मित्रहो, कार्यशाळेत गझल प्रकाशित होण्याचा आज शेवटचा दिवस.
आजही तुम्ही नेहमीप्रमाणे गुणांकन करायचं आहेच.
भारतीय प्रमाणवेळेनुसार १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत तुम्ही गुणांकन करू शकता.
श्वासांची याचना करावी, इतकीही नादारी नाही
मॄत्यूशीही रोखच सौदा, जगणे अता उधारी नाही
चालही तिची वाकडीच अन दंशही विखारी शब्दांचे
जी डसली ती दुनिया होती, नागिण कुणी विषारी नाही
आयुष्याच्या जुगारात मी हरतोय रोज का डाव नवा?
पत्ते माझे हुकमाचे पण, माझ्याकडे उतारी नाही
वेष पाहुनी माझा का रे, पायावर डोके टेकविता?
साधा भेकड संसारी मी, संन्यासी अवतारी नाही
विश्वास कसा ठेवायाचा, त्याच्यावर दुनियेने आता
किती द्रौपद्या लुटल्या गेल्या, आला तरी मुरारी नाही
घायाळ पंख झाले म्हणुनी, दोष कशाला त्यांना द्यावा
जिगर माझ्याच छातीमध्ये जर घेण्यास भरारी नाही?
थांग लावण्या अश्रूंचा मी, जर का शिरलो खोल तळाशी
बुडायचोही नाही आणिक लागायचो किनारी नाही
शेवटचे तीन
शेवटचे तीन शेर आवडले.
आयुष्याच्
आयुष्याच्या जुगारात मी हरतोय रोज का डाव नवा?
पत्ते माझे हुकमाचे पण, माझ्याकडे उतारी नाही
मस्त कल्पना...
माझे ५
*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||
मलापण
मलापण शेवटचे तीन आवडले.
"विश्वास
"विश्वास कसा ठेवायाचा, त्याच्यावर दुनियेने आता
किती द्रौपद्या लुटल्या गेल्या, आला तरी मुरारी नाही"
खरं आहे...
९ गुण...
ठीक वाटली.
ठीक वाटली. माझ्या मते ५ गुण.
-सतीश
छान आहे ६
छान आहे
६ गुण
४ गुण
४ गुण
५ गुण
५ गुण
खणखणीत! ८
खणखणीत!
८ गुण
--------------------------------
आली दिवाळी!
६
६ गुण
==================
अहिंसा....
जय जवान जय किसान....
मस्त. ८
मस्त. ८ गुण.
माझे ५
माझे ५
शेवटच्या ३
शेवटच्या ३ शेरांमधला सहजपणा आवडला.
माझे ६ गुण...
६ गुण
६ गुण