प्रवेशिका - ४३ ( prasad_shir - देव जर ह्रदयात नाही... )

Submitted by kaaryashaaLaa on 13 October, 2008 - 23:48


देव जर ह्रदयात नाही
देव अस्तित्वात नाही

आसवे सांभाळ येथे
सौख्य हे स्वर्गात नाही!

जानवे घाला न घाला
जात काही जात नाही...

फोल भाषा चांदण्याची
हास्य जर ओठात नाही

सत्य हर दगडात आहे
फक्त गाभार्‍यात नाही

उत्तरांचा दोष कोठे?
दम तुझ्या प्रश्नात नाही!

वेळ का ही भेटण्याची?
चांद नाही... रात नाही...

पत्रिका शह देत गेली
मानली मी मात नाही

टाकले सर्वस्व मागे
फक्त माझी कात नाही...

दंगलींना धर्म जाती...
वेदनांना जात नाही...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खास म्हणजे खासच!!!
जात.. एक नंबर! गाभार्‍याचाही मस्त जमलाय!
रात आणि कात.. सुरेख!
एकंदरीत पूर्ण गजलच खास! Happy

खूप छान!
वेळ का ही भेटण्याची?
चांद नाही... रात नाही...

पत्रिका शह देत गेली
मानली मी मात नाही

दंगलींना धर्म जाती...
वेदनांना जात नाही...

हे शेर आवडले. 'पत्रिका' ज्योतिषाची की निमंत्रणाची? Happy पण कोणत्याही अर्थाने घेतलं तरी शेर सुंदरच दिसतो.
'कात टाकण्याचा' शेर नेमका कळला असं वाटलं नाही.
माझ्या मते ७ गुण.
-सतीश

मानली मी मात नाही

वेदनांना जात नाही...

हे मस्तच

७ गुण

"सत्य हर दगडात आहे
फक्त गाभार्‍यात नाही"

८ गुण..

उत्तम गझल!
आसवे, जात, रात हे शेर विशेष.
माझे - ७.

जात, गाभारा आणि मक्ता आवडले. पत्रिकेचाही छान!

माझे ८...
सहज आणि मस्त जमून आलेत शेर...
*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||

८ गुण
==================
अहिंसा....
जय जवान जय किसान....

जात आणि मात आवडले...

माझे ६ गुण..