पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांचे धन्यवाद.
कोहाळ आणि लाल भोपळा ह्यामधे फरक आहे. कोहाळ आतुन पांढर आणि त्याची साल दुधीभोपळ्यापेक्शा गडद असते. वरिल चित्र कोहाळ्याचच आहे. ते कोवळ असल किंवा जुन झाल की त्याच्या सालीचा रंग पांढरट होतो.

कोहळा घालून मटकीची भाजी छान होते. फोडणीतच घालायचा तो.
कोहळा अत्यंत पौष्टिक असतो, त्याला कुष्मान्ड असे म्हणतात.

कोहाळा बाळंतीणीस खायला देतात. हा पौष्टीक, शक्ती व बुद्धीवर्धक असतो. कुष्माण्डपाक असे आयुर्वेदीक टॉनिक मिळते. त्याची कृती माहीत नाही.

बाळांतीणीचे नाहीतरी (जागरण्-बिगरण, शेजारच्यांचे/नातेवाईकांचे सल्ले ऐकुन) डोकं out झालेलं असतं त्यामूळे बुद्धीवर्धक कोहळा देणे अत्यंत योग्य आहे Wink

खिम्याचे कबाब बार्बेक्यू करताना खिमा सळईला (मी इथे मिळणारे skewers वापरते) लावला की गळून पडतो. मी अंड, थोडे बेसन घालून पाहिले पण तरीही खिमा सैल पडतो. याला काही उपाय आहे का?

अंजली, बेसन, अंड्यापेक्षा ब्रेड क्रम्ज घालून बघ. खिमा घट्ट हवा. मीठ घालताच खिम्यालापण पाणी सुटतं.
..............
कुणा आवडे चकली, कुणा कानोल्यात सुख; दिवाळीच्या फराळाचा, माझ्या पोटोबाला धाक!!!! Proud

ह्म्म, म्हणजे अगदी करायला घ्यायच्या आधीच मीठ घालून बघेन. मी आधी पेपर नॅपकीन मधे गुंडाळून घट्ट पिळून घेते.
धन्यवाद मॄ..

खिमा धुवुन एका चाळणीत घालून निथळून घ्यावा. तसेच त्यात डाळ्यान्चे पिठ घालावे. किंवा हवे तर हे डा़ळे घालुन खिमा, दोन तीन वेळा ब्लेंड करुन घ्यावा. खिमा जितका बारिक तितके कबाब अलवार होतात. पुर्वी खिमा पाट्यावर चार वेळा चरबीबरोबर वाटत असत.

अक्खे अंडे घातलेस का खिम्यात? मी नुस्ते पिवळा बलक घालते नी भिजवलेली चणा डाळ वाटून.

कोहळा म्हणजे कुष्मांड. हा अतिशय पौष्टिक आणि बुद्धीदोष दूर करणारा असतो.
याच्यापासून कुष्मांडप्राश (च्यवनप्राशासारखे) नावाचे रसायन तयार करतात. ते अपस्मार (epilepsy), स्मृतिभ्रंश या विकारांवर अतिशय उत्तम काम करते. नुसते टॉनिक म्हणून वापरले तरी छान उपयोग होतो.

आता माझा प्रश्न.
माझ्याकडे भारतातून कुळीथाचे (हुलगे) पीठ आले आहे. त्याचे काय काय करता येईल?
त्याच्या भाकरी बाजरीच्या भाकरीसारख्याच करतात का? आणि पिठलं पण करतात असे आठवतेय.

शिंगोळे करता येतील.

कुळथाच्या पिठाच्या भाकर्‍या नाही होत, पण त्याचे पिठले, माडगे आणि शेगोळे करतात. (कृति असाव्यात इथे )

वि.सु.: कुळथाचे पिठले दुसर्‍या दिवशी अजुन चांगले लागते..

मनू,
हो आक्खे अंडे घातले. म्हणून सैल पडले का?

इथे ( अमेरिकेत ) मटणाच्या खिम्याचे सीख कबाब घरी कोण करतं?
मला रेसिपी हवी लगेच !

अश्विनी
कुळथाच्या पिठीचं पिठलं मस्त लागत. भरपूर कांदा, लसूण घालून करायचं. थालिपिठाच्या भाजणीत मिसळून पण छान लागतात थालिपीठं.

कुठलेही पिठले दुसर्‍या दिवशी छान लागते. घट्ट पिठले असेल तर त्यावर मोठा चमचाभर कच्चे तेल सोडायचे...आहा

अश्विनी, अगं पीठाची जास्त काळजी नको करुस. तुला नाही ना माहिती काय करायचे, दे मला पाठवुन Lol

पाककृती योग्य त्या ठिकाणी टाकली आहे.

शूनू,

मी वरच्या रेसीपीप्रमाणेच करते. पण मी फक्त egg yolk घालते नी चणाडाळ भिजत घालून पाणी न टाकता वाटते. खीमा पण अगदी fine fine वाटून घ्यायचा. मग त्याच मिश्रणात मसाले,आले लसूणाची आधीच बारीक वाटलेली गोळी टाकून पुन्हा मिक्सी फिरवते. मग शेवटी चणाडाळ वाटलेली टाकून वाफवते. हे सगळे flat steamer मध्ये मिठाशिवाय किंचीत वाफवून घेते मग शेवटी बारीक केलेला कांदा,egg yolk, पातीचा कांदा किंवा पातळ जर झालेच असेल तर ब्रेड क्रम्स असे टाकून थोड्यावेळ फ्रीजमध्ये ठेव.
स्क्रूवर पाण्यात भिजवून ठेवून त्यावर हे गोल थापते. थापून झाले की वरून त्यावर तेल लाव.ओवन मध्ये भाजते. मस्त कुरकुरीत होतात.
शुक्रवारीच बनवणार आहे मी. जमले तर फोटो टाकेन. Happy
हो आणखी एक मी फ्रेश मसाला वाटते. तो छान लागतो. वेलची, काळमीरी, एखादे लवंग, बडीशेप, बडी वेलची,जीरे, धणे हे गरम करून वाट मस्त. शान बीन बेकार लागते मला.

अंजली,

अंडे फक्त बायडींग एजेंन्ट म्हणून आहे ते पुर्ण पांढरे घातले तर सैल होते खीमा. दोन अंड्याची बिलकूल गरज नाही एका पांऊडाला. एकच अंडे घाल नी कालवून कालवून घे खीमा गोळा. होइल बघ.

अंजली२८,
मटण सीख कबाब याची कृती योग्य ठिकाणी टाकणार का, इथे ती सगळ्यांना सापडणार नाही. Happy

अश्विनी,मी "विचारपूस" मधे प्रश्न विचारला आहे ,कृपया उत्तर देउ शकाल का?धन्यवाद..

धन्यवाद सगळ्यांना.
वृषाली, उत्तर दिले आहे.
सिन्ड्रेला, कधी पाठवून देऊ पीठ? आणि पिठलं व शेंगोळ्या कधीपर्यंत तयार होईल ते पण सांग. CT म्हणजे फार तर दोन तासाचा रस्ता. तेव्हढे कष्ट घ्यायला मी तयार आहे, शेंगोंळ्यांसाठी. Proud

शेंगोळ्या म्हणजे ? कृती टाक सिंड्रेला लवकर.

शेंगोळ्यांचि कृति आहे ना जुन्या हितगुज वर पिठले, आमटि विभागात.

http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/86677.html?1119594262 इथे आहे कृती. आमची थोडी वेगळी आहे. टाकते नक्की. फुटवा पण टाकते Happy

अश्विनी, पीठ घेऊनच ये Happy आहा, खूब जमेगा रंग जब मिल बैठेंगे दो यार और खायेंगे शिंगोळे...वा वा...वा वा...;)

दुपारच्या मुसळ्धार काळोखी पावसाळी थंडीत,कीचनमध्ये येवून भरपूर कांदा,लसूण,कोथींबीर घालून मस्त सरसरीत कुळीथाचे पीठले... नी गरम गावठी लाल भात तूपाची धार सोडलेला. 'ह्याची सर कशाला नाही'. हे खावून मस्त ब्लंकेट ओढून दुपारची ताणून द्यावी. :).
नाहीतर बेसन नी कुळीथ पीठ एकत्र घेवून कांदा भजी बनवून खावी. Happy

इथे मिल्कशेकच्या कृती आहेत का ? मला सापडत नाहीयेत.

मनु, वाईट्ट वाईट्ट आहेस.

मला ब्राउनीच्या रेसिपीसाठी कुणाचाही रिस्पॉन्स आला नाही(मला वाटलं होतं निदान दिनेशजी तरी सांगतील!).........ओके.......हरकत नाही.
मी ती गुगलवरून मिळवली तीही एगलेस!!!!!!!!!
आता आवळा कँडीची रेसिपी कुणी सांगेल का? सध्या बाजारात खूप आवळे आहेत.

माधुरी ब्राउनी ची रेसिपी टाक ना.
मला पण आवळा माव्याची रेसिपी हवी आहे.

माझी जुन्या हितगुजवर रम ब्रॉउनीची रेसीपी आहे. पण गमम्त म्हणजे मलाच मिळत नाहीये. Happy

Pages