पंढरपुरचे विठ्ठल मंदिर हे बुद्ध मंदिर असुन अन्य काहिही नाही अशी महाराष्ट्रात खुप खोल रुजलेली परंपरा पुरातन काळापासुन चालत आलेली होती. पण नंतर हिंदुनी या स्तुपांचे हळू हळू हिंदु मंदिरात रुपांतर केले. पण विठठल मंदिर हे हिंदु मदिर नसुन ते मुळात बौद्ध मंदिर कसे होते याचे काही पुरावे बघु या.
१) १९४०-१९६५ या कालावधित पुण्यावरुन प्राथमिक शाळेचे उजळणीचे (मुळाक्षर व अंकगणित) पुस्तक प्रकाशित होत असे. त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दशावताराचे चित्र असे. त्यात नववा अवतार बुध्द असल्याचे दाखविले जास्त असुन जे चित्र छापले जायचे ते अजिंठा किंवा वेरुळच्या बुद्धाचे नसुन पंढरिनाथ “विठठलाचे” चित्र असे. विट्ठ्ल हाच बुद्ध आहे असे स्पष्ट करणारा हा सगळ्य़ात मोठा पुरावा.
२) कागदाचा शोध लागण्या आधी किंवा त्या नंतरही महाराष्ट्रात शिळाप्रेसवर पंचांगे छापली जात असत. या पुरातन पंचांगाच्या मुखपृष्ठांवर नवग्रहाची किंवा दशावताराची चित्रं छापली जात असतं. या सर्व शिलापंचांगात सर्वत्र नववा अवतार म्हणून विठठलाचे चित्र छापले जात असतं व नावाबद्द्ल शंका येऊ नये म्हणून विठठलाच्या चित्राखाली बुद्ध असे लिहले जात असे. श्री. वा.ल. मंजुळ व डॉ. के जमनादास यानी अशा प्रकारच्या पंचांगाचा संग्रह तयार केला आहे. विठठलाच्या शिल्पाला बुध्द नाव असलेली काही ठिकाणं येणेप्रमाणे आहेत.
अ) तासगांव (जि. सांगली) येथे विंचुरकरानी बांधलेल्या दक्षीणी शैलीच्या गणेश मंदिराच्या गोपुरावर विठठलाचे मुर्तीला बुद्ध असे नाव आहे.
ब) कोल्हापुरच्या महाल़क्ष्मी मंदिराच्या प्राकाराअतिल एक ओवरीत बुद्ध नावाने विठाबो दिसेल.
क) राजापुर (जि. रत्नागिरी) येथील लक्ष्मीकेशव मंदिरात मुर्तीच्या प्रभावळीत जे दशावतार कोरलेले आहेत त्यातही बुद्ध म्हणून जी मुर्ती कोरलेली आहे, ती आज झिजुन गेलेली असली तरी तिच्या उर्वरित आकारातुन ती विठठलाची मुर्ती असल्याचे स्पष्ट होते.
आता बघु या काही पुस्तकांचे व ईतिहासकारांचे या वरिल मत.
डॉ. भाऊ लोखंडे:
यानी संपुर्ण मराठी संतांच्या वाड.मयाची समिक्षा करुन त्यांचा सारांश काढलेला आहे. ज्यानुसार मध्ययुगीन मराठी संतकवीनी विठठलाला, दुसरे काहि नसुन बुद्धच मानलेले आहे. मी तो जशाचं तसं ईथे देतो (लोखंडे : १९७९ पान १२३) “बाराव्या शतकातील ’गीत गोविंद’ कर्ते कवि जयदे वुद्धाची स्तुती नवव्या अवताराच्या स्वरुपात करतात. ती पुराणावर आधारित आहे. मराठी संत त्यांचे प्रमुख दैवत यांना बुद्धच मानतात (विठोबाच्या रुपाने) कारण विठोबाच बुद्ध आहेत असं दशावतारात मांडलेलं आहे. संत एकनाथ विठठलाला बुद्ध मानुन पुढिल प्रमाणे म्हणतात
“ लोक देखोनि उन्मत दारांनी आसक्त।
न बोले बौद्ध रुप ठेवीले जघनी हात।
नववा वेसे स्थिर रुप तथा नाम बौद्धरुप।“
व वारक-याची दिक्षा देताना जी पाच वचने वधविली जातात ती पंचशिलापेक्षा काहि वेगळी नाही.”
श्री. ए. आर. कुळकर्णी.:
श्री कुळकर्णी यांचे मत सर्वविदीत असुन त्यानी संपादन केलेल्या ’धर्मपद’ या ग्रंथाच्य अपरिशिष्टात देलेले आहे. त्यानी मराठी संतकवींव्या साहित्याची समिक्षा करुन निष्कर्ष काढले आहेत जसे कि, आपण पाहिल्या प्रमाणे भाऊ लोखंडे यानी काढले आहेत. कुळकर्णी म्हणतात कि मंदिराच्या मंडपातील खांबावर ध्यानी बुद्धाच्या आकृत्या आहेत. ते असे सुद्धा म्हणतात कि, विख्यात पाश्चिमात्य विद्वान जॉन विल्सन “मेमॉयस ऑन दि केव्ह टेम्पल” नामक आपल्या ग्रंथात विठठल मंदिर हे बुद्ध मंदिर असल्याचे प्रमाण दिलेले आहेत.
पांडुरंगाची मुर्ती हि झिल्लिदार पंजाची एक अप्रतिम नमुना आहे. झिल्लीदार पंजा बुद्धाचे परंपरागत चिन्ह आहे. यावरुन ती बुद्ध मुर्ती आहे हेच स्पष्ट होते.
आर. डी. भांडारकर:
विठालाची मुर्ती हि बुद्ध मुर्ती असल्याचे पुरावे देताना भांडारकर दोन शिलालेखाचे पुरावे देतात. बेळगाव नजीक एका गावाचे दान पुंडरिक क्षेत्रासाठी दिलेले आहे. हे क्षेत्र भिमारथी च्या काठी असुन ते पवित्र आहे. इ. १२४९ व १२७० चा आप्तोराम्य यज्ञ व शिलालेखात पांडुरंग आणि पुंडरिक हि नावे आह्ते. हि दोन्ही नावे बौद्ध परंपरेची आहेत. ’सधर्म पुंडरिक’ नामक ग्रंथ तर प्रसिद्धच आहे. विठ्ठल हे नाव ब-याच नंतरच्या काळात आले हे स्पष्टच आहे असे भांडारकारांचे म्हणने आहे.
रा. चि. ढेरे
ढेरे यांचे “श्री विठ्ठल एक महासमन्वय” (दक्षिण गोपजनांच्या एका लोकप्रिय देवाच्या वैष्णविकरणाची आणि उन्नयनाची शोधकथा) ॥ढेरे: १९८४॥ या ग्रंथात विठठलाच्या अनेक पैलुंचे विश्लेषण केलेले आहे. सर्वच स्थल पुराणांचे विवरण दिलेले आहे. त्यांचे म्हणणे आहे कि, सर्वच स्थल-पुराणातिल “पांडुरंग महात्म्य” विठ्ठल या देवतेचे वैष्णविकरण करण्याचा प्रयास आहे. ते म्हणतात कि वैष्णवानी बुद्ध स्विकारला परंतु बुद्धाच्या विचाराना छेद दिला व त्यात हिंदुत्व पेरलं.
-------------------------------------
पुढिल भागात येणारे लेख
१) आय्यापा मंदिर
२) पुरिचे जगन्नाथ मंदिर
३) द्राक्षाराम
४) श्रीशैलम
५) तिरुपती बालाजी
<<< केदार ईतिहासातील ब-याद
<<< केदार ईतिहासातील ब-याद गोष्टिंचे पुरावे उपलब्ध नाहीत. म्हणजे ती घटना घडलीच नाही असे नाही.
उदा. रामाचे मंदिर अयोध्येत होते याला सुद्धा ठोस पुरावा नाहिये. मग काय राम मंदिराचे हिंदुनी उगीच उहापोह केला म्हणायचे का ? >>>
मधुकर कोणीतरी लिहुन ठेवलं / स्तुप बांधले म्हणुन आम्ही कसा विश्वास ठेवायचा की बुद्ध खरा होता , जशे स्पायडरमॅन , हीमॅन वगैरे काल्पनिक व्यक्तीरेखा आहेत तशीच बुद्ध ही केवळ काल्पनिक व्यक्तिरेखा असु शकेल.
बुद्ध हा शब्द बुध् या
बुद्ध हा शब्द बुध् या धातुपासून तयार झालेला आहे. बुध् म्हणजे ज्ञान होणे. बुद्ध या शब्दाचे पारंपारिकरित्या दोन अर्थ होतात. एक म्हणजे अशी व्यक्ती जिला ज्ञान झालेलं आहे. ही उपाधी सिद्धार्थासच लावायला हवी असा याचा अर्थ नाही, ती कोणत्याही आत्मदर्शी व्यक्तीस वापरली जाऊ शकते. दुसरा अर्थ म्हणजे "ज्ञानस्वरुप" असलेला. आत्म्यास श्रुती स्मृतींमध्ये शुद्ध, बुध्द अशी विशेषणे दिलेली आहेत. एकनाथ महाराजांचे दिलेले उदाहरण आत्म्यास/श्रीकृष्णास/विठ्ठलांस बुध्द असे संबोधते ते म्हणजे "तू सिद्धार्थ गौतम" आहेस असे म्हणून नाही तर जेव्हा जेव्हा कुणालाही कुठल्याही गोष्टीचे ज्ञान होते तेव्हा त्या "होणार्या" ज्ञानामागे "असलेलं" तत्त्व तू आहेस अशा अर्थाने होय. भागवत सांप्रदायिक विठ्ठलाला साक्षात "ते हे परब्रह्म विटेवरी" मानतात आणि त्याच कारणाने ते विठ्ठलाला "शुद्ध, बुद्ध, नित्य, सत्य" या विशेषणांनी संबोधतात हे समजून घेतले पाहिजे. तत्त्वज्ञान समजून न घेता फक्त नामावळी बघून निष्कर्ष काढायला गेल्यास हे घोटाळे होणारच.
बहुतांशी कुठलेही संस्कृतोद्भव नाव हे कुण्या व्यक्तीचे नाव नसून त्या मागील अर्थ, तत्त्व ध्वनित करणारे असते, विशेषण असते. उदाहरणार्थ शर्व हे विष्णुचे नाव आहे तसेच शंकराचेही नाव आहे. त्याचा मूळ धातू शर्व (वध करणे, नाश करणे) आणि अर्थ नाश करणारा असा होतो. अजून एक समांतर उदाहरण म्हणजे जिन् हा धातू, ज्यापासून जैन हा शब्द बनलेला आहे. जिन् याचा अर्थ जिंकलेला/ली ज्यावरुन जैन म्हणजे "ज्यांनी (इंद्रिये/भौतिक जगत्) जिंकलेले आहे" असा शब्द बनलेला आहे. हा शब्द भागवतांत सुद्धा काही ठिकाणी जितेन्द्रिय व्यक्तींचे वर्णन करताना आलेला आहे. पण त्याचा अर्थ भागवत हे जैन धर्मीयांनी लिहिलेले आहे किंवा तिथे त्या संदर्भात उल्लेखिलेल्या सर्व व्यक्ती जैन धर्मीय होत्या असा होत नाही. इंग्लिश किंवा बहुतांश पाश्चिमात्य भाषांमधला आणि संस्कृतातील विशेषनामांमधला हा महत्वाचा फरक लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
तुमच्या बाकीच्या संशोधनात व्यत्यय आणण्याचा किंवा धर्मसंकल्पनांवरुन वाद घालण्याचा हेतू मुळीच नाही. सारासार विवेक जागृत ठेवून आणि पुर्वग्रहदूषित न होता केलेला कुठलाही अभ्यास तुम्हाला योग्य स्थळी नेऊन पोहोचवेल यात शंका नाही.
>>>>> पण लिहीतना तो स्तूप
>>>>> पण लिहीतना तो स्तूप अचानक हिंदू कसा झाला हे अपेक्षित आहे. <<<<<
हा मुद्दा देखिल महत्वाचा आहे!
क्ष आणि केदार, चांगल्या
क्ष आणि केदार, चांगल्या पोष्टी..
.
.
मी जगन्नाथ मन्दीराच्या बीबी
मी जगन्नाथ मन्दीराच्या बीबी वर या लिखाणाला आक्षेप घेतला तर अॅडमिन्नी माझ्याच प्रतिक्रिया उडवून टाकल्या. नवल आहे. भल्ताच पुरोगामीपना.
कुणाकडे तेवढा वेळ असल्यास व
कुणाकडे तेवढा वेळ असल्यास व प्रिंटरला अॅक्सेस असल्यास ते करावे ही नम्र विनंती.>> मंदार तु पुण्यात राहतोस का, मला तुझा पत्ता दे. मी तुझ्या घरी आणुन देतो हि सगळी माहिति असलेली पुस्तकं.
.
.
भारतात अश्या काही स्टॅटिजिक
भारतात अश्या काही स्टॅटिजिक अॅक्टिव्हीटी घडवल्या जातात कि तो योगा योग आहे असे वाटत नाही. परदेशात सुध्दा असे काही घडते की अनंत लोकांच्या श्रद्दांनाच धक्का लावण्यात येतो.
परदेशात सुध्दा दा विंच्ची कोड च्या माध्यमातुन येशुला सामान्य संबोधण्याचा प्रयत्न झाला.
मधुकरजी काय आनंद मिळतो आपल्याला अश्या थेअरीतुन ? जर हे सत्य निघाले तर आजचे बौध्द तितक्याच प्रेमाने आजच्या विठ्ठलाला भजतील का ?आणि वैष्णव विठ्ठलाला त्यागतील का?
धर्म श्रध्दांना हालवण्याची ही टिपीकल कम्युनिस्ट थेरपी आहे. जगभरात काय भारतात सुध्दा कम्युनिझमची पिछेहाट होताना हा कम्युनिझम आणण्याचा नवा प्रयत्न की काय ?
.
.
परदेशात सुध्दा दा विंच्ची कोड
परदेशात सुध्दा दा विंच्ची कोड च्या माध्यमातुन येशुला सामान्य संबोधण्याचा प्रयत्न झाला.
मला वाटते, तुम्ही डा विंची वाचलेले नाही.... चित्रपटात अनेक गोष्टी कट केलेल्या आहेत. पुस्तक वाचा. मराठीत उपलब्ध आहे..
येशू हा सर्वसामान्य होता, पण तो आपल्या श्रद्धेच्या बळावर असामान्य झाला, असा अंतिम निष्कर्ष काढलेला आहे.. प्रत्येक सामान्य माणसाची श्रद्धा वाढवण्याचाच हा प्रकार नाही का? ... दंतकथांना मर्यादित महत्व ठेवा.. तत्वे महत्वाची, हे समजायला डा विम्ची मुळापासून वाचायलाच हवी...
आता, अशा मताना विरोध करणारेही असतातच, विरोध होणारच.... त्यामुळे मांडलेले मत कमी किंमतीचे ठरत नाही.
कुणाकडे तेवढा वेळ असल्यास व
कुणाकडे तेवढा वेळ असल्यास व प्रिंटरला अॅक्सेस असल्यास ते करावे ही नम्र विनंती.>> मंदार तु पुण्यात राहतोस का, मला तुझा पत्ता दे. मी तुझ्या घरी आणुन देतो हि सगळी माहिति असलेली पुस्तकं.
----------------------------------------------------------------------
मधुकर,
ते या "तुमच्या" लेखांच्या प्रतींबद्दल म्हणत आहेत. मुळ पुस्तकांच्या बद्दल नाही.
मंदार,
जर अॅडमिनने हे लेख उडवले नाहीत (आणि ते कधीच उडवणार नाहीत) तर ते बराच काळ राहतील. प्रती केव्हाही काढता येतील.
.
.
मंदार_जोशी | 11 August, 2010
मंदार_जोशी | 11 August, 2010 - 05:28 नवीन
>>परदेशात सुध्दा दा विंच्ची कोड च्या माध्यमातुन येशुला सामान्य संबोधण्याचा प्रयत्न झाला.
नितीन माझ्या मते सामान्य संबोधण्याचा नव्हे, तर चर्चने आज जो ख्रिस्चन धर्माचा भ्रष्ट अवतार चालवला आहे त्या विषयी होतं ते.
डा विंची च्या लेखकाने सुद्धा हे मान्य केलं आहे की ख्रिस्ताने विवाह केला आणि त्याला एक मूल झालं हे जरी काही लोकांना वाटत असलं तरी त्यामुळे त्याचा दैवीपणा किंवा महात्म्य कमी होत नाही.
मंदारजी, लोकांची श्रध्दा आहे की येशु अविवाहीत होता. मी हिंदु असल्यामुळे मला माहित नाही की अशा थेअरी मुळे ख्रिश्चन समाजावर त्याचा काय परिणाम झाला. मी एकाशी बोललो त्या प्रमाणे चर्च मध्ये याचा प्रतिवाद करण्याकरता काही रविवार खर्च करण्यात आले. ख्रिश्चन लोक माझ्या मते लगेच हिंसेवर उतरत नाहीत त्यामुळे लेखक, सिनेमाकार, पुस्तक प्रकाशक वाचले. सलमान रद्दी ( रश्मी ) सारखा फतवा त्यांच्या विरुध्द निघाला नाही.
ही चर्चा करण्याची गोष्टच नाही.
मध्यंतरी कशावरुन ज्ञानेश्वरमहाराजांनी भिंत चालवली ? कश्यावरुन अजान वृक्षाची मुळी त्यांना त्रास देत होती अश्या निष्कारण शंका उपस्थित केल्या गेल्या. डॉक्टर किंवा डॉक्टरेट माणुस जेव्हा सृष्टीच्या अनंत सिध्दांतापैकी काही सिध्दांताचे ज्ञान जाणुन शात्र काय ते मलाच कळते अश्या अविर्भावात श्रध्दावान परंतु सामान्य माणसात बुध्दीभ्रम उत्पन्न करु पहातो तेव्हा वाईट वाटते. तसेच अर्धवट इतिहास तज्ञांचे. तुमची थेअरी घेऊन अभ्यास करा हवतर. पि.एच.डी मिळवा पण अर्धवट ज्ञान प्रकट करु नका.
आधी तज्ञांबरोबर चर्चा करा. हे ज्ञान प्रकट झाल्याने होणार्या परिणामांची चर्चा करा. फायदे तोटे तपासा आणि सर्वानुमते आणाना लोकांच्या समोर.
दुर्दैवाने हिंदुंना या फालतु थेअरींचा प्रतिवाद करायला एक चर्च किंवा दशवादासारखा हुकमी उपाय नाही. यामुळे हिंदुंच्या श्रध्दांवर घाव घातले जातात.
मंडळी, मालदीवला फिरुन या
मंडळी, मालदीवला फिरुन या जरा......... हिस्टरीमधील डिटेल्स वाचा.. मालदीवात स्तूपाना उस्तुबु म्हणायचे म्हणे..
http://en.wikipedia.org/wiki/Maldives#History
माननीय प्रशासक मायबोली, कोणाच
माननीय प्रशासक मायबोली,
कोणाच तरी ऐकाव या भावनेन आगाऊ यांच एकुन मी आधी केलेली मागणी मागे घेत आहे.
नितीन जोगळेकर
नितिनचिंचवड
मुळात विठ्ठल, बुद्ध, अल्ला,
मुळात विठ्ठल, बुद्ध, अल्ला, येशु या नावांत अडकून पडण्यात काय हशिल आहे. शेवटी मी जर येशुची अर्चना केली किंवा मधुकरांनी विष्णुची साधना केली तर त्याचे फ़ळ आम्हाला केवळ आम्ही त्या धर्माचे नाही म्हणून मिळणार नाही, असे काही आहे का?
डेलिया यांच्या मतांशी मी पुर्णपणे सहमत आहे.
भगवान बुध्दापुढे नतमस्तक
भगवान बुध्दापुढे नतमस्तक व्हायला माझी अडचण नाही. विशालजी मी सहमत आहे आपल्याशी. परंतु नकोते वाद कशाकरता निर्माण करायचे हा प्रश्न आहे.
कोणीही कोणत्याही विचारसरणीचा
कोणीही कोणत्याही विचारसरणीचा पुरस्कार करावा पण अपप्रचार किंवा धार्मिक भावना दुखावणार लेखन करु नये.>>> मग या आधी कुठल्यातरी बीबीवर 'मुस्लिम धर्माचा जिहाद हा एकच अर्थ आहे त्यात फक्त कत्तल,बलात्कार हेच आहे' असे तुम्ही लिहिले होते ते धार्मिक भावना दुखावणारे नाही का? की माबोवर कोणी मुस्लिम नाहीत म्हणून अंधारात जोराजोरात 'दंड' फिरवायचे प्रात्यक्षिक करताय?
याविषयात एक तज्ञांची समिती असावी जी आपल्यास या संदर्भात मार्गदर्शन करेल.>>>>मायबोली प्रशासकांना मदत करण्यासाठी कसल्याही समितिची गरज आहे असे मला वाटत नाही.
या लेखाने तेढ वगैरे वाढेल हा निव्वळ कांगावा आहे. त्यातल्या मुद्द्यांना मुद्द्यांनी प्रतिवाद करा.
<या लेखाने तेढ वगैरे वाढेल हा
<या लेखाने तेढ वगैरे वाढेल हा निव्वळ कांगावा आहे. त्यातल्या मुद्द्यांना मुद्द्यांनी प्रतिवाद करा.>
बरोबर आहे. पण उळात कुणालाच नक्की माहित नाही, कोणता इतिहास ग्राह्य धरायचा नि कोणता नाही. शिवाय काही लोकांना उगाचच नको त्या गोष्टी उकरून काढायची सवय असते. त्यामुळे काय वाट्टेल ते लिहितात! त्याकडे खरे दुर्लक्ष करायचे.
आगाऊ, तुमचे सगळे मुद्दे मान्य
आगाऊ,
तुमचे सगळे मुद्दे मान्य आहेत असे नाही. तुम्ही यामुळे तेढ निर्माण होणार नाही म्हणालात म्हणुन मी मागणी मागे घेत आहे.
कुणीतरी कुणाचतरी ऐकाव या भावनेने.
तुम्ही मुद्यांची सर मिसळ केलीत तरी सुध्दा. मी काहीकाळ एका हिंदुत्वाचा पुरस्कार करणार्या संघटनेचा पदाधिकारी होतो. मी जे काय या काळात केल ते उघडपणे केल. कुणाला घाबरुन अंधारात मला काही करण्याची आवश्यकता वाटली नाही. यापुढेही वाटणार नाही.
मधुकर , मुळात मा. बो .वर कोणी
मधुकर ,
मुळात मा. बो .वर कोणी तुला मुस्लीम आय डी आसलेली व्यक्ती दीसली का ? नाही ना मग तु विचार कर या मा. बो .वर ब हुतांश एक विचार धारा असणारा वर्ग आहे आणी तु कीती ही पुरावे दीली तरी हे लोक त्यांनाच नालायक म्हणतील .
आणी ईतिहास बद्दल म्हण्शील तर तो मी कधीच वाचत नाही ( कारन ईतिहास हा ज्या लोकांकडे लिहाण्याचे व शिक्षणाचे आधिकार होते आशा लोकांनी लिहला आहे तो काही बराबलुततेदाराने लिहला नाही ) नंतर जस जसे इतर वर्ग शिक्षण घेउ लागला या वर संशोधन करु लागला त्या त्यामुळे काही खर्या काही खोट्या गोष्टी बाहेर येउ लागल्या तर प्रस्थापितांना धक्का बसनारच .
आणी हे जे तु लिहीत आहेस हे एखाद्या प्र्स्थापितांने लिहले आसते तर ?????
( वा ग्रेट / तुला हे क्स जम्त / तुझ्या पुढे हात जोड्ले / वा काय लेख आहे )
उदाहरण देतो : एकाद्या दलित लेखकाने काही लिहले तर त्याला दलित साहीत्य म्हणाले जाते ,
प्रस्थापित लेखकाने लिहले तर त्याला कोणते साहीत्य मह्ट्ले जाते ? मी शोध घेत आहे .
मा .बो .करांना विनंती की समोरची व्यक्ती कोणा एका धर्मा चा किंवा जाती ला कमी लेखन्या च्या भावने लिहीत नाही तर त्याला मिळाल्या माहीतीच्या आधारे आहे आणी हि माहिती कुटे मिळेल तर घ्या लिंक :- विद्रोही साहित्य संमेलन / दलित साहित्य संमेलन /मुलनिवासी साहीत्य संमेलन / मराठा सेवा संघ / संभाजी ब्रिगेड / आदीवासी साहीत्य संमेलन / ग्रामिण साहीत्य संमेलन / मुस्लीम साहीत्य संमेलन/ भटके विमुक्त साहित्य संमेलन / आणी आजकाल तर प्रत्येक जाती ची संमेलन भरविली जातात . अशा ठिकांणी जी पुस्तेक विक्रीस असतात ती एक वेळा आपण वाचावित .
ठिकाण :- पुणे ( भिमा कोरेगाव विजय स्तंभ यात्रा ) तारीख माहीत नाही .
मुम्बई :- दादर चेत्यभुमी दिंनाक :- ६ डिसेंबर
.
.
ठिकाण :- पुणे ( भिमा कोरेगाव
ठिकाण :- पुणे ( भिमा कोरेगाव विजय स्तंभ यात्रा ) तारीख माहीत नाही .>> मला माहित आहे. १ जानेवारी. ईथे शौर्य दिन साजरा केला जातो. (१ जाने १८१८ मधे इंग्रजांच्या सैन्यातील महार ब्रिगेडनी बाजीरावांचा पराभव केला होता. म्हणुन इंग्रजानी या विर पुरुषांच्या स्मरणार्थ विजयी स्तंभ उभारलाय. याला "The War of Pride & Self Respect" म्हणुन पण ओळखले जाते).
यावरिल बरचं लिखान मी वाचलेलं आहे. वेळ मिळाल्यास लिहेन.
असो.
चलने दो.
.
.
(१ जाने १८१८ मधे इंग्रजांच्या
(१ जाने १८१८ मधे इंग्रजांच्या सैन्यातील महार ब्रिगेडनी बाजीरावांचा पराभव केला होता. म्हणुन इंग्रजानी या विर पुरुषांच्या स्मरणार्थ विजयी स्तंभ उभारलाय. याला "The War of Pride & Self Respect" म्हणुन पण ओळखले जाते).>>>>>
याबद्दल पुर्ण माहिती मिळू शकेल का? इतक्या त्रोटक माहितीवरून केवळ एवढे स्पष्ट होते की ब्रिटीशांविरुद्ध लढणार्या अनेक भारतीय योद्ध्यापैकी एकाचा ब्रिटीशांनी आपल्याच (भारतीय) लोकांपैकी एका वर्गाचा वापर करून पराभव केला आणि त्यांना इथे विर पुरुष म्हणून संबोधले जातेय. ब्रिटीशांची मदत करणारे त्यांच्या दृष्टीने वीर असु शकतील आम्ही त्यांना फितुरच म्हणणार निदान जोपर्यंत संपुर्र्ण माहिती मिळत नाही तोपर्यंततरी. केवळ एका ब्राह्मण सत्ताधार्याचा पराभव केला, त्यासाठी म्हणून देशाच्या सगळ्यात मोठ्या शत्रुंची मदत केली त्या लोकांना निदान मी तरी वीर म्हणणार नाही... माफ करा. माझ्या शौर्याच्या संकल्पना काही वेगळ्या आहेत.
.
.
मंदार, सगळं पटतय रे.... पण
मंदार, सगळं पटतय रे.... पण काय करणार?
मला दुसर्या बाजीरावांवर असलेला राग कळू शकतो, कारण असेही तो त्याचा विलासीपणा आणि स्त्रीलंपटवृत्तीसाठीच प्रसिद्ध होता. (अर्थात हे मत ऐकीव आणि वाचलेल्या गोष्टींवरून बनवले आहे, सद्ध्याची झांसी की रानी ही मालिका काही वेगळेच सांगतेय. खरे खोटे तो बाजीराव आणि देवच जाणे) माझा आक्षेप त्याबद्दल नाहीये,...
पण त्या पराभवामुळे ब्रिटीश साम्राज्याला समर्थपणे विरोध करू शकणारी एक जबरदस्त सत्ता नेस्तनाबुत झाली आणि ब्रिटीश पुढील २०० वर्षे आपल्या देशावर निरंकुश राज्य करु शकले ही सत्य परिस्थिती आहे आणि तिच्याकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष केले जातेय हे बघून वाईट वाटतेय एवढेच. असो, माझ्या या दोन्ही पोस्टी या बाफच्या मुळ विषयाशी फारकत घेताहेत, म्हणुन इथेच थांबतो.
माझ्या शौर्याच्या संकल्पना
माझ्या शौर्याच्या संकल्पना काही वेगळ्या आहेत.>> असतिल मित्रा. पण बाजिरावांच्या काळात टाकुन दिलेल्या सामाजाला ब्रिटिशानी सैन्यात घेतले. दलितांच्या अंगातील लढाऊ सामर्थ्याला डावलल्या जात असे. मग अशा वेळी ब्रिटीशानी (वापरलय असेल म्हणा) त्या दलितांच्या मनगटातील बळाची कदर केली. त्याना सैन्यात घेतलं. महार ब्रिगेड स्थापन केलं. त्याना मान सन्मानानं जगन्याचा मार्ग दाखविला. शिक्षणाची सोय करुन दिली. मग सांगा. जवळचे कोण ?
शनिवारवाडयातले कि ब्रिटीश.
मुळात शनिवारवाड्यानी दलितांकडे केंव्हा लक्षच दिलं नाही, किंबहुना त्यांच्यावर सतत अत्त्याचारच केला गेला. मग हे वाडयातले राजे आपले राजे कसे काय? ते राजे होते बामणांचे.
आमचे राजे ते, जे आमचा विचार करतात.
विशाल माझ्याकडे या लढायीची संपुर्ण माहिती आहे. पण सध्या तिरुपती बालाजी व रावणावर टिपणे काढतोय.
त्या नंतर या लढाईवर लिहेण.
शिवाजी महाराजांच्या काळात
शिवाजी महाराजांच्या काळात दलिताना पाटिलकी मिळण्यापर्यंत प्रजाहिताचा विचार करणारा राजा होऊन गेला.
पण पुढे त्याच राज्यात जेंव्हा बाजीराव व पेशवाई आली तर यानी दलिताना लिटरली जनावरापेक्षा खालची वागणूक दिली.
मग हा असा राजा आमचा राजा कसा काय ?
तो तुमचा राजा होता, तुम्ही खुशाल त्यांचं गुणगाण करावं.
विषयांतर मोड ऑफ.
Pages