पंढरपुरचे विठ्ठल मंदिर हे बुद्ध मंदिर असुन अन्य काहिही नाही अशी महाराष्ट्रात खुप खोल रुजलेली परंपरा पुरातन काळापासुन चालत आलेली होती. पण नंतर हिंदुनी या स्तुपांचे हळू हळू हिंदु मंदिरात रुपांतर केले. पण विठठल मंदिर हे हिंदु मदिर नसुन ते मुळात बौद्ध मंदिर कसे होते याचे काही पुरावे बघु या.
१) १९४०-१९६५ या कालावधित पुण्यावरुन प्राथमिक शाळेचे उजळणीचे (मुळाक्षर व अंकगणित) पुस्तक प्रकाशित होत असे. त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दशावताराचे चित्र असे. त्यात नववा अवतार बुध्द असल्याचे दाखविले जास्त असुन जे चित्र छापले जायचे ते अजिंठा किंवा वेरुळच्या बुद्धाचे नसुन पंढरिनाथ “विठठलाचे” चित्र असे. विट्ठ्ल हाच बुद्ध आहे असे स्पष्ट करणारा हा सगळ्य़ात मोठा पुरावा.
२) कागदाचा शोध लागण्या आधी किंवा त्या नंतरही महाराष्ट्रात शिळाप्रेसवर पंचांगे छापली जात असत. या पुरातन पंचांगाच्या मुखपृष्ठांवर नवग्रहाची किंवा दशावताराची चित्रं छापली जात असतं. या सर्व शिलापंचांगात सर्वत्र नववा अवतार म्हणून विठठलाचे चित्र छापले जात असतं व नावाबद्द्ल शंका येऊ नये म्हणून विठठलाच्या चित्राखाली बुद्ध असे लिहले जात असे. श्री. वा.ल. मंजुळ व डॉ. के जमनादास यानी अशा प्रकारच्या पंचांगाचा संग्रह तयार केला आहे. विठठलाच्या शिल्पाला बुध्द नाव असलेली काही ठिकाणं येणेप्रमाणे आहेत.
अ) तासगांव (जि. सांगली) येथे विंचुरकरानी बांधलेल्या दक्षीणी शैलीच्या गणेश मंदिराच्या गोपुरावर विठठलाचे मुर्तीला बुद्ध असे नाव आहे.
ब) कोल्हापुरच्या महाल़क्ष्मी मंदिराच्या प्राकाराअतिल एक ओवरीत बुद्ध नावाने विठाबो दिसेल.
क) राजापुर (जि. रत्नागिरी) येथील लक्ष्मीकेशव मंदिरात मुर्तीच्या प्रभावळीत जे दशावतार कोरलेले आहेत त्यातही बुद्ध म्हणून जी मुर्ती कोरलेली आहे, ती आज झिजुन गेलेली असली तरी तिच्या उर्वरित आकारातुन ती विठठलाची मुर्ती असल्याचे स्पष्ट होते.
आता बघु या काही पुस्तकांचे व ईतिहासकारांचे या वरिल मत.
डॉ. भाऊ लोखंडे:
यानी संपुर्ण मराठी संतांच्या वाड.मयाची समिक्षा करुन त्यांचा सारांश काढलेला आहे. ज्यानुसार मध्ययुगीन मराठी संतकवीनी विठठलाला, दुसरे काहि नसुन बुद्धच मानलेले आहे. मी तो जशाचं तसं ईथे देतो (लोखंडे : १९७९ पान १२३) “बाराव्या शतकातील ’गीत गोविंद’ कर्ते कवि जयदे वुद्धाची स्तुती नवव्या अवताराच्या स्वरुपात करतात. ती पुराणावर आधारित आहे. मराठी संत त्यांचे प्रमुख दैवत यांना बुद्धच मानतात (विठोबाच्या रुपाने) कारण विठोबाच बुद्ध आहेत असं दशावतारात मांडलेलं आहे. संत एकनाथ विठठलाला बुद्ध मानुन पुढिल प्रमाणे म्हणतात
“ लोक देखोनि उन्मत दारांनी आसक्त।
न बोले बौद्ध रुप ठेवीले जघनी हात।
नववा वेसे स्थिर रुप तथा नाम बौद्धरुप।“
व वारक-याची दिक्षा देताना जी पाच वचने वधविली जातात ती पंचशिलापेक्षा काहि वेगळी नाही.”
श्री. ए. आर. कुळकर्णी.:
श्री कुळकर्णी यांचे मत सर्वविदीत असुन त्यानी संपादन केलेल्या ’धर्मपद’ या ग्रंथाच्य अपरिशिष्टात देलेले आहे. त्यानी मराठी संतकवींव्या साहित्याची समिक्षा करुन निष्कर्ष काढले आहेत जसे कि, आपण पाहिल्या प्रमाणे भाऊ लोखंडे यानी काढले आहेत. कुळकर्णी म्हणतात कि मंदिराच्या मंडपातील खांबावर ध्यानी बुद्धाच्या आकृत्या आहेत. ते असे सुद्धा म्हणतात कि, विख्यात पाश्चिमात्य विद्वान जॉन विल्सन “मेमॉयस ऑन दि केव्ह टेम्पल” नामक आपल्या ग्रंथात विठठल मंदिर हे बुद्ध मंदिर असल्याचे प्रमाण दिलेले आहेत.
पांडुरंगाची मुर्ती हि झिल्लिदार पंजाची एक अप्रतिम नमुना आहे. झिल्लीदार पंजा बुद्धाचे परंपरागत चिन्ह आहे. यावरुन ती बुद्ध मुर्ती आहे हेच स्पष्ट होते.
आर. डी. भांडारकर:
विठालाची मुर्ती हि बुद्ध मुर्ती असल्याचे पुरावे देताना भांडारकर दोन शिलालेखाचे पुरावे देतात. बेळगाव नजीक एका गावाचे दान पुंडरिक क्षेत्रासाठी दिलेले आहे. हे क्षेत्र भिमारथी च्या काठी असुन ते पवित्र आहे. इ. १२४९ व १२७० चा आप्तोराम्य यज्ञ व शिलालेखात पांडुरंग आणि पुंडरिक हि नावे आह्ते. हि दोन्ही नावे बौद्ध परंपरेची आहेत. ’सधर्म पुंडरिक’ नामक ग्रंथ तर प्रसिद्धच आहे. विठ्ठल हे नाव ब-याच नंतरच्या काळात आले हे स्पष्टच आहे असे भांडारकारांचे म्हणने आहे.
रा. चि. ढेरे
ढेरे यांचे “श्री विठ्ठल एक महासमन्वय” (दक्षिण गोपजनांच्या एका लोकप्रिय देवाच्या वैष्णविकरणाची आणि उन्नयनाची शोधकथा) ॥ढेरे: १९८४॥ या ग्रंथात विठठलाच्या अनेक पैलुंचे विश्लेषण केलेले आहे. सर्वच स्थल पुराणांचे विवरण दिलेले आहे. त्यांचे म्हणणे आहे कि, सर्वच स्थल-पुराणातिल “पांडुरंग महात्म्य” विठ्ठल या देवतेचे वैष्णविकरण करण्याचा प्रयास आहे. ते म्हणतात कि वैष्णवानी बुद्ध स्विकारला परंतु बुद्धाच्या विचाराना छेद दिला व त्यात हिंदुत्व पेरलं.
-------------------------------------
पुढिल भागात येणारे लेख
१) आय्यापा मंदिर
२) पुरिचे जगन्नाथ मंदिर
३) द्राक्षाराम
४) श्रीशैलम
५) तिरुपती बालाजी
१ ) मा.बो. वर कोणी ही मुस्लीम
१ ) मा.बो. वर कोणी ही मुस्लीम आय डी. का नाही ?
माझ्या या प्रश्नाचे उत्तर एक ही मा.बो. का दीले नाही ?
---------------------------------------------
लक्ष्मण,
याचे उत्तर मिळाले नाही कारण इथे कोणीही कुणाला तु कुठल्या जातीचा आहेस, धर्माचा आहेस असे विचारत नाही. आणि संबंध काय त्याचा? इथे आपण एकमेकांशी संवाद साधणारी "माणसे" आहोत.
मधुकरच्या पोस्ट्स च्या आधी अशा विषयावर "इतक्या थराला" जाउन कधिही चर्चा (माझ्या माहितीत तरी) झाली नाही. उगाच काहीतरी कोणी बिनडोकपणाने दुसर्याला चिथावण्यासारखे लिहिले तर त्याला विरोधही होणार नाही का? संयम "सगळ्यानी" पाळणे महत्वाचे आहे. ही फक्त काहींची जबाबदारी होउ शकत नाही.
लक्ष्मण, कोणी कशाला सांगेल
लक्ष्मण, कोणी कशाला सांगेल जात, धर्म? मी सांगितल की मी मुसलमान आहे, विश्वास ठेवाल तुम्ही?
<मा.बो. वर कोणी ही मुस्लीम आय
<मा.बो. वर कोणी ही मुस्लीम आय डी. का नाही ?
माझ्या या प्रश्नाचे उत्तर एक ही मा.बो. का दीले नाही >
अहो कुणाला आठवत नसेल, त्यांच्या दृष्टीने ते महत्वाचे नसेल, इ. अनेक कारणे आहेत. त्यात तुमचा अनादर करण्याची भावना नाही.
तुमच्या माहितीसाठी एक सांगतो - एक कुठलातरी मुसलमान नावाचा आय डी होता इथे. त्या वेळी मी 'मायबोलीवर मराठी' ही चळवळ, एकट्यानेच, जोरात करत होतो. त्यावेळी त्याने इंग्रजीतून काहीतरी लिहीले. म्हणून मी काहीतरी म्हंटले. त्याचा त्याला राग आला. व त्याने मला खाजगी पत्रात, 'बघून घेईन, ' वगैरे लिहून तो माबो वरून निघून गेला.
अजून मी त्याची वाटच बघतो आहे, तीनेक वर्षे झाली.
झाले समाधान? आय डी व व्यक्ति यात गल्लत करू नका. विशेषतः माझ्या सारखे, जे खरे नाव लपवून दुसराच आय डी घेतात, त्यांचा भरोसा नाही. लिहीतात काय, खरे कसे. शिवाय कुणि झक्की मूर्ख आहे, असे म्हंटले तरी ते मला लागत नाही, झक्की असेनाका मूर्ख!
नीरजा मॅडम , मी पुस्तकी कीडा
नीरजा मॅडम ,
मी पुस्तकी कीडा नाही की दुसर्याने काय लिहले आहे त्या वर मला काय म्हणायचे
मी माझ्या निरीक्षणातुन वरील सर्व मते नोदविली आहे एखाद्या लेखकाचे , किंवा साहीत्यीकाचे , वा ईतिहास काराची पुस्तके वाचुन नाही .
मला सांगा कीत्येक लोकांना त्याच्यां जाती व्यतीरीक्त इतर जातीचे मित्र च नाहीत कींवा कधी संबध पण येत नाही अशा लोंकाना इतर लोकांच्या भावना ह्या एक तर पुस्तके वाचुन वा कोणाच्यातरी तोडुन समजते त्याला मी काय करु , आणी तुम्हाला जर हे सगळे खोटे वाटत आसेल तर मी याचे पुरावे देउ शकतो .
मी कधीच कोणावर आरोप करत , माझ्या प्रत्यक पोस्ट ही वर्तमानावर आधरलेली आसते , कोण्या लेखकाची पुस्तके वाचुन नाही .
आणी हो मी कधी कोण्या जाती बद्ल वा धर्माबद्दल कधीच बोलत नाही , मी फक्त आज , आत्ता , परिस्थीती काय त्यावरच बोलतो .
<मा.बो. वर कोणी ही मुस्लीम आय
<मा.बो. वर कोणी ही मुस्लीम आय डी. का नाही ?
माझ्या या प्रश्नाचे उत्तर एक ही मा.बो. का दीले नाही >
हे घ्या उत्तर
मराठी बोलनारे मुस्लीम किती आहेत हो ? मला मुस्लीम मित्र आहेत.
त्यांच्या कित्येक पिढ्या येथ्ये गेल्यात पण ते कधी मराठी शिकण्याच्या भानगडीत पडले नाहीत
मग मला सांगा मुस्लीम या मराठी web-site वर येवुन काय करतील?
मधुकर -
आता मला खरा प्रश्न पडला मी कुठला? माझ्या ४ पिढ्या भारतात गेल्या. (ईतक्याच माहीत आहेत) आता तुम्ही म्हणता ही भुमी माझी नाही. बर या ब्राम्हणा (BTW तुम्ही बामन का लीहीता?) सोडुण बाकीच्या दलित नसलेल्यांचे काय?
ह.बा, जर मधुकर दलित चळवळीचे
ह.बा,
जर मधुकर दलित चळवळीचे कार्य करत असेल तर तो त्याच्या चष्म्यातून आणि अभ्यासातून सुचलेले विचार मांडेल. ते कुणाला योग्य वाटतील किंवा अयोग्य वाटतील. ते मांडण्याचा त्याला अधिकार आहे. फक्त काही जणांना किंवा बहुतांश जणाना ते पटत नाहीत म्हणुन वयक्तिक्/जातीय धिंगाणा स्वतःच घालुन शेवटी......... इथून डिलीट केले जावेत अशी विनंती करणे ही अंत्यंत घाणेरडी गोष्ट आहे >>>
हे तुमचे विचार आणि जेम्स लेनला तुम्हि केलेला खालच्या पातळीवरचा विरोध ह्याला वैचरिक कोलांट्या उड्या म्हणायचे की दिवाळ्खोरि?
बाकी मधुकरला जे म्हणायचे आहे ते त्याने म्हणावेच...
१ जाने १८१८ मधे इंग्रजांच्या
१ जाने १८१८ मधे इंग्रजांच्या सैन्यातील महार ब्रिगेडनी बाजीरावांचा पराभव केला होता< <<<<ही निव्वळ एक चकमक होती. अश्या अनेक चकमकी या नंतरही झाल्या आहेत
पेशवे इंग्रजांना शरण आले ती तारीख आहे २ जुन १८१८, ठिकाण खैर.
दुसरा बाजिराव - जन्म १७७५
पेशवाईची मसनद - १७९६
१७७५ ते १७९६ हा कालावधीत ज्या वेळात त्या काळी शिक्षण घेतले जायचे त्या कालावधीत त्याला तुरंगवास भोगावा लागला होता.
या पुढचा कालखंड तरी सोपा होता का ह्यांच्या साठी ??
>>>मला दुसर्या बाजीरावांवर असलेला राग कळू शकतो, कारण असेही तो त्याचा विलासीपणा आणि स्त्रीलंपटवृत्तीसाठीच प्रसिद्ध होता.
अतिशय चुकीचे विधान आहे. त्यांच्यावरील आक्रमणे, फंदी फितूरी, आणि एवडे असूनही त्यानी ब्रिटीशांना दिलेली कडवी झुंज याचा विचार करा. १७९६ ते १८१८ हा २२ वर्षे एकाकी झुंजत होता.
विषयांतराबद्दल क्षमस्व .
पण माझा स्वामिनिष्टेपुढे नाईलाज झाला. वाट्टेल ते बोललेले कोण खपवून घेणार.
कृपया ब्राम्हण हा शब्द निट लिहावा ही विनंती.
हा आमचा देश आहे, दलितांची
हा आमचा देश आहे, दलितांची भूमी आहे. खरं तर तुम्ही लोकं ईथे उपरे आहात.
>>
फार हसलो.
हा मनुष्य खरोखर द्वेषाने आंधळा झालेला आहे आणि काहीही लिहीत सुटला आहे. मधुकरची परिस्थिती अशी झाली आहे -
विद्या उदंड शिकला | प्रसंगमान चुकतचि गेला||
तरी मग तये विद्येला| कोण पुसे ||
त्याला सपोर्ट करणार्यांचे पण आश्चर्य वाटले. मधुकरने त्याला ज्या विषयावर वाटेल त्यावर लेख लिहावा इथपर्यंत सपोर्ट ठीक आहे. कारण इथे प्रतिवाद करणारे हुशार लोकही आहेत आणि त्यांना इतरांचा सपोर्ट आहे. पण त्याने द्वेषाने काहीही लिहावे आणि सपोर्ट करणारे मात्र सारासार विचार न करता 'त्याला द्वेष वाटला तर त्याची काय चूक, प्रेम वाटले तर त्याची काय चूक' छाप वाक्यं लिहितायेत. सद्गुणविकृतीची उत्तम उदाहरणे वाटत आहेत ही.
लक्ष्मणराव, तुम्ही सांगितलेल्या ठिकाणची पुस्तकं वाचून जर लोक वरील प्रकारे (तुम्ही उपरे वगैरे) लिहीत असतील तर ती पुस्तकं कोणीही वाचायला जाणार नाही (निदान मायबोलीवरील लोक तरी नाही).
<पण त्याने द्वेषाने काहीही
<पण त्याने द्वेषाने काहीही लिहावे आणि सपोर्ट करणारे मात्र सारासार विचार न करता 'त्याला द्वेष वाटला तर त्याची काय चूक, प्रेम वाटले तर त्याची काय चूक' छाप वाक्यं लिहितायेत. सद्गुणविकृतीची उत्तम उदाहरणे वाटत आहेत ही.>
इथे कायदा आहे की 'beyond a shadow of a doubt' गुन्हा सिद्ध झाला पाहिजे. नाहीतर आरोपी सुटतो. तेंव्हा वकील लोक ज्यूरीच्या मनात नसता तर्कवितर्क निर्माण करून शंका उत्पन्न करतात, नि मग त्यांच्या मनात शंका निर्माण झाली की मग 'beyond a shadow of a doubt' ते आरोपीला दोषी ठरवू शकत नाहीत. पण त्याचा अर्थ ते सत्य आहे असे नव्हे. फक्त कायद्यात तसे सांगितले आहे नि 'This is the court of law and order. Truth or justice have no place here' असे इथे सर्रास म्हंटले जाते.
द्वेष म्हणा किंवा इतर काही आंतरिक हेतू म्हणा, त्याने प्रेरीत होऊन आपल्याला हवा तसा अर्थ काढायचा नि तो तार्कीक आहे, म्हणून सांगायचे, असे म्हणून ते सत्य होत नाही. मधुकर नेमके तेच करत आहेत.
एका ठिकाणी बुद्ध स्तूप होता तिथे आता हिंदू मंदीर झाले. तर लढाई, रक्तपात करूनच तसे केले हा तर्क बरोबर असू शकतो. पण म्हणजे ते सत्य आहे असे नव्हे.
त्यांच्या दुर्दैवाने भारतातले लोक हुषार व विचारी आहेत. त्यातले काही लोक इकडे पण आले आहेत.
त्यामुळे मधुकररावांची भारतीय इतिहास, तत्वज्ञान याबद्दलची मते स्वीकारण्यात येणार नाहीत. देवाचे अनंत उपकार!
मी मधुकररावांना सल्ला दिला आहे की त्यांनी अमेरिकेत यावे. इथे बुशला दोनदा निवडून दिले नि आता सारा पेलिनला राष्ट्राध्यक्ष बनवण्याचे ठरवत आहेत. इथे मधुकररावांना लोक डोक्यावर घेतील!!
हिंदु मदिर नसुन ते मुळात
हिंदु मदिर नसुन ते मुळात बौद्ध मंदिर कसे होते याचे काही पुरावे बघु <<
>>प्राथमिक शाळेचे उजळणीचे (मुळाक्षर व अंकगणित) पुस्तक --> हा पुरावा म्हणुन मान्यच होऊ शकत नाही. इथे कोठेही ते बौद्ध मंदिर कसे होते ह्याचा पुरावा मिळत नाही.
>>विठठलाच्या चित्राखाली बुद्ध असे लिहले जात असे -->हो एक काळ असा होता की अश्या पद्धतीची विचारप्रवाह मोठ्या प्रमाणात पसरला होता आणि त्याचा योग्य परिणाम खाली दिसतोच.
>>वैष्णवानी बुद्ध स्विकारला परंतु बुद्धाच्या विचाराना छेद दिला व त्यात हिंदुत्व पेरलं. -->बौद्ध हा विट्ठलरूपी असून त्यासाठी तुम्ही बौद्ध धर्म प्रवेश करण्याची काहीच गरज नाही असेच त्या काळच्या संतांना सुचीत करायचे होते. त्यामुळे विचारांना छेद जाणे वैगैरे शक्यता नाकारता येत नाही
मधुकर तुम्ही सांगितलेले एक सुद्दा पुरावे हे बौद्ध मंदिर च होते हे सांगत नाहियेत.
लक्षात येते आहे का तुमच्या तुम्ही कोठे चुकता आहात ते.
श्री. ढेरे यांचे आज्ञापत्र पुस्तक वाचण्यासारखे आहे
रच्याकने माबोवर एक मुस्लिम
रच्याकने माबोवर एक मुस्लिम व्यक्ती आहे. गेली अनेक वर्ष आहे. मी स्वतः त्या व्यक्तीला भेटले आहे. त्या व्यक्तीने कधीही मी मुस्लिम म्हणून ढोल पिटला नाही. त्या व्यक्तीचा आयडी ती व्यक्ती मुस्लिम धर्माची आहे असे दाखवणारा नाही. आयडी वाचून तुम्ही धर्म कसा ठरवणार? धर्म ही प्रत्येकाची खाजगी बाब आहे.
बाकी मधुकर तुमच्यात इतका द्वेष भरलेला आहे हिंदूंबद्दल, ब्राह्मणांबद्दल की त्याला काही उत्तर न देणंच योग्य. तुम्ही जे लिहीताय त्याच्यातून तुम्हाला काय साध्य करायचंय? कुणाला उपरे म्हणताय? तुम्ही म्हणजे कोण? ही भूमी तुमची म्हणजे कुणाची?
मला वाटतं तुम्ही तुमची शक्ती आणि वेळ कुठल्यातरी विधायक कार्यासाठी लावलीत तर कुणाचं तरी काहीतरी भलं होईल. द्वेष पसरवायचं / वाद घालायचे / वादग्रस्त लिहायचं ह्या व्यतिरीक्त करण्यासारखी अनेक कामं आहेत. तुमची चिकाटी तिकडे कामी येईल आणि देशालाही त्याचा उपयोग होईल.
मीन्वा, तुमच्या ह्या
मीन्वा,
तुमच्या ह्या वाक्यांचा अर्थदेखिल 'अजुन एक बामण... कसा चिडला बघा खरं बोलल्यावर' सोडुन अजुन काही घेतला गेला तरच मला आश्चर्य वाटेल..
लक्षात आलं असेल, की तुमची काही मिनिटं वाया गेलीत . खेद आहे.
या पुढचा कालखंड तरी सोपा होता
या पुढचा कालखंड तरी सोपा होता का ह्यांच्या साठी ??>>
यासाठी माहिती पुर्णा लेख वाचायला आवडेल.
हे तुमचे विचार आणि जेम्स
हे तुमचे विचार आणि जेम्स लेनला तुम्हि केलेला खालच्या पातळीवरचा विरोध ह्याला वैचरिक कोलांट्या उड्या म्हणायचे की दिवाळ्खोरि?
पेशवे,
पंचा सावरायची अक्कल नाही आणि वैचारीक कोलांट्या वगैरे ऐकीव शब्द कशाला वापरताय?
लेनने जिजाऊंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवलेले आणि मधुकर त्याला कळाल्यानुसार्/वाचनानुसार त्याची मते मांडतो आहे. थोड्या दिवसांनी त्याला जातीभेदातला फोलपणा कळेल आणि तो हे बंद करेल. अनुभवाने आणि शिक्षणाने या गोष्टी घडतातच.
बाकी लेनवर मी केलेली टीका आपल्याला चांगलीच झोंबलेली दिसतीये. त्यावेळी मी कोणत्या जातीला विरोध केला नव्हता. शिवद्रोह्यांवर बोललो होतो. आणि बर्याच जणांनी तो आरोप प्रामाणिकपणे स्वतःवर घेतला होता. बाकी तुम्ही तो लेख डिलीट व्हावा यासाठी केलेला प्रयत्न फळाला आलाच की हो... आता कशाला ओरडताय. तुम्ही एखाद्या विषयाला सरळ सरळ जातीय रंग देऊन शेवटी हात वर करून मोकळे होणे आणि समोरच्याला जातिभेद मानणारा ठरवणे हा उद्योग थांबवा आता.
राजकारण, आरक्षण इ. गोष्टींइतकाच सामान्य माणसाचा जातीशी संबंध येतो त्यानंतर प्रत्येकजण फक्त माणूसच असतो. कुणाच्यातरी प्रभावाखाली येऊन किंवा चळवळीच्या प्रेरणेने एखादा विशिष्ठ मते मांडत असेल तर ती त्याची बाजू असते. कुणाला घातलेल्या शिव्या नाही.
असो जोवर लेख डिलीट होत नाही तोवर चालू ठेवा. शुभेच्छा!
अतिशय चुकीचे विधान आहे.
अतिशय चुकीचे विधान आहे. त्यांच्यावरील आक्रमणे, फंदी फितूरी, आणि एवडे असूनही त्यानी ब्रिटीशांना दिलेली कडवी झुंज याचा विचार करा. १७९६ ते १८१८ हा २२ वर्षे एकाकी झुंजत होता.>>>>>
सेवेकरी, अगदी मान्य.... माझ्या पोस्टमध्येदेखील मी खालील वाक्य आधीच जोडले आहे.
<<<(अर्थात हे मत ऐकीव आणि वाचलेल्या गोष्टींवरून बनवले आहे, सद्ध्याची झांसी की रानी ही मालिका काही वेगळेच सांगतेय. खरे खोटे तो बाजीराव आणि देवच जाणे)>>>>
पण ब्रिटीशांना दिलेली कडवी झुंज वगैरे त्याने तो सत्ताभ्रष्ट झाल्यावर दिलेली आहे, ती देखील तात्या टोपेंसारखे प्रखर देशभक्त पदरी होते त्यांच्या बळावर. अन्यथा त्याचा आधीचा इतिहास पेशव्यांच्या कारकिर्दीला कलंक वाटावा असाच आहे. मी स्वत: कट्टर बाजीराव (थोरले) आणि एकंदरच पेशवे भक्त आहे (मग कुणी मला कडवा बामण का म्हणेनात) पण तरीही दुसर्या बाजीरावाबद्दल कधीच फारसे प्रेम वाटले नाही, अर्थात त्याचा शेवटचा काही वर्षाचा काळ वगळता.
पण इथे मुद्दा तो नाहीच आहे. आपण मुळ मुद्द्यापासुन भरकटतोय. तेव्हा मला वाटते यासाठी फारतर दुसरा एखादा बाफ उघडून तिथे बोलु. (खरेतर मला त्याचीही गरज वाटत नाहीये)
असो, काही मुद्द्यांवर वेगळे मत असले तरीही मी तुमच्याशी सहमत आहे.
अरे अजून किती तेच तेच चघळणार
अरे अजून किती तेच तेच चघळणार आहात? ह्या माणसाला किती ही पटवून गोंजारून सांगीतलं तरी शेवटी काय म्हणतात ना..........
मधुकर, व्यक्तीश: तुम्हाला विरोध नाही, असेल तर तो तुमच्या विचारांना आहे. विठ्ठल हे कोणाचेही रुप जरी असले, तरी आज त्याला देव म्हणतात ना, मग तो बुद्ध असूदे नाहीतर विष्णु असू दे, काय फरक पडणार? ब्राम्हण द्वेषाचं बीज सगळीकडे पसरत जाण्यापेक्षा ती एनर्जी एखाद्या फ्रुट्फुल कार्यात का नाही लावत. पेशव्यांन्नी काय केलं आणि फुल्यांनी काय केलं ह्यावर तुम्ही तुमचं आजचं आयुष्य ठरवणार आहात का? आणि तसही केदार म्हणतो तसं कुठल्याही ठोस पुराव्यांशिवाय मत बनवणं बरोबर नाहीचे. बरं तरी विठ्ठल हा फक्त ब्राम्हणांचा देव आहे असं तरी कुठे म्हटलं आहे का? मग तुम्हीच का ह्या नाही त्या देवाचं मंदीर वगैरे वर भांडताय? आणि मुळात नेतृत्व गुण ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या मागे समाज जातो, तसाच बहुसंख्य समाज, त्यावेळी, पेशव्यांच्या मागे गेला होता, मुठभर लोकांनी केलेल्या बदफैलीचा निषेध करण्यापेक्षा त्यांचा जो तुम्ही उदोउदो करत आहात, त्यातून तुमचा ब्राम्हणद्वेष च समोर येतोय. ज्याला १% तरी ठोस पुरावा आहे, अशी कुठलीही गोष्ट मान्य न करणारे मायबोलीकर नाहीत. पण उगाचच उठून हा असं म्हणाला आणि त्यानी तसं केलं म्हणून ब्राम्हणांवर ताशेरे ओढणं आता थांबवा. स्वतःच्या घरात महार मांगांना देखील आपले म्हणून घेणारे ब्राम्हण संत तुम्हाला माहीत असतीलच.
तर एकांगी विचार न करता सारासार विचार करून लिहून बघा, माय्बोलिवर काय प्रतिक्रिया मिळते ते.
मुळात ज्या विठ्ठल मंदीरा
मुळात ज्या विठ्ठल मंदीरा बद्दल हा वाद ,विवाद , व जातीवाद चालला आहे त्या विठ्ठलाला आपल्या पैकी कित्येक मा.बो. करांनी भेटच दिली नसेल . ( अषाढी / एकादशी )
कधी गेलात का पंढरपुराला एखाद्या दिडींत "ज्ञानोबा तुकाराम " म्हणत या दिडींत आठरापगड जातीचे लोक असतात ते एक मेकांना मा . बो.सारखे हिन लेखत नाहीत .
मी स्वतःहा अशा दिडींत गावी आसतांना जात होतो .
श्री . दत्त संस्थान
ह. भ. प . (हरि भक्त परायण )श्री . वसंत महाराज .
मु. लोळगाव . ता.जी.बीड
आणी कित्येक वर्षापासुन माझी आई न चुकता पंढरपुर व पैठणला दिडींत जाते तीला काय करायचे विठ्ठल बोध्द आहे की हिन्दु तीला फक्त एकच माहीत आहे " विठु माझा काळा "
पंढरपुरला माझा गावच्या माहारांजाचा मठ आहे ( इस्कॅआन मठा सेजारी ) त्या मठाचे पत्रायाचे शेड ठोकण्या करीता , मी ,जावेद , चांदया , भिल्या , परट्या , आसे आठरापगड जातीचे लोक गेलो होतोत .
असो पण आजकाल काही निरक्षण केले उच्चशिक्षित लोकच जास्त जातीवादी व धर्मवादी वाटतात .
माझ्या मते ज्या लोकांनी संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम , सावित्रीमाई ,यांना दगड माराण्याचे सोडले नाही तीथे इतर लोकांना तर काय फेकुन मारतील विचार करतोय . ( संताशी तुलना करत नाही ) नाही तर नविन एक मुद्दा भांडायला .
मी कधीच अशा लोकांकडुन चागले पणाची अपेक्षा करत नाही , कारण इतरांना कमी लेखने हा स्थाईस्वभाव आहे यांच्यात ती एक मानसिकता आहे की आपल्या पेक्षा ईतर कोणी श्रेष्ट आहे कींवा त्याला थोडी बुध्दी आहे .
थोडेसे मा.बो. निरीक्षण केले आसता म्ह्त्वाचे वाक्य ईथे जाणवले ते म्हणजे :-
' तु मला ग्रेट म्हण मी तुला ग्रेट म्हणतो '
मा.बो. कोणी वेगळा प्रयत्न केला की तो जातीवादी , धर्मवादी , नालायक , वैगरे अशी लेबल चिटकवली जातात .
कधी गेलात का पंढरपुराला
कधी गेलात का पंढरपुराला एखाद्या दिडींत "ज्ञानोबा तुकाराम " म्हणत या दिडींत आठरापगड जातीचे लोक असतात ते एक मेकांना मा . बो.सारखे हिन लेखत नाहीत .>>>>
अर्थात तिथे कुणी विठ्ठलाला हा हिंदुंचा आहे, हा बौद्धांचा आहे अशी विशेषणेही चिटकवत नाही लक्ष्मणजी.
त्याच्या ठायी निष्ठा ठेवणार्या सर्वांचाच असतो तो. आणि कुणी तिथे तुम्ही उपरे आहात, चालते व्हा असे सल्लेही देत नाही. तिथे सर्वांचेच स्वागत असते. माबोवरही तेच वातावरण असते. पण इतरापेंक्षा वेगळे लिहीणे म्हणजे काहीही लिहीणे असा अर्थ होत नाही.
पहिल्यापासुनचे लेख वाचून
पहिल्यापासुनचे लेख वाचून काढले.
ज्ञानेश्वर भावंडे आणि एकनाथ अजुनतरी नशिबवान दिसत आहेत.
लक्ष्मणभाऊ माबोवर वारीला
लक्ष्मणभाऊ माबोवर वारीला जाणारे अनेक लोक आहेत. फक्त ते तुमच्यासारखे दवंडी पिटत फिरत नाहीत.
मी कधीच अशा लोकांकडुन चागले पणाची अपेक्षा करत नाही , कारण इतरांना कमी लेखने हा स्थाईस्वभाव आहे >> तुम्हालाच कसे हो मायबोलीवर असे लोक भेटले आम्हाला नाई भेटले ते. हा लेख लिहीणारे मधुकर सुद्धा मायबोलीकरांच्या get together ला तसेच वर्षाविहारालाही आले आहेत. त्यांना मायबोलीकर असे वाटत असते तर ते आलेच नसते ना?
मी स्वतःहा अशा दिडींत गावी
मी स्वतःहा अशा दिडींत गावी आसतांना जात होतो . >> अरे वा! तुम्ही महान. आम्ही कुठे जातो काय करतो ते इथे दवंडी पिटून सांगायची आम्हाला गरज वाटत नाही.
आणी कित्येक वर्षापासुन माझी आई न चुकता पंढरपुर व पैठणला दिडींत जाते तीला काय करायचे विठ्ठल बोध्द आहे की हिन्दु तीला फक्त एकच माहीत आहे " विठु माझा काळा " >> ज्जे बात सगळे तुमची आई म्हणतेय तेच म्हणताहेत. तुमची आई खरी हुषार आहे. आम्हाला काय करायचे विठ्ठल बोध्द आहे की हिन्दु ?
पंढरपुरला माझा गावच्या माहारांजाचा मठ आहे ( इस्कॅआन मठा सेजारी ) त्या मठाचे पत्रायाचे शेड ठोकण्या करीता , मी ,जावेद , चांदया , भिल्या , परट्या , आसे आठरापगड जातीचे लोक गेलो होतोत . >> वा ! वा! इथे लोक जे चांगलं काम करतात ते तुम्हाला सांगून करायची त्यांना गरज वाटत नाही आणि त्याची अशी जाहीर दवंडी पिटण्याची तर अजिबातच नाही.
असो पण आजकाल काही निरक्षण केले उच्चशिक्षित लोकच जास्त जातीवादी व धर्मवादी वाटतात . >> कुणाला वाटतात? तुम्हाला ना. आम्हाला नाई वाटत. तुम्हीच सतत जातीयवादी लिखाण करत आहात. इतर लोक इथे रोज येऊन जातीपातीवर चर्चाही करत नाहीत. ते नाही शोधत या आयडीमागे मुसलमान बोलतोय, का हिंदू, ब्राह्मण की महार.
माझ्या मते ज्या लोकांनी संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम , सावित्रीमाई ,यांना दगड माराण्याचे सोडले नाही तीथे इतर लोकांना तर काय फेकुन मारतील विचार करतोय . ( संताशी तुलना करत नाही ) नाही तर नविन एक मुद्दा भांडायला . >> संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम , सावित्रीमाई यांनी नाही कधी त्या दगड मारणारर्यांचा द्वेष केला. तुम्ही का करताय?
आणि राहीला प्रश्न बुद्धाचा - ज्याने सर्वसंगपरीत्याग केला. कशाचाच मोह धरला नाही त्याचे म्हणून घेणारे लोक हे मंदीर बुद्धाचं आहे अशा भौतिक गोष्टींसाठी वाद घालून त्याचीच शिकवण मातीत मिळवताहेत. आपल्या देवाची शिकवण विसरुन इथे वाद घालताहेत. माझी खात्री आहे बुद्ध असते तर भांडत नसते बसले की विठ्ठल नाहीच्चे तो मीच आहे आणि ते देऊळ माझं आहे असं...
जाऊ दे ना मीनू, काही उपयोग
जाऊ दे ना मीनू, काही उपयोग नाहीये. इंग्रजांनी लावलेली द्वेषाची वल्ली जोपासायचं व्रत घेतलय मधुकर, लक्ष्मण सारख्या लोकांन्नी. ह्याच फुटीर वृत्तीमुळे उद्या आणखी किती लोक आपल्यावर राज्य करून जातील काय माहित, पण त्याच्याशी ह्यांना काय? स्वता:ला सुसंस्कृत विचार नाही करता येत म्हणून हा सगळा ब्राम्हण द्वेष चालू आहे बाकी काही नाही.
लक्ष्मण, मीनूने लिहिलंय
लक्ष्मण,
मीनूने लिहिलंय त्याचा विचार करून बघ. खरोखर इतका द्वेष तुझ्यामधे भरलेला बघून मला तरी वाईट वाटलं.
२-३ वर्षात विद्यापीठात जे शिकलास ते हेच का?
पुढिल भागात येणारे लेख १)
पुढिल भागात येणारे लेख
१) आय्यापा मंदिर
२) पुरिचे जगन्नाथ मंदिर
३) द्राक्षाराम
४) श्रीशैलम
५) तिरुपती बालाजी
>>>>>>>>>.
बास का एवढीच मंदिरं ,
अयोध्येच राममंदीर ,सोमनाथ मंदिर , अम्ररनाथ , वैष्णवदेवी ,वरंगलचं मंदिर ,शबरीमाला , कोल्हापुरचं महालक्ष्मी मंदिर , तुळजाभवानी मंदिर इ.इ.कशे काय नाहीत वरच्या यादीत. शोधा शोधा नक्की काही ना काही सापडेल.
जगदंब... जगदंब... आई जगदंबा
जगदंब... जगदंब...
आई जगदंबा तुम्हाला 'सु'बुद्धी देवो मधुकरराव...
बहुत काय लिहिणे...
लक्ष्मण, तुमच्या माउलीला
लक्ष्मण,
तुमच्या माउलीला दंडवत सांगा माझे.
>>असो पण आजकाल काही निरक्षण केले उच्चशिक्षित लोकच जास्त जातीवादी व धर्मवादी वाटतात .
कोण हो हे उच्चशिक्षित लोकं? इथे मुस्लिम आयडी कसा नाही विचारणारे का हो ? का "तुम्ही इथे उपरे आहात, आमची भूमी आहे" असे म्हणणारे? किती अचूक निरीक्षण आहे हो तुमचे ! वा ! वाऽऽ वा !!
>>मी कधीच अशा लोकांकडुन चागले पणाची अपेक्षा करत नाही , कारण इतरांना कमी लेखने हा
>>स्थाईस्वभाव आहे यांच्यात ती एक मानसिकता आहे की आपल्या पेक्षा ईतर कोणी श्रेष्ट आहे कींवा
>> त्याला थोडी बुध्दी आहे .
कसं असतं, की आपण जो चष्मा लावतो, त्याच्या काचेतून जग आपल्याला तसंच, त्याच रंगाचं भासतं. इथे पहिल्या पानावर वाचले असते [असेलही, पण मग ते समजलेले दिसत नाही] तर कळाले असते की
मधुकराच्या प्रत्येक मुद्याचे खंडन, पुरावे देउन करण्यात आलेले आहे. त्या नंतरचा मधुकर यांचा प्रतिसाद
"तुझे वाचन किती आहे हे बघितले पाहिजे" अशा स्वरुपाचा आहे. इथपर्यंत कोणीही जात मधे आणलेली नाही. आता तुम्हाला हे पुरावे खोडणंच जातीयवादी वाटत असलं पाहिजे , ज्या अर्थी तुम्ही असं लिहीलं
आहे. म्हणून तुम्ही लगेच वादाला सुरूवात केलीत का? मुस्लीम आय.डी. कुणी नाही वगैरे वगैरे. कुठे जातीयवाद आला , तुमच्या दृष्टीकोनातून ते सोदाहरण दाखवा बरं. जातीयवादाची तुमची व्याख्या काय आहे ते तरी कळू द्या.
>> पंढरपुरला माझा गावच्या माहारांजाचा मठ आहे ( इस्कॅआन मठा सेजारी ) त्या मठाचे पत्रायाचे शेड >> ठोकण्या करीता , मी ,जावेद , चांदया , भिल्या , परट्या , आसे आठरापगड जातीचे लोक गेलो होतोत .
सहज म्हणून विचारतोय जाताना भेटलेल्या प्रत्येकाला तुम्ही जात विचारत गेला होतात का हो? अठरापगड लोकं नसती भेटली, तर काय केलं असतं? गेला नसतात?
नंद्या.... Perfect Post !
नंद्या....
Perfect Post !
अर्थात तिथे कुणी विठ्ठलाला हा
अर्थात तिथे कुणी विठ्ठलाला हा हिंदुंचा आहे, हा बौद्धांचा आहे अशी विशेषणेही चिटकवत नाही लक्ष्मणजी.
त्याच्या ठायी निष्ठा ठेवणार्या सर्वांचाच असतो तो. आणि कुणी तिथे तुम्ही उपरे आहात, चालते व्हा असे सल्लेही देत नाही. तिथे सर्वांचेच स्वागत असते. >>. अगदी बरोबर. गणपती उत्सवात कारागीरी करणारे बहुतांश कारागीर मुस्लिम असतात. बर्याच वेला हिंदु देवदेवतांच्यासाठी लागणारे हळद-कुंकु,ओट्या ह्यांचे व्यापारीही मुस्लिम असतात्.दगडुशेठला सर्व जातीपातीचे,धर्मांचे लोक नवस बोलतात.
मला स्वतःला मंदिर मुर्ती ही प्रतिके खुप चुकीचे वाटतात.पण असेल एखाद्याची भोळी श्रध्दा तर असु द्यावी.मला तर वाटतय तुमच्या सारखे खुप शिकलेल लोकच जातीयवाद वाढवतायेत आता.
मला मधुकर यांच्या लेखावर
मला मधुकर यांच्या लेखावर काहीच टिप्पणी करायची नाही. मात्र त्यांनी त्यांचे हे महत्त्वपूर्ण ''संशोधन'' फक्त एका संस्थळापुरते मर्यादित न ठेवता राष्ट्रीय व स्थानिक वृत्तपत्रांतून कोट्यावधी लोकांच्या समोर का आणले नाही हे कोडे मात्र मला अद्याप सुटलेले नाही. आजतागायत कोणीही खात्रीशीर इतिहास संशोधकाने जाहीरपणे हे तुमचे म्हणणे कबूल केले आहे का हो? की विठ्ठल मंदीर हे स्तूपच होते म्हणून? तसे निवेदन, मुलाखत वगैरे एव्हाना वृत्तपत्रांतून, टीव्ही चॅनल्समधून दिसायला हवे होते, नै? इथं लोकांशी वाद घालण्यापेक्षा तुम्ही त्याकडे आपले लक्ष दिलेत तर ते जास्त बरे, नै का?
मी कधी ही , ईतिहास व
मी कधी ही , ईतिहास व ईतिहासकार , साहित्य व साहित्यीक , लेखक वा लेख , या बद्दल कधीच लिहले नाही .
मी कधी ही धर्म वा जात आणी कोणाला ही इतिहासाचे पुरावे दीले नाहीत
मी कोणाची पोस्ट कशी चुक आहे या बद्दल ही काही लिहले नाही , आणी तसे करण्याची गरज ही वाटले नाही .
मी नेहमी वर्तमानावर बोलतो वा लिह्तो , माझा विरोध आहे तो एक विचार धारेला .
परंतु माझ्या विरुध्द जे लिहले , जी विशेषन वापरली त्या वरुन तुमची मानसिकता समजते
मी झोपडी वा झोपडपट्टीतुन येऊन ही कोणत्या ही मा . बो.करा ला एक शब्द ही व अपशब्द वापरला नाही
किंवा रागात काही लिहले नाही वा उगीच वाद घातला नाही , या वरुनच तुमच्यात व माझ्यात काय फरक आहे ते लक्षात येइल .
मधुकर लिह्तो एकटा त्या विरोध करतात १०० लोकांचे २०० हात आणी प्रत्यकाचा आय डी चेक केल्यावर मला आसे जानवले की मी केलेला प्रश्न . मा.बो.मुस्लीम आय .डी . का नाही , हे माझे निरिक्षण किती अचुक आहे ते ही कळते .
मा. बो. वर इतर ही हिन्दु धर्मातील लोक आहेत त्यांनी कधी ही या संदर्भात मधुकर बद्दल इतके खालच्या पातळी वर जाउन लिहले नाही वा या वादात स ह भागी झाले नाहीत कारण ती लोक इतर समाजात काही काळ राहीलेली आहेत वावरलेली आहेत .
जिथे आपर्टंमेंट मधे वा सोसायटीत घर घेतांना शेजारी आपलाच आहेना असा विचार करणारयांना मधुकर्चे लिखान कसे पचेल वा झेपेल .
मी मधुकरच्या कोणत्या लिखाना बद्दल कधीच अभिप्राय दिला नाहि , वा कधी प्रसंशा ही केली नाही तुम्ही त्याचे सर्व लेख चेक करा मी कधीच त्या चे लिखान ग्रेट आहे आसे म्ह्टले नाही तरी पण .....
मला एवढेच सांगायाचे आहे की स्वतःहा चा हेका सोडा आजुबाजुला काय चालले आहे ते प हा .
जातीयवादी म्हणजे काय याचे जर माहीती हावी आसेल ना तर माझ्या सोबत पुण्यातील काही शाळेत , संस्थेत , ऑफिसमध्ये , सोसायट्यात , परीसरात , चला तुम्हाला जातीयवादी म्हण्जे काय ते कळेल .
कधी ही एक बोट दुसर्याकडे करण्या आधी चार बोटे आपल्याकडे असतात.
Pages