माझ्या आजीची देवावर खुप श्रद्धा. तिचा देव्हारा बघणं म्हणजे घरी आलेल्या सगळ्यांच्या कौतुकाचा विषय असायचा. तिचं नेहमी म्हणणं असायाचं आपल्याला कसे चांगले चांगले कपडे, दागिने घालायला आवडतं तसचं देवालाही ते आवडतं. म्हणुन ती तिच्या देव्हार्यातल्या सगळ्या देवांच्या मूर्तींना वस्त्रे आणि दागिने घालायची. त्यावरुनच मला एकदा सुचलं की तू इतके महागाची वस्त्रे विकत आणण्यापेक्षा मी तुला शिवुन देईन. तेव्हापासुन मी दर सुट्टीत मामाकडे गेले कि आजीला वर्षभर पूरतील इतकी वस्त्रे शिवुन घ्यायचे. त्यातही सणासुदीला वेगळे, रोजचे वेगळे असे प्रकार होते.
इथे माझ्याकडे ४-५च देवांच्या मूर्ती आहेत. म्हणुन माझ्याकडे काही मोजकीच आणि मोजक्याच टाईपची वस्त्रे आहेत. ही सगळी वस्त्रे मी रेशमी किंवा काठाच्या साड्याच्या ब्लॉऊजच्या उरलेल्या कापडातुन शिवलेली आहेत.
ही बैठक, देवांखाली अंथरायला. हे आधी शिवुन घेतलं आणि मग त्याला टिकल्या चिटकवल्या.
आणि हि काही वस्रे.
शेवटी माझ्या देव्हार्यातला बाळकृष्ण.
देवाची वस्त्रे
Submitted by मिनी on 4 August, 2010 - 10:11
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मिनी खरच किती सुंदर केलीस ग
मिनी खरच किती सुंदर केलीस ग वस्त्र. अजुन केलीस की परत टाक फोटो.
सुंदर आहेत सगळीच वस्त्रे.
सुंदर आहेत सगळीच वस्त्रे.
निंबे बाळकृष्ण अगदी गोड दिसतोय..
बाप्पाचा वॉर्डरोब एकदम झक्कास
बाप्पाचा वॉर्डरोब एकदम झक्कास डिझायनरच्या मनात नक्की भक्तीभाव असणार.
अगदी गोड आहेत सगळी वस्त्रे.
अगदी गोड आहेत सगळी वस्त्रे.
माझी इथली शेजारीण हिवाळ्याची अन उन्हाळ्याची वेगवेगळी वस्त्रे शिवत असते तिच्या गोपालजींसाठी. हिवाळ्याची लोकरीची वस्त्रे, गोधड्या, छोटे ब्लँकेट्स वैगरेचे सेट पण आहेत तिच्याकडे.
बाप्पाचा वॉर्डरोब >>> छान
बाप्पाचा वॉर्डरोब >>> छान कल्पना
गुजराथी लोकांमध्ये असे बालाजी (त्यांच्याकडे गोपाळकृष्णाला बालाजी का म्हणतात? ) ला कपडे व अलंकार घालून सजवायची पद्धत असते, असे पाहिले आहे.
मध्ये विपत्रातून माहीती आली होती की थंडीत सारसबागेच्या गणपतीच्या मूर्तीला स्वेटर वै. घालतात म्हणून. खरे आहे का हे?
गुजरातेत ठाकुरजी म्हणतात ना?
गुजरातेत ठाकुरजी म्हणतात ना? बालाजी दक्षिणेकडे ना?
वाह किती मस्त वस्त्रे आहेत..
वाह किती मस्त वस्त्रे आहेत.. सुंदर
दिनेशदांना अनुमोदन...
बालाजी दक्षिणेकडे ना? >>> अगं
बालाजी दक्षिणेकडे ना?
>>>
अगं हो बालाजी म्हणजे दक्षिणेकडचा तीरुपती बालाजी . म्हणूनच मला हा प्रश्न पडतो की गुजराथी लोक गोपाळकृष्णाला बालाजी का म्हणतात? माझी एक ढोलकीया म्हणून एक गुजराथी मैत्रिण आहे. ते लोक बालाजीच म्हणतात.
बहुतेक राजस्थानचे लोक गोपाळकृष्णाला ठाकुरजी म्हणतात आणि शंकराला एकलिंगजी म्हणतात.
मस्त आहेत वस्त्रे! माझी मावशी
मस्त आहेत वस्त्रे! माझी मावशी असे बरेच काही शिवत असते हौसेहौसेने! जर फोटो मिळाले त्याचे तर अवश्य टाकेन .. निंबुडा, तो बाळकृष्ण कसला नटलाय गं!
सुंदर शिवली आहेत वस्त्रं.
सुंदर शिवली आहेत वस्त्रं.
सुंदर आहेत एकदम!
सुंदर आहेत एकदम!
खुपच छान आहेत सग्ळीच वस्त्रे,
खुपच छान आहेत सग्ळीच वस्त्रे, आणि ब्लाउजपिस च्या उरलेल्या तुकड्यातुन शिवण्याची कल्पना पण छानच.
ड्रेस बरोबर आलेल्या sleeves पण वापरता येतील.
मस्तच मिनी!!!
मस्तच मिनी!!!
मस्तच एकदम !!
मस्तच एकदम !!
खूपच छान!
खूपच छान!
क्युट आहेत
क्युट आहेत
फार गोड आहेत वस्त्रं. तुझ्या
फार गोड आहेत वस्त्रं. तुझ्या देवांनाही ती घालून मिरवायला खूप आवडत असणार
Pages