जीटीजी :)
आहे गेल्या वर्षीची पण काहिहि बदल न करता तशिच्या तशी परत .....सारख जीटीजी ऐकून ऐकून परत एकदा पोस्टावी वाटली.
http://www.maayboli.com/hitguj/messages/75/127142.html?1189519094
औंदा तरी जीटीजी करूया की रं
तीन चार तरी टाळकी जमूया की रं
औंदा तरी जीटीजी करूया की रं॥
एनजेकरांनी बगा लै गाजवला फड
झक्किंनी म्हन सोय केली फक्कड
आर आपन बी गाजावाजा करू या की रं
औंदा तरी जीटीजी करूया की रं॥१॥
बंगळुरातली पोरं बी लै हुशार
केला की वो जीटीजी जरी व्हती चार
आता माज बी जरा तुमी ऐका की रं
औंदा तरी जीटीजी करूया की रं ॥२॥
सिएकरांनी लै येळा घातला घाट
कित्यांदा जीटीजी ची लागली वाट
म्हनं,आता तरी थाटमाट करूया की रं
औंदा तरी जीटीजी करूया की रं ॥३॥
घरात, हाटलात कुटं बी खाऊ
जमवून आनलय कसं तरी भाऊ
लेकराबाळास्नि घेऊन समदे येवा की रं
औंदा तरी जीटीजी करूया की रं ॥४॥
हायेत सा-या गडकरनी चतुरच फार
महिन्यात जीटीजी करतात चार
म्हनं, पोरास्नी धन्याजवळ सोडा की गं
रोजच जीटीजी करूया की गं ॥५॥
श्यामली!
श्यामली
श्यामली
मुंबईकरांचा जी टी जी का नाही पण ?
(No subject)
अर्रे
अर्रे होकी, आता मुंबई वर लक्ष ठेवायला हवं
श्यामली....
श्यामली.... जबरदस्त!
बंगळुरातल
बंगळुरातली पोरं बी लै हुशार
केला की वो जीटीजी जरी व्हती चार
कसचं कसचं
दक्षिणा, तस
दक्षिणा,
तसं म्हटल तर ब-याच ऍडिशन्स होउ शकतील,
पण माझा आता तेवढा वावर राहिला नाही
शैलजा
कुठंही नाही आलं की मी लागते मात्रा मोजायला लगेच
>>>कुठंही
>>>कुठंही नाही आलं की मी लागते मात्रा मोजायला लगेच
>>पण माझा
>>पण माझा आता तेवढा वावर राहिला नाह>> उगाच कारणं देऊ नकोस, वावर नसेल तर वाढव.