पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब्राऊनी, आवळा मावा या सगळ्या कृति होत्या इथे.
मिल्कशेकची अशी खास कृति नसते. कुठलेही गर असलेले फळ घेऊन त्याचा गर घ्यायचा, तो ब्लेंड करुन त्यात साखर आणि दूध घालायचे. शक्यतो आंबट फळे घेत नाहीत, कारण त्याने दूध नासते.
केळे, चिकू, स्टॉबेरी, अंजीर, सिताफळ, पपई, आंबा ईत्यादी फळे योग्य. उसाचा रस आणि दूध हे पण छान लागते.
पिस्ता, केशर, खारिक, खजूर, बदाम , अंजीर हे पण चांगले लागतात. हे सगळे दूधात भिजवुन वाटायचे.

mala malvani masalyachi vajant pramanshir mahiti havi aahe

lal bhoplayachya bhaji aivaji ajun kay karata yaeel

तसा मी मालवणचाच पण तो मसाला आमच्या घरी वापरत नाहीत. प्रमाण मिळाले तर लिहितो.
लाल भोपळ्याचे घारगे, पोळ्या, भरीत, कापं, भजी, थालीपिठे, पाय, खीर, आणि आईसक्रीम करता येते.
सालीची चटणी करता येते.

मला stir fry vegetables ची पाककृती हवीय. जुन्या हितगुजवर सापडली नाही...

मी चुकुन दिवाळिच्या सामानात जो शिर्‍यासाठी वापरतो तो जाडा रवा भरला. त्याचे लाडु चांगले होतिल का ? करंजी चांगली होइल का ?

Dinesh da Lal Bhoplyachi kape mhanje kay prakar aahe, Krupya kruti dya

जगु, नुसत्या रव्यापेक्षा रवा बेसन लाडू कर.... उत्तम होतील. Happy

अग पण त्याला पण बारीक रवा लागतो ना ? मी चुकुन जाडा रवा आणला आहे. होतिल का त्याचे ?

नुसते रव्याचे लाडू केलेस तर भरभरीत होतील म्हणूनच रवा-बेसन लाडू कर.

जगु, जाड रव्याचे ओला नारळ घालून लाडू छान होतात. (बारिक रव्यापेक्षा.)
..............
कुणा आवडे चकली, कुणा कानोल्यात सुख; दिवाळीच्या फराळाचा, माझ्या पोटोबाला धाक!!!! Proud

येक्झॅटली. रवा खमंग बाजुन, मस्त ताजा खवलेला लुसलुशीत नारळ घालून लाडू (मला लाडू पायजेsssssss)

म्रन्मयी,
कच्च्या पपईचे सांडगे कसे करायचे ?

आईला विचारून कृती टाकते.
..............
कुणा आवडे चकली, कुणा कानोल्यात सुख; दिवाळीच्या फराळाचा, माझ्या पोटोबाला धाक!!!! Proud

थँक्स गं पाहिली रेसिपी. राजश्रीवर खानाखजानापण आहे हे माहित नव्हतं Happy

मंजु, म्रुन्मई, सिन्ड्रेला धन्यवाद.
सिन्ड्रेला लाडू झाले की ये माझ्याकडे दिवाळीत.

अनारश्यांच्या पिठात चुकुन तुप जास्त झाले आहे. चपातीच्या पिठा प्रमाणे नरम झाले आहे काय करु ?

अशिनी,
कुळथाचे पिठले करताना नेहमीप्रमाणे फोडणी करायची. त्यात २ ग्लास पाणी घालायचे. लाल तिखट, मीठ, आमसुले ३-४, ५-६ पाकळ्या लसूण वाटून, दोन चमचे ओला नारळ, एक चमचा चिरलेली कोथींबीर घालून उकळायचे. मग साधारणपणे दोन मोठे चमचे कुळथाचे पीठ थोडे थोडे करून टाकायचे आणि ७-८ मिनिटे शिजवायचे. हे पिठले मध्यम जाडसर होते. अधिक घट्ट किंवा पातळ पिठलेही करतात, ते आवडीनुसार ठरवायचे.

माझी एक सिंधी शेजारीण शि-यासदृश्य काहीतरी पदार्थ करायची, त्यात ती भरपुर सुकामेवा घालायची, शिवाय सफरचंद पण घालायची (बहुतेक, नक्की आठवत नाही).

"प्रशाद" म्हणुन ती हा प्रकार आम्हाला अगदी बशी भरुन खायला द्यायची. दिसायला साधारण शि-यासारखा पण रवा वापरायची की नाही हे कळत नव्हते.

कोणाला माहित आहे हा प्रकार?

साधना.

साधना, दलियाचा शिरा विचारत्येस का?

सिंधी लोक एकदम बारीक रवा नाहीतर बहुतेकदा जाड कणीकेचा शीरा बनवतात(पंजाबी लोकांसारखा गुरुद्वारा शीरा नाही बनत हा,मी केलाय). माझी खास सिंधी मैत्रीणीकडे हाच प्रसाद म्हणून असायचा जागरणात. मस्त लागतो. त्याची खासीयत हीच की त्यात मावा असतो नी पाकात टाकतात. खूप विचारले तेव्हा तिच्या आईने ही रेसीपी सांगितली.(एवढे सीक्रेट का ठेवायचे??). असो,

जाडसर कणीक आधी हलकेच भाजायची(तीची आई स्पेशल कणीक दळून आणायची). ब्रॉउन व्हायला द्यायची नाही. खवा/मावा वेगळा मस्त भाजून घ्यायचा. हा एकदम भुरभुरीत कोरडा मावा असतो(मुंबईत असाच मिळायचा, मावा केक ह्या अश्या माव्याने मस्त होतो. तो पांढरा गोळ्यासारखा मिळतो तो मावा नाही ह्याला वापरत;एकदम कोरडा मावा).
सुका मेव्याचे तुकडे करायचे नी तो पर्यन्त पाक करायचा.
भाजलेली कणीक नी मावा एकत्र करून तूपात परतायची. हे सर्व कच्च्या पाकात मिक्स करून मंदाग्नीवर शिजत ठेवायची नाहीतर ओवन मध्ये ठेवायचे. इतका मंदाग्नी ठेवून करायचे की काय जादू असते एकदम मस्त शीरा होतो. कळूनही येत नाही नक्की कशाचा आहे ते. मग त्यांच्या स्टाईल प्रमाणे भरपूर सुका मेवा टाकायचा.

मी इथे आल्यावर दूध पॉवडर(milk mava powder from indian grocery) टाकून बनवला पण ती चव काय आली नाही. Sad

मिल्कशेकची अशी खास कृति नसते >>> दिनेशदा, धन्यवाद. मला खरे तर माझी कृती टाकायची होती. आधीच्या असतील तर त्याला लागुनच दिली असती म्हणुन विचारत होते.

मनु, योग्य ठिकाणी टाक बघु इतकी छान कृती Happy

मनु, मस्त वाटतय वाचायला, तोंडाला पाणी सुटल, हा जो मावा तू लिहीलाहेस, त्याला काही स्पेसिफीक नाव आहे का? आणि नाही मिळाला तर नेहेमीचा चालेल का?

मनु, लगेच कृती दिल्याबद्दल धन्यवाद. आता आठवुन परत पाणी सुटले तोंडाला.... करुन बघते आणि सांगते कसा झाला तो.

साधना

साधा मावा जर ताटात पसरुन पंख्याखाली ठेवला आणि हळुहळु मोडला तर कोरडा होतो. पण मुंबईच्या दमट हवेत जरा जास्त वेळ लागतो. पूण्याच्या हवेत लवकर कोरडा होईल.

व्हेज कोल्हापुरीची रेसिपी हवी आहे.

जुन्या हितगुज वर बघ, दिनेश ह्यांची आहे वाटते वेज कोल्हापूरी.

दालंमोठ जे फरसांण च्या दुकानात मिळत त्याची रेसीपी
कोणाला माहित आहे का??

नाही मिळाली ग मनु.

हा प्रश्न कुठे विचारावा कळले नाही म्हणुन इथे विचारतेय.
लिंबुसत्व पावडरला इथे अमेरीकेत काय म्हणतात. मी आज whole foods मध्ये जावुन सायट्रीक ऍसिड पावडर मागीतली तर त्यांनी माहित नाही असे सांगीतले. गुगल केल्यावर sour salt असे नाव मिळाले. कोणी या नावाने हे खरेदी केलय का?

Pages