्या द्रुष्टी हा विषय संपला . (परत टाईमपास करण्याकरीता आसेच कधी तरी )

लक्ष्या चे लक्ष

मधुकर,

लेख आवडला. विठोबा हा मूळचा बुद्ध आहे किंवा दोघे एकच आहेत हा मुद्दा नावीन्यपूर्ण आहे. पुढील लेखांच्या प्रतीक्षेत आहे. मुद्दा नावीन्यपूर्ण आहे, परंतु खरा / खोटा यावर झालेल्या चर्चेत / चर्चा वाचण्यात भरपूर वेळ गेला.

विठोबा हा बुद्ध किंवा बुद्ध हा विठोबा असायला प्रॉब्लेम काय आहे ते लक्षात आले नाही.

मी स्वतः ब्राह्मण आहे. पण साधारण दिड शतकापुर्वीपर्यंत किंवा त्यानंतरही ब्राह्मण इतरेजनांशी अत्यंत हीनपणे वागलेले आहेत व ती कृत्ये अमानवी होती हेही तितकेच खरे आहे. संभाजी ब्रिगेड व तत्सम संस्थाही तिरस्करणीयरीत्या वागत आहेत. (इतकेच काय, मी एक्केचाळीस वर्षाचा व माझे वडील ७७ वर्षांचे, दहा वर्षापुर्वीपर्यंत त्यांना 'ब्राह्मणेतर' बाईने केलेल्या पोळ्या 'चालायच्या' नाहीत.) (आता चालतात.)

'जात' या विषयावर ऐकणारच नाही अशी भूमिका घेताना वास्तव नाकारले जाते असे वाटते. मुळात विठोबाला पूजणारे बहुतांशी लोक ब्राह्मणेतर असताना चर्चा तिकडे कशी गेली असावी ते लक्षात आले नाही. कारण खूपच चर्चा झालेली आहे.

बरं! विठोबा बुद्ध आहे हे आपण दिलेल्या संदर्भांशिवायच्या स्पष्ट पुराव्यांनिशी सिद्ध झालेच तर काय होईल?

ह.बा. या सदसदस्यमाने वावरणार्‍या व्यक्तीशी बर्‍याच अंशी सहमत!

ह.बा,

जेम्स लेनने तसे लिहीणे व 'आईची बेअब्रू होणे' याबाबत मलाही तीव्र संताप आहे हे मी त्याही लेखात लिहीले होते. मात्र, मायबोलीवर एखादा विशिष्ट गटच अधिक कार्यरत आहे असे मानण्याचे कारण नसावे. आपल्या साहित्याला भरभरून दाद मिळतेच! (अर्थात, हे अवांतर आहे तसे!)

-'बेफिकीर'!

<त्यापेक्षा जे लिहले त्या बाबतीतच नीट पुरावे द्यावेत अन्यथा विचार करुन लिहावे. >

पण का? तसे नसेल म्हणून लिहीण्याचा आमचा हक्क तुम्ही हिरावून घेता का?

<तुम्ही लिहिलेल्यापैकी ८०% पोस्टीचा इथे चाललेल्या चर्चेशी/वादाशी काय संबंध आहे?>

परत तेच! नसेना का संबंध? आम्ही लिहीणारच. आम्हाला लेखन स्वातंत्र्य आहे!!

<पण साधारण दिड शतकापुर्वीपर्यंत किंवा त्यानंतरही ब्राह्मण इतरेजनांशी अत्यंत हीनपणे वागलेले आहेत व ती कृत्ये अमानवी होती हेही तितकेच खरे आहे. >

मधुकरराव, लक्ष्मणराव मोड ऑनः

हा घ्या सज्जड पुरावा, माझ्या आरोपांचा! यामुळेच ग्राऊंड झिरो जवळ मशीद बांधण्यास ब्राह्मणांनी पैसे द्यायला पाहिजेत.

संबंध सगळ्याचा, ब्राह्मणांनी अत्याचार केले, हाच आहे. इराक युद्ध, मेक्सिकन इमिग्रेशन प्रॉब्लेम या सर्वांचे कारण तेच!!

मधुकरराव, लक्ष्मणरावमोड ऑफ.

अबब ११७ नवीन?

लक्ष्मणराव जातीवादावरचं काय आढळलं तुम्हाला ह्या चर्चेत?

विठोबा हा बुद्ध किंवा बुद्ध हा विठोबा असायला प्रॉब्लेम काय आहे ते लक्षात आले नाही. >>
बेफिकिर साहेब आपल्याला मुद्दा लक्षात आलेला नाही. विठोबा बुद्ध असायला किंवा बुद्ध धर्मावर कोणीच हरकत घेतली नाही ! येथील लोक हरकत घेत आहेत ते ती "स्तुपांची मंदिर" हिंदु लोकांनी असलेले स्तूप पाडून केल्याला. दोन्ही मधे फरक आहे. रक्तपात होउन ती मंदिरे पाडून "परकिय हिंदूंनी" तिथे "हिंदुत्व पेरलं" असा मधुकरांचा आक्षेप आहे. आणि त्याला लोकं इथे विरोध करत आहेत. अठरापगड लोकांनी जाण्याचा काही संबंध नाही,

हा वर्षापुर्वीपर्यंत त्यांना 'ब्राह्मणेतर' बाईने केलेल्या पोळ्या 'चालायच्या' नाहीत.) (आता चालतात.) >> ह्याचा इथे काय संबंध आहे? बौद्ध कसे वाईट, बामण कसे वाईट, संभाजी ब्रिगेड ही लढाई दुसरीकडे खेळा तिथे मी पण असेच काहीसे लिहेन की बामणांनी कसा त्रास दिला वगैरे. .

नंदन, या माझ्या मित्राने मला योग्य ते भान आणल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. येथील माझा अनावश्यक प्रतिसाद रद्द करत आहे. त्यांचा असाच लोभ असावा ही प्रार्थना!

-'बेफिकीर'!

.

>>आपला जिथे संबंध नाही तिथे नाक खुपसणे अयोग्यच!
आपल्याला ज्याची माहिती नाही तिथे घरच्यांची माहिती सांगत फिरणेही अयोग्यच. नाही का?
बीबीला फालतू वळणे [कुणी बोलावे, का बोलावे] हे लागू नयेत म्हणून मी लिहीले आहे.

नंदन,

ओह! सॉरी!

मी माझा प्रतिसाद 'रद्द' करतो. काहीतरी 'अवांतर' लिहून गेलो याचे भान दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे.

'घरच्यांची माहिती'! - माझ्या वडिलांची माहिती होती ती! इट्स ओके!

-'बेफिकीर'!

एक मत! 'गेली' ... 'पाच' वगैरे वर्षे 'अमेरिका' किंवा 'तत्सम' ठिकाणी राहून 'तापल्या तव्यावर पोळ्या भाजणार्‍यांनी' नेमके किती बोलावे इथल्या गोष्टींबद्दल??>>
अतिशय उत्क्रुष्ट मुद्दा मांडलात बेफिकिर.

दुसरे मत : "तत्सम" ठिकाणाच्या लोकांनी चालवलेल्या "तत्सम" होस्ट केलेल्या साईट्वर "इथल्या" लोकांनी कसे काय लिहावे ? Lol

सन्माननीय 'असामी',

मला हे खरच माहीत नव्हते. मी माझे 'मायबोली'वरचे सर्व लिखाण थांबवत आहे. जाणीव करून दिल्याबद्दल आभारी आहे. कृपया लोभ असावा.

-'बेफिकीर'!

अहो बेफिकीर, थांबा!!

'गेली' ... 'पाच' वगैरे वर्षे 'अमेरिका' किंवा 'तत्सम' ठिकाणी राहून 'तापल्या तव्यावर पोळ्या भाजणार्‍यांनी' अश्या माझ्यासारख्या लोकांना भारतातल्या लोकांच्या ढोंगी (की मत्सरग्रस्त?!) वृत्तीचा राग येतो.

आता भारतात नाही म्हणजे आम्हाला काहीच माहित नाही का? आम्हाला काय भारताबद्दल काहीच वाटत नाही का? विषयाबद्दल आम्हाला जे माहित आहे, ते तुमच्या मनाविरुद्ध असले की नेमके भारतातले लोक असली विधाने करतात.

आता भारतीय सुद्धा इराक, अमेरिकेबद्दल लिहीतात, पण आम्ही असे म्हणत नाही, की भारतातले लोक का बोलतात? (आता त्यांनी काहीहि म्हंटले तरी इथे कुणिपण ढुंकूनदेखील मनावर घेत नाहीत, ही गोष्ट वेगळी. भारतातले लोक म्हणजे स्वस्त कामगार. संधी मिळाली की तापल्या तव्यावर पोळ्या भाजायला, अहमहिकेने पुढे! बोलेनात का काहीहि!)

तर तुम्ही इथे खुशाल लिहा. सर्वांना मतप्रदर्शन करण्याचा हक्क आहे, परिणाम होवो अथवा न होवो!

बेफिकिर, तुम्ही काय करावे ह्याबद्दल मला काहीहि बोलायचे नाही, तुम्ही बेफिकिरीमधे जि विधाने करता त्यातला विरोधाभास दाखवून दिला.

हबा उवाच >>>
येतो त्यानंतर प्रत्येकजण फक्त माणूसच असतो. कुणाच्यातरी प्रभावाखाली येऊन किंवा चळवळीच्या प्रेरणेने एखादा विशिष्ठ मते मांडत असेल तर ती त्याची बाजू असते. कुणाला घातलेल्या शिव्या नाही.>>

हबा जो सल्ला आपण आशिषला दिलात तोच आपल्याला देतो : खरच इथे पोस्ट करायच्या अगोदर कुणातरी चांगली विचारशक्ती असलेल्या आधी ते पोस्ट दाखवत चला ...

विठ्ठल मंदिर स्तुप असणे आणि विठ्ठ्लाला बुद्ध समजणे ह्यात फरक आहे. विठठल मंदिर नागर अथवा हेमाड्पंती शैलित बांधलेले मंदीर आहे. तिथे आधी स्तुप होता किंवा मंदिरासारखे स्तुप १० व्या शतकात बांधत होते असे दर्शवणारे काही पुरावे आहेत का? मधुकर जी पुस्तके आपण बघत आहत त्यात ह्या बाबत काय मांडले आहे?

पेशवा,
कुणातरी चांगली विचारशक्ती असलेल्या आधी ते पोस्ट दाखवत चला ...
>>> म्हणजे ज्याला तुमच्या मनाप्रमाणे लिहायची बोलायची वागायची तयारी आहे त्याला. असेच ना?

हबा जो सल्ला आपण आशिषला दिलात तोच आपल्याला देतो >>>>
Rofl तुम्ही मला आशिष समजलात हे ठीक आहे हो पण स्वतःला हबा कसे काय समजता? नक्कल करताय?

पेशवे.... आशिषला मी दिलेला सल्ला त्याने लगेच ऐकला बर का. पण मी आपला सल्ला ऐकावा एवढी आपली कुवत आहे असे आपल्या पोस्ट्स वरून वाटत नाही. तेव्हा..... चल रे ह्याट..... तिक्डे. आलाय सल्ला द्यायला.... Happy

हबा ,

स्वतःला हबा सम्जण्या इतके आणी तुमची नक्कल कराविशी वाटावी इतके वाईट दिवस विठ्ठल अथवा बुद्ध कृपेने अजुनतरी आलेले नाहीत Happy

जी गीता दुसर्याला सांगत फिरत आहात ती तुमच्या आतल्या गाढवापुढे पण वाचा (अर्थात कुवत असेल तर) इतकेच सुचवले Happy

कर्नाटकामधे हंपी असे एक ठिकाण आहे. तिथे फार जुने असे विठ्ठल मंदिर आहे. पाचशे वर्षापूर्वी पुरंदरदास नावाचे एक विठ्ठलाचे परम भक्त होऊन गेले. त्यानी विठठलावरती हजाराहून जास्त गाणी रचली. हे मंदिर फार सुंदर आहे, तिथे संगीत वाजवणारे दगडी खांब आहेत. तसेच, विठ्ठलासाठी एक दगडी रथदेखील आहे. मंदिराचे बांधकाम "हेमांडपंथी" शैलीतले आहे.

जेव्हा हंपीवर मुस्लिमानी आक्रमण केले, तेव्हा तिथला विठ्ठलाची मूर्ती लपवत छपवत एका छोट्या गावात आणली, तेच पंढरपूर!! तेव्हा ते मंदिर "स्तूप" असेल वा नसेल. विठ्ठल मात्र कर्नाटकातलाच!!!

पटत नसेल तर जुन्या संताच्या या ओळी बघा!!
"कानडा ओ विठ्ठलू कर्नाटकू" "कानडा राजा पंढरीचा"

>>विठ्ठल मात्र कर्नाटकातलाच!!!

आता हे वाचून कुणी कानडी माणसाने 'गुडी आल्ले कट्ट् बेकु' ( मंदिर वही बनायेंगे) असे आंदोलन सुरु केले नाही म्हणजे मिळवली.

मंदिर की स्तूपे या चर्चेत खरं तर अनावश्यक लिंक आहे... पण निर्जिव वास्तुमुळे सजीवांत वाद नको म्हणून माझी ''धर्म'' ही गझल सर्वांनी अवश्य वाचावी ही विनंती.

http://www.maayboli.com/node/18860

डॉ.कैलास

मायबोली अ‍ॅडमिन हे तुझ्या बाबतीत खुपच मवाळपणाने वागत आहेत. पण इतरही हे असेच मवाळपणाने घेतील असे नाही. तु हा/इतर लेख कुठल्याही बायस शिवाय लिहिले असतेस तर तो एक उत्तम संशोधनात्मक लेख झाला असता पण तु हा (आणि इतर मंदिरांविषयी जे) लेख लिहिले आहेस त्याच्यातुन तुला हिंदुनी काहीतरी अन्याय करुन बौद्ध स्तुपांचे मंदिरात रुपांतर केले हा अर्थ ध्वनीत करायचा आहे हे न कळण्याइतके इथले लोक मुर्ख नक्कीच नाहीत. एखादा मंदार जोशी असाही निघेल ज्याच्याकडे वेळ्/पैसा असेल तुझ्यावर कायदेशीर कारवाई करण्याएवढा. खुप विचार करुन लिहिणे बर पडेल तुला. (असे आपले मला वाटते). बाकी तु बुद्धीमान आहेसच.>>>>>अनुमोदन.

अश्याप्रकारची भ्रमित माहिती नेटवरून पसरवून तुम्ही लोकांना मूर्ख बनवता बनवता स्वत:ला ही बनवता आहात.

मी तुम्हाला संतांचे अनेक अभंग देऊ शकतो जे सिध्द करतात की पंढरपूरचा पांडुरंग (विठ्ठल) हा दुसरा तिसरा कुणीही नसून भगवान विष्णूंचा अवतार कृष्ण आहे. सगळ्यात स्पष्ट पुरवा म्हणजे संत कान्होपात्रांचा अभंग.
____________________________
"अगा वैकुंठीच्या राया, राया विठ्ठल सखया
अगा नारायणा, अगा वासुदेवनंदना"

हा अभंगसुध्दा सांगतो की विठ्ठल हा दुसरा तिसरा कोणीही नसून वासुदेवाचा नंदन (पुत्र) नारायणरूपी भगवान कृष्ण आहे. आता त्यापुढचे कडवेसुध्दा पहा,

"अगा पुंडलीकवरदा, अगा विष्णू तू गोविंदा
अगा रखुमाईच्या कांता, कान्होपात्रा राखी आता."

येथे स्पष्ट उल्लेख केला गेलेला आहे की पुंडलिकाला वर देणारा विठ्ठल हा दुसरा तिसरा कुणीही नसून विष्णू म्हणजेच गोविंद (कृष्ण) आहे जो रखुमाईचा कांत (नवरा) आहे.
_____________________________
आता मला सांगा की बुध्द रूक्मिणीचा कांत (नवरा) होता का?
"विठ्ठल-रुक्मिणी" ही जोडी तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे.
पद्मपुराणसुध्दा पंढरीच्या विठ्ठलाचा माहिमा गाते.

तुम्ही उल्लेख केलेल्या कुलकर्णी, भांडारकर आणि ढेरे, यांची वैयक्तीक मते सत्य बदलू शकत नाहीत. तर ५व्या शतकामध्ये आदि-शंकराचार्यांनी लिहिलेले 'पांडुरंगअष्टकम' हा सर्वात मोठा पुरवा आहे जे तुमच्या सर्व थिअरी चुकीच्या ठरवते.

http://ioustotra.blogspot.in/2008/11/shri-pandurangashtakam.html

पांडुरंगअष्टकम (पांडुरंगाष्टकम) हे आदि-शंकराचार्यांकडून ५व्या शतकात लिहिले गेले होते जेव्हा सिद्धार्थ गौतम बुध्दांचा जन्म सुध्दा नाही झाला होता.
_______
जेव्हा कृष्णाने सत्यभामाला पारिजाताचे वृक्ष स्वर्गातून आणून दिले तेव्हा रूक्मीणी नाराज होऊन कोणालाही न सांगता द्वारका (गुजरात) सोडून दक्षिण दिशेला (महाराष्ट्रात) आली. जेव्हा कृष्ण तीची समजूत घालू लागला तेव्हा तीने कृष्णासोबत परत द्वारकेत यायला नकार दिला. त्यानंतर कृष्णाने पुंडलिकाला भेट दिली कारण मातृपितृभक्त पुंडलिकाची बातमी सगळीकडेच पसरली होती. जेव्हा द्वारकेचे राजा कृष्ण पुंडलिकाची भेट घ्यायला गेले तेव्हा पुंडलिकाने कृष्णाजवळ विट फेकली आणि म्हणाला, "हे द्वारकाधीशा! मी माझ्या आईवडीलांची सेवा करत आहे, तोपर्यंत तू वाट बघ."
कृष्णाने त्याची विटेवर उभा राहून कंबरेवर हाथ घेऊन वाट बघली. आपलं कायतरी चुकत आहे असं जेव्हा पुंडलिकाल वाटले तेव्हा त्याने कृष्णाची माफी मागितली पण भगवान कृष्ण म्हणाले, "तू केलेली मातृपितृ सेवा बघून मी प्रसन्न झालो आहे, माग तुला काय वर पहिजे?" तेव्हा पुंडलिकाने खूप हुशारीने वर मागितला की, "हे देवा! ज्या प्रमाणे तू मजभक्तासाठी या विटेवर उभा राहून वाट बघितलीत, त्याचप्रमाणे सतत तुझ्या भक्तांचे कल्याण करत कायमचा याच वीटेवर असाच उभा रहा !"
भगवान कृष्ण म्हणाले, "तथास्तू!"
त्यावेळी भगवान कृष्ण अप्रकट झाले आणि त्यांच्यासारखी दिसणारी हुबेहूब लहान आकाराची मुर्ती प्रकट झाली जी आज पंढरपूरच्या विठोबा मंदीरात पूजली जाते. अशाप्रकारे भगवान कृष्ण पुंडलिकाला दिलेल्या वरदानानुसार मूर्तीच्या रूपातून कंबरेवर हात घेऊन विटेवर कायम (अटळ) उभे राहिले म्हणूनच ते “विट+अटळ=विठ्ठल” म्हणून ओळखले जाऊ लागले. या मूर्तीचा शिल्पकार तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. कारण ही मूर्ती स्वयंभू मूर्ती आहे.
हीच ती मूर्ती जिने लहानग्या नामदेवाच्या हातून खीर खाल्ली.
हीच ती मूर्ती जिच्यामुळे संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत गोरा कुंभार, संत जनाबाई, संत नामदेव अश्या अनेक संताना आत्मसाक्षात्कार झाला. ह्या सगळ्यांनी आपापल्या ग्रंथांमध्ये पंढरीच्या पांडुरंगाचा उल्लेख वैकुंठाधिपती विष्णू (कृष्ण) असा केला आहे.
आपण म्हणतो, “जय हरी विठ्ठल !” येथे “हरी” शब्द भगवान विष्णूंना रिप्रेझेंट करतो. हर म्हणजे शिवशंकर आणि हरी म्हणजे विष्णू.

बौद्ध धर्माच्या प्रसाराच्या काळात पंढरपुरच्या मंदीराच्या स्थूपावर बौध्द धर्माविषयी कोरले गेले असेल आणि त्याच बौध्दांनी मुद्दाम धर्मप्रसारणासाठी तुम्ही सांगितल्याप्रमाणे अंकगणिताच्या पुस्तकात विठ्ठलाच्या मूर्तीखाली बुध्दाचे नाव घातले असेल.
पण सत्य जाणून घ्यायचे असेल तर विठ्ठलाच्या मूर्तीचे बारीक निरिक्षण करा. कंबरेवर हात घेतलेल्या विठ्ठलाच्या मुर्तीच्या
(1) डाव्या हातामध्ये शंख
(2) उजव्या हाताच्या वळलेल्या अंगठ्यात पद्म (फुल)
(3) छातीवरती भृगुलांछन चिन्ह.
(4) गळ्यात कौस्तुभाचा मणी.
(5) पायाखाली विट
आता मला सांगा, बुध्दाच्या मुर्तीच्या हातात कधी शंख, पद्म असतं का?
कंठी कौस्तुभाचा मणी कोण धारण करतो? --> उत्तर : विष्णू
कोणाच्या छातीवरती भृगुमुनींनी लाथ मारलेली? --> उत्तर : विष्णू
शंख, चक्र, पद्म, गदा कोणाच्या हातामध्ये असते? --> उत्तर : विष्णू
विटेवरती कोण उभा राहिलेला? --> भक्त पुंडलिकाला दिलेल्या वराप्रमाणे विष्णूंचा अवतार भगवान कृष्ण विटेवर उभा राहिलेला.

संतांच्या साहित्यातील अजून पुरावे आहेत माझ्याकडे पण उगाच तुम्हाला वाचायचा त्रास नको. तुम्हाला गरज पडली तर देईन.
हे सर्व पुरावे स्पष्टपणे सिध्द करतात की पंढरपुरचा पांडुरंग (विठ्ठल) हा दुसरा तिसरा कुणीही नसून भगवान विष्णूंचा अवतार भगवान कृष्ण आहे.
______________
धन्यवाद !
!! हरे कृष्ण, जय हरी विठ्ठल !!
Vitthal.jpg

या मूर्तीचा शिल्पकार तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. कारण ही मूर्ती स्वयंभू मूर्ती आहे.
हीच ती मूर्ती जिने लहानग्या नामदेवाच्या हातून खीर खाल्ली.

Happy

Pages