मार्गदर्शन हवे आहे

Submitted by sneha1 on 27 July, 2010 - 11:01

मला मायबोलीवर विचारायला नेहमीच आवडते, कारण सगळे छान मनापासून हवी असलेली माहिती देतात. आता पण मला थोडे मार्गदर्शन हवे आहे.
मी मेटलर्जी मधे बी.ई. केले, नंतर वेल्डिंग कंझुमेबल्स मधे एम्.ई केले. L&T मधे R&D Engineer म्हणून ३ वर्षे काम केलें. नंतर मग लग्न , मुलगी, अमेरिकेत येणे ह्याच्यामुळे काही वर्षे घरीच होती.आता हळूहळू मुलीची फुल टाईम शाळा सुरू होइल्,आता काहीतरी करावेसे वाटते आहे.पण कुठून सुरू करावे ते कळत नाही.
आहे त्या विषयामधे काम शोधावे तर आधीचे काम थोडे specialised आहे. डॉक्टर, आयटी वाल्यांसारखे नाही की जिथे जाऊ तेथे संधी मिळेल्.आणि चार वर्शात चार घरं बदलली आम्ही.म्हणून वाटते की कॉम्पुटर कोर्सेस करावेत का,ज्यांना सगळीकडे डिमांड असेल..त्याच्याबद्द्ल फारशी माहिती नाही.
तर, काय काय करता येइल ह्याविषयी कोणी माहिती देऊ शकेल का प्लीज?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्नेहा
इथे कोर्सेस करायचे तर खालील पर्याय आहेत
सुलेखा सारख्या ठिकाणी देशी कंपन्या जाहिरात देतात क्लासेसची. तिथे नोकरी शोधायला पण मदत वगैरे करणार असे लिहितात तरी. मला अजिबात अनुभव नाही. पण अशा लोकांशी बोलून तुम्हाला माहिती मिळेल. हे लोक फी भरमसाठ लावतात असं ऐकून आहे.

मोठ्या / छोट्या युनिव्हर्सिटीमधे किंवा कम्युनिटी कॉलेजमधे सर्टीफिकेट कोर्सेस / कंटिन्युइंग एड कोर्सेस असतात ते करता येतील. अशा ठिकाणी फी बरीच रीझनेबल असते.

युनिव्हर्सिटीमधे एम आय एस, सॉफ्टवेअर डेव्हलपमेन्ट अशा विषयात मास्टर्स करता येईल.

तुमच्या इथल्या स्कूल डिस्ट्रिक्टमधे चौकशी करुन शाळेत शिक्षक म्हणून नोकरी मिळवण्याकरता अजून काय क्वालिफिकेशन लागेल ते पाहून ते क्वालिफिकेशन करू शकता .

स्नेहा,
तु जर ईथल्या कम्युनीटी कॉलेज मधे गेलीस तर तुला तिथले अ‍ॅकेडमीक अ‍ॅड्व्हायझर्स तुझ्या ईंटरेस्ट प्रमाणे माहीती देऊ शकतील. बर्याचदा ते पहील्यांदाच विचारतात की तुझा काय ईंटरेस्ट आहे. त्या प्रमांणे ते कोर्स सुचवात तसेच ते तिथेच त्यांचे जॉब सेंटरही असते. ते जॉब मिळवायला मदत करतात.
मी स्वतः गेली ५ वर्षे कॉलेजमधे बायोलॉजी शिकवते आहे.
त्याहुन दुसरा ऑप्शन म्हणजे, तुझ्या जवळच्या युनीव्हर्सीटीतही जाऊन चॉकशी करु शकतेस. तिथले अ‍ॅड्व्हायझर्स
सुद्धा सुचवु शकतात. कुठेतरी सुरवात होईल नंतर हळुहळु मार्ग सुचत जातो.

हो, कुठेतरी सुरुवात करायची आहेच्..कारण सध्या पुष्कळ गॅप आल्यामुळे गोंधळल्यासारखं होतंय खरं..तसा L &T च्या आधी मी REC Nagpur मधे पण लेक्चरर चा जॉब केला आहे.
दोघीनांही थॅक्स ..

computer मधील नुसते languages चे कोर्स जसे की VB ,JAVA etc करायचे असतील तर ते इथल्यापेक्षा देशात गेले असताना केलेत तर खर्च खुप कमी येईल. पण सॉफ्ट्वेअर मधे मास्टर्स करायचे असेल तर इथेच केलेत तर उत्तम होईल. लवकर जॉब हवा असेल आणि सॉफ्ट्वेअर प्रोग्रॅमिंग ची आवड फारशी नसेल तर सॉफ्ट्वेअर टेस्टींग चा पर्याय पण उपलब्ध आहे. सॉफ्ट्वेअर टेस्टींग चा कोर्स घेतलात तर टेस्टिंग मधे जॉब मिळु शकतो. तसेच बेसिक सॉफ्ट्वेअर ट्रेनिंग घेउन तुमच्या मुळ विषयाशी (मेटलर्जी ) संबंधित काम करणारी सॉफ्ट्वेअर कंपनी असल्यास तुम्हाला डोमेन नॉलेज असल्याने बीझिनेस अ‍ॅनॅलिस्ट सारख्या जॉबसाठी ट्राय करता येईल.

स्नेहा,
तुम्हाला सॉफ्टवेअरची खरच आवड आहे की केवळ तोच पर्याय दिसतोय म्हणून त्या बद्दल विचार करताय?
खरच आवड असेल तर प्रश्ब नाहि बाकि वर काहि जणानि त्याबद्दल माहिती दिलि आहे.
पण नसेल तर बाकि काहि पर्याय तपासुन बघणार का?

तुम्हि <मेटलर्जी मधे बी.ई. केले, नंतर वेल्डिंग कंझुमेबल्स मधे एम्.ई> केलय म्हणजे हा विषय तुम्हाला आवडतो अस वाटतय. मग तो विषय शिकवण्याचा जॉब आवडेल का?

या विषयाच्या कॉलेजेस मधे लॅब असिस्टंट व्हायला कस वाटेल? (तुमच शिक्षण खरतर जास्तच आहे या जॉब साठि, तरिहि नुसत सुरुवात म्हणुन विचार केला तर?)

ऑनलाईन किंवा अगदि कॉलेजला जाउन या विषयात पुढे काहि शिकायला आवडेल का? तस केलत तर पुढे त्याच विषयात खुप चांगला जॉब मिळु शकतो.

डेलिया म्हणाली तस बीझिनेस अ‍ॅनॅलिस्ट चा जॉब आवडेल का? यासाठि सॉफ्टवेअरचे फार नॉलेज असणे गरजेच नाहि पण एक्सेल, वर्ड आल पाहिजे. एस डि एल सी ची माहिती पाहिजे. डॉक्युमेंटेशन मधे आवड हवी. आणि लोकांशि बोलुन त्यांच्या रिक्वायरमेंट समजुन मुद्देसुद लिहिता यायला हव.

कींवा अगदि दुसरच म्हणजे तुमची दुसरि काहि आवड छंद होता का ज्याच तुम्हि इतके वर्ष काहिच केल नाहियेत?
तस असेल तर त्यात काहि नविन करुन , नविन शिकुन बघता येईल का? त्या विषयात नोकरि स्वताचा व्यवसाय अस काहि करता येईल का?
(उदा. माझि एक मैत्रिण यु एस मधे सेल्फ एम्प्लॉइड डिझायनर आहे. व्हिजिटीन्ग कार्ड, रेडिमेड ड्रेस वर डिझाईन अस काय काय करते. )

एक तर सगळे जण मला तू म्हणा, तुम्ही नाही.
मला माझ्या विषयामधे रस आहेच्.पण आम्ही जाऊ तिथे प्रत्येक ठिकाणी त्याच्यामधला जॉब मिळेल असं नाही सांगता येत्.फार काय भारतातही फार कमी कॉलेजेस मधे ही ब्रँच आहे,सगळीकडे नाही.डेलियाने दिलेला सल्ला पण चांगला आहे.मला एक्सेल, वर्ड ची थोडेफार माहिती आहे.एस डि एल सी म्हणजे काय?

सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. मला सगळं वाचूनच मोटिव्हेट झाल्यासारखं वाटतय.

मला एक असे नाव हवे आहे ज्याचा अर्थ सुन्दर व हेल्दी (स्वस्थ) असा होइल मला माझ्या मैत्रिनिच्या क्लिनिकसाथि नाव हवे आहे

मी सिडनीत राहते. मला स्वताचे लेडिज पार्लर घरि सुरु करायचे आहे , माझे सर्व कोर्सेस पुण्यात झाले आहेत, तसे सध्या घरि थोडेफार clients येतात्.पण व्यवसाय वाढवियासाठी काय करु? Products हि हवे आहेत. सुरुवात शुन्यातुन आहे क्रुपया आपले मार्ग दर्शन हवे आहे. मला काय अडचनी येऊ शकतिल त्या पण सुचवा.