कुंजविहारचा जम्बो वडापाव अजूनही जोमाने सुरु आहे.... काही महिन्यांपूर्वी ठाण्यामधल्या खादाडी जागांवर थोडे लिखाण केले होते... त्यातल्या काही नोंदी ..
ठाणे ईस्टला असाल तर तुम्हाला 'विजय स्नॅक्स कॉर्नर' नक्की माहीत असेल. तसेच अजून एक दुकान आहे ठाणे महानगरपालिका शाळा क्र. ९ समोरच्या गल्लीमध्ये. काही वर्षात हा सुद्धा दुकान बनवेल बहुदा...
ठाणे वेस्ट मध्ये 'दुर्गा स्नॅक्स कॉर्नर' (गोखले रोड), 'गजानन वडेवाला' (विष्णूनगर), 'राजमाता' (राममारुती रोड) आणि माझे सध्याचे सर्वात आवडते 'श्रद्धा वडेवाला' (घंटाळी) ही काही चवदार वडे मिळण्याची ठिकाणे.
तुम्ही जर एकदम हार्डकोर 'कटलेट' फॅन असाल तर मात्र तुम्हाला गोखले रोडवर गावदेवी मंदिरासमोरच्या गल्लीमध्ये असलेल्या कटलेटवाल्याकडे जायला हवे. हल्लीच नाव बदलले आहे त्याने पण ते आधी 'रचना स्नॅक्स' ह्या नावाने ओळखले जायचे.
'चाट'साठी माझे आवडते ठिकाण म्हणजे स्टेशनजवळ आंबेडकर रोडवर असलेल्या जगदीश बुक डेपो शेजारी. असली जबरी 'पाणीपुरी' बनवतो ना तो. शिवाय दहीपूरी, रगडापॅटिस, भेळ, शेवपूरी हे सुद्धा मस्त मिळतात त्याच्याकड़े. राममारुती रोड वर असलेले 'इव्हिनिंग स्पॉट' हा सुद्धा मस्त चाट कोर्नर आहे. मात्र थंड पाणीपूरी खायची असेल तर 'प्रशांत कोर्नर' मस्त आहे.
आइसक्रीमसाठी एक मस्त दुकान आहे ते म्हणजे 'गोखले' यांचे. ह्यांच्याकड़े 'गुलकंद आइसक्रीम' नक्की ट्राय करून बघा. बदामाच्या पानामधले ५०-१०० ग्राम आइसक्रीम खायचो तसे आइसक्रीम अजून सुद्धा तळ्यावर मिळते. तिकडेच थोड़े बाजूला तलावपाळीला 'श्रद्धा फालूदा'वाला सुद्धा आहेच.
तुम्ही जर घोडबंदर रोडच्या आसपास असाल तर मानपाड्याला बिकानेर वाल्याकड़े मिरची वडा, 'काजू समोसा', 'दही कचोरी' आणि 'जिलेबी' अफलातून मिळते.
.......... मला आता लिहिता लिहिता सॉलिड भूक लागली आहे आणि मी ठाण्याच्या रस्त्यांवरुन भरकटतोय..
ठाण्यात मासे खायच्या जागा -ओपन हाउसला 'मालवण' हे एक मस्त हॉटेल आहे. L.B.S. रोड वर असणारे 'सुवर्णदुर्ग' आणि मुलुंड चेकनाकाला असणारे 'सिंधुदुर्ग' सुद्धा बेस्ट. पण ह्या दोघांपेक्षा खोपट S.T. स्टैंडसमोर असलेले 'फिशलैंड' हे माझे जास्त फेवरेट. तसा छोटच आहे पण इकडे गेलात 'कोलंबीभात' ट्राय करा. शिवाय 'बोंबिल फ्राय' ही त्याची स्पेशियालिटी आहे.
बजेट थोडे जास्त असेल तर ठाण्यात बारबेक्यू नेशन लूईसवाडी येथे हायवेला लागूनच आहे. शिवाय मंगलोरियन हॉटेल 'महेश लंच होम' पण वर्तक नगर नाक्याजवळ आहे.
स्टेशन जवळ असलेला एकमेव चांगला वडापाव म्हणजे 'कुंजविहार'. जेंव्हा हे जंबोवड़ा वगैरे आले सुद्धा नव्हते ना तेंव्हा पासून हा जंबोवड़ा बनवतोय. तो सुद्धा एकदम टेस्टी. सोबत एक ग्लास 'लस्सी' घ्यायची आणि मग काय.. अहाहा...
शाळेत, कॉलेजमध्ये असताना तर मी आणि माझा मित्र हर्षदचा हा नित्यक्रम होता. अभ्यास कमी आणि खाद्ययात्रा जास्त. रात्री-बेरात्री अभ्यास सोडून आम्ही कधी वड़ा, तर कधी स्टेशनला मिळणारी पावभाजी, खडाभाजी, बुर्जी खायला जात असू. पहाटे १ नंतर तर त्या 'मटका कुल्फी' वाल्याला शोधायला रस्ता वरुन फिरत तलावपाळीला जायचो. तिकडे तो नक्की सापडायचा. कधीकधी पहाटे ४ वाजता हर्षदच्या घरासमोर असलेल्या चहावाल्याकड़े चहा आणि सोबत खारी किंवा क्रीमरोल खायला.
'प्रिती सँडवीच' बद्दल कोणी लिहिलं नाहिये अजुन?
जांभळीला चिंतांमणीजच्या बाजूला संध्याकाळी ! अहाहा! मसाला टोस्ट, चिलीमिली, क्लब आणि नवीन (हा पण जूना झाला आता) सुरु केलेला मेयोनीज हे प्रकार अप्रतिम असतात.
ह्यांची सगळ्यात पहिली शाखा जांभळी आणि टेंभिनाक्यामध्ये जे SBI ATM आहे त्याच्यासमोर आहे.
ठाण्यात मामलेदारच्या मिसळसाठी खवैयांच्या मनात एक खास जागा आहेच पण कुटीर उद्योगची मिसळही तोडीस-तोड आहे. माझ्यामते तर कांकणभर सरसच...आणि बरोबर त्यांचे खास मसाला दुध...व्वा....खासंच एकदम. त्यान्च्याकडंचे थालिपीठ, कोथंबीर वडी पण छान असतात.
Submitted by श्रद्धादिनेश on 6 August, 2010 - 05:54
भटक्या , तू माझ्या काळात बेडेकरमध्ये होतास असं दिसतंय . १ रु. २५ पैशाला वडापाव मिळायचा . वार्षिक परीक्षा संपल्याचा आनंद केवळ एक वडापाव खाऊन साजरा करण्याचे दिवस होते ते .
गडकरीच्या जवळच महाराष्ट्रीयन थाळी साठी एक जागा होती. "खवय्ये" का? कोल्हापुरी थाळी , गावरान थाळी असे प्रकार मिळायचे. आणी हायक्लास उकडीचे मोदक मिळायचे. ते आहे का अजून?
ठाणा कॉलेजच्या कँटीन मध्ये बटाटा वडा आणी कटलेट फार छान मिळायचं. राजमाताचा वडापाव, जोडीला मिरची ठेचा आणी वर कोकम सोडा. अगदी तों.पा.सु.
"खवय्या" आता भक्तिमंदिर - हरिनिवास चौकातून पुढे ठाणावाला ऑटो येथे गेले आहे. एन. के. जी. एस. बी. बँक विष्णूनगर जवळ गोखले यांचे मंगल आहार एकदा जाऊन पहावे मात्र तेथे बसून खाण्याची व्यवस्था नाही. समर्थ भांडारा समोरील नीळकंठ झेरॉक्स जवळून ठाणे जनता बँकेकडे जाणार्या छोट्या जागेत एक नवीन दुकान आहे तेथील कांदाभजी एकदा पहा. महाराष्ट्र बँक नौपाडा समोर गोखले, मिसळ, मेथी भजी, वडा, साबुदाणा वडा, थालिपीठ इ. साठी एकदा जावे. आइस्क्रीम करिता विष्णुनगर येथे "गारवा", गावदेवी मैदानात जोगदेव यांचे "जनसेवा", न्यू इंग्लिश स्कूल जवळ वैद्य यांचे "टेम्प्टेशन", व पांचपाखाडी डोमिनो जवळ जाधवराव यांचे "नॅचरल".
चुलीवरील मालवणी चिकन राममारुती रोडवरील राजमाता समोर वाघ यांचे आवारात, आणि रेमंड गेट जवळ बिर्याणी, अर्थात हे मी अजून खाऊन बघितले नाही.
Submitted by दिलीप वसंत सामंत on 15 August, 2010 - 00:54
ठाणे ईस्टला असाल तर तुम्हाला 'विजय स्नॅक्स कॉर्नर' >> आहाहा! काय आठवण काढलीत! आत्ता जिथे हे स्नॅक्स कॉर्नर आहे तिथेच समोर पूर्वी विज्याची वडापावची गाडी लागायची. तेव्हा पासून त्याचा वडा पाव, भजी लोकप्रिय आहेत. मागच्याच महिन्यात विज्याचा वडा चोपून आलेय!
मंजू आता मी तुलाच साद घालणार ठाण्यात काही हवं असलं तर टिपटॉपची थाळी विसरलात की लोक.
गेल्या दोन भेटींमधे आवडलेलं ठिकाण म्हणजे " द विलेज" तीन हात नाक्याला. बाजा घातलेल्या असतात. फ्रेश उसाचा रस, मसाला ताक, चाय गरम म्हणत फिरणारा सायकलवाला, चाट्,मारवाडी, पंजाबी फूड, चिंचा आवळे बोरांचा ठेला, आणी अनलिमिटेड बुफे. मधेच कुठेतरी दांडिया सुरू असतो. मेंदीचा स्टॉल, फोक म्युसिक. एकदम मजा येते. थोडं प्रायजी आहे पण सगळ्या फॅमिली बरोबर जाऊन मस्त एंजॉय केलं आम्ही. कधीतरी वेगळं म्हणून छान आहे.
येऊरच्या डोंगरा वरच्या खाऊ गल्ल्या आहेत का अजून मंजू? आलोक हॉटेलच्या जवळ एक जण पॉट आईस्क्रीम घेऊन बसायचे संध्याकाळी. "जनसेवा" नाव होतं का ? छान असायचं ते पण. तलावावर एक फालूदाचा स्टॉल होता. ते पण छान असायचं. तलावाच्याच जवळ जी गल्ली डॉ. प्रधानांच्या बंगल्या कडे जाते तिच्या तोंडावर पूर्वी एक चायनीज रेस्टॉरंट होतं. ते पण छान होतं.
ठाण्या वरून टिटवाळ्या कडे जाण्याच्या रस्त्यावर "चोखी धाणी" पाहिलं. पुढच्या ट्रिपला ट्राय करायचा विचार आहे. कुणी गेलंय का तिकडे?
ईंजिनियरिंग ला असताना अभ्यास करून कंटाळा आला की रात्री बेरात्री चेकनाक्याला मित्रां बरोबर भुर्जी पाव खायला जाणे हा नवर्याचा नेम असे. त्याला विचारून त्याची असली टाईमपास ठिकाणं पण टाकेन नंतर कधीतरी. आम्हाला दोघांनाही खादाडीची आवड आहे. दर ट्रीपला ठरवतो ह्या सगळ्या जुन्या खाऊ गल्ल्यांना भेट द्यायची. काहीच नाही जमलं तर निदान राजमाताची चक्कर हमखास असतेच.
वा मस्तच बीबी. ठाणं माझं सासर. पण आता नवर्यामुळे ह्या सगळ्या ठिकाणांच्या भेटी दर ट्रीप मध्ये होतातच.
साबा साबु एअरपोर्टवर येताना दुर्गाचा वडापाव घेऊन येतात. छानच वाटतं गेल्या गेल्या वडापाव खायला.
मग दुसर्या दिवशी सकाळी शिवाप्रासाद चा इडली डोसा.
खवय्या मस्त आहे. ह्या वेळी आम्ही गेलो होतो तिथे. गावदेवी जवळ एक भेळ पाणीपुरीचं दुकान आहे ते पण मस्तय.
स्वाद चं जेवण छान असतं. आम्ही दोनदा त्यांच्याकडुन घरी जेवण मागवलं होतं. अगदी मीठ लिंबापासून सगळं व्यवस्थित दिलं होतं.
अश्विनी.... खादाडीसाठी सुद्धा भटकावे लागते ना... हेहे.. अरे हे चुलीवरील मालवणी चिकन राममारुती रोडवरील राजमाता समोर वाघ यांचे आवारात >>> बघायला पाहिजेल...
पन्ना ... होय खूप आधीपासून त्याची कमल बुक स्टोरच्या बाजूला गाडी असायची तेंव्हा पासूनचा मी लाईफ टाईम मेंबर...
Submitted by सेनापती... on 16 August, 2010 - 21:24
मायबोली गणेशोत्सव
मायबोली गणेशोत्सव २००९

मायबोली गणेशोत्सव २००९ घेऊन येत आहे विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि बरीच धमाल...
"पर्यावरण - सकारात्मक आणि नकारात्मक", "कृष्णधवल अर्थातच ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी", "रंगपेटी उघडू चला..!!!", "नाव विदेशी-चव देशी" ह्याबद्दल आपण जाणताच.
ह्याशिवाय अजून काय आहे माहित आहे ????
येतय काही लक्षात ?
अधिक माहिती लवकरच....
मटण मसाला रस्सा, सुका मटण,
मटण मसाला रस्सा, सुका मटण, चिंबोरीमसाला, बिर्याणीराईस इत्यादीकरता चेकनाक्याजवळचं सिंधुदुर्ग हॉटेल छान आहे..
तात्या.
बेडेकर शाळेसमोर ठोसर काकांचा
बेडेकर शाळेसमोर ठोसर काकांचा वडापाव्...पण तो फक्त शाळेच्या वेळातच मिळतो..
कुंजविहारचा जम्बो वडापाव
कुंजविहारचा जम्बो वडापाव अजूनही जोमाने सुरु आहे....
काही महिन्यांपूर्वी ठाण्यामधल्या खादाडी जागांवर थोडे लिखाण केले होते... त्यातल्या काही नोंदी .. 
ठाणे ईस्टला असाल तर तुम्हाला 'विजय स्नॅक्स कॉर्नर' नक्की माहीत असेल. तसेच अजून एक दुकान आहे ठाणे महानगरपालिका शाळा क्र. ९ समोरच्या गल्लीमध्ये. काही वर्षात हा सुद्धा दुकान बनवेल बहुदा...
ठाणे वेस्ट मध्ये 'दुर्गा स्नॅक्स कॉर्नर' (गोखले रोड), 'गजानन वडेवाला' (विष्णूनगर), 'राजमाता' (राममारुती रोड) आणि माझे सध्याचे सर्वात आवडते 'श्रद्धा वडेवाला' (घंटाळी) ही काही चवदार वडे मिळण्याची ठिकाणे.
तुम्ही जर एकदम हार्डकोर 'कटलेट' फॅन असाल तर मात्र तुम्हाला गोखले रोडवर गावदेवी मंदिरासमोरच्या गल्लीमध्ये असलेल्या कटलेटवाल्याकडे जायला हवे. हल्लीच नाव बदलले आहे त्याने पण ते आधी 'रचना स्नॅक्स' ह्या नावाने ओळखले जायचे.
'चाट'साठी माझे आवडते ठिकाण म्हणजे स्टेशनजवळ आंबेडकर रोडवर असलेल्या जगदीश बुक डेपो शेजारी. असली जबरी 'पाणीपुरी' बनवतो ना तो. शिवाय दहीपूरी, रगडापॅटिस, भेळ, शेवपूरी हे सुद्धा मस्त मिळतात त्याच्याकड़े. राममारुती रोड वर असलेले 'इव्हिनिंग स्पॉट' हा सुद्धा मस्त चाट कोर्नर आहे. मात्र थंड पाणीपूरी खायची असेल तर 'प्रशांत कोर्नर' मस्त आहे.
आइसक्रीमसाठी एक मस्त दुकान
आइसक्रीमसाठी एक मस्त दुकान आहे ते म्हणजे 'गोखले' यांचे. ह्यांच्याकड़े 'गुलकंद आइसक्रीम' नक्की ट्राय करून बघा. बदामाच्या पानामधले ५०-१०० ग्राम आइसक्रीम खायचो तसे आइसक्रीम अजून सुद्धा तळ्यावर मिळते. तिकडेच थोड़े बाजूला तलावपाळीला 'श्रद्धा फालूदा'वाला सुद्धा आहेच.
तुम्ही जर घोडबंदर रोडच्या आसपास असाल तर मानपाड्याला बिकानेर वाल्याकड़े मिरची वडा, 'काजू समोसा', 'दही कचोरी' आणि 'जिलेबी' अफलातून मिळते.
.......... मला आता लिहिता लिहिता सॉलिड भूक लागली आहे आणि मी ठाण्याच्या रस्त्यांवरुन भरकटतोय..
ऋचा... आपण बेडेकरच्या
ऋचा... आपण बेडेकरच्या दिसता...
बेडेकर शाळेसमोर ठोसर काकांचा वडापाव्...अहाहा.. शाळेच्या दिवसांची आठवण आली... तेंव्हा वडापाव १ रुपया २५ पैसे आणि भजी पाव ७५ पैश्याला मिळायचा तिकडे...
अरे वा. इथे जाग आहे
अरे वा. इथे जाग आहे
कुंजविहारचा जम्बो वडापाव >> एकदम आठवण आली.
ठाण्यात मासे खायच्या जागा
ठाण्यात मासे खायच्या जागा -ओपन हाउसला 'मालवण' हे एक मस्त हॉटेल आहे. L.B.S. रोड वर असणारे 'सुवर्णदुर्ग' आणि मुलुंड चेकनाकाला असणारे 'सिंधुदुर्ग' सुद्धा बेस्ट. पण ह्या दोघांपेक्षा खोपट S.T. स्टैंडसमोर असलेले 'फिशलैंड' हे माझे जास्त फेवरेट. तसा छोटच आहे पण इकडे गेलात 'कोलंबीभात' ट्राय करा. शिवाय 'बोंबिल फ्राय' ही त्याची स्पेशियालिटी आहे.
बजेट थोडे जास्त असेल तर ठाण्यात बारबेक्यू नेशन लूईसवाडी येथे हायवेला लागूनच आहे. शिवाय मंगलोरियन हॉटेल 'महेश लंच होम' पण वर्तक नगर नाक्याजवळ आहे.
स्टेशन जवळ असलेला एकमेव
स्टेशन जवळ असलेला एकमेव चांगला वडापाव म्हणजे 'कुंजविहार'. जेंव्हा हे जंबोवड़ा वगैरे आले सुद्धा नव्हते ना तेंव्हा पासून हा जंबोवड़ा बनवतोय. तो सुद्धा एकदम टेस्टी. सोबत एक ग्लास 'लस्सी' घ्यायची आणि मग काय.. अहाहा...
शाळेत, कॉलेजमध्ये असताना तर मी आणि माझा मित्र हर्षदचा हा नित्यक्रम होता. अभ्यास कमी आणि खाद्ययात्रा जास्त. रात्री-बेरात्री अभ्यास सोडून आम्ही कधी वड़ा, तर कधी स्टेशनला मिळणारी पावभाजी, खडाभाजी, बुर्जी खायला जात असू. पहाटे १ नंतर तर त्या 'मटका कुल्फी' वाल्याला शोधायला रस्ता वरुन फिरत तलावपाळीला जायचो. तिकडे तो नक्की सापडायचा. कधीकधी पहाटे ४ वाजता हर्षदच्या घरासमोर असलेल्या चहावाल्याकड़े चहा आणि सोबत खारी किंवा क्रीमरोल खायला.
'प्रिती सँडवीच' बद्दल कोणी
'प्रिती सँडवीच' बद्दल कोणी लिहिलं नाहिये अजुन?
जांभळीला चिंतांमणीजच्या बाजूला संध्याकाळी ! अहाहा! मसाला टोस्ट, चिलीमिली, क्लब आणि नवीन (हा पण जूना झाला आता) सुरु केलेला मेयोनीज हे प्रकार अप्रतिम असतात.
ह्यांची सगळ्यात पहिली शाखा जांभळी आणि टेंभिनाक्यामध्ये जे SBI ATM आहे त्याच्यासमोर आहे.
ठाण्यात मामलेदारच्या मिसळसाठी
ठाण्यात मामलेदारच्या मिसळसाठी खवैयांच्या मनात एक खास जागा आहेच पण कुटीर उद्योगची मिसळही तोडीस-तोड आहे. माझ्यामते तर कांकणभर सरसच...आणि बरोबर त्यांचे खास मसाला दुध...व्वा....खासंच एकदम. त्यान्च्याकडंचे थालिपीठ, कोथंबीर वडी पण छान असतात.
वा! बरेच ठाणेकर आहेत की
वा! बरेच ठाणेकर आहेत की
भटक्या , तू माझ्या काळात
भटक्या , तू माझ्या काळात बेडेकरमध्ये होतास असं दिसतंय . १ रु. २५ पैशाला वडापाव मिळायचा .
वार्षिक परीक्षा संपल्याचा आनंद केवळ एक वडापाव खाऊन साजरा करण्याचे दिवस होते ते . 
संपदा.. मी १९९८ साली १० वी
संपदा.. मी १९९८ साली १० वी उत्तीर्ण झालो... (कशी ते माहित नाही..) तू कधी झालीस??
ए, ह्या गप्पा ठाणे बाफवर मारा
ए, ह्या गप्पा ठाणे बाफवर मारा
इथे फक्त खादाडी
इथे फक्त खादाडी
कोणी हॉटेल वसंतमध्ये
कोणी हॉटेल वसंतमध्ये (गडकरीच्या जरा पुढे) बनाना उतप्पा खाऊन पहिला आहे का?? नक्की खाऊन बघा ... आणायला थोडा वेळ लावेल पण खाऊन बघाच...
आणि हो.. 'घंटाळी'मध्ये असलेले
आणि हो.. 'घंटाळी'मध्ये असलेले पुरेपूर कोल्हापूर माहित आहे ना??? नक्की जा.. धनगर चिकन खाऊन बघा...
भटक्या आत्ता नुसते ऐकते आहे.
भटक्या आत्ता नुसते ऐकते आहे.
ठाण्यात रहायला परत आले की जायला पाहिजे.
गडकरीच्या जवळच महाराष्ट्रीयन
गडकरीच्या जवळच महाराष्ट्रीयन थाळी साठी एक जागा होती. "खवय्ये" का? कोल्हापुरी थाळी , गावरान थाळी असे प्रकार मिळायचे. आणी हायक्लास उकडीचे मोदक मिळायचे. ते आहे का अजून?
ठाणा कॉलेजच्या कँटीन मध्ये बटाटा वडा आणी कटलेट फार छान मिळायचं. राजमाताचा वडापाव, जोडीला मिरची ठेचा आणी वर कोकम सोडा. अगदी तों.पा.सु.
भटक्या, तुझा आय. डी. खरंतर
भटक्या, तुझा आय. डी. खरंतर पक्का खादाड करायला हवास तू !
प्राडी, आहे आहे
प्राडी, आहे आहे
"खवय्या" आता भक्तिमंदिर -
"खवय्या" आता भक्तिमंदिर - हरिनिवास चौकातून पुढे ठाणावाला ऑटो येथे गेले आहे. एन. के. जी. एस. बी. बँक विष्णूनगर जवळ गोखले यांचे मंगल आहार एकदा जाऊन पहावे मात्र तेथे बसून खाण्याची व्यवस्था नाही. समर्थ भांडारा समोरील नीळकंठ झेरॉक्स जवळून ठाणे जनता बँकेकडे जाणार्या छोट्या जागेत एक नवीन दुकान आहे तेथील कांदाभजी एकदा पहा. महाराष्ट्र बँक नौपाडा समोर गोखले, मिसळ, मेथी भजी, वडा, साबुदाणा वडा, थालिपीठ इ. साठी एकदा जावे. आइस्क्रीम करिता विष्णुनगर येथे "गारवा", गावदेवी मैदानात जोगदेव यांचे "जनसेवा", न्यू इंग्लिश स्कूल जवळ वैद्य यांचे "टेम्प्टेशन", व पांचपाखाडी डोमिनो जवळ जाधवराव यांचे "नॅचरल".
चुलीवरील मालवणी चिकन राममारुती रोडवरील राजमाता समोर वाघ यांचे आवारात, आणि रेमंड गेट जवळ बिर्याणी, अर्थात हे मी अजून खाऊन बघितले नाही.
ठाणे ईस्टला असाल तर तुम्हाला
ठाणे ईस्टला असाल तर तुम्हाला 'विजय स्नॅक्स कॉर्नर' >> आहाहा! काय आठवण काढलीत! आत्ता जिथे हे स्नॅक्स कॉर्नर आहे तिथेच समोर पूर्वी विज्याची वडापावची गाडी लागायची. तेव्हा पासून त्याचा वडा पाव, भजी लोकप्रिय आहेत. मागच्याच महिन्यात विज्याचा वडा चोपून आलेय!
मंजू आता मी तुलाच साद घालणार
मंजू आता मी तुलाच साद घालणार ठाण्यात काही हवं असलं तर
टिपटॉपची थाळी विसरलात की लोक.
गेल्या दोन भेटींमधे आवडलेलं ठिकाण म्हणजे " द विलेज" तीन हात नाक्याला. बाजा घातलेल्या असतात. फ्रेश उसाचा रस, मसाला ताक, चाय गरम म्हणत फिरणारा सायकलवाला, चाट्,मारवाडी, पंजाबी फूड, चिंचा आवळे बोरांचा ठेला, आणी अनलिमिटेड बुफे. मधेच कुठेतरी दांडिया सुरू असतो. मेंदीचा स्टॉल, फोक म्युसिक. एकदम मजा येते. थोडं प्रायजी आहे पण सगळ्या फॅमिली बरोबर जाऊन मस्त एंजॉय केलं आम्ही. कधीतरी वेगळं म्हणून छान आहे.
येऊरच्या डोंगरा वरच्या खाऊ गल्ल्या आहेत का अजून मंजू? आलोक हॉटेलच्या जवळ एक जण पॉट आईस्क्रीम घेऊन बसायचे संध्याकाळी. "जनसेवा" नाव होतं का ? छान असायचं ते पण. तलावावर एक फालूदाचा स्टॉल होता. ते पण छान असायचं. तलावाच्याच जवळ जी गल्ली डॉ. प्रधानांच्या बंगल्या कडे जाते तिच्या तोंडावर पूर्वी एक चायनीज रेस्टॉरंट होतं. ते पण छान होतं.
ठाण्या वरून टिटवाळ्या कडे जाण्याच्या रस्त्यावर "चोखी धाणी" पाहिलं. पुढच्या ट्रिपला ट्राय करायचा विचार आहे. कुणी गेलंय का तिकडे?
ईंजिनियरिंग ला असताना अभ्यास करून कंटाळा आला की रात्री बेरात्री चेकनाक्याला मित्रां बरोबर भुर्जी पाव खायला जाणे हा नवर्याचा नेम असे. त्याला विचारून त्याची असली टाईमपास ठिकाणं पण टाकेन नंतर कधीतरी. आम्हाला दोघांनाही खादाडीची आवड आहे. दर ट्रीपला ठरवतो ह्या सगळ्या जुन्या खाऊ गल्ल्यांना भेट द्यायची. काहीच नाही जमलं तर निदान राजमाताची चक्कर हमखास असतेच.
वा मस्तच बीबी. ठाणं माझं
वा मस्तच बीबी. ठाणं माझं सासर. पण आता नवर्यामुळे ह्या सगळ्या ठिकाणांच्या भेटी दर ट्रीप मध्ये होतातच.
साबा साबु एअरपोर्टवर येताना दुर्गाचा वडापाव घेऊन येतात. छानच वाटतं गेल्या गेल्या वडापाव खायला.
मग दुसर्या दिवशी सकाळी शिवाप्रासाद चा इडली डोसा.
खवय्या मस्त आहे. ह्या वेळी आम्ही गेलो होतो तिथे. गावदेवी जवळ एक भेळ पाणीपुरीचं दुकान आहे ते पण मस्तय.
स्वाद चं जेवण छान असतं. आम्ही दोनदा त्यांच्याकडुन घरी जेवण मागवलं होतं. अगदी मीठ लिंबापासून सगळं व्यवस्थित दिलं होतं.
जस्ट पराठाज कुठे आहे?
जस्ट पराठाज घंटाळी मैदानाच्या
जस्ट पराठाज घंटाळी मैदानाच्या समोर होतं. अजुन चालु आहे की बंद झालय ते माहित नाही.
वागळे ईस्टेटला पासपोर्ट ऑफिसच्या थोडं पुढे फ्युजन ढाबा नावाचं नवीन रेस्टॉरंट चालु झालय. तिथेही नॉन व्हेन पदार्थ चांगले मिळतात.
बेडेकर हॉस्पिटलच्या लेनमध्ये व्हेज ट्रीट नावाचं नवीन हॉटेल चालु झालय, अजुन तरी गेलो नाहीय पण त्याचे ही रिपोर्टस चांगले आहेत.
"जस्ट पराठाज" बंद होऊन तेथेच
"जस्ट पराठाज" बंद होऊन तेथेच "पुरेपूर कोल्हापूर" हे नवीन हॉटेल चालू झाले आहे व तेही चिकन मटन यासाठी प्रसिद्ध आहे असे ऐकले आहे, अजून तेथे गेलो नाही.
तळ्यावर अजूनही फालुदा आहे
तळ्यावर अजूनही फालुदा आहे की... 'साईश्रद्धा' फालुदा खावा अशी झाल्कास जागा. संध्याकाळी ७ च्या आधी गेलात तर फक्त रबडी फालुदा सुद्धा मिळतो.
अश्विनी.... खादाडीसाठी सुद्धा
अश्विनी.... खादाडीसाठी सुद्धा भटकावे लागते ना...
हेहे.. अरे हे चुलीवरील मालवणी चिकन राममारुती रोडवरील राजमाता समोर वाघ यांचे आवारात >>> बघायला पाहिजेल...

Pages